Maharashtra

Nagpur

CC/10/462

Sanjay Nandlal Sharma - Complainant(s)

Versus

Samata Sahakari Bank Ltd Through Administrater Chaitanya Nasare - Opp.Party(s)

Adv. Amit Khare

08 Dec 2010

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/462
1. Sanjay Nandlal SharmaPlot No. Q-8, Laxminagar, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Samata Sahakari Bank Ltd Through Administrater Chaitanya NasareZenda Chowk, Dharampeth, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. Amit Khare, Advocate for Complainant

Dated : 08 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
 
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 08/12/2010)
 
 
1.     तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍यांची तक्रार अशी आहे की, ते पती पत्‍नी असून त्‍यांनी संयुक्‍तपणे गैरअर्जदार क्र. 1 यांचे बँकेत खालीलप्रमाणे रकमा दीर्घ मुदती अंतर्गत सन 2007 मध्‍ये गुंतविल्‍या होत्‍या.
 
      खाते क्र.                    रक्‍कम
1)    31/17479                     रु.2,89,000/-
2)    31/17475                     रु.82,711/-
3)    31/17476                     रु.82,711/-
 
      सदर गैरअर्जदार बँकेत घोटाळा झाल्‍याचे लक्षात आल्‍याने गैरअर्जदार क्र. 2 ने निर्बंध लावून खातेदारांना फक्‍त रु.1000/- त्‍यांचे खात्‍यातून काढता येईल असे आदेश दिले होते व विशेष परिस्‍थीतीमध्‍ये रक्‍कम काढण्‍याची परवानगी दिली होती व त्‍याकरीता कारण नोंदवून अर्ज देणे आवश्‍यक होते. तक्रारकर्त्‍यांच्‍या खात्‍यात रु.4,54,422/- जमा आहेत. त्‍यांनी गैरअर्जदारांना रक्‍कम काढण्‍याकरीता अर्ज केला. परंतू गैरअर्जदारांनी त्‍यांची रक्‍कम त्‍यांना परत केलेली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन त्‍यांची जमा रक्‍कम ही 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. आपल्‍या म्‍हणण्‍यादाखल मुदत ठेवीचे प्रमाणपत्रांच्‍या प्रती व निवाडयांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
2.    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे वर मंचाने नोटीस बजावला असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी उत्‍तर दाखल करण्‍यास वेळ मागितला. मंचाने संधी देऊनही त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल न केल्‍याने दि.19.10.2010 रोजी विना लेखी जबाब प्रकरण चालविण्‍याचा आदेश पारित केला. तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा लेखी उत्‍तरही दाखल केले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.15.11.2010 रोजी पारित केला. सदर प्रकरण मंचासमोर दि.04.12.2010 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
3.    तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीसोबत मुदत ठेवींच्‍या प्रमाणपत्राच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यावरुन तक्रारकर्ते हे गैरअर्जदाराचे ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सदर प्रतीवरुन तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदाराकडे मुदत ठेवी ठेवल्‍या होत्‍या व त्‍या 08.05.2010 व 05.06.2010 ला परीपक्‍व झालेल्‍या आहेत. तसेच तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार बँकेला त्‍यांना रकमेची आवश्‍यकता असल्‍याने गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार अर्ज करुन मागणी केलेली आहे. परंतू गैरअर्जदाराने सदर मागणीस प्रतिसाद दिला नाही व तक्रारकर्त्‍यांची रक्‍कम परीपक्‍व होऊनही अद्याप परत केलेली नाही, ही गैरअर्जदार क्र. 1 यांची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या संदर्भात काही निवाडयांच्‍या प्रती मंचासमोर दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यातील मुद्दे सदर तक्रारीस पूरक असल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
4.    सदर प्रकरणी दाखल मुदत ठेवींच्‍या प्रमाणपत्राच्‍या प्रतींवरुन तक्रारकर्त्‍यांची एकूण रक्‍कम रु.4,54,422/- गैरअर्जदाराकडे आहे व परीपक्‍व झालेली रक्‍कम व ग्राहकाने परत मागितलेली रक्‍कम त्‍यास देणे ही गैरअर्जदार बँकेची जबाबदारी आहे. मंचाचे मते तक्रारकर्ता रु.4,54,422/- ही रक्‍कम तक्रार दाखल दिनाकापासून दि.06.08.2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍यास पात्र आहे.
 
5.    शारिरीक व मानसिक त्रासाबाबत तक्रारकर्त्‍यांनी रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी अवास्‍तव व अवाजवी आहे. तथापि, तक्रारकर्ते रक्‍कम न मिळाल्‍याने झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.3,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. गैरअर्जदार क्र. 2 विरुध्‍द तक्रारकर्त्‍यांच्‍या कुठल्‍याही मागण्‍या नसल्‍याने त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व दाखल दस्‍तऐवजांच्‍या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला    रु.4,54,422/- ही रक्‍कम तक्रार दाखल दिनाकापासून दि.06.08.2010 पासून तर  प्रत्‍यक्ष संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह परत करावी.
3)    गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाईबाबत      रु.3,000/- द्यावे.
4)    गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याला तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
5)    गैरअर्जदार क्र. 2 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
6)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30    दिवसाचे आत करावे.
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT