जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:281/2015
दाखल दिनांक:01/07/2015
आदेश दिनांक 07/07/2015
कालावधी0वर्षे0म07दि
इंदू कन्स्ट्रक्शन गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर मु.पो.गणेश नगर,
अकलूज ता.माळशिरस चे प्रोप्रा.शिवाजी शंकर राऊत
वय 53वर्षे,धंदा-कॉन्ट्रॅक्टर,रा-अकलूज ता.माळशिरस
तर्फे मुखत्यार श्री.धनाजी शंकर राऊत
वय 43 वर्षे,धंदा-कॉन्ट्रॅक्टर रा.सांगोला जि.सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1)सांगोला नगरपरिषद सांगोला,
ता.सांगोला जि.सोलापूर.(सदर नोटीस मुख्याधिकारी सांगोला
नगरपरिषद,सांगोला ता.सांगोला जि.सोलापूर यांचेवर बजावणेत यावी.)
2)मुख्याधिकारी,सांगोला नगरपरिषद सांगोला,
ता.सांगोला जि.सोलापूर. ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील,सदस्य
सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदारतर्फे विधिज्ञ :-श्री.एस.जे.पाटील
निशाणी 1 वरील आदेश
(पारीत दिनांक:-07/07/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
1. तक्रारकर्ता यांचा अँडमिशन युक्तीवाद ऐकला. प्रस्तूत तक्रार तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांनी त्यांना टेंडरचे माध्यमातून दिलेला बांधकामाची येणे रक्कमेचे वसूलीसाठी दाखल केलेली आहे. प्रस्तूतची तक्रार व त्यासोबतची कागदपत्रे व तक्रारकर्ता यांची मागणी यांचा विचार करता तक्रारकर्ता ही बांधकाम करणारी व्यवसायीक कंपनी आहे. त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून टेंडर मंजूर करुन स्विकारलेले काम हे व्यवसायीक हेतूने नफा
(2) त.क्र.281/2015
मिळविण्यासाठी घेतलेले असल्याने त्यामध्ये व्यापारी हेतू दिसून येतो. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)D नुसार तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक होत नाहीत. तसेच प्रस्तूत तक्रारीतील वाद हा ग्राहक विवाद होत नाही. त्यामुळे प्रस्तूत तक्रार दाखल करुन घेणेचा व तो पुढे चालविण्यास अधिकार क्षेत्र वि.मंचास येत नाही. त्यामुळे प्रस्तूत तक्रार रद्द करणे न्यायोचित ठरेल असे वि.मंचास न्यायोचित वाटते. त्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहे.
-: आ दे श :-
1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज रद्द करणेत येत आहे.
2. अर्जदार यांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागावी.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,सोलापूर
दापांशिंलि007071500