निकालपत्र :- (दि.08.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 3 ते 7, 9 ते 13, 16 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.8 यांनी त्यांचे स्वतंत्रपणे म्हणणे दाखल केलेले आहे. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी स्वत:चे नांवे, पत्नीचे नावे व मुलांचे नावे सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेवी, धनसंजिवनी दामदुप्पट रोखा व ज्योतिर्लिंग दामदुप्पट ठेवी ठेवीच्या स्वरुपात व सेव्हींग्ज खात्यावर रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेली तारीख | ठेव परतीची तारीख | मुळ ठेव रक्कम रुपये | मुदतपूर्ण आजअखेर मिळणारी रक्कम | मुदतपूर्व मिळणारी व्याजासह रक्कम | 1. | 25 | 17.12.2002 | 17.01.2009 | 2000/- | 4000/- | -- | 2. | 27 | 23.04.2004 | 23.03.2011 | 3000/- | -- | 3000/- | 3. | 46 | 23.04.2004 | 23.03.2011 | 3000/- | -- | 3000/- | 4. | 105 | 17.12.2002 | 17.01.2009 | 2000/- | 4000/- | -- | 5. | 69 | 23.04.2004 | 23.03.2011 | 3000/- | -- | 3000/- | 6. | 260 | 17.12.2002 | 17.01.2009 | 2000/- | 4000/- | -- | 7. | 240 | 17.12.2002 | 17.01.2009 | 2000/- | 4000/- | -- | 8. | 60 | 23.04.2004 | 23.03.2011 | 3000/- | -- | 3000/- | 9. | 92 | 23.04.2004 | 23.03.2011 | 3000/- | -- | 3000/- | 10. | 201 | 17.12.2002 | 17.01.2009 | 2000/- | 4000/- | -- | 11. | S/B A/c.No.2 | -- | -- | 8900/- | -- | -- |
(3) वरीलप्रमाणे सदर ठेवींची मुदत संपल्यावर किंवा संपूणेचे पूर्वी रक्कम हवी असल्यास परत करणेचे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. परंतु, तक्रारदारांना सदर रक्कमांची प्रापंचिक खर्चाकरिता आणि मुलांच्या शिक्षणाकरिता अत्यंत गरज भासलेने सामनेवाला संस्थेकडून येणे असलेली रक्कम व्याजासह वारंवार भेटून मागणी करुनही सामनेवाला संस्थेने ती देणे टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.02.01.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सेव्हिंग्ज खात्यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1, 3 ते 7, 9 ते 13 व 16 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्या पावत्या या खोटया व बनावट असलेने सामनेवाला हे सदर ठेव पावत्यांच्या रक्कमेचे देणे लागत नाहीत. कारण सामनेवाला संस्थेवर दि.19.11.2007 रोजी शाखाधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा सोडोली, ता.शाहुवाडी यांची अवसायक म्हणून नेमणुक केलेली होती. तक्रार अर्जातील कलम 3 मधील अनु.नंबर 2, 3, 5, 8, 9 कडील पावत्यांची मुदत सन 2011 मध्ये संपत असल्याने सदर पावत्यांबाबतची तक्रार मुदतपूर्व केलेली असलेने तक्रार नामंजूर करणेस पात्र आहे. (6) सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, अवसायक यांनी संस्था नोंदण रद्द करणेचा अहवाल सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शाहुवाडी यांना सादर केला. त्याप्रमाणे संस्थेची नोंदणी रद्द केलेली असून दि.31.03.2008 रोजीपासून विसर्जित केलेली आहे. संस्था नोंदणी रद्द केली असल्याने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शाहुवाडी यांना प्रस्तुत प्रकरणी पार्टी करणे गरजेचे असलेने तक्रारीस नॉन-जाईंडर ऑफ पार्टीज ची बाधा येते. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.1, 3 ते 7, 9 ते 13 व 16 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत अवसाय नेमणुकीचा आदेश व संस्था नोंदणी रद्द केलेचा आदेशाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) सामनेवाला क्र.8 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला पतसंस्था स्थापन झालेपासून आजपर्यन्त कधीही संचालक नव्हते. तक्रारदारांची वकिलामार्फत नोटीस मिळालेनंतर प्रस्तुत सामनेवाला यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शाहुवाडी यांचेकडे माहितीचा अधिकार अन्वये सामनेवाला संस्थेचे संचालक मंडळाची यादी व निवडणुकीसंदर्भात माहिती मागविली असता खालीलप्रमाणे माहिती मिळाली :- 1. मा.आ.कै.संजयसिंह गायकवाड ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या., उखळू यांचे शासकिय लेखापरिक्षण अहवाल दि.04.07.2002 ते 31.03.2004 चे अहवालात असणार संचालक मंडळाची यादी सोबत पाठविणेत येत आहे. 2. मा.आ.कै.संजयसिंह गायकवाड ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या., उखळू यांची सन 2002-03 या वेळेला संचालक मंडळाची निवडणुक झालेली नाही. 3. संस्थेचे कामकाज बंद पडलेने कार्यालयाकडील आदेश क्र.सनिशा/अवसायन/अंतिम आदेश/मा.आ.कै.संजयसिहं गायकवाड/ना पत/सन 2007 दि.12.11.2007 अन्वये अंतिम अवसायनात घेणेत आलेली होती. तदनंतर अवसायक यांचेकडील अहवालाप्रमाणे सदरहू संस्थेची दि.31.03.2008 अन्वये नोंदणी रद्द करणेत आलेली असून संस्थेचे अस्तित्त्व संपुष्टात आले आहे. (9) सदर सामनेवाला संस्थेच्या शासकिय लेखापरिक्षण अहवाल दि.04.07.02 ते 31.03.2004 चे अहवालातील संचालक मंडळाची यादी पाहत प्रस्तुत सामनेवाला क्र.8 हे सामनेवाला संस्थेचे संचालक नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. पर्यायाने प्रस्तुत सामनेवाला यांचा सामनेवाला संस्थेच्या कोणत्याही व्यवहारात सहभाग नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांच्या रक्कमा देणेकरिता प्रस्तुत सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. सदरप्रमाणे तक्रारदारांच्या नोटीसीस उत्तरही दिले होते, परंतु तक्रारदारांनी या बाबीचा प्रस्तुत तक्रारीत उल्लेख केलेला नाही व मे.कोर्टाची दिशाभूल केली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (10) सामनेवाला क्र.8 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत त्यांची मुलगी आजारी असलेचे वैद्यकिय प्रमाणपत्र, उत्तरी नोटीसीची स्थळप्रत, सामनेवाला क्र.8 यांनी सहा.निबंधक यांना दि.11.01.2010 रोजी पाठविलेला अर्ज, सदर अर्जास निबंधक यांचे उत्तर इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (11) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव पावत्यांपैकी काही ठेव पावत्यांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत तर काहींच्या अद्याप संपावयाच्या आहेत. सदर ठेव रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. (12) सामनेवाला क्र.1, 3 ते 7, 9 ते 13 व 16 यांनी त्यांच्या म्हणण्यात सामनेवाला संस्थेवर अवसायक असल्याने प्रस्तुत सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही असे कथन केले आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी त्यांच्या ठेव रक्कमा या सामनेवाला संचालक हे संचालक पदावर कार्यरत असताना ठेवलेल्या असल्याने सामनेवाला संस्थेवर अवसायक असल्याने प्रस्तुत सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही अशा प्रकारची कथने करुन त्यांची वैयक्तिक जबाबदारी टाळू शकत नाही. तसेच, सदर सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. (13) सामनेवाला क्र.8 यांनी त्यांच्या म्हणण्यात ते सामनेवाला संस्थेवर संस्था स्थापन झालेपासून कधीही संचालक नसलेचे कथन केले आहे. सदर कथनाच्या पुष्टयर्थ त्यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था, शाहुवाडी यांचेकडून सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळाची यादी मागवून घेतली आहे. सदर संचालक मंडळाच्या यादी अवलोकन केले असता सदर यादीमध्ये प्रस्तुत सामनेवाला क्र.8 युवराज शंकर पाटील यांचे नांव नसलेचे दिसून येते. तसेच, युक्तिवादाचेवेळेस सदर सामनेवाला क्र.8 यांच्या वकिलांनी सदरप्रमाणे प्रतिपादन केले असता तक्रारदारांच्या वकिलांनी सदर सामनेवाला क्र.8 हे सामनेवाला संस्थेचे संचालक नसलेची वस्तुस्थिती मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या ठेव रक्कमा परत करणेकरिता सदर सामनेवाला क्र.8 यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (14) सामनेवाला क्र.17-श्री.संभाजी नामेदव पाटील हे मयत असलेने त्यांचे नांव तक्रारीतून कमी व्हावे या बाबतची तक्रारदारांनी दि.29.04.2010 रोजी पुरसिस दाखल केलेली आहे. सदर पुरसिस मंजूर करुन त्याप्रमाणे दुरुस्ती करणेबाबतचा आदेश झाला. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1, 3, 5 ते 7 व 9 ते 16 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.2 व 4 हे अनुक्रमे शासकिय अधिकारी व मानद सचिव असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (15) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता धनसंजिवनी दामदुप्पट ठेव रोखा क्र.25, 105, 260, 240 व 210 या ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (16) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता जोतिर्लिंग दामदुप्पट ठेव रोखा क्र.027, 046, 069, 060, 092 या दामदुप्पट ठेवींच्या पावत्या असून त्यांच्या मुदती अ़द्याप पूर्ण झालेल्या नाहीत असे दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्यांच्या रक्कमा या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि.02.03.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजाजाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत. (17) तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपातदेखील रक्कमा ठेवल्याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्ज खाते क्र. 2 वर दि.08.04.2005 रोजीअखेर रुपये 8,900/- जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (18) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1, 3, 5 ते 7 व 9 ते 16 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 व 4 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर कोष्टकात नमूद तारखेपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | मुदतपूर्ण देय रक्कम | व्याज देय तारीख | 1. | 25 | 4000/- | 17.01.2009 | 2. | 105 | 4000/- | 17.01.2009 | 3. | 260 | 4000/- | 17.01.2009 | 4. | 240 | 4000/- | 17.01.2009 | 5. | 201 | 4000/- | 17.01.2009 |
(3) सामनेवाला क्र.1, 3, 5 ते 7 व 9 ते 16 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 व 4 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट ठेव पावत्यांच्या रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि. 02.03.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का व्याज वजाजाता होणारे व्याज द्यावे व दि.03.03.2010 रोजीपासून सदर रक्कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | मुळ ठेव रक्कम रुपये | ठेव ठेवलेली तारीख | 1. | 27 | 3000/- | 23.04.2004 | 2. | 46 | 3000/- | 23.04.2004 | 3. | 69 | 3000/- | 23.04.2004 | 4. | 60 | 3000/- | 23.04.2004 | 5. | 92 | 3000/- | 23.04.2004 |
(4) सामनेवाला क्र.1, 3, 5 ते 7 व 9 ते 16 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 व 4 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांच्या सेव्हिंग्ज खाते क्र.2 वरील रक्कम रुपये 8,900/- (रुपये आठ हजार नऊशे फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.08.03.2005 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे. (5) सामनेवाला क्र.1, 3, 5 ते 7 व 9 ते 16 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 व 4 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |