Maharashtra

Nagpur

CC/649/2021

MRS. HIMAVATI YESAJI KOHOK - Complainant(s)

Versus

SANMAY INVESTMENTS, THROUGH PRO./DIRECTOR OF SH. AMOL NASARE - Opp.Party(s)

ADV. TUSHAR M. BARAPATRE

05 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/649/2021
( Date of Filing : 15 Nov 2021 )
 
1. MRS. HIMAVATI YESAJI KOHOK
R/O. PLOT NO.78, JIJAU CO-OPERATIVE HOUSING SOCIETY, PANDE LAYOUT, NEAR WATER TANK, KHAMALA, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SANMAY INVESTMENTS, THROUGH PRO./DIRECTOR OF SH. AMOL NASARE
OFF.AT, 296, GANDHINAGAR, NORTH AMBAZARI ROAD, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 05 Apr 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्तीने वि.प.चे इन्व्हेस्टमेंट कंपनीमधे रुपये 3,00,000/-, 24 टक्के व्याजदाराने मुदत ठेव ठेवली होती. त्याचा तपशील पूढील प्रमाणे.

 

अ.क्र.

खाते क्रमांक

मुदती ठेव रक्कम

मुदती ठेव दिनांक

परिपक्वता दिनांक

व्याजदर

परिपक्वता रक्कम

1

50

1,00,000/-

3.9.2012

3.9.2013

24%

-

2

50

1,00,000/-

23.11.2012

23.11.2013

24%

-

3

50

1,00,000/-

20.11.2013

20.11.2015

24%

1,24,000/-

  1.  तक्रारकर्तीने वि.प.कडे मुदत ठेव मधे ठेवलेल्या रक्कमेची परिपक्वता मुदत संपल्यानंतर मागणी केली असता वि.प.तक्रारकर्तीला रक्कम परत करण्‍याचे व भेटण्‍याचे टाळीत होता त्यामूळे तक्रारकर्तीने वि.प.ला दिनांक 2.10.2021 ला वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु वि.प.ने तक्रारकर्तीच्या नोटीसची दखल घेतली नाही म्हणून तकारकर्तीने मा. आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प.ला निर्देश देण्‍यात यावे की, वि.प.ने तक्रारकर्तीला मुदत ठेवीतील रक्कम रुपये 3,00,000/- 24टक्के व्याजसासह परत करावे.तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च देण्‍यात यावा.
  2. वि.प.ला आयोगा मार्फत दिनांक 14.12.2021 रोजी नोटीस पाठविण्‍यात आली असता नोटीस प्राप्त होऊनही वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्यांचे विरुध्‍द 16.3.2022 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी युक्तीवादाचे अवलेाकन करता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                                     उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?           होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय?     होय
  4. काय आदेश                                                                 अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

6.     तक्रारकर्तीने वि.प.यांचे इन्व्हेस्टमेंटं कंपनी मधे तिच्या मिळकतीची

रक्कम रुपये 3,00,000/- एक वर्ष कालावधीकरिता द.सा.द.शे.24टक्के व्याजदराने मुदत ठेव मध्‍ये ठेवल्याचे नि.क्रं.2 वर दाखल दस्तऐवजांवरुन निर्देशनास येते. यावरुन तक्रारकर्ती ही वि.प.ची ग्राहक आहे हे सिध्‍द होते.

7.       तक्रारकर्तीने वि.प.कडे मुदत ठेव ठेवलेल्या रक्कमेची परिपक्वता तारखेनंतर मागणी केली असता, वि.प.ने तक्रारकर्तीला रक्कम परत केली नाही ही वि.प.चे प्रती त्रुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे सिेध्‍द होते. त्यामूळे तक्रारकर्ती वि.प.कडुन व्याजासह रक्कम व मानसिक व शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्‍ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. वि.प. ला ला आदेशीत करण्‍यात येते की, वि.प.ने तक्रारकर्तीला दिनांक 3.9.2012 रोजी मुदत ठेव ठेवलेली रक्कम रुपये 1,00,000/-, द.सा.द.शे. 24टक्के व्याजासह मुदत ठेव दिनांक 3.9.2012 पासुन तक्रारकर्तीला प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यत द्यावी.
  3. वि.प.ने तक्रारकर्तीला दिनांक 23.11.2012 रोजी मुदत ठेव ठेवलेली रक्कम रुपये 1,00,000/-, द.सा.द.शे. 24टक्के व्याजासह मुदत ठेव दिनांक 23.11.2012 पासुन तक्रारकर्तीला प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यत द्यावी.
  4. वि.प.ला आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला दिनांक 20.1.2013 रोजी मुदत ठेव ठेवलेली रक्कम रुपये 1,00,000/-, द.सा.द.शे. 24टक्के व्याजासह मुदत ठेव दिनांक 20.1.2013 पासुन तक्रारकर्तीला प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यत द्यावी.
  5. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.
  6. विरुध्‍द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत  करावी.
  7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  8. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.