Maharashtra

Nagpur

CC/93/2017

Shri Duryodhan Sampat Naik - Complainant(s)

Versus

Sanjay Caterers, Through Prop. Sanjay Kumbhalwar (Caterarwala) - Opp.Party(s)

Adv. M.H.Awode

13 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/93/2017
( Date of Filing : 18 Feb 2017 )
 
1. Shri Duryodhan Sampat Naik
R/o. Waregaon, Tah. Kamptee, Dist. Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sanjay Caterers, Through Prop. Sanjay Kumbhalwar (Caterarwala)
R/o. C/o.Pantavane, Beside House of Deshpande Near Maha Maya Budha Vihar, Manav Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Sanjay Kumbhalwar (Caterarwala)
R/o. C/o.Pantavane, Beside House of Deshpande Near Maha Maya Budha Vihar, Manav Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Aug 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्षाचा संजय कॅटर्स या नावाने कॅटरिंग चा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मुलीचे दिनांक ३१/५/२०१६ रोजी होणा-या लग्‍न समारंभाचा १,००० लोकांचा जेवन ब‍नविण्‍याचा विरुध्‍द पक्षाला ठेका रुपये १,१०,०००/- मध्‍ये दिला. तक्रारकर्त्‍याने दिनांक २५/३/२०१६ रोजी विरुध्‍द पक्षाला साक्षगंध कार्यक्रमाकरिता रुपये १५,०००/- दिले आणि साक्षगंध कार्यक्रम संपन्‍न झाला. विरुध्‍द पक्षाने कार्यक्रमाला सेवा दिली. तक्रारकर्त्‍याने लग्‍नाचे समारंभाचे बुकींगपोटी विरुध्‍द  पक्षाला रुपये ४०,०००/- आगाऊ रक्‍कम दिनांक २५/४/२०१६ रोजी दिली. विरुध्‍द  पक्षाने पावतीच्‍या मागील बाजूस रक्‍कम मिळाल्‍याची पोच दिली. बिलामध्‍ये दिलेल्‍या विवरणाप्रमाणे विरुध्‍द पक्षाला जेवन बनवायचे होते.
  3. लग्‍नाचे आठ दिवसाआधी तक्रारकर्ता विरुध्‍दपक्षाला भेटला आणि त्‍याला सांगितले की, लग्‍न समारंभात पाहुण्‍यांची संख्‍या १,००० वरुन २,००० पर्यंत वाढू शकते आणि विरुध्‍द पक्षाला १,००० जास्‍त लोकांचे जेवन बनविण्‍याची विनंती केली. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला जेवनाचे सामान पुरविल आणि जेवन बनविण्‍याची मेहनत तक्रारकर्ता देईल. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विनंती केली की, आधी ठरल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याला २ पट जेवनाची रक्‍कम देणे परवडनारी नाही, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची विनंती नाकारली आणि प्रति प्‍लेट प्रमाणे देण्‍याचा आग्रह केला. तक्रारकर्ता दुप्‍पट रक्‍कम देण्‍यास तयार नव्‍हता विरुध्‍द पक्षाने दिनांक २५/३/२०१६ चा करार रद्द केला आणि करारापोटी घेतलेली आगाऊ रक्‍कम रुपये ४०,०००/- एका आठवड्यात परत करण्‍यास कबुल झाला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दुस-या कॅटर्सशी व्‍यवस्‍था करण्‍याबाबत सांगितले. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा करार रद्द केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला आगाऊ रक्‍कम त्‍वरीत परत करण्‍याबाबत विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने सदर रक्‍कम दुसरीकडे गुंतविली असल्‍याचे सांगून सध्‍या  रक्‍कम परत करण्‍याच्‍या परिस्थितीमध्‍ये नसल्‍याचे सांगून तक्रारकर्त्‍याला  माहे ऑगस्‍ट २०१६ च्‍या महिण्‍यात येण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ता व त्‍यांची पत्‍नी विरुध्‍द पक्षाला भेटले परंतु विरुध्‍द पक्षाने रक्‍कम उपलब्‍ध नसल्‍याचे सांगितले व माहे ऑक्‍टोंबर २०१६ मध्‍ये येण्‍यास सांगितले.
  4. माहे ऑक्‍टोंबर २०१६ रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दुरध्‍वनी केला आणि रकमेबाबत विचारले परंतु विरुध्‍द पक्षाने रुपये ४०,०००/- परत करण्‍यास नकार दिला. करार हा फार आधी रद्द झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाचे रुपये ४०,०००/- परत करण्‍याचे कर्तव्‍य होते. तक्रारकर्त्‍याने वारंवार विनंती करुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे वकीलामार्फत दिनांक १०/१/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षाला कायदशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये ४०,०००/- १८ टक्‍के व्‍याज दराने तक्रारकर्त्‍याला व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष मिळेपर्यंत अदा करावी.
  2. मानसिक व शारीरिक ञासाकरिता व तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्षाचे त्‍याचे विशेष कथनामध्‍ये नमूद केले की, विरुध्‍द पक्षाचा कॅटरिंग सेवा देण्‍याचा व्‍यवसाय आहे आणि विरुध्‍द पक्ष वाढदिवस, लग्‍न समारंभ, साक्षगंध चे ऑर्डर घेतो. विरुध्‍द पक्ष प्‍लेट प्रमाणे ऑर्डर घेतो आणि त्‍यामध्‍ये  वेटर, स्‍वयंपाक करणारे कर्मचारी, महिला कर्मचारी, पाणी सेवा, टेबल, हॉटसेट, चमचे, प्‍लेट, ग्लासेस सामान वाहून नेण्‍याकरिता आणि उतरविण्‍यासाठी वाहन जवळपास १५-२० व्‍यक्‍ती कॅटरिंग सेवा देण्‍याकरिता पुरवितो.
  2. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मुलीचे साक्षगंध कार्यक्रमाकरिता विरुध्‍द पक्षाला ऑर्डर दिला होता व त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सेवा दिली. सदर कॅटरिंग ऑर्डर हा ३०० लोकांकरिता होता व साक्षगंध कार्यक्रमाकरिता रुपये ३०,०००/- देण्‍याचे कबूल केले होते त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने आगाऊ रक्‍कम म्‍हणून रुपये १५,०००/- विरुध्‍द पक्षाला अदा केली होती आणि तक्रारकर्त्‍याने उर्वरीत रक्‍कम रुपये १५,०००/- विरुध्द पक्षाला लग्‍नसमारंभापूर्वी देण्‍याचे कबूल केले होते. तक्रारकर्ता हा नातेवाईक असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने दिलेले वचन स्‍वीकारले होते.
  3. दिनांक २५/४/२०१६ ला तक्रारकर्त्‍याने साक्षगंध कार्यक्रमापोटी देय असलेली उर्वरीत रक्‍कम रुपये १५,०००/- विरुध्‍द पक्षाला अदा केली आणि रुपये २५,०००/- लग्‍नसमारंभाचे कार्यक्रमाकरिता आगाऊ रक्‍कम म्‍हणून विरुध्‍द पक्षाला अदा केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला एकूण रुपये ४०,०००/- अदा केले.
  4. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचेमध्‍ये लग्‍न समारंभ कार्यक्रम १,००० लोकांकरिता रुपये १,१००००/- मध्‍ये ठरला. लग्‍न समारंभाचे आठ दिवसाआधी तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला भेटला आणि त्‍याला सांगितले की, लग्‍नसमारंभातील पाहुण्‍यांची संख्‍या १,००० वरुन २,००० पर्यंत वाढू शकते आणि विरुध्‍द पक्षाला जास्‍तीचे १,००० लोकांकरिता जेवन बनविण्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला जेवनाचे सामानाचा पुरवठा करण्‍याचे सूचविले आणि बनविण्‍याची मजुरी तक्रारकर्ता देणार होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, तो जेवनाचा ऑर्डर जेवण प्‍लेट प्रमाणे तयार करुन घेतो. सदर लग्‍नसमारंभाचा ऑर्डर विरुध्‍द  पक्षाला परवडणारा नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने स्‍वतः लग्‍नसमारंभाचा ऑर्डर रद्द केला आणि विरुध्‍द पक्षाला दिलेल्‍या रकमेपेक्षा जास्‍त रक्‍कम मिळण्‍याच्‍या उद्देशाने खोटी कथा तक्रारीमध्‍ये तयार केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द चुकीची खोटी तक्रार तयार करुन विरुध्‍द पक्षाविरुध्‍द चुकीचे आरोप केले आहे.
  5. तक्रारकर्त्‍याने ऑर्डर रद्द केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे. जर तक्रारकर्त्‍याने लग्‍नसमारंभ कार्यक्रमाचा ऑर्डर रद्द पूर्णपणे केला नसता तर विरुध्‍द पक्षाने इतर कोणत्‍याही लग्‍न समारंभाचे कार्यक्रमाचे ऑर्डर घेतला असता जेव्‍हा एखादे ऑर्डर घेतले जाते त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाला दुकानदारास जेवन तयार करणा-यास भाजी विक्रेत्‍यास आगाऊ रक्‍कम द्यावी लागते. ज्‍यावेळी विरुध्‍द  पक्षाला तक्रारकर्त्‍याने कायदेशीर नोटीस पाठविली त्‍यावेळी विरुध्‍द पक्षकार शॉकमुळे आजारी पडला व त्‍याला दवाखान्‍यात भरती करावे लागले. तक्रारकर्त्‍याच्‍या या वागण्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला दवाखान्‍याचा खर्च सोसावा लागला. तक्रारकर्त्‍याने कार्यक्रमाचा ऑर्डर रद्द केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाचे रुपये ९५,०००/- पेक्षा जास्‍त आर्थिक नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे.
  6. उभयपक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज, लेखी जबाब व लेखी युक्तिवाद याचे वाचन केल्‍यावर व तक्रारकर्त्‍याचा तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

