Maharashtra

Central Mumbai

CC/10/36

S.S. jambhale - Complainant(s)

Versus

Sanjay Malhotra - Opp.Party(s)

Uday Wavikar

27 Jul 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/36
 
1. S.S. jambhale
Patil Chowl, Shraddhanand Road, Vile parle(e),
Mumbai 400 057.
...........Complainant(s)
Versus
1. Sanjay Malhotra
A-2/10, Shah and Nahar Industrial Estate, Dhanraj Mills Compound, Lower parel,
Mumbai 400 013.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 
PRESENT:
 
ORDER

मध्‍य मुंबई ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, परेल, मुंबई

                                        तक्रार क्र.सी.एम.डि.एफ./सी.सी./36/2010

                                          दाखल दिनांक : 29.03.2010

                                           आदेश दिनांक : 23.03.2011

श्री.संतोष शांताराम जांभाळे

पाटिल चाळ, श्रध्‍दानंद रोड,

विले पार्ले (ईस्‍ट), मुंबई-400 057.              ....तक्रारदार

 

      विरुध्‍द

श्री.संजय मल्‍होत्रा

प्रोप्रायटर, मगनुम ग्राफिक्‍स,

ए-2/10, शहा अन्‍ड नहार

इंडस्ट्रियल ईस्‍टेट,

धनराज मिल्‍स कंपाऊंड,

लोअर परेल, मुंबई-400 013.                        ....विरुध्‍दपक्ष

 

                                     गणपूर्ती : श्री.नलिन मजिठिया, अध्‍यक्ष

                                              श्रीमती भावना पिसाळ, सदस्‍या

                        ----------------------------

द्वारा, श्रीमती भावना पिसाळ, सदस्‍या

                       (आदेश दिनांक : 23.03.2011)

1. सदरहू तक्रार श्री.संतोष जांभळे यांनी श्री.संजय मल्‍होत्रा यांचे विरुध्‍द दाखल केली आहे. यामधे त्‍यांनी विरुध्‍दपक्षाकडून विकत घेतलेले लीनोट्रॉपिक 530 पॉझीटीव्‍ह मशीन दोषयुक्‍त असल्‍याने परत घेऊन त्‍यांची दिलेली किंमत रु.4,65,000/- परतफेड करुन देण्‍याची मागणी केली आहे.

 

2. तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष यांच्‍या फॅक्‍टरी प्रगती इंडस्ट्रियल इस्‍टेट 66 मधून लीनोट्रॉपीक 530 पॉझिटीव्‍ह मशीन विरुध्‍दपक्ष यांनी त्‍याबाबत दिलेले आश्‍वासनानंतर खरेदी केले.  त्‍यांची किंमत रु.5,36,000/- एवढी ठरवली व त्‍यांची टोकण रक्‍कम रु.1,25,000/- चेक नं.531571 दि.26.03.08 रोजीचा दिला.  नंतर दि16.06.08 रोजी रु.1,00,000/-  रकमेचा धनादेश नं.531578 देखील दिला. तद् नंतर रोख रक्‍कम रु.2,40,000/- विरुध्‍दपक्ष यांना दिले.  असे एकंदर किंमती पैकी विरुध्‍दपक्ष यांना एकूण रु.4,65,000/-  रकमेची पोच झाली. तद् नंतर विरुध्‍दपक्ष यांनी सदर मशीन तक्रारदार यांनी दिलेल्‍या पत्‍यावर दि.09.07.08. रोजी बसवून (इन्‍स्‍टॉल) करुन दिले. परंतु हे मशीन विरुध्‍दपक्ष्‍ा यांनी दिलेल्‍या अश्‍वासनाप्रमाणे कामाचे रिझल्‍ट देत नव्‍हते. त्‍यामुळे तक्रारदार यांनी अनेकदा विरुध्‍दपक्ष यांना कळवले व तक्रारीही केल्‍या. परंतु विरुध्‍दपक्ष यांनी कोणताही इंजिनियर किंवा तज्ञ हया मशीनचा दोष्‍ा निराकरण करण्‍यास पाठवला नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी कळवले कि, मशीन वॉरंटीत दुरुस्‍त होत नसल्‍यास त्‍यांची रक्‍कम रु.4,65,000/- परत करुन मशीन ताब्‍यात घ्‍यावे.  परंतु विरुध्‍दपक्ष यांनी दुर्लक्ष केले व उत्‍त्‍र दिलेले नाही. विरुध्‍दपक्ष हे मॅग्‍नम ग्राफिक्‍स चे प्रोप्रायटर असून इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तुचा धंदा करतात.  तक्रारदार यांनी सदर मशीन दैनंदिन जीवनातील स्‍वयंरोजगार किंवा उदरनिर्वाहासाठी धंदा करुन कमवण्‍यास घेतले होते असे तक्रारदार यांनी कथन केले होते.  परंतु सध्‍या मशीन चालू नसल्‍याने त्‍यासाठी घेतलेली लीव्‍ह अन्‍ड लायसन्‍स या तत्‍वावर भाडयाने घेतलेली जागा व लोकांची घेतलेली ऑर्डरची कामे करता आली नाहीत व नुकसान झाले असे तक्रारदार म्‍हणतात.

 

3. विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांची लेखी कैफियत दि.18.09.10 रोजी दाखल केली आहे. यामधे त्‍यांनी तक्रारदार यांनी हे मशीन व्‍यापारी दृष्‍टीकोनातून घेतले होते.  त्‍यामुळे तक्रार मंचापुढे चालण्‍यास पात्र नाही, असे म्‍हणणे मांडले आहे.  तक्रारदाराने दिलेल्‍या नोटीस नुसार दि.11.07.09 रोजी मशीनच्‍या इन्‍स्‍पेक्‍शनसाठी विरुध्‍दपक्ष यांचे तज्ञ येऊन गेले होते.  विरुध्‍दपक्ष हे नवीन व वापरलेल्‍या मशीनसाठी सेवा देण्‍याच्‍या व्‍यवसायात आहेत.  विरुध्‍दपक्ष यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर मशीन वापरण्‍यासाठी 2 KVA UPS/ स्‍टॅबलायझारची (Stabilizer) पाणी व वीजेच्‍या कनेक्‍शनची गरज आहे. परंतु तक्रारदार यांनी 1 KVA ट्रान्‍सफॉर्मर वापरला, तरीही विरुध्‍दपक्ष यांच्‍या इंजिनिअरने नंतर ते मशीन चालवून दाखवले होते. परंतु दि.25.11.08 रोजीच्‍या भेटीत विरुध्‍दपक्ष यांच्‍या इंजिनिअरला आढळले कि, 1 KVA मुळे कमी दाबाचा पॉवर सप्‍लाय मिळत आहे.  त्‍यामुळे मशीन योग्‍य रिझाल्‍ट देऊ शकत नाही. तेव्‍हा विरुध्‍दपक्ष हे कमी दाबाचा पॉवर सप्‍लायर बदलून देण्‍यास तयार आहेत.  परंतु त्‍यासाठी राहिलेली किंमत देऊन तक्रारदार यांनी ती पूर्ण करावी.  तसेच तक्रारदार यांनी Agfa-Rapiline Processor  Rip यांचीही विरुध्‍दपक्षाकडे ऑर्डर दिली होती व त्‍या सर्वांची मिळून किंमत रु.5,36,000/- ठरवली गेली.  विरुध्‍दपक्ष पुढे असे कथन करतात की बरेच दिवस तक्रारदार यांनी हे मशीन तद् नंतर वापरले आहे. पण कमी दाबाचे पॉवर सप्‍लाय दिले गेल्‍याने पूर्ण मशीनच बंद पडले. यामधे तक्रारदार यांच्‍या चुकीच्‍या वापरामुळे अशी परिस्‍ि‍थती घडली असे विरुध्‍दपक्ष यांचे म्‍हणणे आहे.

 

 

5. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा कागदपत्रे, लेखी कैफियत व युक्तिवाद मंचाने पडताळून पाहिला व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्‍ण उद्भवतो.

प्रश्‍न विरुध्‍दपक्ष यांच्‍या सवेत कमतरता आढळते का ?

वरील प्रश्‍नाचे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत असून पुढील कारण मिमांसा देत आहे.

                       -कारणमिमांसा-

      6. तक्रारदार यांनी एक लीनोट्रॉपिक 530 पॉझीटिव्‍ह मशीन विरुध्‍दपक्ष यांच्‍या कडून विकत घेतले. ते मशीन पूर्ण इतर अटॅचमेंट सकट रु.5,36,000/- एवढया रकमेस घेण्‍याचे ठरले. तद्वत तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष यांना एकंदर रु.4,65,000/- एवढी रक्‍कम दिली. तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष्‍ा यांना मशीन इंस्‍टॉल केल्‍यानंतर नीट चालत नाही, रिझाल्‍ट बरोबर देत नसल्‍याची तक्रार करुनही विरुध्‍दपक्ष यांनी दुर्लक्ष केले. म्‍हणून वकीलाची नोटीस देऊन तक्रारदार यांनी मशीन परत करुन त्‍याची भरलेली रक्‍कम रु.4,65,000/- परतफेड करुन मागितली. परंतु विरुध्‍दपक्ष यांनी या नोटीसला प्रतिउत्‍तर दिले नाही.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष यांना तक्रारदार यांचे कडून किंमत रु.4,65,000/-  मिळाल्‍याबद्दल वाद नाही असे दिसते.  तद् नंतर विरुध्‍दपक्ष यांनी मशीनमधील दोष काढता आला नाही.  जर मशीनला 2 KVA UPS हेच स्‍टॅबीलायझर लागत होते तर त्‍याबाबतही विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यांना मशीन घेताना किंवा घेण्‍यापूर्वी कोणतीही कल्‍पना दिलेली नव्‍हती. उलट मशीन बरोबर इतर अटॅचमेंटस् मात्र दिल्‍या होत्‍या. Stabilizer व त्‍या मशीन मंचाच्‍या मते एकाच प्रोसेसचे दोन संयुक्‍त भाग आहेत.  त्‍यामुळे मशीन इंस्‍टॉल करतानाही या स्‍टॅबीलायझरचा उपयोग विरुध्‍दपक्ष यांनी केलेला नाही. त्‍यांची सेवा देताना पूर्व कल्‍पना दिली असती तर तक्रारदार यांचे मशीन खरेदी करतानाचे मत वेगळे झाले असते.  तक्रारदार हे यंत्रातील तज्ञ नाहीत. त्‍यामुळे अशी माहिती मशीन घेण्‍यापूर्वी विरुध्‍दपक्ष यांनी देणे आवश्‍यक होते.  तक्रारदार यांनी त्‍याच्‍या उदरनिर्वाहासाठी करणा-या धंदयासाठी एक मशीन विकत घेतले होते. अशी अनेक मशीन धंदयातील फायदयासाठी विकत घेतलेल नाहीत.  तसेच सदय परिस्थितीत तक्रारदार यांनी रु.4,65,000/- विरुध्‍दपक्ष यांना दिलेले आहेत व मशीन बंदही पडलेले आहे. यामधे ग्राहकाचीच कुचंबणा झालेली दिसते.  विरुध्‍दपक्ष यांनी योग्‍य तो स्‍टॅबीलायझर वापरुन स्‍वखर्चाने मशीन पूर्णपणे दोषरहित करुन चालवून दयावे, काम करण्‍याच्‍या स्थितीत मशीन करुन घ्‍यावे अन्‍यथा मशीन परत घेऊन त्‍यांची स्विकारलेली किंमत तक्रारदार यास परत करावी असे या मंचाचे मत आहे,  म्‍हणून हे मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.

-- आदेश --

 

      1. तक्रार क्रमांक 36/2010 अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.  या तक्रारीचा खर्च रु.10,000/- विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यास दयावा व स्‍वतःचा खर्च स्‍वतः सोसावा.

      2. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यास विकत दिलेले लीनोट्रॉपीक 530 पॉझीटिव्‍ह मशीन स्‍वखर्चाने अदयावत सुरु करुन दयावे व तज्ञ रिपोर्ट तयार ठेवावा.  तसेच वॉरंटी दयावी व तक्रारदाराने राहिलेली किंमत विरुध्‍दपक्ष यांना दयावी.  या आदेशाची पूर्तता या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 1 महिन्‍याच्‍या आत दयावे जर विरुध्‍दपक्ष्‍ा स्‍वखर्चाने दुरुस्‍ती व स्‍टॅबीलायझर लाऊन मशीन वर दिलेल्‍या मुदतीत सुरु करुन देऊ शकले नाहीत तर तद् नंतर मात्र त्‍यांनी तक्रारदार यास मशीनची स्‍वीकारलेली किंमत रु.4,65,000/-  परत करावी व दोषयुक्‍त मशीन परत घ्‍यावे.

      3. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रास व नुकसानभरपाईचे रु.10,000/- दयावेत.

      4. उभयपक्षांना साक्षांकित प्रत्र दयावी.

 

 

                     सही/-                               

            (श्रीमती भावना पिसाळ)              (श्री.नलिन मजि‍ठीया)

                  सदस्‍या                           अध्‍यक्ष

 

-        असहमतीचा आदेश -

                    दिनांक - 23/03/2011

 

द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री.नलिन मजिठिया

 

प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये आज दिनांक 23/03/2011 रोजी मा. सदस्‍या, श्रीमती भावना पिसाळ यांनी खालीलप्रमाणे आदेश पारित केलेला आहे -

1. तक्रार क्रमांक 36/2010 अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.  या तक्रारीचा खर्च रु.10,000/- विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यास दयावा व स्‍वतःचा खर्च स्‍वतः सोसावा.

2. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यास विकत दिलेले लीनोट्रॉपीक 530 पॉझीटिव्‍ह मशीन स्‍वखर्चाने अदयावत सुरु करुन दयावे व तज्ञ रिपोर्ट तयार ठेवावा.  तसेच वॉरंटी दयावी व तक्रारदाराने राहिलेली किंमत विरुध्‍दपक्ष यांना दयावी.  या आदेशाची पूर्तता या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 1 महिन्‍याच्‍या आत दयावे जर विरुध्‍दपक्ष्‍ा स्‍वखर्चाने दुरुस्‍ती व स्‍टॅबीलायझर लाऊन मशीन वर दिलेल्‍या मुदतीत सुरु करुन देऊ शकले नाहीत तर तद् नंतर मात्र त्‍यांनी तक्रारदार यास मशीनची स्‍वीकारलेली किंमत रु.4,65,000/-  परत करावी व दोषयुक्‍त मशीन परत घ्‍यावे.

3. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रास व नुकसानभरपाईचे रु.10,000/-  

   दयावेत.

4. उभयपक्षांना साक्षांकित प्रत दयावी.

 

      मा. सदस्‍या यांनी पारित केलेल्‍या आदेशामध्‍ये मी सहमत नसल्‍यामुळे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे -

      प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष दिनांक 14/02/2011 रोजी मौखिक युक्‍तीवादाकरीता आली होती. उभयपक्षांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. उभयपक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदारांचा लेखी जबाब, सत्‍य प्रतिज्ञापत्र, पुरावा इत्‍यादी दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मी खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेत आहेत

 

मुद्दा क्रमांक 1) तक्रारदार यांनी ही बाब सिध्‍द केली आहे की, तो गैरअर्जदार यांचा

                  ग्राहक आहे काय? तसेच त्‍याने लीनोट्रॉपिक 530 पॉझीटिव्‍ह मशीन

                  हे स्‍वतःच्‍या उपजिविकेकरीता विकत घेतले होते काय?

उत्‍तर              होय.

मुद्दा क्रमांक 2)   तक्रारदाराने ही बाब सिध्‍द केली आहे की, लीनोट्रॉपिक 530

                   पॉझीटिव्‍ह मशिनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असून गैरअर्जदार यांनी

                   तक्रारदाराला सेवेत त्रृटी दिली आहे काय?

उत्‍तर               नाही.

मुद्दा क्रमांक 3)   तक्रारदार यांनी नुकसानभरपाईची केलेली मागणी सिध्‍द केली आहे

                   काय ?

उत्‍तर               नाही.

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 1) -

         प्रस्‍तुत तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून मी तक्रारीचे अवलोकन केले असता परिच्‍छेद क्रमांक 2 मध्‍ये नमूद केले आहे की, तो जांभूळकाकाचीवाडी, श्रध्‍दानंद रोड, विले पार्ले (ईस्‍ट), मुंबई-400 057 येथे प्रिंटींगचा व्‍यवसाय करतो, व त्‍याने गैरअर्जदार यांचेकडून लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीन त्‍याच्‍या व्‍यापारीकरणाकरीता घेतले होते. तसेच त्‍या करीता त्‍याने रुपये 5,36,000/- दिले होते ही बाब नमूद केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे ही बाब सिध्‍द होते. परंतु गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी सदर लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीन हे व्‍यापाराकरीता (Commercial purpose) घेतलेले होते व तक्रारदार यांचेकडे एकूण 10 कामगार कामाला आहेत.

तसेच तक्रारदाराने असे नमूद केले की, सदर लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीन बंद पडल्यामुळे, सदर मशिनमध्‍ये उत्‍पादीत दोष असल्‍यामुळे त्‍याला फार मोठे नुकसान सहन करावे लागले. आम्‍ही तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी ही बाब नमूद केली नाही की, त्‍याने सदर मशिन ही स्‍वतःच्‍या उपजिविकेसाठी घेतलेली आहे. परंतु गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, तक्रारदार यांचेकडे 10 कामगार काम करतात ही बाब गैरअर्जदार यांनी पुराव्‍यानुसार सिध्‍द केलेली नाही, त्‍यामुळे मंचाचे मत असे आहे की, तक्रारदार यांनी सदर मशिन स्‍वतःच्या उपजिविकेकरीता घेतलेली आहे.

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 2) -

 दुसरा महत्‍वाचा मुद्दा असा की, तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, गैरअर्जदार हे लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनचे उत्‍पादक आहेत, व त्‍यांनी तक्रारदाराला मशिनमध्‍ये असलेल्‍या उत्‍पादित दोषांसह लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीन  विकलेले आहे. तसेच उत्‍पादनात दोष असल्‍यामुळे मशिन ही वेळोवेळी बंद पडत होती. माझ्या मते जर तक्रारदार हा कोणत्याही उत्‍पादित मशिनमध्‍ये अथवा वस्‍तूमध्‍ये दोष असल्‍याबद्दल नमूद करीत असेल व त्‍याबद्दल तक्रार दाखल करीत असेल तर ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13 प्रमाणे सदर उत्‍पादनात दोष होता याबाबत वस्‍तूची/मालाची चाचणी करुन घ्‍यावयास हवी होती. त्‍याबाबत कलम 13(1)(3) मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे.

 

© Where the complaint alleges a defect in the goods which cannot be determined without proper analysis or test of the goods, the District Forum shall obtain a sample of the goods from the complainant, seal it and authenticate it in the manner prescribed and refer the sample so sealed to the appropriate laboratory along with a direction that such laboratory make an analysis or test, whichever may be necessary, with a view to finding out whether such goods suffer from any defect alleged in the complaint or from any other defect and to report its findings thereon to the District Forum within a period of forty-five days of the receipt of the reference or within such extended period as may be granted by the District Forum.

 

     मंचाच्‍या मते तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली तेव्‍हा त्‍याला लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असल्‍याबाबत दाद मागितली होती. तसेच त्‍यांनी तक्रार ही वकीलांमार्फत दाखल कलेली आहे, त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदर लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनबाबत चाचणी/तज्ञांचा अहवाल दाखल करणे आवश्‍यक होते, परंतु तसा अहवाल तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. सदर मशिन ही प्रिंटींगसंबंधी असून त्‍यातील तांत्रिक बाब मंचाला समजून घेणे आवश्‍यक आहे. परंतु तसा सबळ पुरावा मंचासमोर न आल्‍याने लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष आहे अथवा नाही या मतावर येऊ शकत नाही.

 

तक्रारदार यांनी त्‍यांच्या तक्रारीत लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये कोणकोणते दोष होते ही बाब कुठेच नमूद केलेली नाही. आम्‍ही तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सदर मशिन विकत घेण्‍यापूर्वी सदर मशीन ही प्रगती इंडस्ट्रियल इस्‍टेट, 66, ए.के.व्‍ही.ए.आम्‍ली, सिलव्‍हस्‍सा 396320 येथे जाऊन त्‍याने प्रत्‍यक्ष कंपनीला भेट देऊन मशीन संदर्भात पूर्ण माहिती समजून ती विकत घेतली आहे, व त्‍याचे प्रात्‍यक्षीक करुन पाहिले आहे. तक्रारदार यांनी सदर मशीन हे दिनांक 09/07/2008 रोजी विकत घेतले होते, व तदनंतर सदर मशिनचे इन्‍स्‍टॉलेशन हे दिनांक 10/07/2008 रोजी करण्‍यात आले होते. त्‍याचा सर्व्‍हीस रिपोर्ट तक्रारदार यांनी निशाणी सी, पान क्रमांक 10 वर दाखल केलेला आहे. सदर मशीनचे इन्‍स्‍टॉलेशन झाल्‍यानंतर गैरअर्जदार यांच्‍या अभियत्‍यांने खालीलप्रमाणे सर्व्‍हीस रिपोर्टमध्‍ये नमूद केले आहे -

 Lino 530 & Agta Raplience processor and also Rip install are completed. Everything is Ok. Machine working smoothly.

तसेच तक्रारदार यांनी सदर सर्व्हिस रिपोर्टवर सही केलेली आहे. यावरुन ही बाब सिध्‍द होते की, मशीनचे इन्‍स्‍टॉलेशन हे बरोबर झालेले होते व तक्रारदार हा समाधानी होता. तक्रारदार यांनी दिनांक 10/07/2008 पासून मशीनमध्‍ये उत्पादनातील दोष असल्‍याबाबतची गैरअर्जदार यांचेकडे कधीही लेखी तक्रार केलेली नाही. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना अनेकवेळा फोनद्वारे मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असल्‍याबाबत कळविले आहे याबाबतही योग्‍य तो पुरावा त्‍यांनी मंचात दाखल केलेला नाही.  तक्रारदार यांनी गैरअर्जदाराला दिनांक 01/07/2009 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली होती व त्‍यात मशीन ही प्रॉपर रिझर्ल्‍ट आणि आऊटपूट देत नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी सदर मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असल्‍यामुळे कंपनीला एक वर्षानंतर कळविलेले आहे, परंतु सदर नोटीशीमध्‍ये पण मशीनमध्‍ये उत्‍पादनातील कोणकोणते दोष होते ही बाब नमूद केलेली नाही. तसेच तक्रारदार यांनी दिनांक 18/11/2009 रोजी पुन्‍हा गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली होती. मंचाच्‍या मते तक्रारदार यांनी लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष होते ही बाब सिध्‍द केलेली नाही. जर लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असते तर तक्रारदार हा जवळपास एक वर्षापर्यंत गप्‍प बसला नसता, त्‍याने त्वरित गैरअर्जदार यांचेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या असत्या. वास्‍तविक पहाता तक्रारदाराच्‍या नोटीशीवरुन हे सिध्‍द होते की, मशीनचे आऊटपूट बरोबर निघत नाही त्‍यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी सदर लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोषाबाबतची मागणी पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेली नाही.

गैरअर्जदार यांनी लेखी जबाबात नमूद केले आहे की, सदर मशिनला 1AKVA  स्‍टॅबलायझरचा (Stabilizer) सप्‍लाय दिलेला असल्‍यामुळे मशिन बंद पडत होती. तदनंतर त्‍यांच्‍या तंत्रज्ञाने पहाणी केली असता तक्रारदारांना गैरअर्जदार यांनी  2 KVA UPS/ स्‍टॅबलायझरच (Stabilizer) लावण्‍याबाबत सूचना केली होती. त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी सदर 2 KVA UPS/ स्‍टॅबलायझर (Stabilizer) लावलेले आहे व त्‍यामुळे मशीन सुरळीतपणे सुरु आहे. असे गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे, तसेच त्‍यासंबंधी त्‍यांनी दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत. तक्रारदार यांनी प्रस्‍तूत तक्रार ही दिनांक 29/03/2010 रोजी मंचात दाखल केलेली आहे व तदनंतर अनेक वेळा संधी देऊनही मशिनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असल्‍याबद्दल कोणताच सबळ पुरावा दाखल केलेला नाही त्‍यामुळे मंचाचे मत असे आहे की, लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असल्‍याबाबत सिध्‍द केलेले नसल्‍यामुळे सदर लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनची किंमत रक्‍कम रुपये 4,65,000/- ची मागणी केलेली आहे ती मिळणेस पात्र नसल्‍यामुळे सदर तक्रार खारिज होण्‍यास पात्र आहे.

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 3)

    तक्रारदार यांनी त्‍यांच्या तक्रारीत शारिरीक मानसिक त्रासाबद्दल रुपये 50,000/- व रुपये 20,000/- कॉम्‍पेन्‍शेशनची मागणी केलेली आहे. मंचाने स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 2 मध्‍ये गैरअर्जदार यांनी सेवेत त्रृटी दिलेली आहे ही बाब तक्रारदार यांनी सिध्‍द केलेली नसल्‍यामुळे तक्रारदाराला गैरअर्जदाराविरुध्‍द नुकसानभरपाईची मागणी मागता येत नाही, तक्रारदार यांनी नुकसानभरपाईबाबत कोणताच सबळ पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने नमूद केले आहे की, मशिनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असल्‍यामुळे त्‍याला व्‍यापारात नुकसान सहन करावे लागले, त्‍याकरीता त्‍याने सबळ पुरावा म्‍हणून कोणतेच दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत. तक्रारदार यांनी त्‍याच्‍या तक्रारीत काल्‍पनिक मागणी केलेली आहे त्‍याला कोणताच आधार नाही, त्‍यामुळे तक्रारदार यांनी केलेली मागणी ही खारिज होण्‍यास पात्र आहे.

तसेच सदर मंच हे इतर न्‍यायलयांनी दिलेल्‍या न्‍याय निवाडयांचा उल्‍लेख खालीलप्रमाणे करीत आहेत

1)                               मंचाने मा. राज्‍य आयोग यांनी अपिल क्रमांक 938/2009 साई सर्व्हिस स्‍टेशन लिमिटेड -विरुध्‍द- मेसर्स कोरस इंडिया लिमिटेड व इतर 2 यामध्‍ये व अपिल क्रमांक 956/2009 मारुती उद्योग लिमिटेड -विरुध्‍द- मेसर्स कोरस इंडिया लिमिटेड व इतर 2 या दोन अपिलांमध्‍ये दिनांक 06/03/2010 रोजी पारित केलेल्‍या आदेशाचे अवलोकन केले असता त्‍यात खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे.

Car was purchased by the complainant/Complany on 15/10/2004. Complainant car had run for about 16 months covering 17800 Kms. If this is so, surely thre was no manufacturing defect. The complianant who allee manufacturing defect has to prove that there was manufacturing defect in  the car supplied to him by O.P.No.1 and manufactured by O.P.No.2. There is virtually no evidence of exper adduced by the complainant/Company. It was duty of the respondent/complainant-Company to get the car inspected from expere from the field. So car should have been shown to some Automobile Engineer and his report should have been placed on record to prove that the car was having manufacturing defects on the date of incident. There is no evidence of any kind adduced in this behalf by repondent No.1/Company. The care had not stopped at any point of time during those 16 months when car was being used by Shri. Dutt, official of the complainant/Company.

2)                               तसेच मंचाने मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी स्‍कूटर इंडिया लिमिटेड -विरुध्‍द- मंजुळाबेन किरिटभाई व इतर 2010 (2) सीसीसी 428(एनएस) या निवाडयाचे अवलोकन केले असता परिच्‍छेद क्रमांक 10 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे.

