आदेश पारित द्वारा - श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष आदेश (पारित दिनांक 15 मार्च 2011 ) ( खुल्या मंचातील आदेश ) तक्रारदाराचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार बिल्डर सोबत त्यांचे लेआऊट मधील भुखंड क्रमांक 12 मौजा सुराबर्डी, खसरा नं. 32, प.ह.न. 26, एकुण क्षेत्रफळ 3875 विकत घेण्याचा सौदा दिनांक 13.6.2009 रोजी केला. गैरअर्जदारास इसारा दाखल रुपये 1 लक्ष दिले. उर्वरित रक्कम किस्तीप्रमाणे द्यावयाची होती. पुढे त्यांनी वेळोवेळी किस्तीप्रमाणे संपुर्ण मोबदला गैरअर्जदारास दिला. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त झाल्याची पावती दाखल केली. सदर भुखंडाचे अकृषक रुपांतर झाले नाही किंवा काय त्यांची माहीती तक्रारदारास मिळाली नाही.. तक्रारदारास गैरअर्जदाराने विक्रीपत्र करुन दिले नाही. त्यांनी गैरअर्जदारास दिनांक 24.6.2010 रोजी नोटीस दिली मात्र गैरअर्जदाराने विक्रीपत्र करुन दिले नाही व नोटीसचे उत्तरही दिले नाही म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली व तीद्वारे गैरअर्जदाराने वादातील भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी 1,00,000/-रुपये मिळावे. वेळेवर विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणुन नुकसानी दाखल रुपये 1,00,000/-मिळावे. तसेच रक्कम मिळाल्याचे तारखेपासुन सदर रक्कमेवर 18टक्के दराने व्याज मिळावे व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे. अशा मागण्या केल्या आहेत.
यात गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं.1 यांना नोटीस मिळाली मात्र ते हजर झाले नाही वा त्यांनी जवाब दाखल केला नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश, तसेच गैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांनी आपला लेखी जवाब दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द विनाजवाब प्रकरण चालविण्याचा आदेश आदेश दिनांक 14.2.2011 रोजी पारीत केला. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखवर दाखल केली असुन सोबत बयाणापत्र, रक्कम भरल्याच्या पावत्या आणि नोटीस, पोस्टाची पावती, पोचपावती इतर दस्तऐवज दाखल केले आहेत. गैरअर्जदार हजर झाले नाही व आपला जबाब दाखल केला नाही व दस्तऐवज दाखल केले नाही. तक्रारदारातर्फे वकीलांचा युक्तिवाद ऐकला. सदर प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे गैरअर्जदार हजर झाले नाही व आपला बचाव केला नाही. तत्पुर्वी तक्रारदाराने नोटीस दिली होती त्यांचे उत्तर दिले नाही. तक्रारदाराने आपली तक्रार शपथपत्रावर दाखल केली असुन दस्तऐवजाद्वारे सिध्द केली आहे. त्यावरुन असे दिसते की गैरअर्जदाराने तक्रारदारासोबत भुखंड विक्रीचा सौदा केला होता. बयाणापत्रानुसार रुपये 1,00,000/- स्वि-कारले होते. वेळोवेळी किस्तीच्या रक्कमा स्विकारल्या होत्या. यासंबंधी पावत्या तक्रारदाराने दाखल केल्या आहेत. गैरअर्जदाराने संपुर्ण रक्कम स्विकारुन तक्रारदारास भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहोत. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी आदेश पारित झाल्यापासुन 30 दिवसाचे आत मौजा सुराबर्डी, खसरा नं.32, प.ह.न.26 येथील त्यांचा भुखंड क्रमांक 12, क्षेत्रफळ 3875 चौ. फुट चे विक्रीपत्र करुन, नोंदवुन तक्रारदारास भुखंडाचा ताबा द्यावा. 3. वरील बाब गैरअर्जदारास कायदेशिरदृष्टया शक्य नसेल व तक्रारदार तयार असले तर त्यांनी या भुखंडाची आजरोजी बाजारभावाप्रमाणे येणारी किंमत, त्यासाठी शिघ्रगणक पत्रकाचा वापर करुन आणि येणारी किंमत तक्रारदारास द्यावी. 4. तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- गैरअर्जदाराने द्यावे. 5. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेश पारित झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |