Maharashtra

Jalgaon

CC/10/1320

Tushar Patil - Complainant(s)

Versus

Sanjay Kapur, Manager Central Bank Of India - Opp.Party(s)

Hemant Kulkarni

27 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/10/1320
 
1. Tushar Patil
Parola
Jalgaon
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sanjay Kapur, Manager Central Bank Of India
Branch Parola
Jalgaon
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

ग्राहक तक्रार अर्ज क्र.1320/2010                            
      दाखल दिनांक. 07/10/2010  
अंतीम आदेश दि. 27/12 /2013
कालावधी  03 वर्ष, 02 महिने,20 दिवस
                                                                                  नि.14

अतिरीक्त  जिल्हा  ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव


श्री.तुषार अशोक पाटील,                    तक्रारदार
उ.व. 36 वर्षे धंदा-व्यावसाय,                          (अॅड. हे.म.कुलकर्णी)
रा. पारोळा, ता. पारोळा, जि. जळगांव.  
  विरुध्दो

संजय कपूर, मॅनेजर.                    सामनेवाला 
सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया,     (अॅड.प्रताप निकम)   शाखा, पारोळा, जि. जळगांव.
   

         (निकालपत्र सदस्य , चंद्रकांत एम.येशीराव यांनी पारीत केले)
                           नि का ल प त्र
प्रस्तु त तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्व‍ये दाखल करण्याकत आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हदणणे थोडक्या‍त असे की, त्यांेचे सेंट्रल बँक ऑफ इंडीया, शाखा पारोळा येथे बचत खाते क्र. 2144090043 आहे.  दि. 08/09/2010 रोजी त्यायत 1,41,000/- इतकी रक्कतम जमा होती.  दि. 07/09/2010 रोजी, तक्रारदारांनी संजय चिंधा चौधरी रा. पारोळा, यांच्या शी म्हआसवे शिवारातील गट क्रं. 302/ब/प्लॉ,ट नं. 4 चा खरेदीचा सौदा केला होता.  त्या,पोटी तक्रारदारास त्यां ना रु. 1,00,000/- इतकी रक्कीम दयावयाची होती.  त्या‍मुळे दि. 08/09/2010 रोजी, तक्रारदार सामनेवाला बँकेत गेले.  त्यां नी रु. 1,00,000/- ची विथड्राल स्ली.प भरली.  मात्र सामनेवाल्यां नी त्यां ना त्यां चे संगणक बंद असल्यापने दुस-या दिवशी म्हिणजे दि. 09/09/2010 रोजी येण्यागस सांगितले.  त्याब दिवशी देखील त्यां नी विथड्राल स्लीेप भरली परंतु सिस्टीसम बंद असल्यादमुळे नंतर संपर्क साधा असे त्यायस सामनेवाल्यां च्याह वतीने सांगण्यारत आले. 
03. तक्रारदाराचे असेही म्ह णणे आहे की, त्या्च्याा खाती रु. 1,41,000/- इतकी शिल्लसक असून देखील त्यांसना सामनेवाल्या नी पैसे न दिल्यायमुळे त्यां चा वर नमूद जमीन विषयक सौदा होऊ शकला नाही.  त्याामुळे सामनेवाल्यांकनी केलेल्या  हलगर्जी व निष्कािळजीपणामुळे त्यां चे सर्व मार्गांनी रु. 10,000/- नुकसान झालेले आहे.  आर्थिक, शारीरीक, मानसिक त्रासापोटी रु. 10,000/ द.सा.द.शे. 18 टक्केे व्याीजाने मिळावेत.  तसेच, अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- मिळावेत, अशा मागण्या् तक्रारदाराने मंचाकडे केलेल्या, आहेत. 
04. तक्रारदाराने तक्रार पुष्ठ यर्थ दस्त0ऐवज नि. 5 सोबत दि. 08/09/2010 रोजी भरलेली विथड्राल स्लिप, दि. 09/09/10 रोजी भरलेली विथड्राल स्लिप, त्यांंनी सामनेवाल्या्स दिलेली नोटीस व त्याुच्याद पोचपावत्याु इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 
05. सामनेवाल्यां नी जबाब नि. 09 दाखल करुन प्रस्तुोत अर्जास विरोध केला.  त्यांवच्याल मते, त्यांाच्याा संगणक प्रणालीत तांत्रिक अडचणी मुळे तक्रारदारास व नमूद दोन्हीा दिवशी पैसे अदा करता आले नाहीत.  तसा शेरा देखील दि. 09/09/2010 रोजी च्याह विथड्राल स्पिल वर सही शिक्कायानिशी तक्रारदारास देण्याेत आलेला आहे.  पैसे न मिळाल्या मुळे तक्रारदाराचा जमिन व्य‍वहार होऊ शकला नाही, त्याा बाबत त्यांनना काहीही माहिती नाही.  त्यांमनी तक्रारदारास ए.टी.एम कार्ड द्वारे अथवा अमळनेर शाखेतून पैसे काढण्याळस सांगितले होते.  मात्र तक्रारदाराने तो पर्याय निवडला नाही.  तक्रारदारास झालेल्याळ गैरसोयी बाबत त्यां नी दिलगीरी व्येक्तीन केली होती व कोणतेही उध्दाट वर्तन त्यां च्याब वतीने तक्रारदारासोबत झालेले नाही.   तक्रारदाराने त्यां ना सहकार्य न करता केवळ हटटाने त्यागच शाखेतून पैसे दयावेत असा आग्रह धरला.  त्यारमुळे त्यां नी तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही कमतरता केली नाही.  तक्रारदाराचा अर्ज फेटाळण्यातत यावा अशी विनंती सामनेवाल्यां नी मंचास केलेली आहे. 
06. निष्क र्षासाठींचे मुद्दे व त्याीवरील आमचे निष्क र्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.       
मुद्दे                                     निष्किर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
      कमतरता केली काय ?   -- होय
2. आदेशाबाबत काय?                           --अंतीम आदेशाप्रमाणे.

                        का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
07. तक्रारदाराचे सामनेवाल्यांेकडे बचत खाते आहे.  दि. 08/09/2010 रोजी त्याव खात्या त रु. 1,41,000/- जमा होते.  दि. 08/09/2010 व दि. 09/09/2010 या दोन्हीव दिवशी तक्रारदाराने सामनेवाल्यांाकडे विथड्राल स्लिप भरुन  रु. 1,00,000/- मिळावेत, अशी मागणी केली.  मात्र, सामनेवाल्यां च्यां संगणक प्रणालीत तांत्रिक अडचण असल्यागमुळे त्याम दोन्हीा दिवशी तक्रारदारास ती रक्कयम अदा करण्या0त आलेली नाही.  दि. 09/09/2010 रोजी तक्रारदाराने सादर केलेल्याद विथड्राल स्लिप नि. 5/2 च्याह पाठीमागे बँकच्या0 सहीशिक्या तक्निशी ‘सिस्टीलम बंद असल्या0मुळे पेमेंट करणे शक्यप नाही काही काळा नंतर संपर्क करावा’ असा शेरा देण्याात आला.  उक्तय बाबी दोन्ही  पक्षांना मान्यह आहेत.  त्या’मुळे तक्रारदाराच्याा खात्या त पैसे असूनही तांत्रिक अडचणी मुळे मागितलेले पैसे न देणे ही बाब सेवेतील कमतरता ठरते किंवा नाही इतकाच प्रश्ना आमच्यानसमोर आहे.
08. सामनेवाल्यां ची संगणक प्रणाली दि. 08/09/2010 व दि. 09/09/2010 रोजी कार्यरत नव्हसती तर अशा आकस्मिक परिस्थितीत सामनेवाला बँकेकडून संगणक प्रणाली येण्यामच्या  अगोदर ज्याि पध्द तीने पैसे अदा केले जात होते ती पध्द.त का अंगिकारली गेली नाही, याचा खुलासा सामनेवाल्यां नी केलेला नाही.  संगणक प्रणाली नादुरुस्त  झाल्या,स पुर्वीच्याम पध्द तीने पैसे अदा करुन त्याकची नोंद संगणक प्रणालीमध्ये् टाकता येण्या‍जोगी होती असे आम्हांचस वाटते.  एखादया ग्राहकास वैदयकीय उपचार अथवा अन्‍य काही अत्यंोत आवश्याक कामासाठी तातडीने पैसे हवे असल्या स व संगणक प्रणाली अनेक दिवसासाठी कार्यरत नसल्या्स सामनेवाल्या  बँकेने काय व्यणवस्था  केली असती याचा देखील विचार या ठिकाणी करणे गरजेचे आहे असे आम्हांपस वाटते. 
09. तक्रारदारास ए.टी.एम मधून अथवा अमळनेर शाखेमधून पैसे काढण्यावची विनंती केली असे जरी सामनेवाल्यां चे म्हमणणे असले तरी, ती बाब शेरा म्हयणून त्यात विथड्राल स्लिप वर का लिहीण्यामत आली नाही याचे सुध्दाश उत्त र सामनेवाल्यांंनी दिलेले नाही.  त्यावतही एका तालुका शाखेच्याु ग्राहकांनी पैसे काढण्या साठी दुस-या तालुक्यााच्याम शाखेत जावे व त्याएसाठी वेळ व पैसा खर्च करावा अशी सामनेवाल्यांमची अपेक्षा ग्राहक हिताच्यान विपरीत आहे. यास्ताव मुदा क्र. 1 चा निष्क‍र्ष आम्हीद होकारार्थी देत आहोत. 
मुद्दा क्र.2 बाबतः
10. दि. 07/07/2009 रोजी  तक्रारदाराने संजय चिंधा चौधरी यांच्यााशी म्ह‍सवे शिवारातील गट क्र. 302/ब प्लॉयट नं. 4 चा व्यंवहार केला व त्याापोटी त्याेस  दि. 09/09/2010 पर्यंत रु.1,00,000/- इतकी रक्कदम अदा करावयाची होती या तक्रारदाराच्या् दाव्या0 बाबत सामनेवाल्यां नी ती बाब तक्रारदाराने ती बाब त्यां ना त्याप दिवशी सांगितली नव्हचती, असा बचाव घेतलेला आहे.  त्यांरच्याब मते, तक्रारदाराचे ते विधान खरे नाही.  मात्र तक्रारदाराने व्येवहार ज्या च्यााशी होतो आहे त्यादचे नांव तसेच, जमीनीचा गट क्र. तपशीलवार सांगितलेला आहे याचा विचार करता सामनेवाल्यां चा बचाव टिकू शकत नाही.  त्या मुळे तक्रारदारास पैसे  न मिळाल्याशमुळे तो व्यसवहार रद्द झाला व तक्रारदारास त्यादपोटी शारीरीक व मानसिक त्रास झाला, ही बाब स्विकारावी लागेल. सामनेवाल्यां च्यार कृती मुळे तक्रारदारांचे आर्थिक नुकसानही झाले आहे  हे पाहता तक्रारदार हे नुकसान भरपाई पोटी रु. 3,000/- तसेच, शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु. 2,000/- भरपाईस पात्र आहे असे आमचे मत आहे.  सामनेवाल्यां च्यान सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारास प्रस्तुपत अर्ज दाखल करावा लागला त्याहमुळे तक्रारदार प्रस्तुेत अर्जाचा खर्च म्हतणून रु. 3,000/- मिळण्यालस देखील पात्र आहे असे आम्हांदस वाटते.  यास्तमव मुद्दा क्र. 2 च्या0 निष्काार्षापोटी आम्हील खालील आदेश देत आहोत. 
                              आ दे श 1. सामनेवाल्यां ना आदेशीत करण्या त येते की,त्यांअनी तक्रारदारास
शारिरीक,मानसिक भरपाई पोटी रु.2,000/- व आर्थिक नुकसान
भरपाई पोटी रु. 3,000/-  अदा करावेत.

2. सामनेवाल्यां ना आदेशीत करण्याणत येते की, त्यांअनी
तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.

3. उभय पक्षांना निकालपत्राच्याण प्रती विनामुल्य0 देण्या त याव्याित.

जळगाव दिनांक -27/12/2013
                                                  (मिलिंद सा.सोनवणे)                                                        अध्यंक्ष


                                                  (चंद्रकांत एम.येशीराव)                                                         सदस्य 
 

 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.