तक्रार दाखल दिनांक – 20/03/2009 निकालपञ दिनांक – 29/05/2010 कालावधी - 01 वर्ष 02महिने 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर तक्रार क्रमांक – 131/2009 श्री.सुहास माधव बैतमंगलकर रा. विम्बलडन पार्क बिल्डींग नं 02/204 , जे.के स्कुल विरुध्द, पी.के रोड, ठाणे (पश्चिम). तक्रार क्रमांक – 174/2009 सौ. रत्ना गजानन भावसार रा. 18/A, श्री श्रृष्टी अपार्टमेंट महर्षी बालमिकी रोड, बिम्स स्कुल समोर, ठाणे(पु) 400 603. तक्रार क्रमांक – 175/2009 गजानन दत्तात्रय भावसार रा 18/A, श्री. श्रृष्टी अपार्टमेंट .. तक्रारदार महर्षी बालमिकी रोड, बिम्स स्कुल समोर, ठाणे(पु) 400 603. तक्रार क्रमांक – 176 /2009 गिता सुहास बैतमंगलकर विमल्डन पार्क बिल्डींग नं. 2/204, जे.के स्कुल जवळ, पी.के.रोड. ठाणे (पश्चिम). तक्रार क्रमांक – 177 /2009 कदमबाला इंदिरा अधिनारायन रा. रिध्दी 4, मुकुंद रेसिडेंन्सीयन कॉलनी, मुकुंद लि,. ठाणे बेलापुर रोड, कलवा, ठाणे 400 605. तक्रार क्रमांक – 178/2009 सुमनकुमार भागवतचव्हान जेना रा. ए विंग, 105, मिनिस्ट्री अपार्टमेंट, पारसी पंचायत रोड, अंधेरी(पुर्व). मुंबई.
.. 2 .. तक्रार क्रमांक – 179/2009 अंबिका प्रसन्ना नायक रा. फ्लॅट नं. 204, दुसरा मजला, पुष्पा को.ऑप. हॉ. सो, मेहबुद फोटो स्टुडियो हिल रोड जवळ, बांद्र(पुर्व) मुंबई. तक्रार क्रमांक – 180/2009 विनित भिमराज अग्रवाल रा. फ्लॅट नं. 103, शुशिल रेसिडेंन्सी, गार्डन हॉटेल जवळ, पनवेल, नवी मुंबई. तक्रार क्रमांक – 188/2009 श्री. गुलाबराव केरुबा खरात रा. चंदानी कोलीवाडा, मिथबंदर रोड, अशोक नाखवलचाऊल, राशिका डेकोरेशन जवळ, ठाणे (पुर्व). ..तक्रारदार विरूध्द संस्कृति मार्केटिंग प्रा., लि., प्रो. संदीप जाधव रा. ज्योतस्ना प्रकाश बिल्डींग, पहिला मजला, सम्राट मेडिकलच्या वरती , स्टेशन रोड, गोरेगाव(पुर्व), मुंबई 400 603. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्रिसायडींग मेंबर श्री. पी. एन. शिरसाट - मेंबर उपस्थितीः- त.क तर्फे वकील वाघमारे वि.प एकतर्फा एकत्रीत आदेश (पारित दिः 29/05/2010) मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार क्र.131/2009, 174/2009, 175/2009 176/2009, 177/2009, 178/2009, 179/2009, 180/2009, 188/2009 या अनुक्रमे श्री.सुहास बैतमंगलकर, सौ.रत्ना भावसार, श्री.गजानन भावसार, सौ.गीता बैतमंगलकर, सौ.इंदिरा कदमबाला, श्री.सुमनकुमार जैन, इ. संस्कृती मार्केटिंग प्रा.लि., यांचे विरुध्ध्द त्यांनी गुंतवणुक केलेल्या रकमेची दरमहा व्यातासकट येणारी व 5 वर्षाच्या मुदतीनंतर मुदत ठेवीच्या एकंदर रकमेची मागणी केली आहे.
2. विरुध्द पक्षकार हे IRONORE निर्यात करण्याचा धंदा करतात त्यांनी त्यांची धंद्यासाठी मशीनरी व जागा खरेदी करण्यास दुस-या कंपनीला .. 3 .. म्हणजे मूळ संस्कृती मार्केटिंग प्रा.लि.,कं. यांनी iron-ore जादा नफा कमवण्यास दुस-या कंपनीस विकले त्यासाठी सदर कंपनी विविध इन्व्हेस्टमेन्टच्या स्कीम राबवत होती त्यापैकी सदर स्कीममध्ये रु.1,00,000/- (1 लाख) इन्व्हेस्टमेंट केल्यास दरमहा रु.20,000/- एवढया रकमेचा चेक 5 वर्षापर्यंत दरमहा विरुध्द पक्षकार हे तक्रारकर्ता यांना देणार व मुदत संपल्यावर इन्व्हेस्ट केलेली मुळ रक्कम तक्रारकर्ता यांना पुर्ण देण्यात येणार होती म्हणुन वरील सर्व तक्रारदारांनी तत्सम त्यांच्या रकमा विरुध्द पक्षकार यांच्याकडे इन्व्हेस्ट केल्या होत्या व तत्सम करारनामे केले होते परंतु विरुध्द पक्षकार यांनी काढलेल्या स्कीमप्रमाणे कोणत्याही अटीची पुर्तता करारनामे करुन व पावत्या दिल्या असतानाही विरुध्द पक्षकार यांनी तदनंतर केली नाही. म्हणुन तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ता यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा खालील तक्तयामध्ये तपशील दिला आहे. तक्रार क्र. व तक्रारदाराचे नाव | जाहिरातीप्रमाणे करारनामा केल्याच्या तारखा | जाहिराती प्रमाणे गुंतवणुक केलेली रक्कम मुदत 5 वर्षे | वि.प कडुन दरमहा येणे असलेली रक्कम 5 वर्षापर्यंत | वि.प.कडुन 5 वर्षे मुदतीपर्यंत बाकी येणे असलेल्या खालील रक्कमेचे धनादेश तत्सम करारनाम्याप्रमाणे | 131/2009 श्री.सुहास माधव बैतमंगलकर | दि.07/07/07 दि07/07/07 Bk.statement | रु.1,00,000 रु.1,00,000 | रु.20,000 रु.20,000 | रु.13,00,000 रु.13,00,000 | 174/2009 सौ.रत्ना गजानन भावसार | दि.29/05/07 दि.06/06/07 M.O.U | रु.1,00,000 रु 1,00,000 | रु.20,000 रु.20,000 | रु.13,00,000 रु.13,00,000
| 175/2009 श्री.गजानन दत्तात्रय भावसार | दि.21/07/07 दि.21/07/07 | रु.1,00,000 रु.1,00,000 | रु.20,000 रु.20,000 | रु.13,00,000 रु.13,00,000 | 176/2009 सौ.गीता सुहास बैतमंगलकर | दि.07/07/07 | रु.1,00,000 | रु.20,000 | रु.13,00,000 | 177/2009 सौ.इंदिरा अदिनारायण कदमबाला | Bk. Statement dt.26/06/07 | रु.1,00,000
.. 4 .. | रु.20,000 | रु.13,00,000
| तक्रार क्र. व तक्रारदाराचे नाव | जाहिरातीप्रमाणे करारनामा केल्याच्या तारखा | जाहिराती प्रमाणे गुंतवणुक केलेली रक्कम मुदत 5 वर्षे | वि.प कडुन दरमहा येणे असलेली रक्कम 5 वर्षापर्यंत | वि.प.कडुन 5 वर्षे मुदतीपर्यंत बाकी येणे असलेल्या खालील रक्कमेचे धनादेश तत्सम करारनाम्याप्रमाणे | 178/2009 श्री.सुमनकुमार भगवतीचव्हाण जेना | दि.08/06/07 दि.08/07/07 | रु.1,00,000 रु.1,00,000
| रु.20,000 रु.20,000 | रु.13,00,000 रु.13,00,000
| 179/2009 श्री.अंबिका प्रसन्न नायक | दि.27/06/07 | रु.1,00,000 | रु.20,000 | रु.13,00,000 | 180/2009 श्री.विनित भिमराज आग्रवाल | Memorandum of understanding with receipt dt. 26/06/07 | रु.1,00,000 | रु.20,000 | रु.13,00,000 | 188/2009 श्री.गुलाबराव केरुबा खरात | दि.19/07/07 | रु.1,00,000 | रु.20,000 | रु.13,00,000 |
विरुध्द पक्षकार यांना मंचाने नोटीस बजावणी, पेपर पब्लीकेशन करुनही ते हजर राहीले नाहीत व त्यांनी त्यांची लेखी कैफीयत दाखल केलेली नाही. त्यामुळे मंचाने त्यांच्या विरुध्द दि.02/03/2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला. मंचाच्या मते विरुध्द पक्षकार हे त्यांनी काढलेल्या स्कीम मधील अटींची व नियमांची पुर्तता करण्यास जबाबदार असल्यामुळे ते ठरलेल्या करारनाम्यानुसार सदर अटींची पुर्तता करण्यास बांधील आहेत. म्हणुन हे मंच पुढील प्रमाण एकतर्फा अंतिम आदेश पारीत करत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र.131/2009, 174/2009, 175/2009 176/2009, 177/2009, 178/2009, 179/2009, 180/2009, 188/2009 अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) प्रत्येक तक्रारदारास विरुध्द पक्षकार यांनी द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी वरील सर्व तक्रारीमधील मागणीप्रमाणे तक्रारदारस उभयपक्षात झालेल्या तत्सम करारनाम्यानुसार खालीलप्रमाणे एकंदर रक्कमेचे धनादेश द्यावेत. .. 5 .. तक्रार क्र. व तक्रारदाराचे नाव | जाहिरातीप्रमाणे करारनामा केल्याच्या तारखा | वि.प.यांनी तक्रारक र्तास खालील एकुण रक्कमेचे धनादेश द्यावे. | 131/2009 श्री.सुहास माधव बैतमंगलकर | दि.07/07/07 दि07/07/07 Bank Statement | रु.13,00,000 रु.13,00,000 | 174/2009 सौ.रत्ना गजानन भावसार | दि.29/05/07 दि.06/06/07 Memorandum of understanding | रु.13,00,000 रु.13,00,000
| 175/2009 श्री.गजानन दत्तात्रय भावसार | दि.21/07/07 दि.21/07/07 | रु.13,00,000 रु.13,00,000 | 176/2009 सौ.गीता सुहास बैतमंगलकर | दि.07/07/07 | रु.13,00,000 | 177/2009 सौ.इंदिरा अदिनारायण कदमबाला | Bank Statement dt.26/06/07 | रु.13,00,000 | 178/2009 श्री.सुमनकुमार भगवतीचव्हाण जैना | दि.08/06/07 दि.08/07/07 | रु.13,00,000 रु.13,00,000
| 179/2009 श्री.अंबिका प्रसन्न नायक | दि.27/06/07 | रु.13,00,000 | 180/2009 श्री.विनित भिमराज आग्रवाल | Memorandum of understanding with receipt dt. 26/06/07 | रु.13,00,000 | 188/2009 श्री.गुलाबराव केरुबा खरात | दि.19/07/07 | रु.13,00,000 |
3.विरुध्द पक्षकार यांनी वरील आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत करावे.
.. 6 .. 4.तक्रारीतील सर्व तक्रारकर्ता यांस मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी प्रत्येकी रु.1,000/- (रु. एक हजार फक्त) द्यावेत. 5.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 29/05/2010 ठिकान - ठाणे
(सौ. भावना पिसाळ) (श्री.पी.एन.शिरसाट) प्रिसायडींग मेंबर मेंबर
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|