निकालपत्र :- (दि.28.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांच्या मालकीचा मौजे पाडळी खुर्द, ता.करवीर येथील मिळकत नं.551, 552 या प्लॉटवर तक्रारदारांनी बांधकाम करणेचे ठरले व त्यानुसार सामनेवाला कॉन्ट्रॅक्टर यांचेमध्ये 2006 मध्ये इमारत बांधून देणेबाबत व्यवहार ठरला व अॅडव्हान्सपोटी रुपये 50,000/- अदा केले व त्याप्रमाणे दि.02.05.2006 रोजी स्टॅम्प पेपरवर करार केला. करारात ठरलेप्रमाणे सामनेवाला यांनी विहीत वेळेत रक्कम स्विकारुनही बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी कराराची मुदत वाढवून घेतली व त्याप्रमाणे दि.02.09.2006 रोजी लेखी करार केला. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्याकडून एकूण रक्कम रुपये 3,40,000/- स्विकृत केलेली आहे व त्यांच्या पावत्याही दिलेल्या आहेत. परंतु, त्यांनी बांधकाम पूर्ण केलेले नाही. सबब, सामनेवाला यांनी बांधकाम पूर्ण करुन देणेबाबतचा आदेश व्हावा अथवा काही अडचण असलेस सामनेवाला यांनी स्विकारलेली रक्कम रुपये 3,40,000/- देणेचा आदेश व्हावा. मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेबाबतचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत उभय पक्षकारांमध्ये झालेले करारपत्र दि.02.05.2006, दि.20.09.2006 रोजी मुदतवाढीचे करारपत्र, दि.28.03.2006, दि.07.06.2006, दि.17.06.2006, दि.22.06.2006, दि.26.06.2006, दि.02.07.2006, दि.20.09.2006, दि.09.10.2006 रोजीच्या तक्रारदारांनी सामनेवाला यांना अदा केलेल्या रक्कमांच्या पावत्या, दि.07.09.2007 रोजीची सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, दि.06.10.2007 रोजीची सामनेवाला यांची उत्तरी नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यान्वये दि.25.03.2006 रोजी तक्रारदारांनी करार केला व अॅडव्हान्स रुपये 50,000/- दिले, तसेच दि.02.05.2006 रोजी करार झाला इत्यादी तक्रारदारांची कथने चुकीची असलेचे नमूद केले आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, काम चालू असताना सुरवातीचे तीन महिने पुढील हप्त्यांचे पैसे न दिल्याने दोन महिन्यांचे कामकाज थांबले होते. दुस-या हप्त्याचे पैसे दि.07.06.2006 रोजी व दि.17.06.2006 रोजी दिले. त्यामुळे तक्रारदारांच्या चुकीमुळे कामास विलंब झाला. तिस-या हप्त्याची रक्कम रुपये 10,000/- व चौथ्या हप्त्याची रक्कम रुपये 35,000/- व शेवटच्या हप्त्याची रक्कम रुपये 55,000/- तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेली नाही. तसेच, करारात ठरलेपेक्षा सामनेवाला यांनी जादा काम केले आहे, त्याची रक्कम रुपये 91,017.34 पैसे, तसेच जादा केलेले अटॅमचे लिंटल, लॉफ्ट, पडदी, वीट बांधकाम गिलावा, कॉलम लॅण्डींग बीम, पाण्याची टाकी इत्यादीची रक्कम रुपये 30,103.56 पैसे व रेग्युलर स्टीलऐवजी टीएमटी स्टीलची जादा किंमत रुपये 4,500/- अशी एकूण रक्कम रुपये 2,35,620/- तक्रारदारांकडून येणे बाकी आहे. सदर पैसे बुडविणेचे हेतून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, सदरचे पैसे वसुल होवून मिळावेत व खर्च रुपये 10,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे दि.02.05.2006 रोजी तक्रारदारांच्या मिळकतीमध्ये बांधकाम करणेबाबतचा करार झालेला आहे. सदर कराराचे अवलोकन या मंचाने केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पावत्या तसेच करारपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे एकूण रक्कम रुपये 3,40,000/- सामनेवाला यांना तक्रारदारांनी दिलेचे दिसून येते. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये जादा बांधकाम व जादा मटेरियल यांची रक्कम रुपये 2,35,620/- इतकी रक्कम तक्रारदार देय असलेचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी उर्वरित बांधकाम त्यांनी स्वखर्चाने पूर्ण केलेचे प्रतिपादन केले आहे. परंतु, त्यांनी त्यांच्या कथनाशिवाय कोणताही पुरावा प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी स्वखर्चाने त्यांचे बांधकाम पूर्ण केले असेल तर त्या अनुषंगाने बांधकाम खर्चाबाबतचा तपशील, मटेरियल खर्चाबाबतचा तपशील व पुरावा प्रस्तुत कामी दाखल करणे आवश्यक होते. सामनेवाला यांनी अपूर्ण बांधकामाबाबतची कथने नाकारलेली व तक्रारदारांनी देय असलेल्या रक्कमेचा उल्लेख केलेला आहे. अशा परिस्थतीमध्ये तक्रारदारांनी स्वत: बांधकाम पूर्ण करुन घेतलेले आहे याबाबतचा सुसंगत पुरावा प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |