निकालपत्र
(दि.19.08.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील मागणी खालील प्रमाणेः-
1. अर्जदार यांनी गैरअर्जदाराची डिलरशिप/डिस्ट्रीब्युटरशिप बेकायदेशीररीत्या संपुष्टात आणल्यामुळे अर्जदाराचे व्यापारात नुकसान झाले. म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रु.4,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासहीत देण्यात यावे. तसेच गैरअर्जदाराच्या कंपनीचा माल अर्जदाराने किरायाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला आहे त्यासाठी रक्कम रु.45,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासहीत गैरअर्जदार यांनी द्यावेत. तसेच गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी किरकोळ विक्रेत्यांकडून वसूल केलेले रक्कम रु.3,25,000/- तसेच कंपनीच्या मालाबाबत असलेल्या बोनस व क्लेम रक्कम रु.68,830/- ,मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.10,000/- गैरअर्जदार यांनी द्यावे अशी मागणी केलेली आहे.
2. अर्जदाराचे तक्रारीतील कथन बघीतले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून खरेदी केलेला माल हा अर्जदार किरकोळ विक्रेत्यांना विक्री करीत होता व गैरअर्जदाराने अर्जदाराची डिलरशिप बेकायदेशीररीत्या संपुष्टात आणल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
प्राथमिक युक्तीवाद ऐकला. अर्जदार हा ग्राहक या व्याख्येत अंतर्भूत होतो काय असा प्राथमिक मुद्या उपस्थित होतो.
3. अर्जदार यांनी दाखल केलेल्या यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे व तक्रारीतील कथनाचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून खरेदी केलेला माल पुनर्विक्रीसाठी व व्यावसायीक कारणासाठी घेतलेला होता ही बाब स्पष्ट होते. ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(d) (i) खालील प्रमाणेः-
Sec.2(d)(i) Consumer means any person who—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose;
वरील तरतूदीचे अवलोकन केले असता अर्जदाराने खरेदी केलेला माल हा किरकोळ विक्रेत्यांना पुनर्विक्रीसाठी व व्यावसायीक कारणासाठी खरेदी केलेली असल्याने अर्जदार हा ग्राहक या व्याख्येमध्ये अंतर्भूत होत नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे अर्जदार यांची तक्रार प्राथमिक अवस्थेत फेटाळण्यात येते.