तक्रार क्रमांक – 451/2009 तक्रार दाखल दिनांक – 01/07/2009 निकालपञ दिनांक – 04/02/2010 कालावधी - 00 वर्ष 07 महिने 03 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री.प्रफुल्ल पंढरिनाथ दोंदे ए/27ए चंदन सोसायटी, नुरी बाबा दर्गा, रोड, मखमली तलावाजवळ, पाचपाखाडी, ठाणे(पश्चिम) 400 601. .. तक्रारदार विरूध्द संघवी गार्डन रजनिगंधा ए व बी विंग गृहनिर्माण संस्था, सागाव, मानपाडा रोड, डोंबिवली (पुर्व). .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क स्वतः वि.प एकतर्फा एकतर्फा आदेश (पारित दिः 04/02/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री. प्रफुल दोंदे यांनी सेक्रेटरी व चेअरमन संघवी गार्डन, रजनीगंधा ए व बी विंग गृह निर्माण संस्था यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकाराकडे भरलेली ठेव रक्कम रु.8,400/- व्याजासकट परत मागितली आहे. तक्रारदार यांनी सदनिकेचा ताबा घेण्यापुर्वी विकासकाकडे 12 महिन्याच्या करापोटी व अन्य खर्चापोटी रक्कम रु.8,400/- अनामत स्वरुपात जमा केली होती. सदर रक्कम विकासकाने गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन झाल्यावर संस्थेकडे हस्तांतरित केली व संस्थेने सर्व सभासदाच्या अनामत रक्कमा त्यांना परत केल्या. परंतु तक्रारदार यांना त्यांची अनामत रक्कम रु.8,400/- अद्यापी संस्थेने परत केलेली नाही. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदाराला दि.27/12/2008 रोजी पाठविलेल्या पत्रात कबुल केले आहे कि, त्यांना तक्रारदाराने दिलेल्या दि.17/10/2000 रोजीच्या चेक क्र.131851 द्वारे सदर अनामत रक्कम रु.8,400/- मिळालेले आहेत. जर इतर सभासदांची अनामत रक्कम त्यांनी परत केली तर तक्रारदारांची हि रक्कम अद्यापी का परत केली नाही यात विरुध्द पक्षकार यांनी दिरंगाई व निष्काळजीपणा दाखविला आहे. तरी मंचाच्या मते तक्रारदारांची मागणि रास्त वाटते. मंचाने नोटिस बजावुनही विरुध्द पक्षकार हजर राहिले नाहीत व त्याची लेखी कैफीयत त्यांनी दाखल केली म्हणुन मंचाने दि.04/11/2009 रोजी नो डब्ल्यु एस आदेश करुन एकतर्फा चौकशी केली म्हणुन हे मंच पुढील एकतर्फा अंतीम आदेश पारित करत आहेत. .. 2 .. अंतीम आदेश 1.तक्रार क्र. 451/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) तक्रारदार यांस द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास त्यांची अनामत ठेव रु.8,400/- (रु. आठ हजार चारशे फक्त) त्यांना परत करावी या आदेशाची पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत करावे अन्यथा तदनंतर वरिल रक्कमेवर 7 % व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु. 500/-(रु. पाचशे फक्त) द्यावे. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 04/02/2010 ठिकान - ठाणे
(सौ.भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट ) प्र.अध्यक्षा सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|