Maharashtra

Nagpur

CC/487/2021

SHRI. KRUSHNAJI JANGLUJI SONDAWLE - Complainant(s)

Versus

SANSKRUTI MAHILA RURAL CO-OP. CREDIT SOCIETY LTD. NAGPUR - Opp.Party(s)

ADV. AMOL D. PATIL

16 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/487/2021
( Date of Filing : 31 Aug 2021 )
 
1. SHRI. KRUSHNAJI JANGLUJI SONDAWLE
R/O. OLD BAGADGANJ, NAGPUR-08
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SANSKRUTI MAHILA RURAL CO-OP. CREDIT SOCIETY LTD. NAGPUR
SHOP NO.1, VINOBA NAGAR, KHAWASE COMPLEX, GONHI SIM, UMRER ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SANSKRUTI MAHILA RURAL CO-OP. CREDIT SOCIETY LTD. NAGPUR THROUGH PRESIDENT/SECRETARY MISS. SHEETAL ANIL APTURKAR
R/O. NEW BAHADURA VASTI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. SANSKRUTI MAHILA RURAL CO-OP. CREDIT SOCIETY LTD. NAGPUR THROUGH PRESIDENT/SECRETARY MR. ANIL NAMDEORAO APTURKAR
R/O. NEW BAHADURA VASTI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
PRESENT:ADV. AMOL D. PATIL, Advocate for the Complainant 1
 
Dated : 16 Feb 2022
Final Order / Judgement

मा. अध्‍यक्षश्री. संजय वा. पाटीलयांच्‍या आदेशान्‍वये

  1. तक्रारकर्ते यांनी सदर तकार ग्राहक सरंक्षण कायदा 2019 कलम 35(1) प्रमाणे दाखल केलेली आहे.
  2. वि.प. क्रं.1 ही सहकारी पतसंस्था आहे आणि वि.प.क्रं.2 अध्‍यक्ष असुन वि.प.क्रं.3 हे मॅनेजर आहेत. तक्रारकर्ते यांनी वि.प. यांचेकडे आवर्ती ठेव योजनेमधे खालीलप्रमाणे रक्कमा गुंतवलेल्या होत्या.

खाते क्रं.

खाते उघडण्‍याचा दिनांक

परिपक्वेता दिनांक

गुंतविलेली रक्कम

परिपक्वता रक्कम

२४६

१३.०२.२०१९

१०.०२.२०२०

  २४,०००/-

२५,५६०/- 

२९९

-

-

५,२९९/-

-

३२०

 

 

२,०००/-

-

२२५

 

 

२५,०००/-

२८,०००/-

                                                          परिपक्वता रक्कम    ६०,५६०/-     

  1. वि.प.यांनी सदरहू परिपक्वता रक्कम आणि शेवटच्या दोन खात्यामधील गुंतविलेली रक्कम असे मिळुन 60,560/- रुपये तक्रारकर्ते यांना 10.2.2020 ला द्यावयाची होती. तक्रारकर्ते यांनी सदरहू रक्कम मिळण्‍यासाठी वर्तमान तक्रार दाखल केली आ‍हे आणि वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याचा आक्षेप घेतलेला आहे. तक्रारकर्ते यांनी नुकसान भरपाईपोटी रुपये 30,000/- व खर्चापोटी रुपये 10,000/- ची मागणी केलेली आहे आणि तक्रार मंजूर करण्‍याची मागणी केलेली आहे.
  2. वि.प.क्रं.1 ते 3 यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आल्या परंतु सदर नोटीस घेण्‍यास नकार या शे-यासह परत आल्या. त्यानंतर वि.प.क्रं.2 व 3 यांचेतर्फे स्वाक्षरी नसलेला मुदतीचा अर्ज दिनांक 28.10.2021 रोजी आयोगात समोर सादर करण्‍यात आला. त्यानंतर दिनांक 29.11.2021 रोजी वि.प.चे वकीलांनी सूचना नसल्याबाबत पुरसिस दाखल केली आणि त्यानंतर वि.प.क्रं.1 ते 3 तर्फे कोणीही हजर झालेले नाही म्हणुन वि.प.क्रं.1 ते 3 यांचे विरुध्‍द सदर तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 10.1.2022 पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारदाराचे वकीलांनी लेखी व तोंडी युक्तीवादाबाबत पुरसिस दाखल केल्यानंतर प्रकरण तोंडी युक्तीवादकरिता ठेवण्‍यात आले.
  4. तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थीत होतात.

मुद्दे                                                                        उत्तरे

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्राराचे सेवेत त्रुटी केली आहे काय?          होय  
  3. आदेश?                                                                        अंतीम आदेशाप्रमाणे

का र  मि मां सा

7. वर्तमान प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की,   वि.प. यांनी तक्रारकर्ते यांना मुदत ठेवीच्या रक्कमेवर व्याज देण्‍याबाबत आणि परिपक्वता रक्कम परत करण्‍याबाबत सेवा पूरविण्‍याचे वचन दिलेले आहे आणि त्याबाबतच्य अटी आवर्ती ठेवीच्या पासबुकांवर स्पष्‍टपणे नमुद केलेल्या आहे. सबब तक्रारकर्ते हे वि.प.चे ग्राहक आहेत आणि वि.प.यांनी सदरहू परिपक्वता रक्कम तक्रारकर्ते यांना परत न केल्यामूळे सेवेमधे त्रुटी केलेली आहे म्हणून वर्तमान तक्रार मंजूर करणे उचित आहे. तक्रारकर्ते यांनी केलेली नुकसान भरपाईबाबतची मागणी आणि खर्चाबाबतची मागणी योग्य आहे आणि व्याजाबाबत तक्रारकर्ते यांना द.सा.द.शे.12 टक्के व्याजदाराने व्याज देणे योग्य आहे असे आमचे मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे.

आदेश

  1. तक्रारकर्ता क्रं.1 व 2  यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता क्रं.1 व 2 यांची परिपक्वता रक्कम रुपये 60,560 /- त्वरीत दयावेत आणि सदरहू रक्कमेवर दिनांक 10.2.2020 पासुन द.सा.द.शे.12 टक्के दराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो व्याज द्यावे.
  3. वि.प.ने तक्रारदारांना झालेल्या मानसिक,शारिरिक व आर्थिक नुकसानापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/-  तकारदारास द्यावे.
  4. सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेश पारित दिनांकापासून 45 दिवसाचे आत करावे.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.