सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ. सविता भोसले, अध्यक्षा
मा. श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा. सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 60/2012
तक्रार दाखल दि.12-04-2012
तक्रार निकाली दि.07-08-2015
श्री. सुरेश लक्ष्मण तरटे,
रा. वाठार निं.,ता.फलटण, जि.सातारा .... तक्रारदार.
विरुध्द
1. सम्राट महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,फलटण
तर्फे चेअरमन, सौ. संयोगिनी राजकुमार कांबळे,
रा.भिलकटी, ता. फलटण, जि.सातारा
2. सौ. संगीता सुभाष जगताप,व्हा.चेअरमन,
रा. वनदेवशेरी, कोळकी,
ता. फलटण जि.सातारा
3. सौ. सुवर्णा राजेंद्र काकडे,संचालक,
रा. मंगळवार पेठ,फलटण,ता.फलटण,जि.सातारा
4. सौ. विजयमाला लक्ष्मण साळुंखे,संचालक,
रा. भिलकटी, ता.फलटण,जि.सातारा
5. सौ. मयूरी शितल गांधी,संचालक,
रा.दगडी पुलाजवळ, बुधवर पेठ,फलटण,
ता.फलटण जि.सातारा
6. सौ. माधुरी विलासराव दाणी, संचालक,
रा. रचना अपार्टमेंटच्या मागे, बुधवार पेठ,
फलटण, ता.फलटण, जि.सातारा
7. सौ. साधना संजय कांबळे, संचालक,
रा. भिलकटी, फलटण, ता.फलटण, जि.सातारा
8. सौ.कल्पना हृदयनाथ भोईटे,संचालक
रा. पवन फुट वेअर, डेक्कन चौक,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा
9. सौ. प्रभा रामचंद्र शिंदे,सांचालक,
रा. भिलकटी, फलटण,ता.फलटण, जि.सातारा
10. सौ. संगीता बाळासो कांबळे,संचालक,
रा. सफाई कॉलनी,दत्तनगर,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा
11. सौ. ज्योती संजय काकडे,संचालक,
रा.मंगळवार पेठ,फलटण,ता.फलटण,जि.सातारा
12. सौ. संगीता भिमदेव गि-हे,संचालक
रा.महतपुरा पेठ,फलटण,ता.फलटण, जि.सातारा
13. सौ. लता सुभाष गायकवाड,संचालक
रा. गोळीबार मैदान,हाडको कॉलनी, भोईटे क्लासेस,
फलटण, ता.फलटण,जि.सातारा
14. सम्राट महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,फलटण
तर्फे व्यव्स्थापक
रा.फलटण,ता.फलटण,जि.सातारा ... जाबदार.
....तक्रारदारतर्फे (अँड.एस.एम.भोंगळे)
(अँड.पी.आर.इनामदार)
....जाबदार क्र.2,5,6,8,11,13 तर्फे (अँड.एस.डी.शिंदे)
....जाबदार क्र.1,,4,7,9,10,12,14 (एकतर्फा)
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे,
तक्रारदार हे वाठार-निंबाळकर, ता.फलटण,जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी जाबदार पतसंस्थेत मुदत ठेव योजनेत खालील नमूद केलेप्रमाणे रक्कम गुंतविली होती व आहे.
अ.क्र | ठेवपावती नंबर/ खाते नंबर | ठेव ठेवलेचा दिनांक | ठेवीची मुदत संपलेली दिनांक | ठेव रक्कम | व्याज |
1 | 30 | 04/03/2006 | 04/03/2012 | 10,000/- | 11% |
2 | 30 | 10/11/2006 | 11/11/2012 | 10,000/- | 11% |
3 | 62 | 09/03/2007 | 09/11/2012 | 20,000/- | 11% |
4 | 68 | 19/05/2007 | 19/02/2013 | 10,000/- | 11% |
अशी वर नमूद एकूण रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे. 11 टक्के व्याजदराने वेगवेगळया मुदत ठेवपावत्यांअन्वये ठेव म्हणून तक्रारदाराने जाबदार क्र. 1 पतसंस्थेत गुंतविली होती व आहे. प्रस्तुत मुदत ठेवीच्या मुदती संपल्या त्यामुळे तक्रारदाराने जाबदार यांचेकडे वारंवार रकमेची तोंडी मागणी केली. परंतु जाबदाराने मुद्दामहून रक्कम देणेस टाळाटाळ केली व करत आहेत व रक्कम तक्रारदार यांना परत अदा केली नाही. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे. म्हणून प्रस्तुत रक्कम जाबदारांकडून व्याजासह वसूल होवून मिळावी म्हणून प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदार यांचेकडून मुदत ठेवीची रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे. 11 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळावी, तसेच तक्रारदाराला झाले मानसीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- जाबदार यांचेकडून मिळावी व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- मिळावी अशी विनंती याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत ठेवपावतीची व्हेरीफाईड प्रत, पुराव्याचे शपथपत्र, अर्जासोबत जाबदारकडून मिळालेल्या चेकच्या झेरॉक्स (न वटलेल्या) वगैरे कागदपत्रे याकामी तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र. 1,3,4,7,9,10,12,14 हे नोटीस लागू होवूनही मंचात गैरहजर राहीले. सबब प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाला आहे तर जाबदार क्र. 2,5,6,8,11 व 13 यांची प्रस्तुत कामी हजर होवून त्यांनी त्यांचे म्हणणे/कैफीयत व पुराव्याचे शपथपत्र तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. अवसायक यांची नेमणूक झालेचा मध्यंतरीय व अंतिम आदेशाची सत्यप्रत, जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 6 व 8 यांनी म्हटले आहे की, जाबदार क्र. 6 ही या पतसंस्थेची संचालक नव्हती व नाही. संचालक असलेचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेले नाही. जाबदार क्र.2,5,6,8,11,13 यांनी जाबदार संस्थेवर संचालक नव्हतो त्यामुळे जबाबदारी टाळणेचा प्रश्नच येत नाही असे म्हणणे दिले आहे. तसेच प्रस्तुत संस्थेवर दि.7/10/2011 रोजीचे आदेशाने अवसायक(लिक्विडेटर) यांची नेमणूक झालेली असलेने महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 कलम 107 नुसार प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करणेपूर्वी तक्रारदार यांनी रजिस्टर सहकारी संस्था यांची पूर्व परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही तो फेटाळणेत यावा. तसेच प्रस्तुत जाबदार हे जाबदार क्र. 1 संस्थेचे संचालक असलेचे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदारांनी याकामी दाखल केले आहे. तसेच पुराव्याची शपथपत्रे व लेखी युक्तीवादही दाखल केला आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थी पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.नं. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय ? होय
2. तक्रारदाराचा प्रस्तुत तक्रार अर्ज चालणेस पात्र आहे काय ? नाही
3. अंतिम आदेश काय ? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.-कारण तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेत रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) वेगवेगळया ठेवपावत्यांअन्वये मुदत ठेव योजनेत गुंतविली आहे. प्रस्तुत ठेवपावतींच्या व्हेरीफाईड प्रत नि.5/1 ते नि.5/4 कडे दाखल केल्या आहेत. म्हणजेच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. प्रस्तुत कामी मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्तुत जाबदार क्र. 1 पतसंस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, 1960 नुसार नोंदणीकृत झाली असून प्रस्तुत कायद्याचे कलम 107 प्रमाणे प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करणेपूर्वी रजिस्ट्रार सहकारी संस्था यांची पूर्व परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज रद्द होणेस पात्र आहे. कारण सदर जाबदार क्र. 1 पतसंस्थेवर दि. 7/10/2011 रोजी अवसायक यांची नेमणूक झाली असून त्याचे अंतिंम आदेशाची प्रत व मध्यंतरीय आदेशाची प्रत/ या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. म्हणजेच जाबदार क्र.1 पतसंस्थेवर अवसायक यांची नेमणूक झालेचे स्पष्ट होत आहे. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज सन 2012 मध्ये दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा 1960 चे कलम 107 प्रमाणे रजिस्टार, सहकारी संस्था यांची पूर्व परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक असतानाही तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी किंवा दाखल केलेनंतरही रजिस्टार,सहकारी संस्था यांची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. याकामी आम्ही पुढीलप्रमाणे मे. वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडयांचा व त्यातील दंडकांचा आधार घेत आहोत.
1. 2012 (1) All MR (JOURNAL) 18 Shri . Madanrao Vishwanathrao Patil & Ors. V/S. Dhansampada Nagari Sahakari Path Sanstha Ltd.,
Sec.15 & 17 Co-Operative Societies Act,1960- Fixed Deposits Amount and interest not returned after maturity-District Forum allowed complaint holding Opp. Deficient in their service and directed to pay Rs.1,000/- for mental agony and Rs.1,000/- as costs-whether Society is under liquidation obtaining permission from Registrar, Co-Operative Societies is must as per permission of Maharashtra State Co-Operative Societies Act-While filing complaint before district forum permission of Registrar, Co-Operative Societies has not been obtained- Complaint itself is not maintainable- impunged order set aside & matter remanded back to district forum for fresh disposal.
IMP. Point:- Whenever Society is under liquidation obtaining permission from Registrar Co-operative Societies is must for filing of complaint.
2. 2013 (1) CPR 189 (Mah) Shri Dattatray Shankarao Desai V/S. Sharabi M. Pathan Consumer Protection Act 1986.
No permission under Sec. 107 of Maharashtra Co-Operative Society, 1960 was granted in favour of complainant/ petitioner –complainant is interested in carrying out illegal process of liquidating his assets- This is not permissible under law- Registrar has not granted permission to file legal proceeding as against liquidator in any court of law and much more so before Consumer forum- consumer forum-complaint is tenable and if has been rightly dismissed-revision petition dismissed.
IMP Point- Complaint cannot be filed against Bank under Liquidation without permission of Registrar.
वरील न्यायनिवाडे विचारात घेता प्रस्तुत तक्रारदार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा,1960 कलम 107 प्रमाणे तक्रार अर्ज दाखल करणेपूर्वी रजिस्टार, सहकारी संस्था यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते असे असतानाही तक्रारदाराने रजिस्टार सहकारी संस्था, यांची पूर्वपरवानगी घेतलेली नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज चालणेस पात्र नाहीत असे आमचे स्पष्ट मत आहे.
सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आ दे श
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत येतो.
2. आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.07-08-2015
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.