Maharashtra

Bhandara

CC/15/110

Adhir Kumar Madhu Narnaware - Complainant(s)

Versus

Samsung India Electronics Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv. A.H. Barsagade

15 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/15/110
 
1. Adhir Kumar Madhu Narnaware
R/o. Dabha, Po. Kothurna, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Samsung India Electronics Pvt. Ltd.
A-25, Ground Floor, Front Tower, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi 110044
New Delhi
New Delhi
2. Samsung Service Center, Through its Proprietor
Muslim Library Square, Above Indian Boiler, Bhandara
Bhandara
Maharashtra
3. Anil Trading Company, Through Anil Malhotra
Sneha Nagar, Near Dhargave Nursing Home, Takiya Ward, Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Dec 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, भंडारा.

तक्रार दाखल दिनांकः 11/12/2015

आदेश पारित दिनांकः 15/12/2016

 

 

 

तक्रार क्रमांक.      :          110/2015

                    

तक्रारकर्ता               :           श्री अधिरकुमार मधु नारनवरे

                                    वय – 32 वर्षे, धंदा – वकील,

                                    रा. ढाभा, पो.कोठुर्णा,

                                    ता.जि.भंडारा  

       

                                                                  

-: विरुद्ध :-

 

 

 

 

विरुध्‍द पक्ष         : 1)   सॅमसंग इंडिया इलेक्‍ट्रानिक्‍स प्रा.लि.

                        A-25 ग्राऊन्‍ड प्‍लोअर, फ्रन्‍ट टॉवर,                         

                        मोहन को ऑपरेटिव्‍ह इंडस्ट्रियल इस्‍टेट,

                        नवी दिल्‍ली

 

                    2)  सॅमसंग सर्व्हिस सेंटर,

मार्फत प्रोप्रायटर

      मुस्‍लीम लायब्ररी चौक,

इंडियन बॉयलरच्‍या वर,

      ता.जि.भंडारा

 

 

                                 3) अनिल ट्रेडिंग कंपनी,

                                    मार्फत अनिल मल्‍होत्रा, स्‍नेह नगर,

                                    दारगव्‍हे नर्सिंग होम जवळ,

                                    तकीया वार्ड, भंडारा

                                   

           

 

तक्रारकर्त्‍यातर्फे       :     अॅड.एस.ए.वंजारी, अॅड.ए.एम.नारनवरे,

                         अॅड.ए.एच.बारसागडे

वि.प.1 तर्फे         :     अॅड.श्रीकांत सावजी

वि.प. 2            :     एकतर्फी

वि.प. 3            :     अॅड.के.व्‍ही.कोतवाल, अॅड.एस.के.कोतवाल

 

 

 

            गणपूर्ती            :     श्री. मनोहर चिलबुले        -    अध्‍यक्ष.

                                    श्री. एच. एम. पटेरीया      -    सदस्‍य.

 

                                                                       

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

-//    दे    //-

  (पारित दिनांक – 15  डिसेंबर 2016)

 

 

            तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे.

 

                                      तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे

 

  1. .          तक्रारकर्ता अधिरकुमार मधु नारनवरे यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 सॅमसंग इंडिया निर्मित मोबाईल Samsung Galaxy A-3 (SM-A 300 Black 357572063402132) रुपये 19,303/- मध्‍ये अधिकृत विक्रेता विरुध्‍द पक्ष क्र.3 अनिल ट्रेडिंग कं.भंडारा यांच्‍याकडून दिनांक 18/4/2015 रोजी 1 वर्षाच्‍या वॉरंटीसह खरेदी केला.

 

             सदर मोबाईल हँडसेट सुरुवातीची 3 ते 3 ½  महिने बरा चालला. परंतु त्‍यानंतर त्‍यांत नेटवर्क उपलब्‍ध न होणे, मेमरी कार्ड रिड न करणे इ. समस्‍या निर्माण झाल्‍या. त्‍यामुळे सदर फोनवरुन तक्रारकर्ता इतरांना फोन करु शकत नव्‍हता किंवा इतरांकडून त्‍याला येणारे फोन कॉल स्विकारु शकत नव्‍हता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.3 कडे त्‍याबाबत तक्रार केल्‍यावर त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 चे अधिकृत सेवा केंद्र विरुध्‍द पक्ष क्र.2 सॅमसंग सर्व्हिस सेंटर, भंडारा यांचेकडे पाठविले. तक्रारकर्त्‍याने सदर मोबाईल हँडसेट विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दुरुस्‍तीस दिला. त्‍यांनी 4 दिवसांनी मोबाईल तक्रारकर्त्‍यास परत केला व सांगितले की, त्‍यांनी मदरबोर्ड बदलवून दिला असल्‍याने पुन्‍हा समस्‍या निर्माण होणार नाही. दुरुस्‍तीनंतर  मोबाईल 1 ते 1 ½ महिना बरोबर चालला. परंतु त्‍यांत पुन्‍हा नेटवर्क उपलब्‍ध न होण्‍याची समस्‍या निर्माण झाल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दुरुस्‍तीसाठी दिला आणि सांगितले की तो इतरांना कॉल करतो तेव्‍हा “Not Registered on Network” असा मेसेज येतो. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने मोबाईल दुरुस्‍त झाल्‍याचे सांगून दिनांक 30/10/2015 रोजी तक्रारकर्त्‍यास परत केला. परंतु तक्रारकर्ता घरी पोहचत नाही तोच पुन्‍हा नेटवर्कची समस्‍या सुरु झाली यावरुन हे स्‍पष्‍ट आहे की, मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये निर्मिती दोष असल्‍यानेच तो दोन वेळा विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या अधिकृत दुरुस्‍ती केंद्रास दुरुस्‍तीस देवूनही दुरुस्‍त होवू शकला नाही. विरुध्‍द पक्षाने सदोष मोबाईल हँडसेट तक्रारकर्त्‍यास विकला असून वॉरंटी पिरेड मध्‍ये त्‍याची योग्‍य दुरुस्‍ती करुन दिली नाही, ही सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.         

                       

            1) तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या आर्थिक नुकसानीबाबत रुपये 3,00,000/-, मानसिक त्रासाबाबत रुपये 5,00,000/- आणि शारीरिक त्रासाबाबत रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी.

 

2) सदोष मोबाईल हँडसेट बदलवून देण्‍याचा विरुध्‍द पक्षांना आदेश व्‍हावा.

 

3) तक्रारीचा खर्च विरुध्‍द पक्षावर बसवावा.

 

            तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पुष्‍ट्यर्थ विरुध्‍द पक्षास पाठविलेली नोटीस, पोस्‍टाची पावती, रजिस्‍ट्रीची पोचपावती, परत आलेला लिफाफा इ. दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

 

  1. .                 वि.प.क्र.2 ला मंचातर्फे पाठविलेली नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्‍याने प्रकरण त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍यात आले.

 

विरुध्‍द पक्ष क्र.1 व 3 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. विरुध्‍द पक्ष क्र.3 ने आपल्‍या लेखी जबाबात त‍क्रारीत नमुद मोबाईल हँडसेट त्‍यांच्‍याकडून खरेदी केल्‍याचे मान्‍य केले आहे. मात्र सदर हँडसेट मध्‍ये खरेदीपासून 3 ते 3 ½  महिन्‍यांत तक्रारीत नमुद दोष निर्माण झाल्‍याचे नाकबूल केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.3 ची भेट घेतली व त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे मोबाईल दुरुस्‍तीस पाठविल्‍याचे नाकबूल केले आहे. मोबाईल मधील नेटवर्कच्‍या समस्‍येमुळे तक्रारकर्त्‍याचे पक्षकार, मित्र, नातेवाईक व कुटूंबिय इ.चे फोन नंबर नष्‍ट झाले म्‍हणून त्‍यास शारीरिक व मानसिक त्रास तसेच आर्थिक नुकसान झाल्‍याचे नाकबुल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास सिल्‍ड मोबाईल हँडसेट विकलेला असल्‍याने त्‍यांनी सदोष मोबाईल हँडसेट विकण्‍याचा व त्‍यासाठी जबाबदार असण्‍याचा प्रश्‍नच नाही. तक्रारीस कारण व मागणी विरुध्‍द पक्ष क्र.3 ने नाकारली आहे.

 

            विरुध्‍द पक्ष क्र.1 ने आपल्‍या लेखी जबाबात सांगितले की, त्‍यांनी दिलेली वॉरंटी ही अटी व शर्तींच्‍या अधिन आहे परंतु तक्रारकर्त्‍याकडून सदर अटी व शर्तींचे पालन झालेले नाही. वॉरंटीच्‍या अटीप्रमाणे जर ग्राहक व विरुध्‍द पक्ष क्र.1 मध्‍ये काही वाद झाला तर केवळ दिल्‍ली स्थित न्‍यायालयातच सदर वाद चालविण्‍याची अधिकारकक्षा राहिल असे स्‍पष्‍ट नमुद आहे. त्‍यामुळे मंचाला सदर तक्रार चालविण्‍याची अधिकार कक्षा नाही. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद विरुध्‍द पक्ष क्र.1 निर्मित मोबाईल हँडसेट विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून खरेदी केल्‍याचे नाकारलेले नाही. त्‍यांचे म्‍हणणे असे की, विरुध्‍द पक्ष क्र.1 ही मोबाईल हँडसेट बनविणारी नामांकित कंपनी आहे आणि उच्‍च प्रतिचे उत्‍पादन करुन ग्राहकांना उत्‍तम सेवा पुरविते. तसेच  आपल्‍या  उत्‍पादनाबाबत  ग्राहकांना  वॉरंटी  देते मात्र त्‍यासाठीच्‍या अटी व शर्तींचे पालन ग्राहकाने देखिल करणे आवश्‍यक आहे. जर अटी व शर्तीप्रमाणे उत्‍पादनाचा योग्‍य वापर केला नाही तर वॉरंटी संपुष्‍टात येते. तक्रारकर्त्‍याने दिनांक 18/4/2015 रोजी खरेदी केलेला मोबाईल हँडसेट 3 ते 3 ½ महिने चांगला चालला याचाच अर्थ त्‍यांत कोणताही निर्मिती दोष नव्‍हता. नेटवर्क उपलब्‍ध न होणे म्‍हणजे मोबाईल हँडसेट मध्‍ये दोष असणे असे होत नाही. नेटवर्क समस्‍येसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 ला दोष देता येणार नाही व त्‍यासाठी ते जबाबदार नाही. त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने आपली समस्‍या नेटवर्क कंपनी कडे सांगावयास पाहिजे, मोबाईल निर्मात्‍यांकडे नाही.

 

            वॉरंटीप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास विनामुल्‍य दुरुस्‍ती सेवा पुरविलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार निराधार व खोटी असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र आहे. दुरुस्‍तीनंतर देखिल 1 ते 1 ½ महिना पर्यंत मोबाईल योग्‍य प्रकारे चालला याचा अर्थच त्‍यांत निर्मिती दोष नाही. वॉरंटी प्रमाणे देय असलेली विनामुल्‍य सेवा देण्‍यास आताही विरुध्‍द पक्ष क्र.1 तयार आहे त्‍यामुळे सदर तक्रारीस कधीही कारण घडत नसल्‍याने तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. मोबाईल हँडसेटमध्‍ये दोष असल्‍याबाबत तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. त्‍यामुळे निर्मिती दोष सिध्‍द झालेला नाही. विरुध्‍द पक्षामुळे तक्रारकर्त्‍यास कोणताही शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाल्‍याचे नाकबूल केले असून तक्रारकर्त्‍याची मागणी नाकबूल केली आहे.

 

            विरुध्‍द पक्षाकडून सेवेत कोणताही न्‍युनतापुर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झाला नसल्‍याने तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली आहे.

 

  1. .          उभय पक्षांच्‍या कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.

 

 

            मुद्दे                                                   निष्‍कर्ष

 

 

1) मंचाला सदर तक्रार चालविण्‍याची अधिकारकक्षा आहे काय?        होय.

2) वि.प.ने न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केलेला आहे काय? –            होय.                                           

3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय?      अंशतः

3) अंतीम आदेश काय?                                   तक्रार अंशतः 

                                                      मंजुर

                                               

 

 कारणमिमांसा  

 

 

  1.                     मुद्दा क्र.1 बाबतविरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा की, वॉरंटीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे ग्राहक व विरुध्‍द पक्ष क्र.1 मधील कोणताही वाद चालविण्‍याची अधिकारकक्षा फक्‍त दिल्‍ली स्थित न्‍यायालयासच राहील असे नमुद असल्‍याने मंचाला सदर तक्रार चालविण्‍याची अधिकारकक्षा नाही.

 

           ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 हा खास ग्राहक हितासाठी केलेला कायदा असून त्‍यांत सदर कायदयाअंतर्गत तक्रार कुठे दाखल करता येईल हे कलम 11 मध्‍ये सांगितले आहे. त्‍यांत कलम 11(2)(b) मधील तरतुद खालीलप्रमाणे आहे.

  1.         Jurisdiction of the District Forum

2)   A complaint shall be instituted in a District Forum within the local limits of whose jurisdiction,—

                  (b)     ‘any of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides, or carries on business or has a branch office, or personally works for gain, provided that in such case either the permission of the District Forum is given, or the opposite parties who do not reside, or carry on business or have a branch office, or personally work for gain, as the case may be, acquiesce in such institution;

 

तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 निर्मित मोबाईल हँडसेट विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून विकत घेतला आणि त्‍यांतील दोषांच्‍या दुरुस्‍तीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 चे अधिकृत दुरुस्‍ती केंद्र असलेल्‍या विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दिला होता तो त्‍यांनी पुर्णतः दुरुस्‍त करुन दिलेला नाही. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 हे भंडारा येथेच व्‍यवसाय करीत असल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 विरुध्‍द सदरची ग्राहक तक्रार चालविण्‍याची अधिकार कक्षा भंडारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला  आहे. केवळ वॉरंटीमध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र.1 ने स्‍वतःच दिल्‍ली स्थित न्‍यायालयासच विरुध्‍द पक्ष क्र.1 व ग्राहक यांचेतील वाद चालविण्‍याची अधिकार कक्षा राहिल असे लिहीले असले तरी त्‍यामुळे सदर ग्राहक तक्रार चालविण्‍याच्‍या मंचाच्‍या अधिकार कक्षेस बाधा येत नाही. म्‍हणुन मुद्दा क्र.1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

           

5.          मुद्दा क्र.2 बाबतसदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 निर्मित तक्रारीतील वर्णनाचा मोबाईल हँडसेट अधिकृत विक्रेता असलेल्‍या विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून दिनांक 18/4/2015 रोजी रुपये 19,303/- मध्‍ये विकत घेतल्‍याबाबत उभयपक्षात वाद नाही.

 

            तसेच सदर मोबाईल मध्‍ये खरेदीनंतर 3 ते 3 ½ महिन्‍यांनी मेमरीकार्ड रिड न करणे आणि नेटवर्क उपलब्‍ध न होण्‍याची समस्‍या निर्माण झाल्‍याने  तक्रारकर्त्‍याने तो  विरुध्‍द पक्ष क्र.1 चे  अधिकृत  सेवा  केंद्र असलेल्‍या विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दुरुस्‍तीस दिला व त्‍यांनी दुरुस्‍ती करुन दिल्‍यानंतर 1 ते 1 ½ महिना चांगला चालला याबाबत देखिल उभयपक्षांत वाद नाही.

            तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ने मदरबोर्ड बदलून दिल्‍याचे सांगूनही सदर मोबाईल मध्‍ये पुन्‍हा नेटवर्क उपलब्‍ध न होण्‍याची समस्‍या निर्माण झाली. मोबाईल विकत घेतल्‍यानंतर 5 महिन्‍यांच्‍या काळात दोन वेळा सदर समस्‍या निर्माण होणे व विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून सदर  दोषाचे  समुळ  निवारण  न होणे  याचाच अर्थ  सदर मोबाईल मध्‍ये निर्मिती दोष आहे आणि निर्मिती दोष असलेला सदर मोबाईल तक्रारकर्त्‍यास विक्री करुन विरुध्‍द पक्ष क्र.1 व 3 ने आणि विरुध्‍द पक्ष क्र.2 ने बदलवून न देता दुरुस्‍त झाल्‍याचे सांगून तक्रारकर्त्‍यास परत करणे ही विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी अवलंबिलेली ग्राहकाप्रती सेवेतील न्‍युनता आहे.

 

            विरुध्‍द पक्ष क्र.1 ने नविन Galaxy A3 आणि Galaxy A-5 हे मोबाईल हँडसेट निर्माण करतांना metal unibody construction चा वापर केल्‍यामुळे त्‍याचा परिणाम नेटवर्क सिग्‍नल रिसीव्‍ह करण्‍याची क्षमता कमी होण्‍यात झाला असल्‍याने  तक्रारकर्त्‍याचा Galaxy A 3 हा हँडसेट निर्मिती दोषामुळे नेटवर्क सिग्‍नल योग्‍य प्रकारे रिसीव्‍ह करीत नसल्‍याने तक्रारकर्त्‍यास सदर फोनचा वापर करता येत नाही. आपल्‍या युक्‍तीवादाच्‍या पृष्‍ठर्थ्‍य Galaxy A 3 व A 5 संबंधाने इंटरनेटवर आलेल्‍या दिनांक 11/11/2014 च्‍या कॉमेन्‍टसची प्रिंट कॉपी सादर केली आहे, त्‍यांत म्‍हटले आहे की, Samsung Galaxy A 3 and A5 seems to have signal issues.

The two new phones are decidedly mid-range in specs, but they do come with metal unibody construction. It’s taken Samsung a very long time to go this route for smartphone materials, and now it looks like it may have a problem on its hands.

A simple test conducted in Russia shows that the A3 and A5 have noticeably worse signal reception when compared to the plastic Galaxy S5.

In the picture above, you can see all three handsets placed side by side, each accessing the same mobile network. The Galaxy S5 has a signal strength reading of -82 dBm, while the A3 and A5 only get -92 dBm and -93 dBm respectively. In this area, the closer you can get to 0, the better your signal actually is. And anything below -100 dBm usually means you can’t do much with that connection, while at levels around -113 dBm it’s likely that your phone won’t even connect to the network.Since this is the same network tested in the exact same spot, the difference in signal strength between the three devices can probably be chalked up to how good each of them is at getting connected. And we all know that metal smartphones can have problems with this – anyone remember #antennagate?

Furthermore, the reception issues that both the Galaxy A3 and A5 encounter seem not to be limited to mobile network connectivity, as they also appear in the case of Wi-Fi. Though in a small house or apartment and with a powerful router you may not notice anything out of the ordinary. On the other hand, when it comes to mobile networks, a difference of 10 dBm in reception could, at the edges of your carrier’s coverage, mean the difference between making a call and not making it – or being unable to connect to the Internet, for that matter. And constantly having weak signal may even drain the battery faster.

So while people have welcomed Samsung’s jump into the metal unibody smartphone space, it looks like the Korean company still has some hardware tweaking to do to get things just right.

                        तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांनी सदरची बाब एकच सिम कार्ड त्‍याच्‍या A 3 फोनमध्‍ये व दुस-या कंपनीच्‍या फोनमध्‍ये टाकून जेव्‍हा दुस-या फोनमध्‍ये चांगले नेटवर्क सिग्‍नल येतात तेव्‍हा त्‍याच ठिकाणी विरुध्‍द पक्ष क्र.1 निर्मित तक्रारकर्त्‍यास विकलेल्‍या A3 फोनमध्‍ये मात्र सिग्‍नल येत नाही, कारण त्‍याच्‍या निर्मिती दोषामुळे सिग्‍नल रिसीव्‍ह करण्‍याची क्षमताच कमी असल्‍याचे प्रात्‍यक्षिकाद्वारे मंचाला दाखवून दिले आहे. त्‍यामुळे वेगळया तज्ञ अहवालाची आवश्‍यकता नाही.

 

            याउलट विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा की, तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल मध्‍ये नेटवर्क सिग्‍नल येत नसतील तर तो मोबाईल हँडसेटचा दोष नसून नेटवर्क प्रोव्‍हायडर यंत्रणेचा दोष असल्‍याने त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने नेटवर्क प्रोव्‍हायडर कंपनीकडे तक्रार करावयास पाहिजे. जेव्‍हा जेव्‍हा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दुरुस्‍तीसाठी मोबाईल हँडसेट दिला तेव्‍हा वॉरंटीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे तो विनामुल्‍य दुरुस्‍त करुन दिला असल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून सेवेत कोणताही न्‍युनतापुर्ण व्‍यवहार झालेला नाही.

 

            विरुध्‍द पक्ष क्र.3 च्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा की, त्‍यांना विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून मिळालेला सिल्‍ड मोबाईल हँडसेट त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास विकला असल्‍याने त्‍यांतील निर्मिती दोषांबाबत त्‍यांची कोणतीही जबाबदारी नाही.

 

            तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांनी दाखल केलेली विरुध्‍द पक्ष क्र.1 निर्मित Galaxy A3 आणि A5 बद्दलची मेटल बॉडी मुळे सिग्‍नल रिसिव्हिंग क्षमता कमी झाल्‍याबद्दलची उपलब्‍ध माहिती (Comments) तसेच त्‍याच्‍या मोबाईल मधील सिम A3 मध्‍ये सिग्‍नल रिसिव्‍ह करत नाही मात्र तोच अन्‍य कंपनीच्‍या हँडसेट मध्‍ये त्‍याच ठिकाणी भरपूर सिग्‍नल रिसीव्‍ह करीत असल्‍याचे मंचासमोर सादर केलेल्‍या प्रात्‍यक्षिकातून हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याच्‍या सिम मध्‍ये किंवा नेटवर्क प्रोव्‍हायडर कंपनीच्‍या यंत्रणेतील दोषामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या Galaxy A 3 मोबाईल मध्‍ये सिग्‍नल रिसिव्‍ह न होण्‍याचा दोष निर्माण झालेला नसून, विरुध्‍द पक्ष क्र.1 ने Galaxy A3 आणि A5 मध्‍ये फायबर बॉडी ऐवजी metal unibody construction चा वापर केला असल्‍याने सदर मोबाईल हँडसेटची नेटवर्क सिग्‍नल रिसिव्‍ह करण्‍याची क्षमता कमी झाली असल्‍याने सदरच्‍या निर्मिती दोषामुळे तक्रारकर्ता त्‍याच्‍या मोबाईल हँडसेटचा वापर करु शकत नाही. विरुध्‍द पक्ष क्र.1 कंपनीने असा सदोष हँडसेट विरुध्‍द पक्ष क्र.3 मार्फत बाजारात विक्री करणे व त्‍याची विरुध्‍द पक्ष क्र.2 कडून योग्‍य दुरुस्‍ती न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या हँडसेट बदलवून देण्‍याच्‍या मागणीची पुर्तता करण्‍याऐवजी हँडसेट मध्‍ये कोणताही दोष नसल्‍याचा खोटा बचाव घेणे ही विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 ची मोबाईल ग्राहकाप्रती सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

 

6.          मुद्दा क्र.3 व 4 बाबत – मुद्दा क्र.1 वरील विवेचनाप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1ने निर्मिती दोष असलेला मोबाईल हँडसेट निर्माण करुन तो विरुध्‍द पक्ष क्र.3 मार्फत तक्रारकर्त्‍यास विकलेला आहे. त्‍यामुळे सदर मोबाईल हँडसेटची किंमत रुपये 19,303/- दिनांक 18/4/2015 पासून प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.12% व्‍याजासह मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे.

 

            तक्रारकर्त्‍याने आर्थिक नुकसान भरपाई रुपये 3,00,000/- मानसिक त्रासाबाबत रुपये 5,00,000/- व शारीरिक त्रासाबाबत नुकसान भरपाईची केलेली मागणी अवास्‍तव असून त्‍या मागणीसाठी कोणताही आधार नाही. वरील परिस्थिती लक्षात घेता तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रुपये 5,000/- आणि तक्रार खर्च रुपये 2,000/- मंजुर करणे न्‍यायोचित होईल. म्‍हणुन मुद्दा क्र.3 व 4 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

           

     वरील निष्‍कर्षास अनुसरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.             

- आ दे श  -

 

       तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 खालील  

      तक्रार  वि.प. क्र.1 ते 3 विरुध्‍द संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या  खालीलप्रमाणे   

      अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

 

  1.     तक्रारकर्त्‍यास मोबाईल हँडसेटची किंमत रुपये 19,303/- दिनांक 18/4/2015 पासून प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.12% व्‍याजासह विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या दयावे.
  2. .    तक्रारकर्तीस झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 

      3 यांनी संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या नुकसान भरपाई रुपये 5,000/-(पाच  

      हजार) दयावी.

  1.     तक्रारकर्तीस तक्रारीच्‍या  खर्चापोटी  रुपये 2,000/-(दोन हजार) विरुध्‍द पक्ष  

      क्र.1 ते 3 यांनी संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या दयावे.

  1.     वि.प. कडून आदेशाची पुर्तता झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याने सदोष मोबाईल आहे 

      त्‍या स्थितीत वि.प.ला परत करावा.

  1.     वि.प. 1  ते 3  ने  आदेशाची   पूर्तता  संयुक्‍त  व  वैयक्तिकरित्‍या  

      प्रत मिळाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत करावी.

6.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

7.    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

       

                  

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.