Complaint Case No. CC/736/2021 | ( Date of Filing : 01 Dec 2021 ) |
| | 1. SANGITA NANDAKISHOR KAYANDE, THROUGH HER PARENTS MOTHER SANGITA KAYANDE | R/O. PLOT NO.19, SANACHAYANI COMPLEX, TRIMURTI NAGAR, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA | 2. SARAKSHI NANDAKISHOR KAYANDE, THROUGH HER PARENTS MOTHER SANGITA KAYANDE | R/O. PLOT NO.19, SANACHAYANI COMPLEX, TRIMURTI NAGAR, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. SANCHAYANI SAVING & INVESTMENT (INDIA) LTD., THROUGH DIRECTOR/ MANAGER | OFF.AT, MAHAJAN TOWER, MAHAJAN MARKET, SITABUILDI, NAGPUR AND OFF. PLOT NO.A-9, KALYANI, NADIA, WEST BENGAL AND OFF.AT 41, LENIN SARANI, KOLKATA | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या कलम ३५ नुसार दाखल केलेली आहे.
- संचयनी सेव्हींग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट (इं) मर्या. ही एक कंपनी असुन ती भारतीय कंपनी कायदा 1956 अंतर्गत क्रं.31699 नुसार नोंदणीकृत आहे. त्यांचे नोंदणीकृत कार्यालय भुखंड क्रं.अ-9, एफपीओ,कल्याणी, जिल्हा-नाडीया, पश्चिम बंगाल येथे असुन नियंत्रक कार्यालय-41, लेनिन सरानी, कोलकत्ता येथे असुन एक शाखा कार्यालय- संचयनी सेव्हींग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट (इं) मर्या.(गृहविभाग) महाजन टॉवर, महाजन मार्केट, सिताबर्डी नागपूर येथे आहे. त्यांचा व्यवसाय ते संचालक व व्यवस्थापक यांचे व्दारे करतात. त्यांचा मुख्य व्यवसाय व्यापारी तथा निवासी संकुल बांधणे हा असुन ते बहूमजली इमारती बांधुन सदनिकांची विक्री करतात. वि.प. हे भुखंड क्रं.19 खसरा क्रं. 19/1,20,21, मौजा-भामटी बिल्डीम परमिट क्रं.18/15630, आराजी 585.35 चौ.मि., त्रिमूर्ती नगर येथील जमीनीचे मालक आहेत. त्यांनी या जमिनीवर व्यापारी तथा निवासी संकूल, बहूमजली इमारती बांधण्याचे ठरविले. हा भुखंड अकृषक जमिन (एन.ए) असून वि.प.ने त्यावर बहूमजली इमारत, मान्यताप्राप्त आराखडयाप्रमाणे “ संचयनी संकुल ” त्रीमूर्ती नगर नागपूर येथे बांधली आहे. तसेच तक्रारदाराने पूढे नमूद केले की, सदरहू मालमत्ता वि.प. यांनी श्रीमती केशाबाई शिवदानमल मोखा, श्रीमती सरोज कन्हाईलाल मोखा, श्रीमती सविता अशोक मोखा आणि श्रीमती पूरणदेवी किशोर मोखा यांचे कडुन नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे 24.1.1992 रोजी खरेदी केले. त्याच प्रमाणे सदरहू मालमत्तेचा वि.प.ने नागपूर सूधार प्रन्यास कडुन सदरचा आराखडा दिनांक 5.3.1991 रोजी मंजूर करुन घेतला व त्याचा बिल्डींग परमिट क्रं.सीएस/28/15630, असा आहे.
- तक्रारकर्ता हे वि.प. यांचे कंपनीत एजंट म्हणुन काम करीत होते. त्यामूळे तक्रारकर्ता व वि.प. हे एकमेकांशी चांगले परिचित होते. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.कडुन सदनिका क्रं.303, तिसरा माळा,क्षेत्रफळ-725.00 चौ.फुट, मौजा-भामटी, भुखंड क्रं.19, खसरा क्रं.19/1, 20,21, बिल्डींग परमिट क्रं.सीएस/28/15630, हा त्रीमूर्ती नगर नागपूर येथील संचयनी कॉम्प्लेक्स अपार्टमेंन्ट येथे एकूण रक्कम रुपये 2,75,000/- मध्ये सन 1995 मध्ये वि.प.ला देऊन सदर सदनिका विकत घेतली. ठरल्याप्रमाणे तकारदाराने वि.प.कडे संपूर्ण रक्कम जमा केली. तसेच सदरच्या इमारतीचे बांधकाम संपूर्ण झाल्यानंतर वि.प.ने तक्रारदाराला सदरचा सदनिका क्रमांक-303, चा प्रत्यक्ष ताबा सन 1995 मध्ये दिला म्हणजेच सदरची सदनिका तक्रारदाराचे ताब्यात अंदाजे 25 वर्षापासून आहे. वि.प. यांनी घोषणापत्राचा करार, महाराष्ट्र सदनिका मालकी ह्क्क कायदा 1970 साली (डीओडी) निष्पादीत केला होता व तो सहनोंदणी अधिकारी नागपूर यांचे समोर 30.8.1995 रोजी नोंदणीकृत झाला. त्याचप्रमाणे वि.प. यांनी सदरहू मालमत्ते बाबत नागपूर सूधार प्रन्यास येथे खरेदीदारांची नावे दिली. अशा प्रकारे व इतर काही औपचारिकतेनंतर वि.प.यांनी तक्रारदाराचे नावे विक्रीपत्र करुन देण्यास संमती दिली.
- तक्रारकर्ता पूढे नमूद करतो की, वि.प.ने उपरोक्त सदनिकेचे कब्जापत्र व सदर सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा देखिल तक्रारदाराला सन 1995 मध्येच दिलेला आहे. तक्रारदार तेव्हापासून या सदनिकेत आपल्या परिवारासह राहात आहे व तक्रारकर्ता हे नियमितपणे वीज देयक, महसूल मालमत्ता कर, एनआयटी ग्राऊंड रेंन्ट इत्यादींचे शुल्क संबंधीत कार्यालयात जमा करीत आहेत. वि.प.यांनी पूर्वी निश्चीत केल्याप्रमाणे विक्रीपत्र तक्रारदाराचे नावे नोंदवून दिले नाही कारण त्यावेळी वि.प. यांची कंपनी डबघाईस गेली होती. त्यामूळे वि.प. सतत कोणते ना कोणते कारण सांगून विक्रीपत्र नोंदविण्याचे टाळाटाळ करीत होता. तक्रारकर्ता विक्रीपत्र नोंदणीची रक्कम भरण्यास तयार असुन सुध्दा वि.प.यांनी तक्रारदाराचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 14.9.2021 रोजी वि.प.ला वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठविली. वि.प.ने त्याची दखल घेतली नाही आणि विक्रीपत्र नोंदविण्याकरिता कुठलाही प्रतिसाद न दिल्याने तक्रारदाराने या आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली की, वि.प.यांनी निर्देश देऊन उपरोक्त संचयनी कॉम्प्लेक्स अपार्टमेंन्ट, येथील सदनिका क्रं.-303, चे तक्रारदाराचे नावे कायदेशिररित्या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. जर वि.प. हे करुन देण्यास असमर्थ ठरले तर या आयोगाने सदरचे विक्रीपत्र तक्रारदाराचे नावे कायदेशिररित्या नोंदणीकृत करुन द्यावे. त्याकरिता लागणारा खर्च तक्रारकर्ता करण्यास तयार आहे. सदरहू सदनिकेचा ताबा अंदाजे 25 वर्षापासून तक्रारदाराकडे आहे व तो कायम करण्यात यावा. तसेच वि.प.ने शारिरिक,मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी व न्यायालयीन खर्चापोटी रुपये 3,00,000/- मिळावे अशी मागणी केली आहे.
- विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत नोटीस पाठविण्यात आली असता वि.प. नोटीस प्राप्त होऊन सुध्दा आयोगासमक्ष हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 25.4.2022 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
- विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
का र ण मि मां सा - संचयनी सेव्हींग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट (इं) मर्या. ही एक कंपनी असुन ती भारतीय कंपनी कायदा 1956 अंतर्गत क्रं.31699 नुसार नोंदणीकृत आहे.त्यांचा व्यवसाय व्यापारी तथा निवासी संकुल बांधणे हा असुन ते बहूमजली इमारती बांधुन सदनिकांची विक्री करतात. वि.प. हे भुखंड क्रं.19 खसरा क्रं. 19/1,20,21, मौजा-भामटी बिल्डीग परमिट क्रं.28/15630, आराजी 585.35 चौ.मि., त्रिमूर्ती नगर येथील जमीनीचे मालक असुन त्यानंतर सदर जमिनीचे वि.प.ने अकृषक रुपांतरण करुन त्यावर बहूमजली इमारत, नागपूर सुधार प्रन्यासच्या मान्यताप्राप्त आराखडयाप्रमाणे “ संचयनी संकुल ” या नावाने त्रीमूर्ती नगर नागपूर येथे बांधली आहे. वि.प. यांनी सदरहू जमिनीचे नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे 24.1.1992 रोजी खरेदी केली आहे हे निशाणी क्रं.2 वर दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने अभिलेखावर दिनांक 30.8.1995 रोजीची नोंदणीकृत डीड ऑफ डिक्लेरेशनची प्रत दाखल केली आहे. त्याचप्रमाणे सदरहू मालमत्ता नागपूर सूधार प्रन्यास कडुन बिल्डींग परमिट क्रं.सीएस/28/15630, दिनांक 5.3.1991 ची प्रत अभिलेखावर दाखल आहे. तसेच तक्रारदाराने स्वतःचे नावे असलेले विद्युत देयक व म.न.पा.यांचे कर भरणा केल्याची पावती अभिलेखावर दाखल केली आहे. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता वि.प.चा ग्राहक आहे. वि.प.ने तकारदाराकडुन उपरोक्त सदनिका क्रं.303 चे विक्रीपोटी संपूर्ण रक्कम रुपये 2,75,000/- स्विकारुन सुध्दा तक्रारदाराचे नावे नोदंणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही ही वि.प.चे सेवेतील त्रुटी आहे व यावरुन वि.प.ने तक्रारदारासोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सदनिका क्रं.303,तिसरा माळा, क्षेत्रफळ-725.00 चौ.फुट, मौजा-भामटी, भुखंड क्रं.19, खसरा क्रं.19/1, 20,21, चे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. नोंदणी करिता येणारा खर्च तक्रारदाराने सोसावा.
- वि.प.ने तक्रारदाराचा सदरच्या सदनिकेवर अंदाजे 25 वर्षापासून असलेला प्रत्यक्ष ताबा कायदेशिर (Confirmation of possession) करावा.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |