Maharashtra

Akola

CC/14/17

Anand Kamal Varma - Complainant(s)

Versus

Sanjay Narayandasji Virwani - Opp.Party(s)

Self

23 Apr 2015

ORDER

विद्यमान जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,

                  यांचे न्‍यायालयासमोर

             अकोला, (महाराष्‍ट्र ) 444 001

 

प्रकरण क्रमा 17/2014          दाखल दिनांक     06.01.2014

                             नोटीस तामिल दि. 05.03.2014

                              निर्णय दिनांक   : 23.04.2015

                              निर्णय कालावधी :  15 म. 17दि.

 

तक्रारकर्ते/अर्जदार                   :-             आनंद कमल वर्मा,

                                                                        वय : 30 वर्षे, 

                                    रा. सोनार लाईन आकोट,                                           ता. आकोट, जि. अकोला

                                    //विरुध्‍द //

विरुध्‍दपक्ष/गैरअर्जदार      :-          संजय नारायणदासजी विरवाणी,

                                                                        प्रो.प्रा. नॅशनल सेल्युलर,

                             नरसिंग रोड, आकोट, जि. अकोला

      

जिल्‍हा मंचाचे पदाधिकारी   :-   1) आ.श्रीमती एस.एम.उंटवाले, अध्‍यक्षा

                                     2) आ.श्री कैलास वानखडे, सदस्‍य

                                                               3) आ.श्रीमती भारती केतकर, सदस्‍या                         

तक्रारकर्ते      तर्फे   :-               ॲङ जी.व्ही.बोचे,

विरुध्‍दपक्ष          तर्फे         :-               ॲङ एन.डी.देवाणी

                                                                        ॲङ व्ही.ए.पंजवाणी

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :23/0/2015 )

 

आदरणीय सदस्‍य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार

 

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर  करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .

 

          तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून सोनी इरिक्सन कंपनीचा मोबाईल फोन दि. 14/5/2012 रोजी रक्कम रु. 26,000/- मध्ये विकत घेतला, ज्याचा बिल क्र. 472, इ.एम.इ.आय नं. बी.ए.एस.902 डब्ल्यू एक्स एफ 64, सिरीयल नं. 0002017 आहे.  सदर फोन विकत घेतल्यानंतर 6-7 महिन्यांनी सदर फोन मध्ये फॉल्ट निर्माण झाला.  ज्यामुळे सदर फोनची बॅटरी 3-4 तासामध्ये डाऊन होत होती, फोन नेहमी राहून राहून बंद पडत होता.  सदर फोनची वारंटी एक वर्षाची होती.  तक्रारकर्त्याने दि. 5/12/2012 रोजी सदर मोबाईल रिपेअरींग करिता विरुध्दपक्ष यांना दिला.  परंतु विरुध्दपक्षाने सदर मोबाईल वेळीच दुरुस्त करुन दिला नाही, उलट तक्रारकर्त्याला वारंवार वेळ देवून बोलाविले व चार महिन्यानंतर मोबाईल रिपेअरींग करुन परत दिला.  त्यानंतर सदर मोबाईल 2-3 महिने व्यवस्थित चालला व त्यानंतर पुन्हा तोच दोष सुरु झाला.  म्हणून तक्रारकर्त्याने पुन्हा विरुध्दपक्षाकडे तक्रार केली व फोन परत केला.  विरुध्दपक्ष यांनी दोन महिन्यानंतर फोन कंपनीचे सर्व्हीस सेंटर मध्ये घेऊन जाण्याबाबत सुचित केले.  तक्रारकर्त्याने सदर फोन सर्व्हीस सेंटरकडे नेला असता त्यांनी सांगितले की, वारंटी पिरेडमध्ये सदर फोन आमचे सर्व्हीस सेंटरवर रिपेअरींगकरिता देण्यात आला नाही, तसेच कंपनीचे सिल तुटलेले असल्याने ते फोन रिपेअरींग करुन देवू शकत नाही,या बाबत विरुध्दपक्ष यांचा सुचित केले असता त्यांनी फोन घेवून घेतला आणि चालु करुन दिला.  परत एक महिन्यानंतर फोन बंद पडू लागला,  त्यावेळी तक्रारकर्ते विरुध्दपक्षाकडे गेले असता त्यांनी स्क्रिन खराब झालेली आहे आणि रिपेअरींग करिता रक्कम रु. 12,000/- खर्च आहे, तसेच वारंटी पिरेड संपलेला असल्यामुळे रिपेअरींगची रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले.  तक्रारकर्त्याने घेतलेला मोबाईल फोन जुलै 2013 पासून पुर्णपणे बंद पडलेला आहे.  विरुध्दपक्षाने कंपनीचे सर्व्हीस सेंटर मध्ये फोन दुरुस्त करुन न घेता खाजगीमध्ये रिपेअरींग करुन घेतला व स्थानिक मॅकेनिकच्या चुकीमुळे मोबाईलची स्क्रिन खराब झाली.  अशा प्रकारे विरुध्दपक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.  त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 20/5/2013 रोजी विरुध्दपक्षास नोटीस पाठविली.  सदर मोबाईल बंद असल्यामुळे तक्रारकर्त्यास अतोनात नुकसान सोसावे लागले.  तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर होवून विरुध्दपक्ष यांनी अनुचित प्रथेचा अवलंब केला आहे, असे घोषीत करावे.  विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला मोबाईल बदलवून दयावा किंवा रक्कम रु. 26,000/- परत द्यावी.  तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक आर्थिक व मानसिक त्रासापोटी व सदर तक्रारीचे खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. 10,000/- देण्याचा आदेश व्हावा.

सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्‍यासोबत  एकंदर  03  दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत. 

विरुध्‍दपक्ष  यांचा लेखीजवाब :-

2.         सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्‍दपक्ष यांनी आपला  लेखीजवाब,   शपथेवर दाखल केला  त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन  असे नमुद केले आहे की,…

विरुध्दपक्ष यांनी कबुल केले की, तक्रारकर्त्याने सोनी इरीक्सन कंपनीचा स्मार्ट फोन विरुध्दपक्षाकडून खरेदी केला.  तक्रारकर्त्याचा सदरहू फोन दुरुस्ती करिता सोनी इरीक्सन कंपनीच्या मान्यताप्राप्त दुरुस्ती केंद्र, अकोला येथे पाठविला होता व 15 ते 20 दिवसानंतर सदरहू फोन दुरुस्त होवून परत आला व तो तक्रारकर्त्यास परत करण्यात आला.  सदर फोन वारंटी कालावधी मध्ये असल्यामुळे दुरुस्ती शुल्क आकारण्यात आले नाही.  पहील्या दुरुस्ती नंतर सदर फोन व्यवस्थीत चालू होता करिता तक्रारकर्त्याने विनातक्रार परत घेतला.  परंतु त्यानंतर तक्रारकर्त्याने निष्काळजीपणामुळे फोनला हाताळले व त्यामुळे तो परत खराब झाला आणि तक्रारकर्त्याने सदरहू फोन परस्पर दुरुस्ती केंद्रात  नेला,  परंतु ह्या वेळी वारंटी अवधी संपल्यामुळे दुरुस्ती केंद्राने तक्रारकर्त्याला विना शुल्क दुरुस्त करुन देण्यास नकार दिला.  दुरुस्तीची वारंटी ही कंपनी मार्फत ग्राहकाला देण्यात येते.  सदर वारंटीमध्ये विरुध्दपक्षाची कोणतीही जबाबदारी नाही. 

विरुध्दपक्षाने असे नमुद केले की, सदर प्रकरणात क्लीष्ट स्वरुपाचे तांत्रिक व वैज्ञानिक मुद्यांचा समावेश असल्यामुळे व साक्ष पुराव्याशिवाय सदर तक्रारीत उपस्थित केलेल्या विषयांचा न्यायनिवाडा देणे शक्य होवू शकणार नसल्यामुळे सदर तक्रार फेटाळण्यात यावी.  तक्रारकर्त्याला जाणीव होती की, त्यांना कंपनीकडून एक वर्षाची दुरुस्तीची वारंटी होती,  तसेच रिप्लेसमेंटची वारंटी नव्हती.  विरुध्दपक्षाने विक्रेता या नात्याने पुर्ण जबाबदारी पार पाडली आहे.  तक्रारकर्त्याने कंपनी व सर्व्हीस सेंटरला पार्टी केलेले नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी.

सदर लेखी जवाब विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेखावर दाखल केला 

3.   त्यानंतर  तक्रारकर्त्याने साक्षीदाराचा पुरावा, प्रतिउत्तर व  उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.      सदर प्रकरणात तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब, उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद  विरुध्दपक्षाने दाखल केलेला न्यायनिवाडा यांचे काळजीपुर्वक अवलोकन केल्यास असे दिसून येते की, या प्रकरणात विरुध्दपक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्त्याने त्यांच्या दुकानातून सोनी इरीक्शन कंपनीचा स्मार्ट मोबाईल फोन दि. 14/5/2012 रोजी रक्कम रु. 26,000/- मध्ये खरेदी केला होता.  सदर फोनचे बिल दस्त क्र. 4 वर तक्रारकर्त्याने दाखल केले आहे.  सदर बिलाचे अवलेाकन केले असता, असे दिसते की, फोन मधील बॅटरी व चार्जर यांची सहा महिन्यांची वारंटी व मोबाईलची एक वर्षाची वारंटी होती.

     तक्रारकर्त्याचे स्वत:चे कथन असे आहे की, दि. 5/12/2012 रोजी त्यांनी सदर मोबाईल बॅटरी सर्व्हीस देत नसल्यामुळे रिपेअरींग करिता विरुध्दपक्ष यांच्या दुकानात दिला होता.  त्यांनी तो 4 महिन्यानंतर दुरुस्त करुन दिला.  यावरुन विरुध्दपक्षाचे हे म्हणणे पटते की, त्यांनी सदरहू फोन दुरुस्ती करिता कंपनीच्या मान्यताप्राप्त दुरुस्ती केंद्र अकोला येथे पाठविला होता व त्या वेळेस दुरुस्ती शुल्क न आकारता विरुध्दपक्षाने हा फोन तक्रारकर्ते यांना दुरुस्त करुन वापस दिला होता. तसेच या बद्दल तक्रारकर्त्याची तक्रार नव्हती, असेही दिसते.  या बद्दलचा बोध तक्रारकर्त्याच्या साक्षीदाराच्या उलट तपासणी मधून सुध्दा होतो.  यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने सदरहू फोनच्या बँटरीसंबंधी वारंटी कालावधी संपल्यानंतर  सदर फोन बँटरी सर्व्हीस देत नाही,  या कारणावरुन पहील्यांदा विरुध्दपक्षाच्या दुकानात दिला होता, तरी विरुध्दपक्षाने दुरुस्ती करिता केाणतेही शुल्क न आकरता तो दुरुस्त करुन दिला होता.  तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, सदर मोबाईल दोन ते सात महिने व्यवस्थीत चालल्यानंतर पुन्हा बंद पडू लागला,  म्हणून विरुध्दपक्षाकडे दिल्यानंतर त्यांनी कंपनीच्या सर्व्हीस सेंटर मध्ये जाण्याचा सल्ला दिला व तेथे त्यांना असे सांगण्यात आले की, सदरच्या फोनच्या रिपेअरींग साठी खर्च रु. 12,000/- आहे.  यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने  रेकॉर्डवर जॉब कार्डची प्रत लावलेली नाही.  तसेच कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला व कंपनीला या प्रकरणात पक्षकार  केलेले नाही. परंतु तक्रारकर्त्याच्या कथनावरुन असा बोध होतो की, आता सदर मोबाईलचा वारंटी कालावधी देखील संपलेला आहे.  तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीत कुठेही निश्चित तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तसेच तक्रार संदीग्ध आहे.  त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेला न्यायनिवडा 2013 (1) ALL MR (JOURNAL) 13  कमलदिप सिंग  विरुध्द  दि चिफ एल.जी.इलेक्ट्रानिक्स इंडिया प्रा.लि.  व यात  नमुद केलेले निर्देश…….

“ Consumer protection Act 1986 – S.2- Deficiency In service – Alleged after expiry of warranty period – Held unless there is a contractual obligation deficiency in service cannot be attributed to opponent especially when warranty or guarantee period is expired.”

     यानुसार मंचाचे असे मत आहे की, तकारकर्ते यांच्या स्वत:च्या कथनानुसारच विरुध्दपक्षाची सेवेतील न्युनता सिध्द होत नाही.  सबब अंतिम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.

::: अं ति म  आ दे श  :::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
  2. न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
  3. सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या.

       

 

( कैलास  वानखडे )            (श्रीमती भारती केतकर)          (सौ.एस.एम.उंटवाले )

   दस्य                               सदस्‍या                       अध्‍यक्षा    

          जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,अकोला

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.