Maharashtra

Thane

CC/07/484

Shri. Ashok Ganpat Khanvilkar - Complainant(s)

Versus

Sanjeevani Electronic - Opp.Party(s)

30 Aug 2008

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE DISTRICT THANE Room No.214, 2nd Floor, Collector office
consumer case(CC) No. CC/07/484

Shri. Ashok Ganpat Khanvilkar
...........Appellant(s)

Vs.

Sanjeevani Electronic
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रार क्रमांक – 484/2007

तक्रार दाखल दिनांक – 28/02/2007

निकालपञ दिनांक – 30/08/2008

कालावधी - 01 वर्ष 06 महिने 02 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे

इंद्रजित जयनाथ यादव

द्वारा तारादेवी जयनाथ यादव

जी./बी./5 माधुरी सी.एच.एस

गुणासागर नगर. ,

कलवा.. .. तक्रारदार

विरूध्‍द

दि. ब्रांच मेनेजर

पारसिक जनता बँक लि.,

कलवा ब्रांच,

जिल्‍हा - ठाणे .. सामनेवाला

समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्‍यक्षा

श्री. पी. एन. शिरसाट - सदस्‍य

उपस्थितीः- .‍क तर्फे वकिल आर. पी. मुदोलकर

वि.प तर्फे वकिल आ. . लाटनेकर

आदेश

(पारित दिः 30/08/2008)

मा. श्री. पी. एन. शिरसाट – सदस्‍य यांचे आदेशानुसार

1. ग्राहक तक्रारीचे संक्षिप्‍‍त विवेचन खालिलप्रमाणेः-

सदरची तक्रार मास्‍टर इंद्रजित जयनाथ यादव (अज्ञान) (Minor) यांचे वतिने त्‍याची आई श्रीमती तारादेवी जयनाथ यादव ही मृतक जयनाथ पी यादव याची पत्‍नी आहे. व तक्रादार हा मृतकाचा मुलगा आहे. मृतक जयनाथ पी यादवचा मृत्‍यु दिनांक 09/07/2005 रोजी मिनी क्रीटीकेअर हॉस्‍पीटल घणसोली नवी मुंबई येथे झाला. मृत्‍युपत्र तक्रारीसोबत जोडले आहे.

मृतक जयनाथ पी यादव यांने मृत्‍युपूर्वी विरूध्‍दपक्षाकडे रु. 3,00,000/- (रुपये तीन लाख फक्‍त)‍ फिक्‍स डिपोझीटमध्‍ये ठेवले होते त्‍याचा नंबर 151652 असा होता. पुन्‍हा तेच रुपये (Renewal) पुर्नजिवीत करण्‍यासाठी ठेवावेत असे विरूध्‍दपक्षाचे पत्र दिनांक12/01/2007 रोजी तक्रारदाराला ि‍

.. 2 ..

नाही. तसेच बॅटरी चार्ज करण्‍याकरीता दिनांक 10/10/2007 रोजी घेऊन गेले व ती बॅटरी दिनांक 25/10/2007 पर्यंत आणली नाही. बॅटरी चार्ज करण्‍यासाठी रु. 250/- एवढा खर्च मागितला त्‍यापैकी त्‍यांना रु. 100/- रुपये दिले व अजुनही विरुध्‍दपक्षकाराने पॉवर बॅटरी‍ आणि इन्‍वर्टर आणुन दिला नाही म्‍हणुन ही तक्रार दाखल केली असुन तक्रारदाराने विरूध्‍द पक्षाकडून रु. 9,900/- परत मिळावेत अथवा इर्न्‍वटर व बॅटरी नविन द्यावी व मानसीक त्रासापोटी रू .1,500/- द्यावेत या कारणासाठी हि तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

2. विरूध्‍द पक्षकाराला सदरहु तक्रारीची नोटिस मिळाली परंतु त्‍यांनी आपला लेखी जबाब सादर केला नाही. विरूध्‍द पक्षाला आपली बाजु मांडण्‍याची संधी देऊनही ते मंचासमोर हजरही झाले नाहीत किंवा लेखी जबाबही सादर केला नाही. म्‍हणुन विरूध्‍द पक्षाचे विरूध्‍द एकतर्फी आदेश पारित करण्‍यात आला. तक्रारदाराने निशाणी 5 वर नोटीस रिपोर्ट सादर केला.


 

3. वरील तक्रारीसंबंधी एकमेव मुद्दा उपस्‍थीत होतो तो येणे प्रमाणेः-

तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने सेवेमध्‍ये त्रृटी/कसूर किंवा

बेजबाबदारपणा दाखविला हे तक्रारदार सिध्‍द करु शकले काय?

उत्‍तर - पुर्णपणे होकार होऊ शकत नाही, अंशतः

कारण मिमांसा

वरील मुद्दाचे स्‍पष्‍टीकरण असे की, तक्रारदाराने विरूध्‍द पक्षाला रु. 9,700/- देऊन त्‍यांचेकडून इर्न्‍वटर आणि बॅटरी अशा वस्‍तु दिनांक 08/11/2006 रोजी खरेदी केल्‍या. परंतु दिनांक 10/09/2007 रोजी वरील इर्न्‍वटर बिघडला व त्‍याची तक्रार विरूध्‍द पक्षाकडे केली. त्‍यांनी त्‍यांचा इंजिनिअर दिनांक 14/09/2007 ला पाठविला. परंतु बॅटरी चार्ज केलेली नसल्‍यामुळे इन्‍वर्टर चालू होऊ शकला नाही. तसेच बॅटरी चार्ज करण्‍याकरीता

.. 3 ..

नेली व त्‍यासाठी तक्रारदाराकडून रु. 100/- वेगळे घेतले व बॅटरी आणि इन्‍वर्टर अजुनही परत केले नाही त्‍यामुळे तक्रारदाराचे आर्थिक, शारिरीक व मानसीक नुकसान झाले असे मान्‍य करता येणार नाही कारण तक्रारदार यांनी 9 ते 10 महिने इर्न्‍वटर व बॅटरीचा वापर केलेला आहे. बॅटरीचे चार्जींग व्‍यवस्‍थीत होते की नाही व त्‍यांची सुरुक्षिततेची काळजी घेणे याची जबाबदारी ग्राहक तक्रारदाराची आहे. या प्रकरणात तक्रारदार यांनी पुर्ण सुरक्षतेची काळजी घेतली तरी ही दोष उत्‍पन्‍न झाले होते व आहेत असे तक्रारदार यांची तक्रार नाही तसेच बॅटरीत नेमका कोणता दोष केव्‍हापासुन व कसा व का आला हे ही सिध्‍द सबळ पुराव्‍याने केलेले नाही म्‍हणुन तक्रारदार यांचा अर्ज नामंजुर करण्‍यास पात्र आहे. विरूध्‍दपक्ष यांनी रु.100/- बॅटरी दुरूस्‍तीसाठी घेतले ही चुकीने घेतले हा मुद्दा ही सिध्‍द केलेले नाही म्‍हणुन पुर्नतः तक्रार मंजुर करणेस पात्र नाही.

तक्रारदार यांनी विरूध्‍दपक्षकार यांना दिनांक 10/10/2007 रोजी बॅटरी दुरूस्‍तीसाठी दिली जी विरूध्‍दपक्षकारांने परत केली नाही हया कथनास कोणता‍‍ही पुरावा नाही व सिध्‍द केलेले नाही म्‍हणुन दखल घेणेत आलेली नाही.

 

4. विरूध्‍द पक्षाला वरील तक्रारीची नोटीस पाठवून त्‍यांनी त्‍यांची बाजु लेखी जबाबाद्वारे प्रस्‍तुत करणे कायद्यानुसार आवश्‍यक होते परंतु त्‍यांनी त्‍याची कसलीही तसदी घेतली नाही. उभय पक्षामध्‍ये PRIVITY OF CONTRACT असुन आ ‍र्थिक व्‍यवहार झाल्‍यामुळे CONSIDERATION होते परंतु विरोधी पक्षाने त्‍यांची जबाबदारी योग्‍य रितीने हाताळली नाही व त्‍यासाठी लेखी जबाबही सादर केलानाही त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारदाराला वरील व्‍यवहाराच्‍या संदर्भात सेवेमध्‍ये त्रृटी/कसुर किंवा बेजबाबदारपणा दाखविला असे स्‍पष्‍ट होते. या मंचाला तक्रारदाराच्‍या तक्रारीमध्‍ये सव्‍य आण‍ि तथ्‍ये आढळून आल्‍यामुळे खालील आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

  1. तक्रार क्रमांक 484/2007 हि अंशतः मंजूर करण्‍यात येते.

    .. 4 ..

  2. विरुध्‍द पक्षकरांने तक्रारदारास इन्‍वर्टर व बॅटरी चांगल्‍या स्थितीत दुरुस्‍त करून द्यावे.

  3. वरील हु‍कुमाची तामिली 30 दिवसाचे आत परस्‍पर करावी.

  4. तक्रारकर्तायांनी मा. सदस्‍य यांचे करिता दाखल केले 2 सेट त्‍वरित परत घेवून जावेत.

  5. उभय पक्षकारांना या निकालपत्राची सांक्षाकित प्रत निःशुल्‍‍क द्यावी.

     

    दिनांक – 30/08/2008

    ठिकाण – ठाणे

     

     

    (सौ. शशिकला श. पाटील ) ( श्री. पी. एन. शिरसाट )

    अध्‍यक्षा सदस्‍य

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे