(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 29 ऑक्टोबर, 2015)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा गोंदीया येथील रहिवासी असून तो व्यवसाय करतो आणि विरूध्द पक्ष 1 हे Manufacturing Company असून विरूध्द पक्ष 2 ह्यांची एजन्सी आहे. .
3. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 2 कडून दिनांक 12/02/2013 रोजी सॅमसंग कंपनीचा RT33FAJFARX/TL हा रेफ्रीजरेटर खरेदी केला. त्यानंतर मे-2013 मध्ये फळे ठेवण्याचा ट्रे स्वच्छ करीत असतांना रेफ्रीजरेटरला 2 छिद्रे दिसली आणि ती दिसू नये म्हणून विरूध्द पक्ष यांनी त्यावर टेप लावलेला होता. परंतु ते रेफ्रीजरेटर दुरूस्त करून किंवा बदलून देण्याऐवजी विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याचीच चूक दाखवून रेफ्रीजरेटर बदलून द्यावयास टाळाटाळ केली. रेफ्रीजरेटर दुरूस्त करून द्यावा म्हणून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे तक्रार केली. तसेच तक्रारकर्त्याने सदर रेफ्रीजरेटर विरूध्द पक्ष 2 यांच्या दुकानात नेऊन दिला. त्यानंतर विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला खात्री पटवून दिली की, रेफ्रीजरेटरचे भाग बदलून लावण्यात आलेले आहे आणि रेफ्रीजरेटर दुरूस्त करण्यात आला असे सांगून सदर रेफ्रीजरेटर तक्रारकर्त्याच्या घरी पाठवून देण्यात आला.
4. परंतु ऑक्टोबर 2013 मध्ये पुन्हा रेफ्रीजरेटरमधील फळांच्या ट्रे जवळ 2 छिद्रे दिसली. त्यावेळेस तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 2 यांना कळविले. परंतु विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा दिली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 29/10/2013 रोजी E-mail द्वारे कळविले. सदर E-mail चे विरूध्द पक्ष 1 यांनी उत्तर दिले मात्र रेफ्रीजरेटर बदलवून दिला नाही. तसेच विरूध्द पक्ष 1 यांनी हा रेफ्रीजरेटरचा Physical damage असून तो दुरूस्त करून देण्याची विरूध्द पक्ष 2 यांची जबाबदारी आहे. त्याकरिता विरूध्द पक्ष 1 हे जबाबदार नाहीत असे सांगितले. अशाप्रकारे दिवसेंदिवस रेफ्रीजरेटरची दोन छिद्रे मोठमोठी होत गेली. त्यामुळे बर्फ वितळून आतील सर्व भागात दोष आढळले. त्याचा परिणाम Cooling System वर झाला. अशाप्रकारे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यासाठी तक्रारकर्त्याने जुना रेफ्रीजरेटर बदलून नवीन देण्यात यावा तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रू.50,000/- नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 25/02/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 26/02/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांनी हजर होऊन वकिलांमार्फत त्यांचा लेखी जबाब दाखल केला.
6. विरूध्द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 17/07/2014 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 27 वर आहे. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्याचे सर्व व्यवहार हे विरूध्द पक्ष 2 यांचेसोबत झाल्याचे म्हटले आहे. तसेच विरूध्द पक्ष 1 ही एक प्रतिष्ठित कंपनी असून ती ग्राहकांना व्यवस्थित सेवा देत असते आणि विरूध्द पक्ष 2 ही एक Separate Entity आहे. विरूध्द पक्ष 1 यांच्याजवळ असलेल्या वेगवेगळया वस्तूंवर Warranty असते आणि त्या Warranty मध्ये काही अटी व शर्ती असतात. त्या अटी व शर्ती केवळ विरूध्द पक्ष 1 यांनाच binding नसून त्या तक्रारकर्त्याला सुध्दा लागू असतात. तक्रारकर्त्याने त्या Warranty च्या Instructions Manual प्रमाणे सदरच्या रेफ्रीजरेटरचा उपयोग केलेला नाही. त्या Instructions Manual मध्ये Condition No. 7 वर Condition of warranty दिल्या गेल्या आहेत. तक्रारकर्त्याने दिनांक 12/02/2013 रोजी रेफ्रीजरेटर खरेदी केला आणि 3 महिनेपर्यंत त्यात कुठलाही दोष आढळला नाही. तसेच त्यात कोणताही उत्पादन दोष देखील नव्हती आणि तक्रारकर्त्याने तशी तक्रारसुध्दा केली नाही. दिनांक 12/02/2013 रोजी रेफ्रीजरेटर खरेदी केल्यानंतर तेव्हाच विरूध्द पक्ष 2 यांचेकडून तो Installed करण्यात आला. तक्रारकर्त्याच्या समोर त्यावेळेस तक्रारकर्त्याला रेफ्रीजरेटरच्या फ्रुट ट्रे मधील छिद्रे दिसून आली नाही. म्हणजेच ज्यावेळेस रेफ्रीजरेटरचे Installation झाले त्यावेळेस रेफ्रीजरेटरमध्ये कोणतीही छिद्रे नव्हती किंवा Physical damage नव्हता किंवा 3 महिनेपर्यंत तक्रारकर्त्याला रेफ्रीजरेटरमध्ये छिद्रे दिसली नाहीत.
पुढे आपल्या लेखी जबाबात असे सांगतात की, सदरचा रेफ्रीजरेटरमधील Physical damage हा तक्रारकर्त्याने हाताळतांना झाला आणि Warranty मधील अटी व शर्तीनुसार असे आहे की, जर वस्तुंमध्ये Physical damage असेल तर Warranty च्या Conditions लागू होत नसून ते दुरूस्त करायला Charges द्यावे लागतात. म्हणून सदरचा रेफ्रीजरेटर हा Physically damaged आहे आणि ते Warranty मध्ये येऊ शकत नाही. करिता विरूध्द पक्ष 1 हे जबाबदार नाहीत. तक्रारकर्त्याने दिनांक 19/10/2013 रोजी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे रेफ्रीजरेटर बद्दल तक्रार करताच विरूध्द पक्ष 1 यांनी त्याला सांगितले की, रेफ्रीजरेटर Physically damaged आहे आणि Chargeable basis वर दुरूस्त करून देण्यास तयार आहेत. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडून जास्त पैसे उकळण्याकरिता विरूध्द पक्ष 1 यांच्या विरोधात खोटी तक्रार केलेली आहे. विरूध्द पक्ष 1 यांनी आपल्या सेवेत कोणताही कसूर केलेला नाही असे लेखी जबाबात म्हटले आहे.
7. विरूध्द पक्ष 2 यांचेविरूध्द मंचामार्फत बजावण्यात आलेली नोटीस त्यांना मिळूनही ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब सुध्दा दाखल केला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 2 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाद्वारा दिनांक 19/06/2015 रोजी पारित करण्यात आला.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत रेफ्रीजरेटर खरेदी केल्याचे बिल पृष्ठ क्र. 12 वर, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना रेफ्रीजरेटरसंदर्भात E-mail द्वारे केलेल्या तक्रारीची प्रत पृष्ठ क्र. 13 वर, सदर तक्ररीच्या अनुषंगाने विरूध्द पक्ष 1 यांनी E-mail द्वारे दिलेल्या उत्तराची प्रत पृष्ठ क्र. 15 वर, रेफ्रीजरेटरचे फोटो व त्याचे बिल पृष्ठ क्र. 17, 18 वर, वॉरन्टी कार्डची प्रत पृष्ठ क्र. 19 वर तसेच तक्रारकर्त्याचे शपथपत्र पृष्ठ क्र. 33 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. पी. झेड. शेख यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 43 वर दाखल केला असून त्यात त्यांनी असे सांगितले की, तक्रारकर्त्याने दिनांक 12/02/2013 रोजी विरूध्द पक्ष 2 यांचेकडून सॅमसंग कंपनीचा रेफ्रीजरेटर क्रमांक RT33FAJFARX/TL रू. 28,000/- मध्ये खरेदी केला. त्यानंतर मे-2013 मध्ये फळे ठेवण्याचा ट्रे स्वच्छ करीत असतांना रेफ्रीजरेटरला दोन छिद्रे असल्याचे आणि ती दिसू नये म्हणून विरूध्द पक्ष यांनी त्यावर टेप लावलेला असल्याचे आढळून आले. परंतु सदर रेफ्रीजरेटर दुरूस्त करून किंवा बदलवून देण्याऐवजी विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याची चूक दाखवून रेफ्रीजरेटर बदलवून देण्यास टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे तक्रार केली की, विरूध्द पक्ष 2 यांनी रेफ्रीजरेटर दुरूस्त करून द्यावा म्हणून तक्रारकर्त्याने सदर रेफ्रीजरेटर विरूध्द पक्ष 2 च्या दुकानात नेऊन दिला. त्यानंतर विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला खात्री पटवून दिली की, रेफ्रीजरेटरचे भाग बदलवून लावण्यात आलेले आहे आणि रेफ्रीजरेटर दुरूस्त करण्यात आला असे सांगून रेफ्रीजरेटर तक्रारकर्त्याच्या घरी पाठवून देण्यात आला.
परंतु ऑक्टोबर 2013 मध्ये पुन्हा रेफ्रीजरेटरमधील फळांच्या ट्रे जवळ दोन छिद्रे दिसली. त्यावेळेस तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 2 यांना कळविले. परंतु विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा दिली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 19/10/2013 रोजी E-mail द्वारे कळविले. त्या E-mail चे विरूध्द पक्ष 1 यांनी उत्तर दिले मात्र रेफ्रीजरेटर बदलून दिला नाही. तसेच विरूध्द पक्ष 1 यांनी रेफ्रीजरेटरचा Physical damage असून तो दुरूस्त करून देण्याची विरूध्द पक्ष 2 यांची जबाबदारी आहे. त्यासाठी विरूध्द पक्ष 1 हे जबाबदार नाही असे सांगितले. त्यामुळे रेफ्रीजरेटरची दोन छिद्रे दिवसेंदिवस मोठमोठी होत गेली. त्यामुळे बर्फ वितळून आतील सर्व भागात दोष आढळले. त्याचा परिणाम Cooling System वर झाला. अशाप्रकारे विरूध्द पक्ष 1 यांनी आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. तसेच विरूध्द पक्ष 2 यांना मंचामार्फत नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांच्याविरूध्द एकतर्फा आदेश घोषित करण्यात आला आणि विरूध्द पक्ष 1 यांनी त्याचे शपथपत्र हे खोट्या स्वरूपाचे दाखल केले असून विरूध्द पक्ष 1 यांनी त्या दोषाबद्दल कुठलेही खात्रीलायक विश्लेषण केलेले नाही. तसेच रेफ्रीजरेटर खरेदी केल्यावर विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला Invoice Warranty आणि Guarantee ची Copy दिली. सदरील फळांच्या ट्रे च्या छिद्राला विरूध्द पक्ष यांनी टेप लावून त्यातील दोष लपवून ठेवलेला होता. रेफ्रीजरेटरला दुरूस्त करण्याकरिता विरूध्द पक्ष 2 यांनी नेला परंतु त्याला टेप वगैरे लावून परत पाठवून दिला. परत काही दिवसानंतर तोच दोष पुन्हा आढळून आला. अशा प्रकारे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक करून आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी.
10. विरूध्द पक्ष 1 यांच्या वकीलांनी सदरहू प्रकरणात शपथपत्र दाखल केले असून ते पृष्ठ क्र. 38 वर आहे. तसेच विरूध्द पक्ष 1 यांनी दाखल केलेले उत्तर हाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा असे नमूद करून तोंडी युक्तिवाद केला की, सदरहू प्रकरणात तक्रारकर्त्याचे सर्व व्यवहार हे विरूध्द पक्ष 2 यांचेसोबत झाले. विरूध्द पक्ष 1 ही एक प्रतिष्ठित कंपनी असून ती ग्राहकांना व्यवस्थित सेवा देत असते आणि विरूध्द पक्ष 2 ही एक Separate Entity आहे. विरूध्द पक्ष 1 यांच्याजवळ असलेल्या वेगवेगळया वस्तूंवर Warranty असते आणि त्या Warranty मध्ये काही अटी व शर्ती असतात. त्या अटी व शर्ती केवळ विरूध्द पक्ष 1 यांनाच binding नसून त्या तक्रारकर्त्याला सुध्दा लागू असतात. तक्रारकर्त्याने त्या Warranty च्या Instructions Manual प्रमाणे सदरच्या रेफ्रीजरेटरचा उपयोग केलेला नाही. त्या Instructions Manual मध्ये Condition No. 7 वर Condition of warranty दिल्या गेल्या आहेत. तक्रारकर्त्याने दिनांक 12/02/2013 रोजी रेफ्रीजरेटर खरेदी केला आणि 3 महिनेपर्यंत त्यात कुठलाही दोष आढळला नाही. तसेच त्यात कोणताही उत्पादन दोष देखील नव्हती आणि तक्रारकर्त्याने तशी तक्रारसुध्दा केली नाही. दिनांक 12/02/2013 रोजी रेफ्रीजरेटर खरेदी केल्यानंतर तेव्हाच विरूध्द पक्ष 2 यांचेकडून तो Installed करण्यात आला. तक्रारकर्त्याच्या समोर त्यावेळेस तक्रारकर्त्याला रेफ्रीजरेटरच्या फ्रुट ट्रे मधील छिद्रे दिसून आली नाही. म्हणजेच ज्यावेळेस रेफ्रीजरेटरचे Installation झाले त्यावेळेस रेफ्रीजरेटरमध्ये कोणतीही छिद्रे नव्हती किंवा Physical damage नव्हता किंवा 3 महिनेपर्यंत तक्रारकर्त्याला रेफ्रीजरेटरमध्ये छिद्रे दिसली नाहीत. सदरचा रेफ्रीजरेटरमधील Physical damage हा तक्रारकर्त्याने हाताळतांना झाला आणि Warranty मधील अटी व शर्तीनुसार असे आहे की, जर वस्तुंमध्ये Physical damage असेल तर Warranty च्या Conditions लागू होत नसून ते दुरूस्त करायला Charges द्यावे लागतात. म्हणून सदरचा रेफ्रीजरेटर हा Physically damaged आहे आणि ते Warranty मध्ये येऊ शकत नाही. म्हणून तक्रारकर्त्याची सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
11. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष 1 यांचा लेखी जबाब, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | नाही |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. सदरहू प्रकरणात तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 2 यांचेकडून दिनांक 12/02/2013 रोजी रेफ्रीजरेटर खरेदी केला. त्याबद्दलचे बिल सदरहू प्रकरणात दाखल केलेले आहे. परंतु विरूध्द पक्ष 2 यांचेविरोधात मंचामार्फत नोटीस बजावण्यात आल्यानंतरही विरूध्द पक्ष 2 हे मंचात उपस्थित झाले नाहीत. म्हणून त्यांच्याविरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. तसेच तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, सदर रेफ्रीजरेटरमध्ये छिद्रे आढळून आली. परंतु तक्रारकर्त्याला त्याच्या E-mail चे उत्तर ऑक्टोबर महिन्यात पाठविण्यात आलेले आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याने फेब्रवारी मध्ये रेफ्रीजरेटर खरेदी केला तेव्हा सदरचा दोष नव्हता.
13. तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरणात रेफ्रीजरेटरमध्ये उत्पादन दोष होता आणि सदरहू दोष सततचा व न दुरुस्त होणारा आहे याबद्दल Expert-evidence दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या रेफ्रीजरेटरमध्ये उत्पादन दोष होता हे तक्रारकर्त्याचे म्हणणे पुराव्याअभावी मान्य केल्या जाऊ शकत नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रार खालील आदेशानुसार खारीज करण्यात येत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.