::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :-12.07.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
1.अर्जदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, अर्जदार यांनी गै.क्रं 2 कडुन घरघुती वापराकरिता गै. क्रं 1 कंपनीचे निर्मीत डबल डौर रेफरिजरेटर दिनांक 23/10/2012 रोजी खरेदी केले. सदर फ्रिज घेतल्या नंतर गै.क्रं 3 यांचे दुकानातुन माणुस येऊन फ्रिज सुरू करून दिले. दिनांक 14/03/2013 रोजी सकाळी अंदाजे 9.30 ते 10.00 वाजत्याचे दरम्यान फ्रिज मधे अत्यंत गंभीर प्रकाराचे स्फोट झाला. सदर वेळेस अर्जदार क्रं 2 ची पत्नी स्वयंपाक घरात काम करत होती व स्फोटा मुळे तिच्या डोक्यास व पायास अत्यंत गंभीर स्वरुपाचे दुखापत झाली. त्यानंतर अर्जदारानी फ्रिजची पाहणी केली असतांना फ्रिजच्या समोरचे दरवाजे त्याच्या पासुन निघुन गेले होते. व फ्रिजच्या उजव्या बाजुला मधोमधे मोठे छिद्र पडले दिसले. तसेच अर्जदार क्रं 2 यांची पत्नी किचन मधे गंभीर अवस्थेत बसुन होती. लगेच त्यांना साफल्य हॉस्पीटल मध्ये भर्ती करण्यात आले. सदर घटनाचे पुलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट देण्यात आली. गै.क्रं 3 यांनी इलेक्ट्रीक इंस्पेक्टर यांना सदर घटनेची माहिती देऊन पाहणी करण्याकरिता विनंती केली. त्यानी येवून मैाका पाहणी केली व इलेक्ट्रीक फिटींग किंवा पुरवठा मधे कुठलाही दोष नसल्याचे सांगितले. गै.क्रं 2 कडुन दोन व्यक्ती सदर घटनेची व फ्रिजची पाहणी केली त्यानी त्या फ्रिज मधे स्फोट झाल्याचे कारणाचे उपकरण काढुन नवीन उपकरण बसवले व अर्जदाराला कोणतेही जॉब कार्ड न देता व त्या संदर्भात कारण व विवरण न सांगता लिहुन दिले नाही. सदर बाब गै.क्रं 1 यानी दोष पुर्ण फ्रिज विक्री करण्याकरिता दिली होती ही बाब स्पष्ट होते. त्या संदर्भाची सुचना ही दिनांक 17/07/2013 रोजी अर्जदार क्रं 1 ने पुलिस स्टेशन कडे दिली होती. अर्जदाराला दोष पुर्ण निर्मीत फ्रिज गैरअर्जदाराने विकली असुन त्या घटनेच्या नंतर फ्रिज बदलुन दिली नाही म्हणुन अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदाराविरूध्द दाखल केलेले आहे.
2.अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, अर्जदाराला झालेला आर्थिक नुकसान व त्यावरील व्याज गै.क्रं 1 ते 3 कडुन मिळण्याचा आदेश व्हावे, दोष पुर्ण फ्रिज परत घेऊन त्या ऐवजी नवीन दोष रहीत फ्रिज गैरअर्जदाराने अर्जदाराला बदलुन देण्याकरिता आदेश व्हावे तसेच अर्जदाराला झालेला शारीरिक मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडुन मिळण्याचा आदेश व्हावे.
3.अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराला नोटीस प्राप्त होवून गैरअर्जदार मंचासमक्ष हजर झाले व गैरअर्जदार क्रं 1 नी आपले लेखीउत्तर नि. क्रं. 25 प्रमाणे दाखल केले. गैरअर्जदार क्रं 1 नी आपले लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खेाटे असुन त्यांना नाकबुल आहे. अर्जदाराने सदर घटनाबाबत कधीच गै.क्रं 1 ला कळविलेले नव्हते. गै.क्रं 1 व 2 ला पुलिस अधिका-यांनी दिनांक 14/04/2013 ला बोलवले होते. त्यानुसार गै.क्रं 1 व 2 च्या वतीने बयाण देण्यात आले. त्यानी स्थल निरीक्षण केले त्यावेळेस सदर फ्रिज चालु होता व तो त्यानी दिड घंटा फ्रिज चालवुण पाहिले व अर्जदाराला चालवुण दाखविल सदर फ्रिज मधे कसल्याही प्रकाराचे निर्मीती दोष नाही. सबब सदर तक्रार खेाटी असुन खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे. गै.क्रं 2 नी नि.क्रं 31 वर मा. राज्य आयोग खंडपीठ नागपुर यांनी दिलेल्या प्रथम अपील क्रं A/14//397 dated 17/3/15 आदेशानुसार जवाब दाखल केले. सदर जवाबात गैरअर्जदार क्रं 2 नी असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खेाटे असुन त्यांना नाकबुल आहे. गैरअर्जदार क्रं 2 नी पुढे असे कथन केलेले आहे की, अर्जदार क्रं 3 यांना इलेक्ट्रीक फिटींग व वस्तुंची संपुर्ण माहिती आहे. त्या घटना संदर्भात अर्जदार क्रं 3 नी इलेक्ट्रीक निरीक्षक समोर कधीच फ्रिज निर्मिती संदर्भात मुद्दा घेतला नाही व अर्जदाराचे समक्ष फ्रिजची पडताडणी करण्यात आली. गैरअर्जदाराने दिनांक 14/04/2013 रोजी फ्रिज चे विडियो क्लिप ही काढले आहे त्यात ही फ्रिज मधे कोणतेही दोष आढळले नाही. गैरअर्जदार क्रं 2 हे फक्त अधिकृत सेवा देणारे असुन त्यांना फ्रिज बदली करून देण्याचा कोणताही अधिकार नाही. गैरअर्जदार क्रं 3 हा अधिकृत विक्रेता असुन गैरअर्जदार क्रं 1 हा फ्रिज चे निर्माता आहे. सदर फ्रिजची पडताळणी करतांना त्यामधे कोणतेही त्रुटी किंवा निर्मिती दोष आढळले नाही. म्हणुन सदर तक्रार खेाटे स्वरूपाची असल्याने खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे. गैरअर्जदार क्रं 3 नी सदर प्रकरणात लेखी उत्तर दाखल केले नसल्याने दिनांक 31/03/2016 रोजी गैरअर्जदार क्रं 3 च्या विरूध्द लेखी उत्तराशिवाय प्रकरण चालवण्याचा आदेश नि.क्रं 1 वर करण्यात आले.
4.अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1.अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
2. गैरअर्जदार क्रं 1 व 3 अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय.
काय ?
3.गैअर्जदार क्रं 2 ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे नाही.
काय?
4.अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने घरगुती वापराकरिता गैरअर्जदार क्रं 3 कडुन गैरअर्जदार क्रं 1 कंपनीचे निर्मित फ्रिज खरीदी केले होते. सदर फ्रिज खरेदी केल्यानंतर गैरअर्जदार क्रं 2 हे गैरअर्जदार क्रं 1 चे अधिकृत सेवा केन्द्र आहे. ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असुन अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहे असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6.गैरअर्जदार क्रं 2 यानी नि.क्रं 31 वर त्यांचे जवाबात असे कथन केलेले आहे की, दिनांक 14/04/2013 रोजी वादातील फ्रिजची व्हिडीयो क्लिप घेण्यात आली होती. ती क्लिप प्रकरणात दाखल करण्यात आली नाही. सबब सदर व्हिडीयो क्लिपच्या आधारे गैरअर्जदाराचे असे म्हणने आहे की, वादातील फ्रिज मधे कोणतीही त्रुटी नव्हती हे ग्राहय धरण्या सारखे नाही. अर्जदाराने नि.क्रं 44 वर अर्जदारातर्फै श्री. अनंत कुमार कुलदीप रामानंद यांचे साक्षी व्दारा शपथपत्र ची पडताडणी व नि.क्रं 42 वर सर्वे रिपोर्ट ची पडताडणी करतांना असे आढळले की दिनांक 16/04/2013 रोजी साक्षीदाराने केलेली तपासणी मधे असे माहिती पडले की, ‘I noticed that right side covered teared for about eight inch which covered over cooling system. The tearing of heavy sheet and Damages to refrigerator must be due to puncture of cooling system & internal blocking of pipe line. This mode is completely faulty due to Manufacture defect due to excess cooling system in built in the Fridge’. या उलट गैरअर्जदाराने जाच अधिकारी यांचे कोणतेही पुरावे प्रकरणात दाखल केलेले नाही. अर्जदाराने नि क्रं 42 वर दाखल केलेले व त्यासोबत साक्षीदाराचे शपथपत्राव्दारे असे सिध्द झाले आहे की अर्जदाराकडे असलेल्या फ्रिज मधे निर्मीती दोष होते व गैरअर्जदार क्रं 1 व 3 यांनी अर्जदाराला सदर फ्रिज बदली करून दिली नसल्याने अर्जदारा प्रती न्युनतम सेवा दर्शवलेली आहे सिध्द होते सबब मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. गैरअर्जदार क्रं 2 हे फक्त अधिकृत सेवा केन्द्र असल्याने अर्जदाराचे दोष पुर्ण असलेली फ्रिज बदली करून देऊ शकत नाही तसेच गैरअर्जदार क्रं 2 नी अर्जदाराला सदर फ्रिज विक्री केली नसुन किंवा त्याची निर्मिती केली नसुन अर्जदाराप्रती गैरअर्जदाराने कोणतेही न्युनतम सेवा दर्शवलेली नाही असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं 3 चे उत्तर नाकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
1)अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2)गैरअर्जदार क्रं 1 व 3 यांनी व्यक्तीगत किंवा संयुक्त रितीने अर्जदाराची दोष पुर्ण फ्रिज परत घेवुन त्या ऐवजी नवीन दोष रहीत फ्रिज आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 45 दिवसाच्या आत अर्जदाराला बदलवुन दयावे.
3)गैरअर्जदार क्रं 1 व 3 यानी व्यक्तीगत किंवा संयुक्त रितीने अर्जदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रूपये 5000/- व तक्रारीचा खर्च 2500/- रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 45 दिवसाच्या आत अर्जदाराला दयावे.
4)गैरअर्जदार क्रं 2 चे विरूध्द तक्रार खारीज करण्यात येत आहे.
5)आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी..
चंद्रपूर
दिनांक - 12/07/2016