नि. ४१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.३०/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १५/०१/२०१०
तक्रार दाखल तारीख : २३/०२/२०१०
निकाल तारीख : ०८/०२/२०११
-------------------------------------------
१. श्री दिनेश मधुकुमार कोठावळे,
व.व. – २८, धंदा – शिक्षण
२. सौ जुलिया मधुकुमार कोठावळे
व.व. – ४५, धंदा – गृहकृत्य
दोघे रा.३८, हॅप्पी होम,
लिमये डोळयांच्या दवाखान्यानजीक,
विश्रामबाग, सांगली ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. संभाजी राजे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
विजयनगर, वानलेसवाडी,
विलीनीकरण झाल्यानंतरचे नांव
पांडुरंग कृष्णाजी पाटील नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादीत, सांगली
टिळक चौक, गांवभाग, सांगली
२. श्री यशवंत निवृत्ती पाटील (चेअरमन)
नं.३७/९, धरण रस्ता, सांगलीवाडी
३. श्री तुकाराम ज्ञानू पाटील,(व्हा.चेअरमन)
रा.शाळा नं.९ नजीक, सांगलीवाडी
४. संपतराव पांडुरंग पाटील (संचालक)
रा.शाळा नं.९ नजीक, सांगलीवाडी
५. निरज सुभाषचंद्र गुप्ता (संचालक)
रा.व्यंकटेश सृष्टी, बायपास रोड, सांगली
६. श्री शिवाजी बाळासो पाटील (संचालक)
रा.गाडगीळ प्लॉट, सांगलीवाडी
७. श्री गोपाळ ज्ञानू पाटील (संचालक)
रा.भारतीय विद्यापीठ समोर, सांगली
८. श्री राजेंद्र लक्ष्मण कुंभार (संचालक)
रा.लक्ष्मी मंदिराजवळ, कुपवाड रोड, सांगली
९. श्री पंढरीनाथ सिताराम माने (संचालक)
रा.गणपती मंदिराजवळ, सांगली
१०. श्री भुपेंद्रसिंग गुरुचरणसिंग गैरजोरया (संचालक)
रा.सांगली सायकल मार्ट, सारस्वत बॅंकेजवळ,
सांगली
११. श्री बाळासाहेब युवराज कांबळे
रा.यल्लम्मा मंदिराजवळ, सांगलीवाड
१२. सौ वैशाली अशोक पाटील (संचालिका)
रा.शाळा नं.९ नजीक, सांगलीवाडी
१३. सौ मिना सुनिल ताटे
रा.रेल्वे स्टेशनजवळ, सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फे: +ìb÷.नवीनचंद्र कोठावळे
जाबदार क्र.२ ते ८ व ११ ते १३ तर्फे : +ìb÷. अविनाश आ.पाटील
जाबदार क्र.९ तर्फे : +ìb÷. सी.ए.पाटील
जाबदार क्र.१० तर्फे :+ìb÷. डी.एम.धावते (नो-से)
जाबदार क्र.१: एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये व सेव्हिंग्ज खात्यान्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार संभाजी राजे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम गुंतविली होती. ठेवीची मुदत संपलेनंतर तक्रारदार यांनी रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ६ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. जाबदार क्र.२ ते ८ व ११ ते १३ यांनी नि.२३ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्येजाबदार संस्थेच्या नामबदलाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच यातील संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ होते तेच संचालक मंडळ अस्तित्वात व कार्यरत आहे. उपनिबंधक, सहकारी संस्था मिरज यांचेकडील यादीची मागणी केली असता संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या व्यक्तीच संस्थेच्या संचालक असल्याचे यादीवरुन सिध्द होते. सदरचे संचालकांना तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी सामील करणे गरजेचे होते. जाबदार क्र.१ पतसंस्था यांनी तक्रारदारांस चुकीची संचालक मंडळ यादी दिल्याने या जाबदारांना या प्रकरणी सामील केलेले आहे. जाबदार क्र.२ ते ८ व ११ ते १३ यांनी संस्थेच्या कोणत्याही प्रोसिंडींगवर सहया केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारअर्ज जाबदार क्र.२ ते ८ व ११ ते १३ यांचेविरुध्द फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.२४ ला शपथपत्र व नि.२६ चे यादीसोबत १ कागद दाखल केला आहे.
३. जाबदार क्र.९ यांनी नि.२८ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार क्र.९ हे संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्था अगर पांडुरंग कृष्णाजी पाटील नागरी सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्थांचे कधीही सभासद नव्हते, त्यामुळे सदर संस्थाचे संचालक मंडळ सदस्य होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संचालक मंडळाचे यादीमध्ये जाबदार क्र.९ यांचे नाव नमूद नाही. त्यामुळे तक्रारअर्ज जाबदार क्र.९ यांचेविरुध्द फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.३२ ला शपथपत्र व नि.३० चे यादीसोबत १ कागद दाखल केला आहे.
४. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१० यांना नोटीसची बजावणी झालेनंतर ते याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करण्यात आला.
५. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
६. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार पतसंस्थेमध्ये गुंतविल्याबाबतची सत्यप्रत नि.३८ चे यादीने दाखल केली आहे. तक्रारदार यांनी ठेवपावती क्र.१९६ अन्वये रक्कम रु.१५,०००/- जाबदार यांचेकडे दि.९/१/२००७ रोजी गुंतविल्याचे दिसून येते. सदर ठेवपावतीवर दि.१०/१/२००७ पासून व्याज मिळाल्याचे नसल्याचे तक्रारदार यांनी त्यांचे ३८ च्या निवेदनामध्ये नमूद केले आहे. सदर ठेवपावतीवरील व्याजाचा दर हा ९ टक्के नमूद आहे. त्यामुळे सदरची रक्कम रु.१५,०००/- ही ठेव ठेवलेल्या तारखेपासून म्हणजे दि.९/१/२००७ पासून द.सा.द.शे. ९ टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या सेव्हिंग्ज खात्याच्या पासबुकच्या प्रमाणीत सत्यप्रतीचे अवलोकन केले असता सदर पासबुकवर जाबदार यांचे कोणतेही नाव अथवा शिक्का दिसून येत नाही त्यामुळे सदर पासबुक जाबदार पतसंस्थेचे आहे अथवा नाही याबाबत स्पष्टता होत नसल्याने व तक्रारदार यांनी त्याबाबत इतर कोणताही अन्य पुरावा दाखल केला नसल्याने सदरची रक्कम मंजूर करण्यात येत नाही.
७. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १३ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. जाबदार संभाजीराजे पतसंस्था ही पांडुरंग कृष्णाजी पाटील पतसंस्थेमध्ये विलीन झाली आहे व सदरची बाब जाबदार यांनीही मान्य केली आहे त्यामुळे रकमेची मागणी करुनही ती न देवून पांडुरंग पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
८. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार क्र.१ पांडुरंग कृष्णाजी पाटील नागरी सहकारी पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.१९६ वरील रक्कम रु.१५,०००/-व या रकमेवर दि.९/१/२००७ पासून द.सा.द.शे. ९% दराने व्याज अदा करावे.
२. यातील जाबदार क्र.१ पांडुरंग कृष्णाजी पाटील नागरी सहकारी पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.२३/३/२०१२ पर्यंत न
केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: ०८/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.