AS against this, petitioner got the vehicle inspected by an Exper of the Company and, according to his Report, the defects may have crept in on account of lack of oil or due to overloading or on account that the vehicle was not being driven properly. The Inspection Report submitted by him had been discarded bythe Fora below because the Affidavit of the said Exper had not been filed in support of the Report. The Complainant did not lead any evidence to rebut the same. Even it, the Report of the Expert produced by the petitioner is discarded, the fact remains that the respondent had failed to prove that there was a manufacturing defect. In the absence of any such evidence, it cannot be said that there was any manufacturing defect in the vehicle.

3)                               तसेच मंचाने मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी एमआरएफ लिमिटेड -विरुध्‍द भालचंद्र जमनादास पटेल व इतर 2010 (2) सीसीसी 85(एनएस) या निवाडयाचे अवलोकन केले असता परिच्‍छेद क्रमांक 10 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे

The petitioner’s Engineer, in his Report has submitted that there was no manufacturing defect in the tyres. The onus to prove that there was manufacturing defect in the tyres was on respondent no.1, which he failed to discharge by leading any expert evidence. As against this, the petitioner had got the tyres examined from its Engineer, who after examination the same, stated in his Report that there was no manufacturing defect in the tyres. No reasons have been given by the State Commission to differ from the opinion given by the petitioner’s Engineer

 

4)                               तसेच मंचाने मा. राष्‍ट्रीय आयोग आणि सुप्रिम कोर्ट यांनी कन्‍झ्युमर केसेस पान नंबर 1986-94  बी.पी.एल. लिमिटेड विरुध्‍द एन. रथिनासबापती या न्‍याय निवाडयाचे अवलोकन केले.

 

मंचाने उपरोक्‍त चार न्‍याय निवाडयांचे अवलोकन केले असता मा. राज्‍य आयोग व मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी या न्‍याय निवाडयात नमूद केले आहे की, जर ग्राहक मंचाकडे कोणत्‍याही तक्रारीमध्‍ये मशिनच्‍या उत्‍पादीत दोषांबद्दल वाद असेल तर तक्रारदार यांनी त्‍या मशिनमध्‍ये उत्‍पादनातील दोष आहेत ही बाब सिध्‍द करण्‍याची जबाबदारी ही तक्रारदार यांचेवरच आहे. तक्रारदार यांनी मशिनमध्‍ये उतपादनातील दोष असल्‍याबद्दल तज्ञांचा पुरावा दाखल केलाच नाही, त्‍यासंबंधीत कोणतेच दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत.

तक्रारदार यांनी सदर मशिन दिनांक 09/08/2008 रोजी विकत घेतली होती. सदर मशिनसंबंधी वॉरंटी संदर्भात करारनामा हा गैरअर्जदारासोबत झाला होता. त्‍याबाबतचे कोणतेच दस्‍तऐवज दाखल केलेले नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी सेवेत त्रृटी दिलेली आहे ही बाब ग्राहय धरता येत नाही.

      मंचाचे मत असे आहे की, तक्रारदार यांनी सदर लिनोट्रॉनिक 530 पॉझिटिव्‍ह मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष असल्‍याबाबत सिध्‍द केलेले नसल्‍यामुळे सदर तक्रार खारिज करण्‍यात येते. मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहेत

               - आदेश -

1)         तक्रार क्रमांक 36/2010 खारिज करण्‍यात येते.

2)         उभयपक्षांनी आपापला खर्च स्‍वतः सोसावा.

3)         सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्‍यात यावी.

दिनांक 23/03/2011

ठिकाण - मध्‍य मुंबई, परेल.

 

(सदर तक्रारीचा असहमतीचा आदेश लगेच मंचाच्‍या दुस-या सत्राच्‍या बैठकीत पारीत करण्‍यात आला.)

 

                                        सही/-

                                        (नलिन मजिठिया)

                                       अध्‍यक्ष

 

 

 

 

 

 

 

 

 

         मध्‍य मुंबई ग्राहक तक्रार न्‍याय निवारण मंच, परेल मुंबई

 

दुस-या सदस्‍यांचे मत

 

-        आदेश -

 

द्वारा - मा. सदस्‍य, श्री. एस. एस. पाटील

      दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंच (सेवावर्ग)

 

 

 मा. महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोगाचे दिनांक 10/06/2011 चे आदेश व मा. ग्राहक तक्रार निवारण मंच मध्‍य मुंबई यांचे दिनांक 17/06/2011 चे आदेशान्‍वये सदर तक्रारीची सुनावणी दिनांक 28/06/2011 रोजी ठेवून तक्रारदार व विरुध्‍दपक्ष यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला. तसेच तक्रारअर्ज व त्‍यासोबत तक्रारदार यांनी हजर केलेले दस्‍त (कागदपत्र), विरुध्‍दपक्ष यांनी दाखल केलेली कैफीयत, तक्रारदार यांचे शपथपत्र व त्‍यासोबत जोडलेली कागदपत्रे, तसेच दोन्‍ही पक्षांचे लेखी युक्‍तीवाद लक्षपूर्वक वाचले. मा. सदस्‍या श्रीमती भावना पिसाळ व मा. अध्‍यक्ष सर्वश्री मजिठिया साहेब यांचे दिनांक 23/03/2011 चे या तक्रार अर्जावरील आदेशांचे काळजीपूर्वक अवलोकन केले. या तक्रारीबाबत आमचे मत पुढीलप्रमाणे -

सदर प्रकरणात न्‍याय करतांना आम्‍ही खालील मुद्दे प्रामुख्‍याने विचारात घेतले -

मुद्दा क्रमांक 1)   तक्रारदार हा ग्राहक आहे काय?

उत्‍तर              होय.

मुद्दा क्रमांक 2)   तक्रारदार यांनी घेतलेली वस्‍तू (लीनोट्रॉनिक 530 मशीन) दोषयुक्‍त

                   असल्‍याचे सिध्‍द झाले आहे काय?

उत्‍तर               नाही.

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 1)

    यात तक्रारदार यांनी दिनांक 26/06/2008 रोजी विरुध्‍दपक्ष यांचेकडून लिनोट्रॉनिक मशीन 530 हे 5,36,000/ रुपयास विकत घेतलेले आहे. यात विरुध्‍दपक्ष यांनी आक्षेप घेतला आहे की, तक्रारदार यांनी सदर मशीन हे त्‍याच्‍या धंद्यासाठी घेतलेले असल्‍याने तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. तथापी ग्राहक या संज्ञेतील पुढील तरतुदीनुसार तक्रारदार प्रिटींग व्‍यवसाय स्‍वतःच्‍या उपजिवीकेसाठी करतात की त्‍यांची उपजिवीका अन्‍य व्‍यवसायावर अवलंबून आहे याबाबत आम्‍ही तोंडी युक्‍तीवादाचे वेळी युक्‍तीने विचारुन तक्रारदार यांची वैय्यक्‍तीक माहीती काढून घेतली, त्‍यावेळी आमचे असे निदर्शनास आले की, सदर तक्रारदार यांची उपजीवीका प्रकरणातील प्रिटींग व्‍यवसायावरच आहे व ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(ड)(ii) खाली सदर तक्रारदार हे ग्राहक  या व्‍याख्‍येत बसतात आणि तक्रारदार हे विरुध्‍दपक्षाचे ग्राहक आहेत.

स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 2)

      या मुद्याचे अनुषंगाने आम्‍ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन केले त्‍यात तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पान 10 वर दिनांक 09/07/2008 रोजी सदर मशीन तक्रारदार यांचेकडे बसवल्‍याबाबतचा (इन्‍स्‍टॉल केल्‍याबाबतचा) रिपोर्ट आहे. त्‍यानुसार सदर मशीनबाबत इंजीनिअरचा रिमार्क आहे Everything is ok त्‍यावर ग्राहकाची सही आहे. त्‍यानंतर दिनांक 01/07/2009 म्‍हणजे तब्‍बल एक वर्षानंतर तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष यांना वकीलामार्फत नोटीस दिलेली आहे. त्‍या अगोदर, विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीमध्‍ये मान्‍य केले आहे की, दिनांक 25/11/2008 रोजी तक्रारदार (त.) यांनी सदर मशीन चालत नसल्‍याची तक्रार केली होती. परंतु विरुध्‍दपक्ष यांनी त्‍यांचा अभियंता यास तक्रारदाराकडे पाठवून मशीनची पाहणी केली असता मशीनमध्‍ये दोष नसून पॉवर सप्‍लाय 2 केव्‍ही ए यू.पी.एस. स्‍टॅबिलायझर न बसवता सदर मशीन 1 केव्‍ही ए स्‍टेप डाऊन ट्रान्‍स्‍फॉर्मरमुळे प्रॉब्‍लेम झालेला होता असे नमूद करुन त्‍यांना 2 केव्‍ही ए युपीएस स्‍टॅबीलायझरचा सल्‍ला दिला होता. यावरुन यात विरुध्‍दपक्ष यांच्‍या मतानुसार लिनोट्रॉनिक मशीनमध्‍ये दोष नसून 1 केव्‍ही ए ट्रॉन्‍स्‍फॉर्मरमुळे लेसर पॉवर सप्‍लाय झालेला असल्‍याचे विरुध्‍दपक्षाचे मत आहे.  प्रार्थना क्रमांक (अ) नुसार तक्रारदार यांनी संपूर्ण लिनोट्रॉनिक मशीनची दिलेली रक्‍कम परत पाहिजे असल्‍याची मागणी केलेली आहे. त्‍यांनी त्‍यासाठी सदर मशीनमध्‍ये उत्‍पादनातील दोष आहे (संपूर्ण मशीन हे दोषयुक्‍त आहे) हे सिध्‍द करणे गरजेचे आहे.

(2) दिनांक 09/07/2008 पासून तक्रारदार यांनी मशीन किती दिवस योग्‍य प्रकारे चालले व केव्‍हापासून नादुरुस्‍त झाले याबाबत तक्रारीत स्‍पष्‍टपणे काहीही नमूद केलेले नाही. तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक 8 मध्‍ये ते म्‍हणतात The Lenotronic machine 530 positive machine supplied of installed by Op. was found detective. यावरुन हे मशिन बसवल्‍या दिवसापासून नादुरुस्‍त होते असे मानल्‍यास त्‍यांनी दिनांक 09/07/2008 रोजी जो इन्‍स्‍टॉलमेंट रिपोर्ट दिलेला आहे त्‍यावर स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे की, सर्वकाही ओके त्‍यावर ग्राहक म्‍हणून तक्रारदार यांनी सही केली आहे. शिवाय दिनांक 09/07/2008 पासून ते 01/07/2009 पर्यंत सुमारे एक वर्षात, तक्रारदार हे गप्‍प आहेत व त्‍यांनी दिनांक 01/07/2009 रोजी विरुध्‍दपक्ष यांना नोटीशीद्वारे मशीनमधील दोषाबाबत कळविले आहे. याबाबत तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी प्रत्‍यक्ष व फोनद्वारे विरुध्‍दपक्षाशी याबाबत संपर्क साधलेला होता. पण या म्‍हणण्‍यास तसा काही सबळ पुरावा नाही. तक्रारदार यांनी सदर मशीन सुमारे पावणे दोन वर्षे वापरल्‍यानंतर ही तक्रार दाखल केलेली आहे.

(3) याबाबत न्‍यायाचे सर्वसम्‍मत तत्‍व आहे की जर एखादी व्‍यक्‍ती वस्‍तूत उत्‍पादनातील दोष (मॅन्‍युफॅक्‍चरींग डिफेक्‍ट) आहे अगर कोणताही दोष आहे असा दावा करीत असेल तर त्‍याबाबत त्‍यांनी सदर दोष असल्‍याबाबत तज्ञाचा पुरावा देणे आवश्‍यक आहे. यात तक्रारदार यांनी सदर मशीन नादुरुस्‍त असून त्‍यात उत्‍पादनातील दोष असल्‍याबाबत कोणताही तज्ञ पुरावा मंचासमोर आणलेला नाही. दिनांक 29/03/2010 रोजी सदर तक्रार ग्राहक मंचासमोर दाखल आहे. त्‍यानंतरही तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्जाच्‍या चौकशी दरम्‍यान (दि. 29/03/2010 ते 23/03/2011) एक वर्षाच्‍या कालावधीत याबाबत तज्ञांचा पुरावा सादर केलेला नाही. यामुळे या वादातील  लिनोट्रॉनिक 530 मशीन हे दोषयुक्‍त आहे अगर त्‍यात उत्‍पादनातील मुलभूत दोष निर्माण झालेला आहे हे तक्रारदारांना सिध्‍द करता आलेले नसल्‍याने सदर तक्रार खारिज करण्‍याच्‍या योग्यतेची असल्‍याचे माझे प्रामाणिक मत आहे. त्‍यामुळे मी मा. अध्‍यक्ष, श्री. मजिठिया सहेब यांचे मताशी पूर्ण सहमत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो-

              - आदेश

1) तक्रार क्रमांक 36/2010 खारिज करण्‍यात येते.

      2) खर्चाबाबत आदेश नाही.

      3) आदेशाची प्रत विनामुल्‍य उभयपक्षांना द्यावी.

                                            

                                         ( एस. एस. पाटील )

                                               सदस्‍य

                             मध्‍य मुंबई जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, परेल

 

 

सदर तक्रारीमध्‍ये सदस्‍या, श्रीमती भावना पिसाळ यांनी दिनांक 23/03/2011 रोजी आदेश पारित करुन तक्रार ही अंशतः मंजूर करण्‍यात आली. सदर अंतिम आदेश खालीलप्रमाणे आहे

 

      1. तक्रार क्रमांक 36/2010 अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.  या तक्रारीचा खर्च रु.10,000/- विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यास दयावा व स्‍वतःचा खर्च स्‍वतः सोसावा.

      2. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यास विकत दिलेले लीनोट्रॉपीक 530 पॉझीटिव्‍ह मशीन स्‍वखर्चाने अदयावत सुरु करुन दयावे व तज्ञ रिपोर्ट तयार ठेवावा.  तसेच वॉरंटी दयावी व तक्रारदाराने राहिलेली किंमत विरुध्‍दपक्ष यांना दयावी.  या आदेशाची पूर्तता या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 1 महिन्‍याच्‍या आत दयावे जर विरुध्‍दपक्ष्‍ा स्‍वखर्चाने दुरुस्‍ती व स्‍टॅबीलायझर लाऊन मशीन वर दिलेल्‍या मुदतीत सुरु करुन देऊ शकले नाहीत तर तद् नंतर मात्र त्‍यांनी तक्रारदार यास मशीनची स्‍वीकारलेली किंमत रु.4,65,000/-  परत करावी व दोषयुक्‍त मशीन परत घ्‍यावे.

      3. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रास व नुकसानभरपाईचे रु.10,000/- दयावेत.

      4. उभयपक्षांना साक्षांकित प्रत्र दयावी.

 

   सदस्‍या़, श्रीमती भावना पिसाळ यांनी पारित केलेल्‍या आदेशाशी अध्‍यक्ष हे असहमत असल्‍यामुळे त्‍यांनी वेगळा आदेश पारित करुन सदर तक्रार खारिज करण्‍यात आली होती. परंतु मंचातील सदस्‍य श्री. एस. एस. पाटील, यांना दक्षिण मुंबई जिल्‍हा मंचात सदस्‍य पदावर वर्ग करण्‍यात आले असल्‍यामुळे मा. महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग यांना विनंती पत्र पाठवून दुस-या सदस्‍यांचे मत जाणून घेण्‍याबाबत विनंती अर्ज दिनांक 23/03/2011 रोजी पाठविला होता. त्‍या अर्जाला अनुसरुन मा. राज्‍य आयोग यांनी दिनांक 10/06/2011 रोजी आदेश पाठवून सदस्‍य, श्री. एस. एस. पाटील यांचे दुसरे मत घेण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले होते, त्‍या अनुषंगाने सदस्‍य, श्री. एस. एस. पाटील यांनी सदर प्रकरणात दिनांक 14/07/2011 रोजी मत दिलेले असून मा. सदस्‍य, श्री. एस. एस. पाटील यांनी तक्रार ही खारिज केलेली आहे. तसेच सदस्‍य श्री. एस. एस. पाटील यांनी तक्रार खारिज करुन अध्‍यक्ष यांनी पारित केलेल्‍या आदेशाला संमती दिलेली आहे. सदर प्रकरणात बहुमतानी तक्रार खारिज करण्‍यात आलेली आहे. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येतो-

        - अंतिम आदेश -

      1) तक्रार क्रमांक 36/2010 खारिज करण्‍यात येते.

      2) खर्चाबाबत आदेश नाही.

      3) आदेशाची प्रत विनामुल्‍य उभयपक्षांना पाठविण्‍यात यावी.

                                            

               

               (एस. एस. पाटील)    ( नलिन मजिठिया )    (भावना पिसाळ)

                   सदस्‍या           अध्‍यक्ष                  सदस्‍या

                  मध्‍य मुंबई जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, परेल.

                                                                                                                                एम.एम.टी./-

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.