Maharashtra

Akola

CC/14/187

Sharad Bhimrao Pandage - Complainant(s)

Versus

Sanjay Krushi Seva Kendra - Opp.Party(s)

Nakat

15 Sep 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/187
 
1. Sharad Bhimrao Pandage
R/o. Palaso Badhe, Tq. Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sanjay Krushi Seva Kendra
through Prop.Old Coton Market, Akola
Akola
Maharashtra
2. Shah Agencies,through Proprietor
Near Manek Talkies,Akola
Akola
Maharashtra
3. Param Agro Seeds
through Authorised Officer,Mogar Rd. Khandawa
Khandwa
Madhya Pradesh
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 15/09/2015 )

आदरणीय अध्‍यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …

      तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून दि. 12/6/2014 रोजी “जे.एस.335 उन्न्त” हे सोयाबिन बियाणे, एकूण 9 थैल्या, प्रत्येकी रु. 950/- प्रमाणे एकूण रु. 17,500/- ला विकत घेतले.  तक्रारकर्त्याने त्याचे पत्नीचे नावाने असलेली शेती, शेत सर्वे नं. 8/2, क्षेत्रफळ 1 हे. 16 आर मौजे जलालपुर व शेत सर्वे नं. 8/7 क्षेत्रफळ 1 हे. 21 आर मौजे जलालपूर, तसेच शरद देविदास खोत यांचे नावाने असलेली शेती, जी तक्रारकर्ता ठोक्याने करीत आहे, त्याचा गट नं. 8/1 क्षेत्रफळ 1 हे. 16 आर मौजे जलालपुर, ही शेती योग्य ती मशागत करुन पेरणीकरिता तयार केली.  जुलै 2014 मध्ये चांगला पाऊस आल्यानंतर दि. 26/7/2014 रोजी तक्रारकर्त्याने सदर बियाण्याची पेरणी वरील शेतामध्ये केली.  परंतु सदर बियाणे तक्रारकर्त्याच्या शेतात उगवलेच नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यांनी तक्रारकर्त्याची तक्रार ही तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती, अकोला यांच्याकडे पाठविली.  तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती अकोला, यांनी दि. 21/8/2014 रोजी तक्रारकर्त्याच्या वर नमुद शेतीवर भेट देवून पाहणी केली व आपला अहवाल दिला.  त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 3 निर्मित सोयाबिनचे बियाणे जे.एस. 335 या वाणाच्या अनुक्रमे लॉट क्र. 8209 हे बियाणे सदोष असल्या कारणाने,  ह्या बियाण्याची उगवण क्षमता 10 टक्के असल्याचे  समितीच्या निदर्शनास आले आहे.  तक्रारकर्त्यासोबत इतरही कास्तकारांना विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी असेच बोगस सदोष बियाणे विकलेले आहे.  अशा प्रकारे सदोष बियाणे तक्रारकर्त्यास विकून  विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याचे नुकसान केलेले आहे.  तक्रारकर्त्याने तक्रारीद्वारे एकूण रु. 2,46,750/- चे नुकसान झाल्याचे नमुद केलेले आहे.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना, सदर तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचा अहवाल पाठविला व नुकसान भरपाईची मागणी केली.  परंतु विरुध्दपक्षांनी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना दि. 6/11/2014 रोजी वकीलामार्फत सुचना पत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली.  परंतु विरुध्दपक्षांनी खोटी माहिती देऊन जबाब पाठविला.  तक्रारकर्त्यास दोषयुक्त बियाणे पुरवून विरुध्दपक्षाने सेवेमध्ये न्युनता दर्शविली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला व म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार  मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व झालेल्या नुकसानीची एकूण रक्कम रु. 2,46,750/- तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावा.

               सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 13 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्ष  क्र. 1 यांचा लेखीजवाब :-

2.        विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत असे नमुद केले की,  तक्रारकर्ता हा शेतकरी नाही, कारण त्याच्या नावाने एकही शेती नाही.  तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती, अकोला यांनी त्यांच्या अहवालामध्ये तक्रारकर्ता वंदना शरद पंडागे व शरद देविदास खोत असे दर्शविले आहे.  त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर तक्रार दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही.  दुस-याची शेती ठोक्याने घेणे हा व्यापार झाला,  त्यामुळे शेती ठोक्याने करणारा व्यक्ती हा ग्राहक या व्याख्येत मोडत नाही.  वादातील बियाण्याचे वितरक मे. महाराष्ट्र बिज भंडार, खामगांव हे आहेत व त्यांना या तक्रारीत आवश्यक पक्ष केलेले नाही.  विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी भरपुर शेतक-यांना सदर बियाणे विक्री केलेले आहे, परंतु तक्रारकर्त्याशिवाय इतर कोणत्याही शेतक-याने बियाण्याबाबत तक्रार केली नाही.  तक्रार निवारण समितीमध्ये एकूण पाच सदस्य असतात, परंतु सर्व पाच सदस्य उपस्थित असल्याबाबत कोणताही पुरावा अथवा घटनास्थळ पंचनामा तक्रार निवारण समितीने प्रकरणात दाखल केला नाही.  तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष तक्रारकर्त्याच्या शेतावर जाऊन पाहणी केली नाही, तर तक्रारकर्त्याच्या सांगण्यावरुन चौकशी अहवाल त्यांच्या कार्यालयात बसुन तयार केला आहे, त्यावर समितीच्या अध्यक्षांची सही नाही.  तक्रार निवारण समितीने शेताची पाहणी करण्याआधी विरुध्दपक्षांना सुचना देणे आवश्यक होते,  परंतु तसे न करता तक्रार निवारणसमितीने एकतर्फी चौकशी दाखवून अहवाल तयार केला आहे.  सन 2014 च्या जुलै महिन्यात अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडल्या कारणाने त्या वर्षी ब-याच         शेतक-यांचे बियाणे न उगवता पिके खराब झाली व दुबार पेरणी करावी लागली.  कोणत्याही प्रकारच्या बियाण्यापासून चांगले उत्पन्न मिळण्याकरिता फक्त बियाण्यांचा दोष नसतो.  नैसर्गिक पाऊस, जमीन, औषधे, वातावरण व पिकाची घ्यावयाची काळजी, हया सर्व बाबींवर उत्पन्न अवलंबुन असते.  तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये नुकसान भरपाईची रककम दुप्पट दर्शविली आहे. अशा प्रकारे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसून खोटी तक्रार विरुध्दपक्षाविरुध्द दाखल केलेली असल्यामुळे ती खर्चासह खारीज करण्यात यावी. 

विरुध्‍दपक्ष  क्र. 2 यांचा लेखीजवाब :-

      विरुध्दपक्ष क्र. 2 ने सदर प्रकरणात पुरसीस दाखल करुन, नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 3 यांचा लेखी जवाब हाच विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखी जबाब गृहीत धरण्यात यावा.


विरुध्‍दपक्ष  क्र. 3 यांचा लेखीजवाब :-

       विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत असे नमुद केले की, तक्रारकर्त्याजवळ त्याचे नावावर कोणतीही शेती नसल्याने व तक्रारकर्ता हा ठोक्याने शेती करीत असल्याने, तो ग्राहक नसून केवळ व्यावसायिक आहे.  कृषी अधिकारी तसेच तालुका स्तरीय समिती यांनी बियाणे कायदा कलम 23-अ प्रमाणे कोणत्याही तरतुदीचे पालन केलेले नाही.  त्यांनी फक्त दर्शनी पाहून त्यांचा अहवाल सादर केला आहे.  वास्तविक पाहता उगवण शक्तीचा अहवाल देण्यापुर्वी, त्या बियाण्याचे पुर्ण परिक्षण करुन,  त्या नंतरच अहवाल द्यायचा असतो.  कारण उगवण शक्तीला तापमान, हवामान, पाण्याची आद्रता तसेच जमीनीचा दर्जा, पर्जन्यमान,  पेरणीची पध्दत ह्या सर्व बाबी आवश्यक असतात.  कृषी अधिकारी व चौकशी समितीने दिलेला अहवाला हा पुर्णत: दोषपुर्ण आहे.  जिल्हा समितीने अहवाल देतांना बियाणे कायद्याअंतर्गत कलम 23-अ 1 चे कोणतेही पालन केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.   

     विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला आहे

3.      त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर, सौ. वंदना शरद पंडागे यांचा प्रतिज्ञालेख, श्री शरद देविदास खोत यांचा प्रतिज्ञालेख,  व लेखी युक्तीवाद दाखल केला.  विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

3.     या प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार,   सोबत  दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 व 3  यांचा स्वतंत्र लेखी जवाब व विरुध्दपक्ष क्र. 2 ची पुरसीस, तक्रारकर्त्याचे प्रतीउत्तर, व उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे

     तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की,  तकारकर्त्याकडील जी शेती आहे,  त्यापैकी शेत गट क्र. 8/7 क्षेत्रफळ 1 हे. 21 आर, मौजे जलालपुर ता.जि. अकोला, हे त्याच्या पत्नीच्या नावे आहे व तकारकर्ता हा शरद देविदास खोत यांच्या नावाची गट क्र. 8/1 मौजे जलालपुर क्षेत्रफळ 1 हे. 16 आर, ही शेती ठोक्याने वहीती करतो.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे जे एस 335 उन्नत हे बियाणे खरेदी करुन, वरील शेतात पेरले असता ते उगविले नाही,  म्हणून त्याची तक्रार  तालुका स्तरीय तक्रार निवारण समीतीकडे केली असता,  त्यांनी शेताला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली व अहवालात त्याचे स्पष्ट मत नोंदविले की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास विकलेले बियाणे जे.एस. 335 लॉट क्र. 8209 हे सदोष आहे.  तक्रारकर्त्याने पेरणीपुर्वी बराच खर्च करुन शेत पेरणी योग्य केले होते. त्यामुळे प्रार्थनेतील नमुद  नुकसान भरपाई विरुध्दपक्षाकडून मिळावी.

         यावर,  विरुध्दपक्ष क्र. 1 जे बियाणे विक्रेता आहे,  त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याच्या नावाने शेती नाही,  त्यामुळे तक्रारकर्ता शेतकरी नाही.  तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या समीतीच्या अहवालात योग्य नोंदी नाहीत,  त्यामुळे अहवाल हा फक्त प्रथम दर्शनी दिलेला असल्यामुळे,  त्यावर विश्वास ठेवता येणार नाही.

       विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी त्यांच्या एकत्रित लेखी युक्तीवादात असे मुद्दे मांडले आहेत की, तक्रारकर्त्याजवळ कोणतीही शेती नाही व तो ठोक्याने शेती करतो,  त्यामुळे ग्राहक या संज्ञेत बसत नसून,  त्याचे स्वरुप व्यावसाईक आहे.  तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या बियाणे बिलात,  विरुध्दपक्ष क्र. 3 चे कोणतेही बियाणे खरेदी केल्याचे दिसत नाही व लॉट नंबर मध्ये खोडातोड असून,  ते वेगळया अक्षरात बिलावर नमुद आहे.  समीती अहवालात नमुद लॉट नंबर व खरेदी बिलावरील लॉट नंबर हा वेगवेगळा आहे,  शिवाय अहवाल हा प्रथमदर्शनी दिलेला आहे व त्यात विरुध्दपक्ष क्र. 3 उत्पादीत बियाणे, असे कुठेही म्हटलेले नाही.  सदर बियाणे “उन्नती” चे आहे.  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 3 चा त्याच्याशी संबंध नाही.  सदर देविदास खोत यांचे शेतात करण्यात आलेल्या पाहणी अहवालात बियाणे उत्पादक कंपनी व लॉट नंबर नमुद नाही.  त्यामुळे सदर अहवालावर भिस्त ठेवता येणार नाही.  विरुध्पक्ष क्र. 2 व 3 यांनी खालील न्यायनिवाड्यावर भिस्त ठेवली आहे.

     2004 STPL (Cl) 83 NC

     Agsun Seeds ( India ) Ltd. Vs. N. Nagendra Reddy & Ors.

 

        Consumer Protection Act, 1986 Section 2(1)(d) – Seeds – Locul Standi – Complaint of defective seeds – District Forum and State commission allowed the complaint – Revision – Complaint has no locus standi as they had not purchased the seeds – Not consumers Complaint not maintainable

            उभय पक्षांच्या युक्तीवादानंतर,  विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी युक्तीवादात नमुद केलले आक्षेप,  तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सर्व दस्तऐवजांवरुन मंचाने तपासले असता, असे दिसते की, खरेदी बिलात बियाणे जे.एस. 335 उन्नत हे तकारकर्त्याने खरेदी केलेले आहे व त्यातील लॉट नंबर हा वेगळया अक्षराने व खोडतोडसह नमुद आहे.  दाखल शेतकी दस्तात,  तक्रारकर्त्याच्या नावे कोणतीही शेती नमुद नाही, ती त्याची पत्नी वंदना शरद पंडागे या नावे आहे. पत्नीचा खुलासा मंच समजु शकतो,  परंतु समीती अहवालातील दुसरे शेत, जे शरद देवीदास खोत यांच्या  नावे आहे,  त्याबद्दल तक्रारकर्त्याचे कथनानुसार, ठोक्याने वहीती करणेबाबतचा कोणताही पुरावा लावलेला नाही किंवा त्यांच्या प्रतिज्ञालेखातुन असे दिसते की, ते अकोला येथीलच रहीवाशी आहेत,  त्यामुळे त्यांना प्रकरणात तक्रारकर्ते बनविण्यास हरकत नव्हती.  परंतु तक्रारकर्त्याने तसे केले नाही,  त्यामुळे विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या वरील न्यायनिवाड्यावर विरुध्दार्थी कथन अगर पुरावा तक्रारकर्त्याकडून उपलब्ध झाला नाही,  त्यामुळे तक्रारकर्ता “ग्राहक” या संज्ञेत बसतो का ? या बद्दल संदिग्धता आहे.  तसेच विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी बिलावरील उन्नत बियाणे हे त्यांचे नाही असा आक्षेप घेतला आहे.   त्यामुळे तालुका स्तरीय तक्रार निवारण समीतीचा अहवाल तपासला असता,  त्यात कुठेही “ विरुध्दपक्ष क्र. 3 उत्पादीत बियाणे ” असा शेरा नाही.  समितीने बियाणे जे.ए. 335 लॉट क्र. 8209 हा सदोष आहे, असे मत वंदना शरद पंडागे या शेतक-याच्या अहवालावर नोंदविलेले आहे व शरद देविदास खोत यांच्या अहवालात सदोष लॉट नंबर कोणते ?  हे देखील नमुद  नाही.  परंतु बियाणे खरेदी पावतीवर, लॉट नंबर हा वेगळाच नमुद आहे, तो अहवालात नमुद नाही,  म्हणजेच प्रकरणात  सर्व संदिग्धता आहे व तकारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या सर्व आक्षेपांचे ठोस पुराव्याद्वारे निरसन केले नाही.  अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याची, विरुध्दपक्षाकडून नुकसान  भरपाई मिळण्याची विनंती मंजुर करता येणार नाही

   सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे..

                              :::अं ति म  आ दे श:::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज  करण्यात येत आहे.
  2. न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
  3. सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 
 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.