नि. 67
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2103/2009
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 14/09/2009
तक्रार दाखल तारीख : 03/12/2009
निकाल तारीख : 26/04/2013
-----------------------------------------------------------------
1. श्रीमती सुवर्णा उल्हास देसाई
वय वर्षे – 45, धंदा– घरकाम
2. कु. तेजश्री उल्हास देसाई
वय वर्षे – 20, धंदा–शिक्षण
3. चि.अमेय उल्हास देसाई
वय वर्षे – 18, धंदा–शिक्षण
सर्व रा. प्लॉट नं.8, आनंदबन, कुपवाड फाटा,
सांगली ता.मिरज जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती
सांगली, मार्केट यार्ड, सांगली
2. श्री सुरेश बाबूराव शिंदे
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
रा.जत, ता.जत जि. सांगली
3. श्री सुभाष बाळीशा खोत
व.व. सज्ञान, धंदा – शेती
रा.कानडवाडी, पो.कवलापूर, ता.मिरज जि. सांगली
4. श्री मदनराव विश्वनाथराव पाटील
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
रा.विजय बंगला, वसंत कॉलनी, सांगली
5. श्री श्रीनिवास रामचंद्र भोसले
व.व. सज्ञान, धंदा – शेती
रा.कोसारी, ता.जत जि. सांगली
6. सौ रुक्मिणी यशवंत पाटील
व.व. सज्ञान, धंदा – घरकाम
रा.कवलापूर, ता.मिरज जि. सांगली
7. श्री परमेश्वर शिवगोंडा व्हनमराठे
व.व. सज्ञान, धंदा – शेती
रा.संख, ता.जत जि. सांगली
8. श्री सुर्यकांत शंकर आडके
व.व. सज्ञान, धंदा – व्यापार
रा.सुयश, नेमिनाथनगर, सांगली
9. श्री यशवंत सहदेव सावंत
व.व. सज्ञान, धंदा – व्यापार
रा.प्लॉट नं.26, शांतीसागर कॉलनी,
100 फुटी रोड, सांगली
10. श्री महादेव रामण्णा अंकलगी,
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
मु.पो.जाडरबोबलाद, ता.जत जि.सांगली
11. श्री कोंडाजी लक्ष्मण पाटील
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
मु.पो.दुधेभावी, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
12. मा.गिरमला रेवणसिध्द रगटे
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
मु.पो.कोणबगी, पो.को.बोबलाद ता.जत जि.सांगली
13. श्री केशव बापू कदम
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
मु.पो.कुकटोळी, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
14. सौ कमल रामगोंडा जाबगोंडा
व.व. सज्ञान, धंदा – घरकाम
मु.पो.बिळूर, ता.जत जि.सांगली
15. भारत दादू डुबुले
मु.पो.देशिंग, ता. कवठेमहांकाळ जि.सांगली
16. श्री प्रकाश विठोबा जमदाडे
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
शिवनेरी निवास, डफळे कॉलनी,
पाटबंधारे कार्यालयाशेजारी, वॉर्ड नं.3, जत जि. सांगली
17. श्री अभय तात्यासो मगदूम
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
मु.पो.धरवाडकर प्लॉट नं.31, सांगली
18. श्री बाळासो बाळगोंडा पाटील
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
मु.पो.म्हैशाळ ता.मिरज जि. सांगली
19. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लि.
सांगली, मुख्य शाखा सांगली
20. श्री मदनराव विश्वनाथराव पाटील
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य
रा.विजय बंगला, वसंत कॉलनी, सांगली
21. श्री नरसगोंडा सातगोंडा पाटील
व.व. सज्ञान, धंदा – समाजकार्य/व्हा.चेअरमन
मु.पो.नांद्रे ता.मिरज जि. सांगली
22. श्री सुरेश आदगोंडा पाटील
व.व.सज्ञान, धंदा – व्यापार
रा.वसंत मार्केट यार्ड, जनरल कमिशन एजंट,
सांगली
23. श्री अमरनाथ सदाशिव पाटील
व.व.सज्ञान, धंदा – व्यापार
रा.सदाशिव – 4, शनिवार पेठ, माधवनगर
सांगली
24. श्री किरण राजाभाऊ जगदाळे
व.व.सज्ञान, धंदा – व्यापार
रा.1113, खणभाग, जगदाळे गल्ली, सांगली
25. श्री अरविंद शामराव पाटील
व.व.सज्ञान, धंदा – व्यापार
रा.पद्माळे, ता.मिरज जि.सांगली
26. श्री आनंदराव मारुती पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.सांगलीवाडी, ता.मिरज जि.सांगली
27. श्री सुरेश जिनगोंडा पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.समडोळी, ता.मिरज जि.सांगली
28. श्री श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.मौजे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली
29. श्री सर्जेराव सखाराम पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.कवठेपिरान, ता.मिरज जि.सांगली
30. श्री निवास दत्ताजीराव देशमुख
व.व.सज्ञान, धंदा – शेती / व्यापार
रा.शिराळा, ता.शिराळा जि.सांगली
31. श्री दत्तात्रय श्रीपती सुर्यवंशी
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.अंकलखोप, ता.पलूस जि.सांगली
32. सौ बेबीताई मारुती पाटील
व.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.कमानवेस, मंगळवार पेठ
मिरज जि.सांगली
33. सौ वंदना संभाजी पाटील
व.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.कवठे पिरान, ता.मिरज जि.सांगली
34. श्री सुधाकर धोंडीराम आरते
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.कसबे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली
35. श्री गजानन लक्ष्मणराव गवळी
व.व.सज्ञान, धंदा –व्यवसाय
रा.112, गवळी गल्ली, सांगली
36. श्री मुजिर अब्बास जांभळीकर
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.404, वखारभाग, सांगली
37. श्री भरत महादेव पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.बुधगांव, ता.मिरज जि.सांगली
38. श्री सतिश आप्पासो बिरनाळे
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.वसंत कॉलनी, वसंत मार्केट यार्ड सांगली
39. श्री विजय विरुपाक्ष घेवारे
4, उत्तर शिवाजीनगर, दडगे गर्ल्स हायस्कूल नजीक
सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री ए.आर.कुडाळकर
जाबदार क्र.1, 5, 8 ते 12, 14 ते 16 तर्फे : अॅड ए.आर.देशमुख
जाबदार क्र.3 तर्फे : अॅड डी.टी.पवार
जाबदार क्र.4 तर्फे : अॅड एम.वाय.ताम्हणकर
जाबदार क्र.20 ते 28 व 31, 35 ते 39 तर्फे : अॅड एम.वाय.ताम्हणकर
जाबदार क्र.19 तर्फे : अॅड एच.आर.पाटील
जाबदार क्र.2, 6, 17, 18, 32 : वगळण्यात आले.
जाबदार क्र.7, 13, 29, 33 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदार यांनी दाखल केली आहे.
2. सदर तक्रारीचा तपशील थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे -
तक्रारदार श्रीमती सुवर्णा उल्हास देसाई यांचे पती उल्हास आण्णू देसाई हे जाबदार क्र.1 कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेकडे कर्मचारी होते. आपल्या भविष्यकालीन आर्थिक समस्यांचा विचार करुन त्यांनी भविष्य निर्वाह निधीच्या आपल्या रकमेची गुंतवणूक मुदत ठेवीमध्ये जाबदार क्र.1 च्या माध्यमातून संयुक्त खाते काढून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचे बंधन असताना जाबदार क्र.2 ते 18 यांनी बेकायदेशीररित्या जाबदार क्र.19 कडे गुंतविली होती. कालांतराने दि.16/6/2008 रोजी तक्रारदाराचे पती मयत झाले, मात्र पत्नी या नात्याने त्या कायदेशीर वारस असल्याने त्यांनी जाबदार क्र.1 ते 39 यांचेकडे वारंवार मागणी करुनही त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांचे पती यांनी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचे व मुलांचे संगोपन व शिक्षण करण्याचे दृष्टीने जाबदार क्र.1 यांचेमार्फत जाबदार क्र.19 यांचेकडे मुदत ठेवीमध्ये खालीलप्रमाणे रक्कम गुंतविली.
अ.क्र. |
ठेवपावती क्र. |
रक्कम रु. |
मुदत ठेवीची तारीख |
मुदत संपलेली तारीख |
1 |
101150 |
11300 |
1/6/2003 |
8/10/08 |
2 |
116249 |
12000 |
10/4/04 |
10/4/09 |
3 |
116927 |
13500 |
23/10/04 |
23/10/09 |
4 |
117134 |
153000 |
22/11/04 |
22/11/09 |
5 |
131137 |
12600 |
4/4/05 |
4/4/10 |
6 |
135864 |
13000 |
30/11/05 |
30/11/10 |
|
एकूण |
2,15,400/- |
|
|
उपरोक्त कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे व्याजासह रक्कम रु.3,24,072/- जाबदार क्र.1 ते 39 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या वसूल करुन मिळावी तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- तसेच प्रकरण खर्चापेटी रु.10,000/- मिळावेत अशा प्रकारची मागणी तक्रारअर्जात केली आहे.
3. आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र, जाबदार क्र.1 व जाबदार क्र.19 यांच्या संचालक मंडळाची यादी, ठेवपावत्यांच्या सत्यप्रती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. जाबदार क्र.1 ते 5, 8 ते 11, 14 ते 16, 19 ते 28, 31, 35 ते 39 यांनी नि.क्र. अनुक्रमे 31, 48, 49, 51, 53, 56, 59 ला आपले म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराच्या अर्जातील सर्व मुद्दे फेटाळले आहेत व खालील मुद्दे प्रामुख्याने मांडलेले आहेत.
अ. तक्रारदाराचे पती जाबदार क्र.1 चे कर्मचारी होते, त्यामुळे ग्राहक सेवादार नाते निर्माण होत नाही.
ब. जाबदार क्र.1 ही स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था आहे, तिचे कामकाज चालविणेसाठी पणन संचालकांची व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या परवानगीची आवश्यकता नाही.
क. गुंतविलेल्या रकमा परतीची वैयक्तिक व संयुक्त जबाबदारी जाबदार क्र.19 ते 39 यांची आहे असे जाबदार क्र.1 यांनी लेखी म्हणण्यात मांडले आहे.
ड. प्रॉव्हिडंड फंड व ग्रॅच्युईटीच्या रकमा जाबदार क्र.1 कडे तक्रारदाराचे पती यांचे संमतीने जाबदार क्र.1 यांच्या संयुक्त नावाने व सहीने गुंतविलेल्या होत्या.
इ. जाबदार क्र.4 यांनी जाबदार क्र. 1 संस्थेचे जाबदार क्र.2 ते 18 संचालक नसल्याचे कथन केले आहे.
फ. जाबदर क्र.2 व 21 यांनी जाबदार क्र.19 वर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालून परवाना रद्द केला व सध्या अवसायक असल्याने संचालक मंडळ बरखास्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
ग. जाबदार क्र.19 तर्फे अवसायक यांनी म्हणणे मांडले असून त्यामध्ये बँकेवर अवसायक मंडळ स्थापन केलेले असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 107 प्रमाणे प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द कोणताही दावा वा इतर कारवाई दाखल करणेपूर्वी मे.कमिशनर को-ऑपरेटीव्ह यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच बँकेच्या ठेवीदारांचे D.I.C.G.C. कडे क्लेम करुन त्यानुसार ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचे काम चालू असून त्याप्रमाणे क्लेम नं.20096 या क्लेमची तडजोडीची रक्कम रु.1,00,000/- संबंधीत तक्रारदार व संस्था यांनी स्वीकारली असल्याचे नमूद केले आहे.
ह. जाबदार क्र.3 यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती विरुध्द दावा करणेचा झालेस दावापूर्व नोटीस दिलेली नाही. तसेच तक्रारदाराने सदरची तक्रार पणन संचालकांची परवानगी न घेता दाखल केली आहे असा मुद्दा मांडला.
5. तक्रारदारांची तक्रार व दाखल कागदपत्रे, जाबदारांचे त्यावर लेखी म्हणणे, न्यायनिवाडे व दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायमंचापुढे खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
6. तक्रारदारच्या पतीच्या नावे संयुक्त खात्याने जाबदार क्र.1 यांनी जाबदारक क्र.19 कडे मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केलेली होती हे नि. 5/3 ते 5/8 वरील मुदत ठेवी पावत्यांवरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.19 चे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
7. तक्रारदाराने वारंवार मागणी करुनही जाबदार क्र.1 ते 38 यांनी तक्रारदाराच्या मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतरही रक्कम अदा केलेली नाही. हा निश्चित सेवेतील दोष आहे. जाबदारांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे प्रत्यही दिसून येते.
8. जाबदारांच्या विधिज्ञांनी आपल्या लेखी म्हणणे व युक्तिवादामध्ये विविध मुद्दयांचा ऊहापोह केला. त्यामध्ये आर्थिक जबाबदारी टाळण्याचाच जाबदार यांचा प्रयत्न दिसून येतो. तक्रारदार यांचे पती हे जाबदार क्र.1 च्या आस्थापनेत नोकरी करीत होते. पर्यायाने जाबदार क्र.1 यांनी कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घेणे अभिप्रेत होते व त्या त्यावेळी घेतलेल्या निर्णयाला बांधील असणे तेवढेच क्रमप्राप्त असते. कर्मचा-याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जाबदार क्र.1 यांनी संयुक्त खाते उघडून (तक्रारदाराचे पती व संस्थेचे सचिव यांचे नावे) जाबदार क्र.19 यांचेकडे गुंतवणूक करताना बाजार समिती अधिनियम कलम 36 कडे जाबदार क्र.1 ते 18 यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. बाजार समितीचा निधी त्या जिल्हयाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवला पाहिजे (नियम 107) असे नमूद असताना जाबदार क्र.19 या संस्थेमध्ये तक्रारदाराची प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम गुंतविण्याचे प्रयोजन काय ? त्यामुळे तक्रारदाराची गुंतवणूक केलेली रक्कम मिळवून देण्याचे उत्तर दायित्व पूर्णपणे जाबदार क्र.1 ते 18 यांच्याकडे जाते असे मंचाचे ठाम मत आहे. मूलतः बाजार समित्यांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी पणन संचालक व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या निर्देशनाखाली त्यांचे कामकाज चालते. बाजार समितीला लागणारा निधी किंवा वार्षिक बजेट आर्थिक ताळेबंद हे पणन संचालकांकडून मंजूर करुन घ्यावे लागतात. त्यामुळे जाबदार क्र.1 यांनी बाजार समितीचे कामकाज चालविणेसाठी पणन संचालकांची व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या परवानगीची आवश्यकता नाही हे म्हणणे गैर आहे किंवा वास्तवता दर्शक नाही असे म्हणावेसे वाटते. जाबदारक क्र.1 ते 18 यांनी तक्रारदाराची गुंतवणूक जिल्हा बँकेत वा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे कायदयाने अभिप्रेत असताना नेमकी जाबदार क्र.19 कडे का ठेवली ? याचे उत्तर बाजार समितीच्या काही संचालकांचे हितसंबंध त्यामध्ये गुंतलेले होते हे स्पष्ट होते आणि म्हणून तक्रारदारांची मुदत ठेवीची रक्कम देण्याची उत्तरदायित्व जाबदार क्र.19 ते 38 यांच्या बरोबरच जाबदार क्र.1 ते 18 यांच्याकडे वैयक्तिकरित्या जाते.
9. जाबदार क्र.19 ही एक juristic person असून तिचे अस्तित्वच संचालक मंडळामार्फत असते व योग्य वेळी हा पडदा/बुरखा (veil) बाजूला करुन अथवा उचलून संचालक मंडळाला संस्थेच्या सदोष सेवेसाठी जबाबदार धरणे आवश्यक ठरते. (At appropriate times, corporate veil has to be lifted up) अशा आशयाचा निष्कर्ष सन्मा. राष्ट्रीय आयोगाने रविकांत विरुध्द विणा भटनागर (संदर्भ – 2009(1) CPR 87) या प्रकरणात काढलेला आढळतो. प्रस्तुतच्या तक्रारअर्जामध्ये जाबदार क्र.19 वर अवसायक असल्याने व भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालून परवाना रद्द केल्याने संचालक मंडळ बरखास्त असल्याने तत्कालीन संचालक मंडळ तक्रारदाराची मुदतठेवीची रक्कम देऊ शकत नाही असे जाबदाराचे म्हणणे आहे. परंतु अवसायक येणे, परवाना रद्द करणे, संचालक मंडळ बरखास्त करणे अशी परिस्थिती निर्माण का झाली याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. संचालक मंडळाची जबाबदारी फक्त त्यांच्या भागभांडवलापुरती मर्यादित असते असे संचालकांचे म्हणणे आहे. संचालक मंडळ भागधारक असले तरीसुध्दा संचालक मंडळाचे सदस्य म्हणून संस्थेचा कारभार ते चालवत असतात. अशा भागधारकांपैकीच काहींची निवड संचालक मंडळावर होते. संचालक मंडळावर वित्तीय संस्थेचा कारभार चालविण्याची (affairs of management of society) जबाबदारी असते. अशा प्रकारे कारभार चालविताना घेतल्या गेलेल्या निर्णयांचे दायित्व निश्चितपणे संचालक मंडळावर येते. संचालक मंडळाचे सदस्य म्हणून अन्य भाग धारकांपेक्षा वेगळे व विशेष अधिकार आणि जबादार-या या दोन्ही संचालकांना प्राप्त झालेल्या असतात. अशा परिस्थितीत जबाबदारींचे दायित्व स्वीकारण्याची वेळ आली की आपली जबाबदारी भागभांडवलापुरती मर्यादीत अशी भूमिका संचालकांना घेता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. संस्था चालविण्यासाठी रक्कम उभी करण्याच्या हेतूने जमा केलेले भागभांडवलाचे मालक अर्थातच भाग भांडवलदार व संस्था चालविण्याची जबाबदारी स्वीकारलेले संचालक मंडळ यांच्या जबाबदा-या निश्चितच वेगळया असून बँकेतर्फे केल्या गेलेल्या सर्व कृतींचे उत्तरदायित्व स्वीकारणे, संचालक मंडळासाठी बंधनकारक ठरते असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
त्यातूनही संचालक मंडळाला वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरण्यात यावे अशी स्पष्ट तरतूद सहकार कायदयातील कलम 73 1 (A, B) मध्ये आढळते. याउलट नावातील मर्यादीत शब्दांमुळे संचालक मंडळाची जबाबदारी मर्यादित होते अशी स्पष्ट तरतूद संचालक दाखवू शकलेले नाही. कलम 73 व सन्मा.राज्य आयोग महाराष्ट्र यांचा निवाडा या दोहोंचा एकत्र विचार करताही संचालक मंडळाला संयुक्त व वैयक्तिकरित्या जबाबदार धरणे आवश्यक ठरते.
ग्राहक संरक्षण कायदयाची निर्मिती ही ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी झाली असून अनावश्यक असताना सहकार कायदयातील तरतुदी मंचापुढील प्रकरणात लागू करणे तक्रारदारांवर नुसतेच अन्यायकारक ठरणार नाही तर या कायदयाच्या मूळ हेतूला सुध्दा ते बाधक ठरेल असे या मंचाचे मत आहे.
9. जाबदार क्र.19 बँकेच्या ठेवीदारांचे D.I.C.G.C. क्लेम करुन त्यानुसार ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचे काम चालू असून त्याप्रमाणे क्लेम नं.20096 या क्लेमची तडजोडीची रक्कम रु.1,00,000/- संबंधीत जाबदार व संस्था यांनी स्वीकारल्याचे जाबदार क्र.19 चे अवसायक यांनी लेखी म्हणण्यात म्हटले आहे. मात्र तक्रारदाराला रक्कम दिल्याचा सबळ पुरावा सादर करण्यात आलेला नाही.
10. जाबदार क्र.1 व त्यांचे संचालक जाबदार क्र.19 वर यांचेकडे अंगूलीनिर्देश करुन आपली आर्थिक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या आस्थापनेत काम केलेल्या मयत कर्मचा-याची अभागी विधवा पत्नी व तिची मुले पती गमावल्यानंतर आर्थिक विवंचनेमुळे कोणत्या परिस्थितीत जगत असतील याचा एक माणूस म्हणून विचार करणे आवश्यक होते मात्र तो विचार न करता किंवा तिला मदत न करता जबाबदारी एकमेकांवर ढकलणे कितपत योग्य आहे ? जाबदार क्र.19 च्या संचालकांबरोबरच जाबदार क्र.1 च्या संचालकांचीही तेवढीच तक्रारदाराची मुदत ठेवीची रक्कम देण्याची नैतीक आणि कायदेशीर जबाबदारी होती असे मंचाचे ठाम मत आहे. मुदत संपल्यानंतर ठेवीदाराचे पैसे न देणे हा सेवेतील दोष मान्य करावा लागतो.
11. जाबदार क्र.2,6,17,18 यांना या तक्रारीतून कमी करण्याची विनंती तक्रारदाराने मंचासमोर मांडलेली मागणी मान्य करण्यात आली आहे.
12. अवसायकांना त्यांचा लेखी युक्तिवाद मान्य करुन या प्रकरणात जबाबदार धरण्यात आलेले नाही.
वर नमूद विवेचनावरुन तक्रारदारांची भविष्य निर्वाह निधीची बँकेत गुंतविलेली रक्कम तसेच मानसिक त्रास व खर्चाची रक्कम देण्यासाठी दोन्ही संचालक मंडळांना वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरणे आवश्यक ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. जाबदार क्र.1, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 19 ते 38 (जाबदार क्र.32 वगळून) यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदाराने मुदतठेवीमध्ये गुंतवलेली व्याजासह रक्कम रु.3,24,072/- (रुपये तीन लाख चोवीस हजार बहात्तर) दि.3/12/2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने तक्रारदारांना परत करावी.
2. जाबदार क्र.1, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 19 ते 38 (जाबदार क्र.32 वगळून) यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदाराला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- देणेचे आदेश देण्यात येत आहेत.
3. वर नमूद जाबदारांनी तक्रारदाराला प्रकरण खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 26/04/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.