Maharashtra

Washim

CC/36/2012

Pradeep Rustamrao Ghuge - Complainant(s)

Versus

Sanjay Kishormal Baheti, Pro.Pra. Shri Krishi Seva Kendra, Medshi - Opp.Party(s)

R.D.Kulkarni

31 Dec 2014

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/36/2012
 
1. Pradeep Rustamrao Ghuge
At.Marsula, Tq. Malegaon, Dist. Washim
...........Complainant(s)
Versus
1. Sanjay Kishormal Baheti, Pro.Pra. Shri Krishi Seva Kendra, Medshi
At. Medshi, Dist. Washim
2. Chief Officer, Igal seeds and Biotech ltd. Indore (M.P.)
R.N.T. Road, Indore (M.P.)
Indore
Madhyapradesh
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MR. A.C.Ukalkar MEMBER
 HON'BLE MRS. J.G.Khandebharad MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                                                                      :::    आ दे श   :::

                                                                          ( पारित दिनांक  :   31/12/2014 )

 

आदरणीय अध्‍यक्षा, सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार  : -

 

1.       ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्‍वये, सादर करण्‍यात आलेल्‍या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्‍यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-   

     तक्रारकर्ता हा मारसुळ, ता. मालेगाव जि. वाशिम येथील रहिवाशी आहे व तिथे त्‍यांच्‍या मालकीची शेती आहे. तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍द पक्ष क्र. 1 कडून विरुध्‍द पक्ष क्र. 2 ऊत्‍पादीत सोयाबीन बियाणे, बॅच नं. 49820 च्‍या 15 बॅग, बॅच नं. 49816 च्‍या 12 बॅग व बॅच नं. 49824 च्‍या 3 बॅग, अशा एकूण 30 बॅग, प्रती बॅग 1160/- रुपये या दराने दिनांक 02/06/2011 रोजी खरेदी केल्‍यात.  सदर सोयाबीन बियाण्‍याची तक्रारकर्त्‍याने त्‍याचे शेत गट क्र. 367 मधील 1 हेक्‍टर 62 आर व सामाईक क्षेत्र 7 हेक्‍टर 99 आर मध्‍ये पेरणी केली.  परंतु पेरणी केलेल्‍या 30 बॅग सोयाबीन बियाण्‍यापैकी 10 बॅग सोयाबीनच्‍या उगवल्‍याच नाहीत. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे 10 बॅग सोयाबीन बियाण्‍यापासुन मिळणा-या ऊत्‍पन्‍नाचे नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास सदर पिक मोडुन सन 2011 मध्‍ये पुनर्पेरणी करावी लागली.

     त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने याबाबत कृषी विकास अधिकारी, जि.प. वाशिम यांच्‍याकडे रितसर तक्रार दिली.  त्‍या तक्रारीची दखल घेऊन कृषी विकास अधिकारी, वाशिम यांनी तक्रारकर्त्‍यास दिनांक 13/09/2011 रोजीचा जिल्‍हा तक्रार निवारण समितीचा अहवाल पाठविला.  त्‍या अहवालामध्‍ये सुध्‍दा लॉट क्र. ऑक्‍टोंबर 10-12-172-49816, ऑक्‍टोंबर 10-12-172-49820 या बियाण्‍यामध्‍ये दोष असल्‍यामुळे ऊगवण कमी झाल्‍यामुळे, तक्रारकर्ता याने पुनर्पेरणी केली, असे नमुद आहे.

     त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे, 10 बॅग सोयाबीनचा खरेदी खर्च 11,600/- रुपये, पुनर्पेरणीचा खर्च 20,000/- व अंदाजे 70 क्विंटल ऊत्‍पादनाचे नुकसान असे 1,31,600/- रुपयाचे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या या नुकसानीस विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 हे वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तरित्‍या जबाबदार आहेत.

     म्हणून, प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, तक्रारकर्त्‍याने विनंती केली की, विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 कडून वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तरित्‍या नुकसान भरपाई रुपये 1,31,600/- दयावी तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी प्रत्‍येकी रुपये1,000/- तक्रारकर्त्‍यास दयावेत.

     तक्रारीचे पृष्ठयर्थ पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र केले व दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 4 कागदपत्रे दाखल केलीत.

 

2)   विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांचा लेखी जवाब :-  सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र. 1यांनी लेखी जबाब दाखल करुन नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्र. 1 हे मेडशी येथे कृषी सेवा केंद्र चालवितात, त्‍यांचे दुकानातुन तक्रारकर्ता यांनी दिनांक 02/06/2011 रोजी इगल सिडस अँन्‍ड बायोटेक लिमी. इंदौर या कंपनीचे सोयाबीन जेएस 335 या जातीचा लॉट नं. 49820 च्‍या 15 बॅग, लॉट नं. 49816 च्‍या 12 बॅग व लॉट नं. 49824 च्‍या 3 बॅग, अशा एकूण 30 बॅग,सिलबंद अवस्‍थेत सर्टीफीकेशन टॅग व लेबल असलेल्‍या अवस्‍थेत खरेदी केल्‍या.  सदर बियाणे हे विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी स्‍वस्‍तीक ट्रेडर्स, अकोला यांचेकडून खरेदी केले. सदरहू बियाणे त्‍यांना इंदौर येथून ट्रक क्र. एमपी 09 केडी 7706 ने 20/05/2011 रोजी डी.एम क्र. जीएमई-190511-015 ने प्राप्‍त झाले.  बियाणे खरेदी करतांना त्‍यांना बियाणे नियमानुसार गुणवत्‍तेचे असल्‍याबाबत खात्री दिली होती. सदरहू बियाणे आलेल्‍या स्थितीतच अत्‍यंत सिलबंद अवस्‍थेत सिल व टॅग ची खात्री करुन, विक्री केले व तक्रारकर्ता यांनी त्‍याची खात्री करुनच सदरहू बियाणे खरेदी केले. विरुध्‍द पक्ष क्र. 1 हे फक्‍त विक्रेता असून बियाण्‍याच्‍या गुणवत्‍तेवर व उगवण क्षमतेवर त्‍यांचे कोणतेही नियंत्रण नसते.  बियाणे प्रमाणीत असल्‍याचा टॅग बियाणेचे पिशवीवर लावलेला असतो व त्‍यावर बियाण्‍याबद्दल, त्‍याचे उगवणशक्‍ती बाबत पूर्णपणे दर्शविलेले असते. बियाण्‍याच्‍या उगवणशक्‍तीची पूर्ण जबाबदारी सदरहू कंपनीची असून त्‍यात विरुध्‍द पक्ष क्र. 1 चा कोणताही सहभाग नाही.  त्‍यामुळे नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी इगल सिडस अँन्‍ड बायोटेक कंपनीची व त्‍यांनी ज्‍यांचेकडून खरेदी केले त्‍या स्‍वस्‍तीक ट्रेडर्स, अकोला यांची असून विरुध्‍द पक्ष क्र. 1 ची नुकसान भरपाईची कोणतीही जबाबदारी नाही व त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास पूर्ण सहकार्य केले आहे. सोबत कागदपत्रे जोडली आहेत.

 

 

3)   विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांचा लेखी जवाब :-  सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र. 2यांनी लेखी जबाब दाखल करुन  बहुतांश विधाने नाकबूल केली व नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या सोयाबीन बियाण्‍याच्‍या 30 बॅग पैकी नेमके कुठले बियाणे उगविले नाही हे निश्‍चीत केले नाही व कुठेही त्‍याचे विश्‍लेषण केले नाही. तक्रारकर्त्‍याने पिक मोडून सन 2011 मध्‍ये पुर्नपेरणी केली हे म्‍हणणे चुकीचे आहे कारण पुर्नपेरणी करण्‍यापुर्वी तक्रारकर्त्‍याने बियाणे उगविले नाही यासंबंधी तक्रार कुठेही दिली नाही किंवा त्‍यासंबंधीची कोणतीही कागदपत्रे दाखल केले नाही.  तक्रारकर्त्‍याने बियाणे हे प्रयोगशाळेमध्‍ये परिक्षणासाठी पाठविले नाही.  तसेच त्‍यांनी पुन: पेरणी केली व नंतर त्‍यांनी कृषी विकास अधिकारी,जि.प.वाशिम यांचेकडे तक्रार दिली, त्‍या तक्रारीची प्रत प्रकरणात दाखल केली नाही.  विरुध्‍द पक्षाने पुढे अधिकच्‍या कथनात नमूद केले त्‍याचा थोडक्‍यात आशय असा की, तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीस कसल्‍याही प्रकारे कायदयाचा आधार नाही. वास्‍तविक 30 बॅग सोयाबीनची पेरणी करण्‍याकरिता लागणारी जमीन ही 30 एकर पाहिजे. परंतु तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या 7/12 नुसार,असे लक्षात येते की, त्‍यांच्‍याकडे तेवढी जमीन उपलब्‍ध नाही व फक्‍त 4 एकर जमीन आहे. कृषी विकास अधिकारी, वाशिम यांनी बियाणे कायदा कलम 23-अ प्रमाणे कोणत्‍याही तरतुदीचे पालन केले नाही. त्‍यांनी फक्‍त दर्शनी पाहणी करुन अहवाल सादर केला.  कारण उगवण शक्‍तीला तापमान, हवामान, पाण्‍याची आर्द्रता तसेच जमिनीची दर्जा, पर्जन्‍यमान, पेरणीची पध्‍दत हया सर्व बाबी

आवश्‍यक असतात. म्‍हणून हा अहवाल दोषपुर्ण आहे. मध्‍यप्रदेश राज्‍य बिज

प्रमाणीकरण संस्‍था भोपाल येथुन हे बियाणे प्रमाणीत करण्‍यात येते. लॉट क्र. 10.12.49820 चे ऊत्‍पादन 39 क्विंटल केले होते. त्‍यात तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार दोष आहे परंतु 3,900 किलो पैकी 60 किलोची तक्रार आली, उर्वरीत बियाण्‍याबाबत आजपर्यंत कुठलिही व कुणाचीही तक्रार आलेली नाही, याचा अर्थ तक्रारकर्त्‍याच्‍या पेरणीमध्‍ये दोष आहे. विरुध्‍द पक्षाने कथनास बाधा न येता नमुद केले की, विरुध्‍द पक्ष क्र. 2 निर्माता कंपनी यांना हे बियाणे बिज परिक्षण प्रयोगशाळेत पुढील परिक्षणासाठी पाठवायचे आहे व त्‍याकरिता लागणारा सर्व खर्च करण्‍यास ते तयार आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या चौकशी समितीने अहवाल देतांना बियाणे कायदा कलम 23-अ 1 चे कोणतेही पालन केलेले नाही, ते कलम खालीलप्रमाणे आहे. . . . .

“ Sec. 23-A – Action to be taken by the Seed Inspector if a complaint is lodged with him. (1) If farmer has lodged a complaint in writing that the failure of the crop is due to the defective quality of seeds of any notified kind or variety supplied to him, the Seed Inspector shall take in his possession of the marks or labels, the seed containers and a sample of unused seeds to the extent possible from the complainant for establishing the source of supply of seeds and shall investigate the causes of the failure of his crop by sending samples of the lot to the Seed Analyst for detailed analysis at the State Seed Testing Laboratory. He shall thereupon submit the report of his finding as soon as possible to the competent authority.” 

     करिता तक्रारकर्त्‍याची तक्रार ही कायदयाच्‍या चौकटीत नसून, पुर्णत: खोटी व बनावटी  दाखल केली असल्‍यामुळे खर्चासह खारिज व्‍हावी.

     सदर लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला.

 

4)  का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

 

    या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे स्‍वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाचा लेखी युक्तिवाद तसेच उभय पक्षांनी दाखल केलेले सर्व न्‍यायनिवाडे, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन,खालील निष्‍कर्ष कारणे देऊन नमुद केला.

     या प्रकरणात तक्रारकर्ते यांचा असा युक्तिवाद आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडून ईगल कंपनीचे सोयाबीन बियाणे एकंदर 30 बॅग खरेदी केल्‍या होत्‍या, त्‍यापैकी 10 बॅगमधील सोयाबीन बियाणे न उगविल्‍यामुळे, तक्रारकर्ते यांना सदर पीक मोडुनपुर्नपेरणी करावी लागली व रुपये 1,31,600/- चे नुकसान झाले.  तक्रारकर्त्‍याने कृषी विकास अधिकारी, जि.प. वाशिम यांच्‍याकडे सदर तक्रार केली असता त्‍यांनी अहवाल पाठविला व त्‍यात देखील वरील बियाण्‍यामध्‍ये दोष आढळला. 

     यावर विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांनी तीन वेगवेगळया बॅचच्‍या सोयाबीन बियाण्‍याच्‍या 30 बॅग खरेदी केल्‍या होत्‍या, त्‍यापैकी कोणत्‍या बियाण्‍यामधील कुठले बियाणे उगविले नाही, हे निश्‍चीतपणे सांगता येत नाही, कारण तसे तक्रारकर्ते यांचे विश्‍लेषण नाही. पुर्नपेरणी करण्‍यापूर्वी तक्रारकर्त्‍याने ते बियाणे उगविले नाही अशी तक्रार कुठेही केली नाही. कृषी विकास अधिकारी, जि.प. यांनी हे बियाणे बिज परिक्षण प्रयोगशाळेत परिक्षणासाठी पाठविले नाही. पिकाचे निरीक्षण कृषी अधिका-याने केले नाही कारण त्‍या निरीक्षणापूर्वीच तक्रारकर्त्‍याने त्‍या शेतात पुर्नपेरणी केली असे तक्रारकर्त्‍याचेच म्‍हणणे आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या शेताचा 7/12 उतारा दाखल केला त्‍यात त्‍यांची जमीन फक्‍त 4 एकर आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने 30 बॅग सोयाबीन बियाण्‍याच्‍या पेरणीसाठी पुरेशी जमीन आहे हे दर्शविले नाही, तसेच उगवणशक्‍तीला ईतर घटकही कारणीभुत असतात त्‍याचा अहवालात ऊल्‍लेख नाही.  सबब तक्रार दोषपूर्ण आहे.

     उभय पक्षांचा हा युक्‍तीवाद एैकल्‍यानंतर व दाखल दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्‍यानंतर मंचाच्‍या असे निदर्शनास आले की, तक्रारकर्ता यांनी श्री कृषी सेवा केंद्र, मेडशी येथुन खरेदी केलेल्‍या बियाण्‍यांची जी पावती दाखल केली आहे,त्‍यात पैसे बाकी  असे लिहलेले आहे, त्‍यामुळे मोबदला देवून बियाणे खरेदी केले असे दिसत नाही. तसेच दाखल शेतीच्‍या7/12 दस्‍तात तक्रारकर्ते यांची शेतजमीन 1 हे. 62 आर एवढीच दिसून येते, त्‍यामुळे सामाईक शेत क्षेत्राचा विचार करता येणार नाही. तक्रारकर्ते यांचे कथनच असे आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडून तीन वेगवेगळया बॅचच्‍या सोयाबीन बियाण्‍याच्‍या एकंदर 30 बॅग खरेदी केल्‍या होत्‍या व त्‍यापैकी 10 बॅग सोयाबीन बियाणे उगविले नाही. परंतु नेमक्‍या कोणत्‍या बॅचच्‍या बॅगमधील बियाणे उगवले नव्‍हते, त्‍याबद्दलचे विश्‍लेषण तक्रारीत नमुद नाही, शिवाय कृषी विकास अधिकारी, जि.प. वाशिम यांच्‍या अहवालात देखील ही बाब नमुद नाही. तक्रारकर्ता यांनी न उगविलेल्‍या सोयाबीन बियाण्‍याची तक्रार कुठे केलेली दिसत नाही, त्‍यामुळे साहजिकच त्‍याबद्दलचे निरीक्षण होऊ शकले नाही, कारण तक्रारकर्ते यांनी न उगविलेल्‍या बियाण्‍यांचे पीक मोडून पुर्नपेरणी केली असे त्‍यांचे स्‍वत:चे कथन आहे.  त्‍यामुळे दिनांक 26/07/2011 रोजीचा पाहणीचा अहवाल स्विकारता येणार नाही. जे बियाणे उगविले नव्‍हते, त्‍याबद्दलचा अहवाल, रेकॉर्डवर उपलब्‍ध नसल्‍यामुळे, तक्रारकर्ते यांची विरुध्‍द पक्षाकडून त्‍याबद्दलची नुकसान भरपाई मिळण्‍याची विनंती ग्राहय धरता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. सबब सबळ पुराव्‍याअभावी तक्रारकर्ता यांची तक्रार प्रतीपालनिय नाही.  सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.

                                                                              :अंतीम आदेश ::

1)   तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्‍यात येते.

2)   न्‍यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.

3)  उभय पक्षास आदेशाच्या प्रती विनामुल्य दयाव्यात.

 

 

                                             (श्रीमती जे.जी. खांडेभराड)    (श्री. ए.सी.उकळकर)   ( सौ. एस.एम. उंटवाले  

                                                            सदस्या.                      सदस्य.               अध्‍यक्षा.

                                      जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. A.C.Ukalkar]
MEMBER
 
[HON'BLE MRS. J.G.Khandebharad]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.