Maharashtra

Nagpur

CC/11/487

Sau. Jankibai Sampatrao Meshram - Complainant(s)

Versus

Sankalp Developers - Opp.Party(s)

Adv. Sanjay Kasture

21 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/487
 
1. Sau. Jankibai Sampatrao Meshram
Hawale Layout, Khamla,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sankalp Developers
26, 1st floor, Sanskrutik Sankul, Zanshi Rani Chowk, Sitabuldi
Nagpur 440 012
Maharashtra
2. Sankalp Developers, Through Partner Shri Darmendra Shrirang Wanjari
Office- 26, 1st floor, Sanskrutik Sankul, Zanshi Rani Chowk, Sitabuldi,
Nagpur 440 012
Maharashtra
3. Sanklpa Developers, Through Partner Sau. Vandana Raju Tarare
Office- 26, 1st floor, Sanskrutik Sankul, Zanshi Rani Chowk, Sitabuldi,
Nagpur 440 012
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Sanjay Kasture, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

::निकालपत्र::
(पारीत द्वारा- श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्‍यक्ष)
(पारीत दिनांक 21 एप्रिल,2012 )
1.   अर्जदार/तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली प्रस्‍तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2.   अर्जदार/तक्रारकर्तीची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, तीने, गैरअर्जदार जे विकासक आहेत, यांचे सोबत करारपत्र करुन मौजा सुराबर्डी, प.ह.नं.26 खसरा क्रमांक-25 मधील भूखंड क्रमांक-75, क्षेत्रफळ 1388.56 चौरसफू्ट  रुपये-55,542/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचा करार दिनांक-27.11.2007 रोजी केला. दि.18.01.2008 रोजी रुपये-14,000/- बयाना राशी दिली. उर्वरीत रक्‍कम रुपये-41,542/- प्रतीमाह मासिक हप्‍ता रुपये-1187/- प्रमाणे 35 मासिक हप्‍त्‍यात दिनांक’27.11.2007 ते 27.10.2010 या कालावधीत हप्‍तेवारीने द्यावयाची होती. तक्रारकर्ती/अर्जदार हिने बयाना राशी धरुन भूखंडापोटी एकूण रुपये-51,000/- एवढी रक्‍कम वेळोवेळी गैरअर्जदारास दिली.
3.    अर्जदार/तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, गैरअर्जदाराने भूखंडाचे अकृषक रुपांतरण करुन, उर्वरीत रक्‍कम स्विकारुन, भूखंडाचे विक्रीपत्र करुन देणे गरजेचे होते. तक्रारकर्त्‍याने या संबधात गैरअर्जदारास वेळोवेळी विनंती केली, मात्र गैरअर्जदाराने कोणतीही कारवाई केली नाही व विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारास पत्र दिले परंतु त्‍याचाही उपयोग झाला नाही.
 
      
 ग्राहक तक्रार क्रमांक : 487/2011
4.    म्‍हणून शेवटी तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन तीद्वारे करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावाने गैरअर्जदाराने करुन दयावे किंवा आजचे बाजारभावा प्रमाणे भूखंडाची रक्‍कम गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस परत करावी असे आदेशित व्‍हावे. तसेच तक्रारकर्तीस झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-25,000/- व तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/- मिळावेत अशी मागणी केली.
5.    प्रस्‍तुत प्रकरणात यातील गैरअर्जदारास रजिस्‍टर पोस्‍टाने न्‍यायमंचाचे मार्फतीने नोटीस पाठविली. मात्र रजिस्‍टर पोस्‍टाद्वारे पाठविलेली नोटीस तीस दिवसा पेक्षा जास्‍त कालावधी होऊनही परत न आल्‍यामुळे तसेच रजिस्‍टर पोच पावती सुध्‍दा प्राप्‍त न झाल्‍यामुळे, गैरअर्जदारास नोटीस मिळाल्‍याचे घोषीत करण्‍यात आले व गैरअर्जदार विरुध्‍द प्रस्‍तुत प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात पारीत करण्‍यात आला.
6.    प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत बयानापत्र आणि गैरअर्जदाराकडे भूखंडापोटी वेळोवेळी जमा केलेल्‍या रकमांच्‍या पावत्‍या, खाते पुस्‍तीका, नकाशा असे दस्‍तऐवज दाखल केलेत.
7.    प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्तीचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.
 
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक : 487/2011
 
8.    तक्रारकर्तीची लेखी तक्रार, प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवज आणि त.क.हिचा युक्‍तीवाद यावरुन न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-
::निष्‍कर्ष ::
9.    प्रस्‍तुत प्रकरणात गैरअर्जदारास न्‍यायमंचाचे मार्फतीने रजिस्‍टर नोटीस पाठविण्‍यात आली परंतु गैरअर्जदार न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी कोणतेही लेखी निवेदन सादर केले नाही व कोणताही बचाव केला नाही. तसेच तक्रारकर्तीचे म्‍हणणेही खोडून काढले नाही.
10.   तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजा वरुन व प्रतिज्ञालेखा वरुन तिने गैरअर्जदारा सोबत मौजे सुराबर्डी, तालुका जिल्‍हा नागपूर, प.ह.नं.26, खसरा नं.25, भूखंड क्रमांक-75, क्षेत्रफळ-1388.56 चौरसफूट भूखंड खरेदी बाबतचा व्‍यवहार दिनांक-27.11.2007 रोजी केला होता व गैरअर्जदारास भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रक्‍कम रुपये-51,000/- दिलेली आहे, या बाबी सिध्‍द झालेल्‍या आहेत. गैरअर्जदाराने सदर शेतीचे अकृषक वापरा मध्‍ये रुपांतरण करुन, भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे करुन देणे गरजेचे होते आणि त्‍यासंबधीची जबाबदारी गैरअर्जदाराने करारात स्विकारलेली आहे परंतु गैरअर्जदाराने तसे केले नाही आणि त.क.ला दिलेल्‍या सेवेत त्रृटी ठेवलेली आहे.
       
11.   वरील सर्व वस्‍तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श 
1)  तक्रारकर्त्‍याची तक्रार गैरअर्जदारा विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
 
ग्राहक तक्रार क्रमांक : 487/2011
2) गैरअर्जदाराने, तक्रारकर्तीस त्‍यांचेतील लेखी करारा प्रमाणे मौजे सुराबर्डी
    ता.जि.नागपूर येथील प.ह.नं.26, खसरा क्रमांक-25 मधील भूखंड क्रं-75,
    क्षेत्रफळ-1388.25 चौरसफूटाचे विक्रीपत्र, तक्रारकर्ती जवळून करारात
    ठरलेल्‍या भूखंडाचे किंमती नुसार भूखंडाची राहिलेली उर्वरीत रक्‍कम
    त.क. कडून स्विकारुन नोंदणीकृत खरेदी सदर आदेश प्राप्‍त झाल्‍या पासून
    तीन महिन्‍याचे आत त.क.चे नावे करुन द्यावी.
3)  उपरोक्‍त अक्रं-2) प्रमाणे कायदेशीरदृष्‍टया भूखंडाची खरेदी त.क.चे नावे
    करुन देणे गैरअर्जदारास शक्‍य नसल्‍यास शासकीय शिघ्रगणक पत्रिके
    मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे आजचे बाजारभावाने करारातील नमुद भूखंडाचे
    क्षेत्रफळा प्रमाणे येणारी किंमत आणि त्‍यातून तक्रारकर्ती कडून भूखंडापोटी
    घेणे असलेली रक्‍कम रुपये-4542/- वजा करुन, उर्वरीत रक्‍कम
    तक्रारकर्तीस सदर आदेश प्राप्‍त झाल्‍या पासून  तीन महिन्‍याचे आत
    परत करावी, विहित मुदतीत आदेशाचे पालन न केल्‍यास गैरअर्जदार
    नुकसानीपोटी तक्रारकर्तीस प्रतीदिन रुपये-100/- प्रमाणे रक्‍कम देणे
    लागतील.
4) तक्रारकर्तीस झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-5000/-
    (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त ) आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-2000/-
    (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) गैरअर्जदाराने सदर आदेशाची प्रत प्राप्‍त
    झाल्‍या पासून तीन महिन्‍याचे आत द्यावे.
5)  निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्‍या द्याव्‍यात.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.