निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 06.08.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 12.08.2010 तक्रार निकाल दिनांकः- 04.02.2011 कालावधी 4 महिने22 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. नारायण पिता शंकरराव वैरागार अर्जदार वय 55 वर्षे धंदा शेती रा.ताडपांगरी पो.सिंगणापूर ( अड. माधुरी क्षिरसागर ) ता.जि.परभणी. n विरुध्द 1 व्यवस्थापक गैरअर्जदार संजिवनी को-आप बॅक एकतर्फा बसमत रोड परभणी ता.जि.परभणी. 2 शाखाधिकारी ( अड. गणेश सेलूकर ) दि वैद्यनाथ अर्बन कॉ-ऑप बॅक लिमीटेड परभणी ता.जि.परभणी ----------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती सुजाता जोशी सदस्या ) अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मुदत ठेवीमध्ये ठेवीची मुदत पूर्ण झाल्यावर व्याजासह रक्कम देण्याचे गैरअर्जदाराने नाकारल्यामुळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा अल्पभुधारक शेतकरी असून त्याचे संजिवनी को. ऑप बॅकेमध्ये पुनर्गुतवणूक ठेव म्हणून रुपये 23468/- व रुपये 40090/- ठेवले होते दिनांक 08.04.2003 रोजी अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 1 ला भेटला व त्याने त्याचे पुनर्गुतवणूक ठेवीतीलरुपये 23468/- परत मागितले व दिनांक 14.04.2003 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे त्याचे पुनर्गुतवणूक ठेवीतील रुपये 40090/- परत मागितले तेंव्हा गैरअर्जदार क्रमांक 1 ने खाते क्रमांक 22/295 व खाते क्रमांक 22/293 मधील रक्कमा पुनर्गुतवणूक ठेवीमध्ये ठेवल्या. अर्जदार दोन्ही खात्यपामधील मुदत ठेवींच्या अर्जदार दोन्ही खात्यामधील मुदतठेवींच्या मुदती संपल्यानंतर दिनांक 05.05.2009 रोजी वैद्यनाथ को.ऑप बॅकेच्या शाखाधिका-याना भेटले व रुपये 47706/- व रुपये 81495/- ची मागणी केली असता गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्या रक्कमा देण्याचे नाकारले व फक्त मुद्यल देण्यात येइल असे सांगून दिनांक 24.12.2009 रोजी अर्जदाराच्या खाते क्रमांक 221/114 मध्ये फकत मुद्यल जमा करण्यात आले. अर्जदाराला त्याच्या ठेवीवरील व्याज देण्याचे गेरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने बेकायदेशीररित्या नाकारुन त्रूटीची सेवा दिल्याबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व दोन्ही पुनर्गुतवणूक ठेवीवरील एकूण व्याज रुपये 63537/- द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळावेत व मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 7000/- व दाव्याचा खर्च रुपये 3000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात मुदत ठेवीच्या पावत्याच्या छायाप्रती, जिल्हा उपनिबंधकाना दिलेला अर्ज, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्रे दाखलकेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसपाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 याना नोटीस मिळूनही नेमल्या तारखेला न्यायमचात हजर झाले नसल्यामुळे त्यांच्याविरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, खाते क्रमांक 22/295 ची पावती क्रमांक 1070 खाते क्रमांक 22/293 ची पावती हया रिजर्व बॅक आफ इंडियाच्या नियम व तरतूदीचे पालन केल्याशिवाय दिलेल्या आहेत. अर्जदाराने दिनांक 24.12.2008 रोजी मुद्यल घेण्यासाठी अनुमती दिल्यामुहे मुद्यल अर्जदाराच्या खाते क्रमांक 221/114 मध्ये हस्तातंरीत करण्यात आले. अर्जदाराचे रुपये 23468/- ची मुदत ठेवीची रक्कम 08.04.2003 रोजी परीपक्व झाली होती व तीचे दिनांक 18.07.2003 रोजी नुतनीकरण करण्यात आले व त्याची मुदत दिनांक 08.04.2009 रोजी संपली. मुदत संपल्यानंतर 14 दिवसाच्या आत नुतनीकरण केले तरच ते कायदेशीर असते पण हे नुतनीकरण 101 दिवसानंतर केलेले आहे तसेच रुपये 400900/- ची पावती 13.04.2003 रोजी परीपक्व झाली तीचे दिनांक 18.07.2003 रोजी नुतनीकरण करण्यात आले तेही नियमानुसर नाही. अर्जदाराने शपथपत्र दाखल करुन दोन्ही पावत्याच्या मुद्यलाची रक्कम उचलली आहे. दोन्ही पावत्याचे नुतनीकरणाचे बॅकेच्या लेजर मध्ये नसल्यामुळे त्या रक्कमा गेरअर्जदार क्रमांक 2 देवू शकत नाहीत. गेरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नसताना अर्जदाराने ही खोटी तक्रार दाखल केल्यामुळे ही तक्रार रुपये 20000/- च्या खर्चासहीत फेटाळण्याची विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र, खाते उतारा, विलीनीकरणाच्या ऑर्डरची छायाप्रत, ऑडीट रिपोर्ट सह रिजर्व्ह बॅकेचे परीपत्रक इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व अर्जदार व गैरअर्जदाराच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदार हा गैरअर्जदार बॅकेचा ग्राहक आहे काय ? होय 2 अर्जदार त्याचे मुदत ठेवीवरील व्याज मिळण्यास पात्र आहे काय ? होय 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 - गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदीनुसार गेरअर्जदार क्रमांक 1 चा ग्राहक नाही परंतू दिनांक 20.10.2008 रोजी संजिवनी बॅकेचे विलीनीकरण गैरअर्जदार क्रमांक 2 च्या बॅकेत झाले. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 चे सर्व व्यवहार गैरअर्जदार क्रमांक 2 च्या आखत्यारीत आले त्यामुळे संजिवनी बॅकेचे ग्राहक हे वैद्यनाथ बॅकेचे ग्राहक झाले म्हणून त्याना वैद्यनाथ बॅकेच्या विरुध्द मंचसमोर दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मुद्या क्रमांक 2 व 3 - अर्जदाराने संजीवनी को.ऑप बॅक लिमीटेड गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 18.07.2003 रोजी पावती क्रमांक 1070 मध्ये रुपये 23468/- सहा वर्षे मुदतीसाठी द.सा.द.शे 12 % व्याजाने ठेवले व दिनांक 18.07.2003 रोजी रुपये 40090/- पावती क्रमांक 1069 मध्ये सहा वर्षे मुदतीसाठी द.सा.द.शे 12 % व्याजाने ठेवले पावती क्रमांक 1070 ची मुदत दिनांक 08.04.2009 रोजी व पावती क्रमांक 1069 ची मुदत दिनांक 13.04.2009 रोजी संपली तेंव्हा अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पैसे मागण्यासाठी गेला असता. गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराकडून दिनांक 18.12.2009 रोजी शपथपत्रावर नि. 5/3 वर असे लिहून घेतले की, रुपये 63558/- इतकी रक्कम अर्जदाराला मान्य आहे. अर्जदाराने नि. 5/6 व नि. 5/7 वर दाखल केलेल्या अर्जानुसार रुपये 23468/- व्याजासह रुपये 47706/- व रुपये 40090/- व्याजासह रुपये 81495/- मिळण्याची मागणी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सहा वर्षासाठी ठेवलेली रक्कम रुपये 23468/- ही व्याजासह रुपये 47462/- होते व रुपये 40090/- ही सहा वर्षासाठी ठेवलेली रक्कम व्याजासह रुपये 83050/- होते हे नि. 17/1 व नि. 17/2 वरील गैरअर्जदाराने दाखल केलेल्या खाते उता-यावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि. 17/4 वरील भारतीय रिजर्व बॅकेच्या परीपत्रकानुसार अर्जदाराकडून गैरअर्जदार क्रमांक 1 ने मुदत ठेवी स्विकारलेल्या आहेत त्यामुळे अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 2 कडून मुद्यलावरील व्याज मिळणेस पात्र आहे म्हणून खालील प्रमाणे आदेश देत आहोत. . आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास पावती क्रमांक 1070 मधील रुपये 24238/- व पावती क्रमांक 1069 मधील रुपये 41405/- निकाल समजल्यापासून 30 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम देय होइपर्यत बचत खात्याच्या प्रचलीत व्याज दरानुसार दयावे. 3 गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराला मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत दयावेत. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |