Maharashtra

Nagpur

CC/11/58

Shri Gangeshwar Bhuneshwar Rana - Complainant(s)

Versus

Sankalp Developers - Opp.Party(s)

Adv. Sanjay Kasture

18 Aug 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/11/58
1. Shri Gangeshwar Bhuneshwar RanaJagdish Nagar, Katol Road,NagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Sankalp Developers26, 1st floor, Sanskrutik Sankul, Sitabuldi,NagpurMaharashtra2. Sankalp Developers Through Shri Dharmendra Shrirang Wanjari26, 1st floor, Sanskrutik Sankul, Sitabuldi, NagpurNagpurMaharashtra3. Sankalp Developers Through Partner Sau. Vandana Raju Tarare26, 1st floor, Sanskrutik Sankul, Sitabuldi, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv. Sanjay Kasture, Advocate for Complainant

Dated : 18 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 18/08/2011)
तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍यांनी मौजा धवलपेठ येथे प.ह.क्र.80, ख.क्र.6, ता.जि.नागपूर येथील प्‍लॉट क्र. 164 हा एकूण क्षेत्रफळ 1499.32 चौ.फु.चा रु.1,49,932/- मध्‍ये घेण्‍याचा करार करण्‍यात आला. त्‍यापैकी वेळोवेळी तक्रारकर्त्‍यांनी रु.1,06,766/- गैरअर्जदारांना दिले. परंतू पुढे गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन देण्‍यास टाळाटाळ केल्‍याने तक्रारकर्त्‍यांनी विक्रीपत्र करुन देण्‍याचा आग्रह केला असता गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन देण्‍यास असमर्थता दर्शवून रक्‍कम परत देण्‍याकरीता काही रकमेचे धनादेश तक्रारकर्त्‍यांना दिले. परंतू सदर धनादेश हे अपू-या निधीस्‍तव अनादरीत झाले. गैरअर्जदार हे तक्रारकर्त्‍यांना प्‍लॉटचे विक्रीपत्रही करुन देत नाही व रक्‍कमही परत देत नाही, म्‍हणून त्‍यांनी मंचासमोर तक्रार दाखल करुन, गैरअर्जदारांनी विवादित प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा सदर प्‍लॉट उपलब्‍ध नसल्‍यास आजच्‍या बाजारभावाप्रमाणे प्‍लॉटची किंमत द्यावी, मानसिक त्रासाबाबत भरपाई आणि प्रकरणाच्‍या खर्चाची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीसोबत बयानापत्र, पावत्‍या, पुस्तीका, धनादेश, अनादरीत धनादेश यांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
 
2.          सदर प्रकरण मंचासमोर दाखल झाल्‍यावर मंचाने गैरअर्जदारांना नोटीस पाठविली असता गैरअर्जदारांनी नोटीस प्राप्‍त होऊनही तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल न केल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द उत्‍तराशिवाय कारवाई चालविण्‍याचा आदेश मंचाने पारित केला व प्रकरण युक्‍तीवादाकरीता ठेवण्‍यात आले. युक्‍तीवादाचेवेळेस तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकण्‍यात आला. गैरअर्जदारांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्रे, दस्‍तऐवज व दाखल निवाडयांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
 
3.                                 निर्विवादपणे तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याशी वर दिलेल्‍या तपशिलाप्रमाणे भुखंड खरेदी करण्‍याचा करार केला होता व कराराप्रमाणे जास्‍तीत जास्‍त रक्‍कम तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार यांना अदा केलेली असल्‍याचे दिसून येते.
4.                तसेच तक्रारकर्त्‍यांच्‍या शपथपत्रावरुन असेही निदर्शनास येते की, सदरच्‍या रक्‍कमा दिल्‍यानंतर तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार यांना सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍याची मागणी केली असता, विक्रीपत्र करुन देण्‍यास असमर्थता दर्शवून तक्रारकर्त्‍यांच्‍या रकमा 18 टक्‍के व्‍याजाने परत करण्‍यास तयार असल्‍याचे आश्‍वासन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यांना दिले होते हे तक्रारकर्त्‍यांचे म्‍हणणे नाकारण्‍यासाठी गैरअर्जदार यांनी लेखी उत्‍तर दाखल केले नाही. तसेच लेखी युक्‍तीवादामध्‍ये गैरअर्जदारांनी शेत जमीन ही इंडस्‍ट्रीयल रीजर्व्‍हेशनमध्‍ये असल्‍यामुळे सदर जमीन ही गैरकृषी होणे अशक्‍य आहे, त्‍यामुळे विक्रीपत्र करण्‍यास गैरअर्जदार असमर्थ आहेत असे नमूद केले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात तथ्‍य आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते.
5.                दाखल दस्‍तऐवजांवरुन व तक्रारकर्त्‍यांच्‍या शपथपत्रावरील कथनावरुन गैरअर्जदार यांनी काही रकमांचे धनादेश तक्रारकर्त्‍यांना रक्‍कम परत करण्‍याबाबत अदा केले होते. परंतू सदर धनादेश वटविण्‍यास तक्रारकर्ते गेले असता गैरअर्जदारांच्‍या खात्‍यात अपूरा निधी असल्‍याने ते अनादरीत झाले. याचाच अर्थ सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍यांना प्राप्‍त झाली नाही. त्‍यामुळे उभय पक्षांमध्‍ये करार अस्तित्‍वात आहे. एकतर गैरअर्जदार यांनी उर्वरित रक्‍कम घेऊन तक्रारकर्त्‍यांना कराराप्रमाणे भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावयास पाहिजे होते किंवा तक्रारकर्त्‍यांनी दिलेल्‍या रकमा व्‍याजासह परत द्यावयास पाहिजे होत्‍या. तसे न करुन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यांना सेवेत कमतरता दिली आहे असे या मंचाचे मत आहे. मंचाने तक्रारीत दाखल पावत्‍यांच्‍या प्रतींचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍यांनी एकूण रु.1,06,766/- गैरअर्जदारांना प्‍लॉटच्‍या किंमतीपोटी दिलेले आहे. त्‍यामुळे सदर रकमेवर व्‍याजही मिळण्‍यास तक्रारकर्ते पात्र आहेत.
 
6.                गैरअर्जदारांनी भुखंड उपलब्‍ध असल्‍यास व तक्रारकर्ता भुखंड घेण्‍यास तयार असल्‍यास, तक्रारकर्त्‍यांना करारात नमूद केल्‍याप्रमाणे भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे अथवा तक्रारकर्त्‍यांच्‍या रकमा व्‍याजासह परत करण्‍यास गैरअर्जदार जबाबदार आहेत. सबब खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येतात.
2)    गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यांकडून उर्वरित रक्‍कम घेऊन करारनाम्‍यात नमूद     असलेल्‍या भुखंडाचे विवरण असलेल्‍या भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे व प्रत्‍यक्ष भुखंडाचा ताबा द्यावा. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍यांनी सोसावा.
किंवा
      गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यांकडून घेतलेली रक्कम रु.1,06,766/- ही    दि.31.12.2009 पासून गैरअर्जदार यांनी स्विकारली तेव्‍हापासून तर प्रत्‍यक्ष    रकमेच्‍या अदायगीपर्यंत द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह द्याव्‍या.
3)    गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/- प्रत्‍येकी द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्‍तीकपणे आदेशाची प्रत  प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT