Maharashtra

Bhandara

CC/19/40

SHANTABAI H.TEMBHURNE - Complainant(s)

Versus

SANCHALK,VIMA SANCHANALAY MAHARASHTRA STATE - Opp.Party(s)

ADV M.J.HARDE

16 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/40
( Date of Filing : 15 Feb 2019 )
 
1. SHANTABAI H.TEMBHURNE
NEAR ARJUN ACADEMY VAIANAGANGA NAGAR, GIROLA PO. KARDHA TAH DIST BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SANCHALK,VIMA SANCHANALAY MAHARASHTRA STATE
264 GRUHANIRMAN BHAWAN FIRST FLOUR KALA NAGAR IN FRONT BANDARA MUMBAI
MUMBAI
MAHARASHTRA
2. KARYAKARI ABHIYANTA ASOLI MENDA
ASOLI MENDA PRAKALP NUTANIKARAN VIBHAG KR 1 MUL DIST CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
3. KARYKARI ABHIYANTA GOSEKHURD PUNARVASAN VIBHAGIY PATAK
PLOT NO.13 CIVIL LINE NAGPUR TAH DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
4. ABHIKSHAK ABHIYANTA GOSEKHURD UPASA SINCHAN MANDAL
AMBADI TAH DIST BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Mar 2021
Final Order / Judgement

                                                    (पारीत व्‍दारा सौ.वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या )

 

01.    तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्षां विरुध्‍द तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात समूह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी तसेच अन्‍य अनुषंगीक मागण्‍यांसाठी प्रस्‍तुत जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर  दाखल केलेली आहे.

02.          तक्रारी प्रमाणे थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

   तक्रारकर्ती उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून तिचा पती श्री हेमराज जैराम टेंभूर्णे हा  विरुध्‍दपक्ष क्रं 2 उपविभागीय अभियंता, गोसीखुर्द पुर्नवसन विभाग, आंबाडी, भंडारा यांचे कार्यालयात मुक्‍कदम पदावर कार्यरत होता आणि त्‍यावेळी सदर कार्यालयाने शासन निर्णय दिनांक-04 फेब्रुवारी, 2016 अनुसार समूह वैयक्तिक अपघात विमा योजने करीता त्‍याचे एप्रिल-2016 च्‍या पगारातून वार्षिक रुपये-344/- एवढया हप्‍त्‍याची कपात केली होती व सदर हप्‍त्‍याची रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचेकडे जमा केली होती. अशाप्रकारे तिचा मृतक पती हा विरुध्‍दपक्षांचा ग्राहक होतो आणि त्‍याचे मृत्‍यू नंतर ती पत्‍नी या नात्‍याने लाभार्थी ग्राहक आहे.  त्‍यानंतर तिचे पतीचे विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे मूल, जिल्‍हा चंद्रपूर कार्यालयात स्‍थानांतरण झाले होते. यातील विरुध्‍दपक्ष क्रं 3 व क्रं 4 हे तिचे मृतक पतीचे वरिष्‍ठ अधिकारी आहेत.

     तिने पुढे असे नमुद केले की, दिनांक-17.12.2017 रोजी तिचे पती श्री हेमराज टेंभूर्णे यांचे वाहनाला झालेल्‍या अपघातामुळे निधन झाले, सदर घटनेची तक्रार पोलीस स्‍टेशन, कारधा येथे करण्‍यात आली होती. पोलीसांनी चौकशी करुन न्‍यायालयामध्‍ये आरोपी विरुध्‍द दोषारोपपत्र दाखल केले. मृत्‍यूचे वेळी तिचे पती श्री हेमराज टेंभूर्णे यांचे वय-59 वर्ष होते व तो एप्रिल-2018 मध्‍ये सेवानिवृत्‍त होणार होता. अपघात विमा योजने नुसार तिचा पती श्री हेमराज टेंभूर्णे याचे अपघाती निधन झाल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-10,000,00/- विरुध्‍दपक्षां कडून मिळण्‍यास पात्र आहे. सन-2017 मध्‍ये सदर अपघात विमा योजनेच्‍या वार्षिक हप्‍त्‍याची रक्‍कम रुपये-344/- ची कपात विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी तिचे मृतक पतीचे पगारातून तसेच कार्यालयातील कार्यरत अन्‍य कर्मचा-यांच्‍या वेतनातून केलेली नाही, या प्रकारा मध्‍ये तक्रारकर्तीचे पतीची कोणतीही चुक नाही, उलट विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी विम्‍याच्‍या वार्षिक हप्‍त्‍याची वेतनातून कपात न केलयाने आपले सेवेत  त्रृटी व निषकाळजीपणा केलेला आहे.

     तिने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू नंतर तिने विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना कळविले तसेच मागणीनुसार एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, मृत्‍यू दाखला व ईतर दसतऐवज त्‍यांना पुरविलेत व नुकसान भरपाईच्‍या रकमेची मागणी केली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी तिचे मृतक पतीची सन-2017 मध्‍ये वार्षिक हप्‍ता रक्‍कम रुपये-344/- ची कपात त्‍याचे पगारातून झालेली नसल्‍याने नुकसान भरपाईची रक्‍कम देता येत नसल्‍याचे सांगितले. तिने या संदर्भात वेळोवेळी विरुध्‍दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांचे कार्यालयास भेटी देऊन विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई रकमेची मागणी केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. पतीचे मृत्‍यू नंतर तिचे वर मुलांची जबाबदारी आहे. तिने दिनांक-24.09.2018 रोजी विरुदपक्ष क्रं 3 यांचेकडे अर्ज दाखल केला. उलटपक्षी विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी दिनांक-11.11.2018 रोजीचे पत्र पाठवून तिला वरील नमुद कारणास्‍तव विम्‍याची रक्‍कम देण्‍यास नकार दिला. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला विम्‍याची रक्‍कम आणि त्‍यावरील व्‍याजाचे रकमे पासून वंचित राहावे लागत आहे, त्‍यामुळे तिला आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. तिने दिनांक-27.12.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना रजिस्‍टर पोस्‍आने कायदेशीर नोटीस पाठवून विम्‍याचे रकमेची व्‍याजासह मागणी केली परंतु सदर नोटीस तामील होऊनही प्रतिसाद मिळाला नाही. म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील मागण्‍या विरुध्‍दपक्षां विरुध्‍द केल्‍यात-

 (01)    विरुध्‍दपक्षांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्तीला समूह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-10,00,000/- आणि सदर रकमेवर दिनांक-17.12.2017 पासून ते रकमेच्‍या प्रतयक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(02)    विरुध्‍दपक्षांना आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्तीला झालेल्‍या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- द्दावेत.

(03)    या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई तर्फे उपविमा संचालक   श्री अनंत र. इंदुलकर यांनी लेखी उत्‍तर पान क्रं 73 ते 75 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात नमुद केले की, तक्रारकर्ती हिचे मृतक पती श्री हेमराज ज.टेंभूर्णे हे विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे आ‍स्‍थापनेवर कार्यरत असताना त्‍यांचे दिनांक-17.12.2017 रोजी अपघाती निधन झाले. त्‍यांचे मृत्‍यू नंतर पत्‍नी या नात्‍याने तक्रारकर्तीने राज्‍य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपधात विमा योजने अंतर्गत विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. राज्‍य शासनाने दिनांक-04.02.2016 रोजीचे शासन निर्णयान्‍वये शासकीय कर्मचा-यां करीता अपघात विमा योजना लागू केली आहे. सदर योजने अंतर्गत शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा अपघाती मृत्‍यू अथवा कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास परिशिष्‍ट अ नुसार सदर कर्मचा-यास अथवा त्‍याचे वारसांना आर्थिक नुकसान भरपाई देय आहे. सदर अपघात विमा योजनेच्‍या अमलबजावणीसाठी प्रत्‍येक कार्यालय प्रमुखाने त्‍यांच्‍या अधिनस्‍त कार्यरत कर्मचा-यांच्‍या वेतन देयकातून अपघात विमा वर्गणी कपात करुन योजनेच्‍या लेखाशिर्षा मध्‍ये महाराष्‍ट्र शासन निर्णय क्रं-संकीर्ण-2017/प्र.क्रं.19/वि प्रशासन, मंत्रालय, मुंबई-32, दिनांक-18 फेब्रुवारी, 2017 नुसार जमा करणे आवश्‍यक आहे. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी त्‍यांच्‍या आस्‍थापनेवरील कर्मचा-यांची अपघात विमा वर्गणी माहे फेब्रुवारी-2017 च्‍या वेतनातून कपात केलेली नाही ही बाब तक्रारअर्जातील परिच्‍छेद क्रं 3 मध्‍ये नमुद आहे. विमा अधिनियम 1938 च्‍या तरतुदींच्‍या अधीन राहून विमा दावा स्विकारण्‍यात येतो. मृतक श्री हेमराज टेंभूर्णे यांचया माहे फेब्रुवारी-2017 च्‍या वेतनातून माहे एप्रिल-2017 ते मार्च-2018 करीता अपघात विमा वर्गणी कपात करुन यो योजनेच्‍या लेखाशिर्षा मध्‍ये जमा केलेली नाही, त्‍यामुळे अपघात विमा योजने खाली तक्रारकर्तीला नुकसान भरपाई देत होत नाही. करीता त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 तर्फे करण्‍यात आली.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मुल, जिल्‍हा चंद्रपूर यांनी लेखी उत्‍तर पान क्रं 84 ते 87 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये सदर तक्रार ही शासन निर्णय क्रं-संकीर्ण-2015/प्र.क्रं-45/विमा प्रशासन, दिनांक-04.02.2016 व शासन निर्णय क्रं-संकीर्ण-2016/प्र.क्रं-81/विमा प्रशासन, दिनांक-18.02.2017 चे अटी व शर्तीचे पालन न करता दाखल करण्‍यात आली असल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी असे नमुद केले. सदर विमा पॉलिसी ही सन-2016 चे 01/04/2016 ते 31/03/2017 कालावधी पर्यंत लागू होती. त्‍यांनी कोणत्‍याही प्रकारे हेतुपुरस्‍पर सेवेत त्रृटी व निषकाळजीपणा केलेला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं-2 यांना सन-2017 चे विम्‍या बाबतचे शासन परिपत्रक उशिराने प्राप्‍त झाल्‍यामुळे सन-2017 मध्‍ये कार्यालया मार्फत कोणत्‍याही कर्मचा-यांची वार्षिक हप्‍त्‍याची रक्‍कम  कपात करण्‍यात आली नाही त्‍यामुळे वि.प.क्रं 2 यांनी कोणताही निषकाळजीपणा केला नाही, उलट मृतक श्री हेमराज याने त्‍याचे पगारातून वार्षिक विम्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम कपात झाली नसल्‍या बाबत तक्रार त्‍यांचे कडे नोंदविली नाही. त्‍यांनी तक्रारकर्तीचे दिनांक-27.12.2018 रोजीचे नोटीसला दिनांक-09.01.2019 रोजी उत्‍तर दिलेले आहे. मृतक हेमराज याचा अपघाती मृत्‍यू दिनांक-17.12.2017 रोजी झाला होता व विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी दिनांक-24.09.2018 रोजी त्‍यांचे कार्यालयात अर्ज सादर केला होता. सदर प्रकरण त्‍यांचे कार्यालयात प्रलंबित असताना तक्रारकर्तीने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल केली असल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी केली.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन, विभागीय पथक, नागपूर यांनी पान क्रं 79 वर लेखी निवेदन दाखल केले. त्‍यांनी नमुद केले की, तक्रारकर्तीचे पती श्री हेमराज टेंभूर्णे हे मुकादम म्‍हणून  कार्यरत होते.  तयांचे वेतनातून समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेचा फेब्रुवारी-2016 देय मार्च-2016 या महिन्‍याचा पहिला हप्‍ता वेतनातून कपात केल्‍याची नोंद त्‍यांचे मूळ सेवा पुस्‍तकात केलेली आहे परंतु सन-2017 मध्‍ये दुसरा हप्‍ता कपात केल्‍याची नोंद मूळ सेवा पुस्‍तकात दिसून आली नाही आणि दिनांक-17.12.2017 रोजी अपघातामध्‍ये त्‍यांचे निधन झाल्‍याने त्‍यांची पत्‍नी श्रीमती शांताबाई हेमराज टेंभूर्णे यांनी अपघात विमा योजनेची रक्‍कम रुपये’10,00,000/- ची मागणी केलेली आहे. कार्यकारी अभियंता आसोलमेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मूल यांचेकडे माहे फेब्रुवारी-2017 मध्‍ये रुपये-345/- विमा हप्‍त्‍याची रक्‍कम मृतक श्री हेमराज टेंभूर्णे यांचे वेतनातून कपात केली किंवा कसे या बाबत विचारणा केली असता त्‍यांनी दिनांक-15.11.2018 रोजीचे पत्रान्‍वये फेब्रुवारी-2017 मध्‍ये कोणत्‍याही कर्मचा-याचे समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेचा दुसरा हप्‍ता करण्‍यात आलेला नाही असे कळविले असल्‍याचे नमुद केले.

06.    तक्रारकर्तीने पान क्रं 15 वरील दस्‍तऐवज यादी नुसार  दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये मृतकाचे मूळ सेवा पुस्‍तकातील समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची नोंद असलेला दस्‍तऐवज, मृतकाचा एफ.आय.आर., मरणोत्‍तर पंचनामा, घटनास्‍थळ पंचनामा, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, कार्यकारी अभियंता यांना दिलेली पत्रे, रजि.नोटीस, रजि.पावत्‍या व रजि.पोच, शासन निर्णय अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्तीने पान क्रं 90 ते 93 वर पुराव्‍या दाखल स्‍वतःचा प्रतिज्ञालेख दाखल केला. तसेच माहिती अधिकारा अंतर्गत माहे फेब्रुवारी, 2018 मध्‍ये  विम्‍याची रक्‍कम कपात केल्‍या बाबत कर्मचा-यांची यादी दाखल केली.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा संचलनालय, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी लेखी उत्‍तर पान क्रं 73 ते 75 वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 तर्फे श्री अनंत रघुनाथ इंदुलकर, उपविमा संचालक, विमा संचलनालय, मुंबई यांनी पान क्रं 112 व 113 वर प्रतिज्ञालेख दाखल केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मुल, जिल्‍हा चंद्रपूर यांनी लेखी उत्‍तर पान क्रं 84 ते 87 वर दाखल केले. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 तर्फे श्री राजेश घनश्‍याम बघमार कार्यकारी अभियंता यांनी पुराव्‍या दाखल प्रतिज्ञालेख पान क्रं 102 व 103 वर दाखल केला. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी 11 ऑगस्‍ट, 2017 रोजीच्‍या वैयक्तिक अपघात विमा योजनेच्‍या परिपत्रकाची प्रत दाखल केली.े विरुध्‍दपक्ष क्रं 3 कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन, विभागीय पथक, नागपूर यांनी पान क्रं 79 वर लेखी निवेदन दाखल केले.

08.     प्रकरणातील उपलब्ध दस्‍तऐवज, शासन निर्णय, उभय पक्षां तर्फे दाखल शपथपुरावे इत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री एम.जे. हरडे तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 तर्फे वकील श्रीमती पी.डी.पशीने यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यायावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

 तक्रारकर्तीचे पती विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नतुतनीकरण विभाग क्रं 1 मूल, जिल्‍हा चंद्रपूर यांचे आस्‍थापनेवर कार्यरत असताना त्‍यांचे पगारातून माहे फेब्रुवारी-2017 चे वेतनातून समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेचा वार्षिक हप्‍ता रुपये-345/- ची रक्‍कम कपात न झाल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

02

तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती निधना नंतर विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-10.00 लक्ष मिळण्‍यास पात्र आहे काय?

-होय-

03

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                  -कारणे व मिमांसा-

मुद्दा क्रं 1 ते 3 

09  सदर प्रकरणात निकाल देताना महाराष्‍ट्र शासन, वित्‍त विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांनी राज्‍य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्‍थापनेवरील अधिकारी/कर्मचा-यांना लागू करण्‍या बाबत दिनांक-11 ऑगस्‍ट, 2017 रोजीचे शासन निर्णयाचे वाचन करणे आवश्‍यक आहे. याचे कारण असे आहे की,  तक्रारकर्तीचे पती श्री हेमराज टेंभूर्णे यांचे वाहनाला झालेल्‍या अपघातामुळे दिनांक-17.12.2017 रोजी निधन  झालेले आहे. सन-2017 मध्‍ये ही योजना उशिराने दिनांक-01 ऑगस्‍ट, 2017 पासून लागू करण्‍यात आलेली आहे.सदर योजना ही एैच्‍छीक स्‍वरुपाची असून योजने मध्‍ये सहभागी होण्‍या करीता अधिकारी/कर्मचारी यांनी अनुमतीपत्र तसेच नामनिर्देशनपत्र  विभाग प्रमूख व कार्यालय प्रमूख यांचेकडे भरुन देणे आवश्‍यक आहे. सन-2017 मध्‍ये अपघात विमा योजनेची वर्गणी ही माहे ऑगस्‍ट-2017 देय सप्‍टेंबर-2017 चे वेतनातून कपात करणे आवश्‍यक राहिल. समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी वसूल करण्‍याची जबाबदारी सदस्‍य कार्यरत असलेल्‍या संबधित कार्यालय प्रमूख/आहरण व संवितरण अधिकारी (Drawing & Disbursement Officer) यांची राहिल. गट- अ ते ड विमा रक्‍कम रुपये-10,00000/- वार्षिक वर्गणी रुपये-354/- नमुद आहे. कर्मचा-यांच्‍या वेतन देयकां सोबत अपघात विमा वर्गणी वसुल झाली आहे याची खात्री कोषागार कार्यालयाने करावी असेही सदर परित्रकात नमुद आहे.  

10.  तक्रारकर्तीचे पती श्री हेमराज टेंभूर्णे हे विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मुल, जिल्‍हा चंद्रपूर यांचे आस्‍थापनेवर कार्यरत असताना वाहनाला झालेल्‍या अपघातामुळे दिनांक-17.12.2017 रोजी त्‍यांचे निधन  झालेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मुल, जिल्‍हा चंद्रपूर यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये मान्‍य केलेले आहे की, सन-2017 चे विम्‍या बाबतचे शासन परिपत्रक उशिराने प्राप्‍त झाल्‍यामुळे सन-2017 मध्‍ये कार्यालया मार्फत कोणत्‍याही कर्मचा-यांची वार्षिक हप्‍त्‍याची रक्‍कम  कपात करण्‍यात आलेली नाही. परंतु हे त्‍यांचे म्‍हणणे मान्‍य होण्‍या सारखे नाही कारण सदर समूह वैयक्तिक अपघात विमा योजना ही महाराष्‍ट्र शासनाचे संपूर्ण अधिकारी/कर्मचारी यांच्‍या करीता राबविण्‍यात आलेली असून सन-2017 मध्‍ये दिनांक-01 ऑगस्‍ट, 2017 पासून ही योजना लागू करण्‍यात आलेली  असून अपघात विमा योजनेची वर्गणी ही माहे ऑगस्‍ट-2017 देय सप्‍टेंबर-2017 चे वेतनातून कपात करणे आवश्‍यक राहिल असे दिनांक-11 ऑगस्‍ट, 2017 रोजीचे शासन निर्णयामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद आहे. तसेच सदर शासन निर्णयामध्‍ये स्‍पष्‍ट तरतुद आहे की, समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी वसूल करण्‍याची जबाबदारी सदस्‍य कार्यरत असलेल्‍या संबधित कार्यालय प्रमूख/आहरण व संवितरण अधिकारी (Drawing & Disbursement Officer) यांची राहिल. तक्रारकर्तीचे मृतक पती श्री हेमराज टेंभूर्णे यांचे दिनांक-17.12.2017 रोजी निधन झालेले असल्‍यामुळे माहे ऑगस्‍ट, 2017 देय सप्‍टेंबर-2017 चे वेतनातून रुपये-354/- विम्‍याची वर्गणी कपात होणे आवश्‍यक होते परंतु सन-2017 या वर्षात एकाही अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतनातून वार्षिक विम्‍याची वर्गणी कपात झालेली नाही ही एक आश्‍चर्यकारक बाब आहे. वस्‍तुतः कर्मचा-याचे वेतन व त्‍यामधील कपाती करण्‍याची जबाबदारी ही कार्यालय प्रमूख व आहरण संवितरण अधिकारी (Drawing & Disbursement Officer) यांची आहे परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यालय प्रमूख व आहरण संवितरण अधिकारी यांनी सदर वित्‍त विभागाचे शासन निर्णया कडे संपूर्णतः दुर्लक्ष्‍य केले ही बाब येथे स्‍पष्‍ट होते, त्‍यामुळे विरुदपक्ष क्रं 1 विमा संचलनालय यांचे कडून तक्रारकर्तीला तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात देय विमा रक्‍कम रुपये-10,00,000/- मिळालेली नाही ही बाब स्‍पष्‍ट आहे.

     वस्‍तुतः महाराष्‍ट्र शासनाने त्‍यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे अपघाती निधन झाल्‍यास त्‍यांचे कायदेशीर वारसदारांना विम्‍याची रक्‍कम मिळावी या उदात्‍त हेतूने सदर योजना सुरु केलेली आहे.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबधित तक्रारकर्तीचे पतीचे वेतनातून वार्षिक विम्‍याचे हप्‍तयाची रक्‍कम जमा केली नाही तर त्‍या प्रकरणात तक्रारकर्तीचा कोणताही दोष दिसून येत नाही.

11.   सदर समूह वैयक्तिक अपघात विमा योजने मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 संचालक, विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मूल, जिल्‍हा चंद्रपूर जे आहरण व संवितरण अधिकारी आहेत.  विमा संचालनालय आणि  विरुध्‍दपक्ष क्रं 2 आहरण व संवितरण अधिकारी यांचे मध्‍ये विमा कंपनी आणि तिचे एजंट असे संबध प्रस्‍थापित होतात आणि तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे पतीचे निधना नंतर कायदेशीर वारसदार म्‍हणून ती सदर योजने मध्‍ये लाभार्थी ग्राहक (Beneficiary Consumer) आहे आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी विम्‍याचा वार्षिक हप्‍ता कापला जरी नसला तरी (Deferred payment) झाले असते असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

12.  सदर प्रकरणातील वस्‍तुस्थिती पाहता आम्‍ही खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवीत आहोत-

!)   DESU Vs.Basanti Devi, III (1999) CPJ 15 SC, Honble Supreme Court in similar kind of group insurance scheme under the name of Salary Saving Scheme, that DESU is certainly not an insurance agent within the meaning of insurance Act but DESU is certainly agent as defined under Sec.182 of the Contract Act as DESU had ostensible authority to collect premium and so far as employee was concerned, DESU was an agent of the LIC to collect premium on its behalf.

II)   In I (2004) CPJ 247 LIC of India Vs. K. Narayan Murthy, it is held that premium if falls short of, it is their duty to inform Drawing and Disbursement officer and collect balance, burden to collect correct premium lies on O.P. Deficiency in service proved, O.P. liable to pay due amount and collect difference of amount payable under policy.

III)  LIC of India Vs. Ram Sakhi, LAWS (NCD) 2015-1-137, wherein Salary Saving Scheme is elaborately explained and it is observed that on non receipt of the premium, the insurance company was duty bound to give a notice to the employer as well as to the employee regarding default in payment of premium and its failure to do so could not deprive the insured of the benefits under the policy.

        उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांचा विचार करता विरुध्‍दपक्ष क्रं 2 आहरण व संवितरण अधिकारी यांनी वार्षिक विम्‍याचा हप्‍ता पगारातून कपात केला नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांना तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती निधनामुळे देय विमा रक्‍कम रुपये-10,000,00/- नाकारता येणार नाही, त्‍यामुळे तक्रारकर्तीला विमयाची रक्‍कम रुपये-10,00,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल रुपये-15,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कडून तिला मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

13   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-

                                                                             -अंतिम आदेश-

(01)  तक्रारकर्तीची,  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 संचालक, विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मूल, जिल्‍हा चंद्रपूर यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 संचालक, विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू बाबत समूह अपघात विमा योजने मध्‍ये देय रककम रुपये-10,000,00/-  प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत अदा करावी.

(03)  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 संचालक, विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांना असेही आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्तीचे पती हयातीत व कर्तव्‍यावर असताना शासकीय परिपत्रका प्रमाणे त्‍यांचे मासिक पगारातून विरुदपक्ष क्रं 2 संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी  वार्षिक विमा हप्‍ता रक्‍कम रुपये-354/- वेतन देय दिनांक-01 सप्‍टेंबर, 2017 कपात न केल्‍यामुळे सदर विमा हप्‍त्‍याची रक्‍कम आणि त्‍यावर विम्‍याचे योजने नुसार देय व्‍याज अशी रक्‍कम  विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, असोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1, मूल, जिल्‍हा चंद्रपूर यांचे कडून विरुध्‍दपक्ष क्रं 1 संचालक, विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी परस्‍पर खात्‍या अंतर्गत पत्रव्‍यवहार करुन वसुल करावी, यासाठी तशा आशयाचे लेखी मागणी पत्र विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी, विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना दयावेत, त्‍यासाठी तक्रारकर्तीचे विमा दाव्‍याची रक्‍कम थांबविण्‍यात येऊ नये.

(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष  क्रं 1 संचालक, विमा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई  यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीमध्‍ये आदेशाचे अनुपालन न केल्‍यास देय विमा रक्‍कम मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष  क्रं 1 यांची राहिल.

(05)  विरुध्‍दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, आसोला मेंढा प्रकल्‍प नुतनीकरण विभाग क्रं 1 मूल, जिल्‍हा चंद्रपूर  यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त)  अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा तक्रारकर्तीला निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत अदा कराव्‍यात. विहित मुदतीमध्‍ये आदेशाचे अनुपालन न केल्‍यास  सदर नुकसान भरपाई आणि तक्रारखर्चाची  रक्‍कम एकूण रुपये-25,000/- मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष  क्रं 2 यांची राहिल. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्तीचे पतीचे वार्षिक विमा हप्‍त्‍याची  कपात न केलेली रक्‍कम रुपये-354/- व त्‍यावरील विमा योजने नुसार व्‍याज यासह विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे कडून मागणीपत्र आल्‍या नंतर त्‍यांचेकडे त्‍वरीत भरावी.

(06)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

(07)  विरुध्‍दपक्ष क्रं 3 व क्रं 4 यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(08) सदर निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

             (09)  उभय पक्षांनी दाखल केलेले अतिरिक्‍त संच त्‍यांना परत करण्‍यात यावे.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.