 अ.क्र.                  मुद्दे                                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        नाही
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मुलीचे साक्षगंध कार्यक्रमा निमित्‍त ३०० लोकांचे जेवनाकरिता बिल क्रमांक ६३, दिनांक ३१/५/२०१६  मध्‍ये विवरणामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाला ऑर्डर दिला व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक २५/३/२०१६ रोजी रुपये १५,०००/- आगाऊ रक्‍कम दिली व उर्वरीत रक्‍कम लग्‍नसमारंभ  कार्यक्रमापूर्वी तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला अदा करणार होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कबुलीप्रमाणे साक्षगंध कार्यक्रमाची सेवा दिली. त्‍यानंतर दिनांक ३१/५/२०१६ रोजी होणा-या लग्‍न समारंभाकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला बिल क्रमांक ६३ दिनांक ३१/५/२०१६ मध्‍ये विवरणामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे १,००० लोकांचे जेवनाकरिता रुपये २५,०००/- दिनांक २५/४/२०१६ रोजी विरुध्‍द पक्षाला आगाऊ रक्‍कम म्‍हणून अदा केली. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ (१) वर दाखल दस्‍तऐवजावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने साक्षगंध कार्यक्रमाकरिता व लग्‍न समारंभ कार्यक्रमातील जेवनाकरिता विरुध्‍द पक्षाला प्‍लेट प्रमाणे ऑर्डर दिला होता. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्‍द होते.
  2. तक्रारकर्त्‍याने लग्‍न समारंभाचे आठ दिवसाआधी विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधून विरुध्‍द पक्षाला लग्‍नात येणा-या लोकांची संख्‍या १,००० वरुन २,००० पर्यंत वाढण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षकार यांचेमधील दिनांक ३१/५/२०१६ चे लग्‍न समारंभातील जेवनाचे कॅटरिंग ऑर्डरमध्‍ये बदल करुन लग्‍न समारंभातील जेवण १,००० ऐवजी २,००० लोकांचे बनविण्‍याबाबत विनंती केली व त्‍याकरिता विरुध्‍द पक्षाने जेवण बनविण्‍याकरिता लागणारे सामान पुरवावे व तयार करण्‍याची मजुरी तक्रारकर्ता देणार होता. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचेमध्‍ये  लग्‍नसमारंभाचे १,००० लोकांचे जेवन पुरविण्‍याचा करार हा प्‍लेटप्रमाणे झाला होता व त्‍यानुसार विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला प्‍लेट प्रमाणे कॅटरिंग सेवा देणार होता. परंतु तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला लग्‍नाचे आठ दिवसाआधी लग्‍नसमारंभातील जेवण तयार करण्‍याकरिता सामान विरुध्‍द पक्षाने पुरविण्‍याबाबत विनंती करुन स्‍वतःहून कराराचे पालन केले नाही आहे व स्‍वतःहून करार रद्द केला आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व त्‍यामुळे तक्रारकर्ता लग्‍न समारंभापोटी विरुध्‍द पक्षास दिलेली आगाऊ रक्‍कम मिळण्‍यास पाञ नाही आहे असे मंचाचे  मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येते.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.