Maharashtra

Sangli

CC/08/1366

Madhav Sambhaji Chougule etc.3 - Complainant(s)

Versus

Samata Nag.Sah.Pat.Mar. - Opp.Party(s)

17 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1366
 
1. Madhav Sambhaji Chougule etc.3
Sonai, 365/1/K, S.T.Colony Rd., Vishrambaug, Sangli 416 415
...........Complainant(s)
Versus
1. Samata Nag.Sah.Pat.Mar.
S.T.Colony Rd., Vishrambaug, Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                           नि.नं. ७०
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्‍या सौ सुरेखा बिचकर
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३६६/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख     - ११/१२/२००८
तक्रार दाखल तारीख   - १७/१२/२००८               
निकाल तारीखः       - १७/१०/२०११
----------------------------------------------
 
१. श्री माधव संभाजी चौगुले, व.व.६३, सेवानिवृत्‍त
   सौ शोभा माधव चौगुले, व.व.६३, घरकाम
   श्री मिलिंद माधव चौगुले, व.व.३३, लघुउद्योग
   सर्व रा. सोनाई, ३६५/१/क, एस.टी.कॉलनी रोड,
   विश्रामबाग, सांगली ४१६ ४१५                       .... तक्रारदार
विरुध्‍द
 
१. समता नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत
   एस.टी.कॉलनी रोड, विश्रामबाग, सांगली
 
२. श्री हिंदूराव संतराम सुर्यवंशी, वय सज्ञान,
    रा.सुर्योदय सावरकर कॉलनी, मार्ग क्र.१,
    विश्रामबाग, सांगली
 
३. श्री अशोक रंगराव जाधव, वय सज्ञान,
    रा.श्रीपाद अपार्टमेंट, नागराज कॉलनी,
    विश्रामबाग, सांगली
 
४. श्री अरुण गुणधर कुदळे, वय सज्ञान,
    रा.पद्मावती कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
५. श्री महादेव शिवराम दिक्षीत, वय सज्ञान
    रा.चाणक्‍यपुरी कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
६. श्री दिलीप श्रीपाल हमीदवाड, वय सज्ञान
    रा. गंगोत्री निवास, १७, एस.टी.कॉलनी
    विश्रामबाग, सांगली
 
७. श्री बाबासाहेब आप्‍पू ऐतवडे, वय सज्ञान
    रा.प्‍लॉट नं.९, ३६५/१/क, नागराज कॉलनीशेजारी,
    विश्रामबाग, सांगली
 
८. श्री बाळासाहेब दत्‍तात्रय भंडारे, वय सज्ञान
    रा.कृष्‍णाव्‍हॅली कॉलनी, चिंतामणी कॉलेजच्‍या मागे,
    विश्रामबाग, सांगली
 
९. सौ विमल हणमंत सुर्यवंशी, वय सज्ञान
    रा.१०१८, वर्धमाननगर, कुपवाड जि. सांगली
 
१०. श्री संजय चंद्रकांत कुलकर्णी, वय सज्ञान
    रा.ओंकार बंगला, संत ज्ञानेश्‍वर चौक,
    विश्रामबाग, सांगली
 
११. श्री अविनाश नारायण गाडदी, वय सज्ञान
    रा.एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
    (मंचाच्‍या दि.२२/१०/१० च्‍या आदेशान्‍वये वगळले.)
 
१२. श्री लक्ष्‍मण केशव पाटील, वय सज्ञान
    रा.एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
१३. सौ नंदीनी राजीव खाडीलकर, वय सज्ञान
    रा. एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
१४. सौ मंगल दिलीप साळुंखे, वय सज्ञान
    रा. एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
१५. श्री दिलीप बळवंत मोरे, वय सज्ञान
    रा. एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
१६. श्री विकास शिवाजी बोडरे, वय सज्ञान
     रा. एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
१७. श्री बाबूराव ज्ञानू कोळी
     धामणी रोड, दत्‍त नगर, विश्रामबाग, सांगली
 
१८. श्री प्रकाश महादेव दिक्षीत
     चाणक्‍यपुरी, विश्रामबाग, सांगली
 
१९. सौ अलका महिपती मुळीक
     पोलिस लाईन, विश्रामबाग, सांगली
 
२०. श्री बाबासाहेब यशवंत पाटील
     मंगलमुर्ती नागराज कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
२१. श्री संजय रामचंद्र गवळी
    श्रमसाफल्‍य, यशवंतनगर, कुपवाड रोड, सांगली
 
२२. श्री आशिषकुमार राजाराम यमगर
     पार्वती कुंज अपार्टमेंट, खणभाग, सांगली
 
२३. सौ उर्मिला हणमंत इंगवले
     उल्‍हासनगर, कुपवाड ता.मिरज जि. सांगली          .... जाबदार
 
                      तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री ए.ए.देशपांडे
                      जाबदार क्र.१, ५ ते १०, १२, १५ ते २१ एकतर्फा
                      जाबदार क्र. ४, १४, २२, २३ नो से
                      जाबदार क्र. ११ वगळले
                      जाबदार क्र. २ व १३ स्‍वत:
                        जाबदार क्र.३ - +ìb÷. श्री ए.आर.कुडाळकर
 
नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेवी व मुदत ठेव अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार समता नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झाल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण २२ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १, ५ ते १०, १२, १५ ते २१ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. जाबदार क्र. ४, १४, २२, २३ हे प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले परंतु त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द नो से चा आदेश करण्‍यात आला. जाबदार क्र.११ यांना नि.६५ वरील आदेशानुसार वगळण्‍यात आले.
 
३.    जाबदार क्र.२ यांनी मंचाच्‍या नोटीसीची बजावणी त्‍यांचेवर झालेवर हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे स्‍वतंत्रपणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. परंतु या म्‍हणण्‍यासोबत त्‍यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही त्‍यामुळे जाबदार क्र.२ यांचे म्‍हणणे सदरहू निकालपत्राचे वेळी विचारात घेणेत आलेले नाही. 
 
४.    जाबदार क्र.१, ३ व १६ यांनी मंचाच्‍या नोटीसीची बजावणी त्‍यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. परंतु जाबदार क्र. १ व १६ यांचेविरुध्‍द यापूर्वीच एकतर्फा आदेश झाले होते. याबाबत‍ सदरहू जाबदार यांनी नि.३५ अन्‍वये त्‍यांच्‍याविरुध्‍द झालेला नो से आदेश रद्द होवून मिळणेसाठी अर्ज दाखल केला. सदरहू आदेश रक्‍कम रु.७५०/- तक्रारदारांना देण्‍याचे अटीवर मंजूर करण्‍यात आला. मात्र जाबदार क्र.१ व १६ यांनी सदरहू आदेशाचे पालन न केल्‍याने आणि तसेही त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश झालेला असल्‍याने व त्‍यांची मागणी नो से आदेश रद्द होवून मिळावे अशी असल्‍याने त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत निकालपत्राचे वेळी विचारात घेण्‍यात आलेली नाही. 
 
      मात्र जाबदार क्र.३ यांचेविरुध्‍द कोणतेही आदेश झाले नसल्‍याकारणाने नि.३८ अन्‍वये जाबदार क्र.१, ३ व १६ यांचेवतीने दाखल करण्‍यात आलेले म्‍हणणे केवळ जाबदार क्र.३ यांचे वतीने प्रस्‍तुत प्रकरणी विचारात घेण्‍यात येत आहे. जाबदार क्र.३ यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्‍यातील कथने अमान्‍य केलेली आहेत. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार दि.३/१०/२००७ रोजीच्‍या संचालकांच्‍या सभेमध्‍ये तक्रारदारांच्‍या ठेवी परत करणेबाबत ठराव करण्‍यात आलेला होता. परंतु रक्‍कम वाटपावेळी वसुलीच्‍या कमतरतेमुळे ठेवीदारांना त्‍यांना पैसे देता आलेले नाहीत. अर्जदार क्र.१ हे काही काळ सदरहू जाबदार संस्‍थेमध्‍ये चेअरमन म्‍हणून कार्यरत होते. दि.३/१०/२००७ च्‍या सभेमध्‍ये प्रथमत: ठेवीदारांच्‍या ठेवी परत करण्‍याचे व त्‍यानंतर संचालकांच्‍या व त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या ठेवी परत करावयाच्‍या असे ठरले होते. त्‍यामुळे जोपर्यंत सर्व ठेवीदारांच्‍या ठेवी देण्‍यात येत नाहीत, तोपर्यंत तक्रारदार क्र.१ व त्‍यांचे नातेवाईक यांना त्‍यांनी गुंतविलेल्‍या रकमांची मागणी करण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होत नाहीत. या जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये पुढे असेही नमूद केले आहे की, संस्‍थेच्‍या संचालकांवर अद्यापही सहकार खात्‍याने कोणत्‍याही गैरव्‍यवहाराबाबत ठपका ठेवलेला नाही अथवा त्‍यांना जबाबदार धरलेले नाही आणि म्‍हणून या संचालकांना प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांच्‍या ठेवीसाठी जबाबदार धरता येणार नाही. सर्व ठेवीदारांनी अचानकपणे ठेवी मागणेस सुरुवात केली असल्‍याने तक्रारदारांना त्‍यांची रक्‍कम एकरकमी परत करणे या जाबदारांना शक्‍य नाही. आणि या सर्व बाबींचा विचार करुन ज्‍या प्रमाणात वसुली होईल त्‍याप्रमाणे तक्रारदारांच्‍या ठेवींतील रकमा परत करण्‍याची परवानगी जाबदारांना मिळावी अशी व या रकमेसाठी माफक हप्‍ते बांधून मिळावेत अशी विनंती जाबदार क्र.३ यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये केली आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा व तक्रारअर्जाचा खर्चदेखील तक्रारदारांकडून जाबदारांना मिळावा अशी विनंती जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये केली आहे व म्‍हणण्‍याचे पुष्‍ठयर्थ प्रतिज्ञाप्र दाखल केले आहे.
 
५.  जाबदार क्र.१३ यांनी देखील त्‍यांचे म्‍हणणे नि.२२ अन्‍वये प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात त्‍यांनी दि.१५/२/२००५ रोजी पतसंस्‍थेच्‍या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्‍याचे व सदरहू राजीनामा संस्‍थेच्‍या संचालक मंडळाच्‍या मिटींग मध्‍ये मंजूरही झाल्‍याचे नमूद केले आहे. आणि म्‍हणून या जाबदारांना तक्रारदारांच्‍या ठेवीसाठी जबाबदार धरण्‍यात येवू नये अशी विनंती त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात केलेली आहे. त्‍याचप्रमाणे या जाबदारांना ते संचालक नसतानाही त्‍यांना प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार म्‍हणून सामील केल्‍याने त्‍यांना जो नाहक त्रास झाला त्‍याकरीता कॉम्‍पेन्‍सेटरी कॉस्‍ट म्‍हणून रक्‍कम रु.१,०००/- मिळावेत अशीही विनंती केली आहे व म्‍हणण्‍याचे पुष्‍ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.२३ अन्‍वये ३ कागद प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले आहे.
 
६.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकांविरुध्‍द आदेश करावा अशी मागणी केलेली आहे. व मागणीच्‍या पुष्‍ठयर्थ त्‍यांनी नि.२८ अन्‍वये समता नागरी सहकारी पतसंस्‍था विश्रामबाग यांचे संचालक मंडळावर दि.२१/६/२००९ रोजी विश्रामबाग पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा रजिस्‍टर नं.१३४/९९ भादंविसं कलम ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ३४ या अंतर्गत दाखल करण्‍यात आलेल्‍या प्रथम वर्दीची सत्‍यप्रत दाखल केली आहे. याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.  तक्रारदारांनी नि.२८ अन्‍वये जे कागदपत्रे दाखल केलेली आहेत, त्‍यावरुन संचालकांविरुध्‍द केवळ पोलिस ठाण्‍यामध्‍ये गुन्‍हा नोंद केल्‍याचे दिसून येते. त्‍यावरुन त्‍यांना कोणत्‍या गैरव्‍यवहारासाठी जबाबदार धरण्‍यात आलेले आहे असा निष्‍कर्ष निघू शकत नाही. आणि नेमकी हीच बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र.२ ते १० व १२ ते १६ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
     
६.    वर नमूद विवेचनावरुन तक्रारदारांनी जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये ठेवीअन्‍वये रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या व त्‍यांची मागणी करुनही सदरहू रकमा त्‍यांना परत न देवून जाबदार संस्‍थेने तक्रारदारांना सदोष सेवा पुरविली ही बाब शाबीत होते. तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या ठेवींच्‍या मुदती पूर्ण झालेल्‍या आहेत. या ठेवींवर तक्रारदारांना कोणतेही व्‍याज मिळालेले नाही असे नि.५७ अन्‍वये दाखल केलेल्‍या व्‍याज निवेदनात नमूद केले आहे. याचा विचार करता दामदुप्‍पट ठेवींतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्‍याच्‍या दुस-या दिवशीपासून १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत. हे व्‍याजदर मंजूर करीत असताना जाबदार संस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्‍याची बाब विचारात घेण्‍यात आलेली आहे तर मुदत ठेवीत गुंतविण्‍यात आलेली रक्‍कम ठेव ठेवल्‍या तारखेपासून पावतीवर नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ०००९६३ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) दि.२/३/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र. ०००९७१, ०००९७२ मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.१३/३/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ०००९९९ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) दि.२४/४/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
४. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१११४ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) दि.१४/५/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
५. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१११६ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) दि.१५/५/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
६. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००११२२ मधील रक्‍कम रु.८,०००/- (अक्षरी रुपये आठ हजार फक्‍त) दि.२९/५/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
७. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००११४४ मधील रक्‍कम रु.१८,०००/- (अक्षरी रुपये अठरा हजार फक्‍त) दि.३०/६/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
८. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१२२४ मधील रक्‍कम रु.५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) दि.११/९/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
९. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१२४१ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.२४/९/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१०. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१२४२ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.२७/९/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
११. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१२४९ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) दि.११/१०/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१२७९ मधील रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.२६/१०/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१२८० मधील रक्‍कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) दि.२६/१०/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१४. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र. ००१२८१, ००१२८२ मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.२/५/२०१० पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१५. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१३०० मधील रक्‍कम रु.७,०००/- (अक्षरी रुपये सात हजार फक्‍त) दि.२६/४/२०१० पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१६. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ००१३२८ मधील रक्‍कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) दि.१८/६/२०१० पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१७. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव ठेव पावती क्र. ००१७४९ मधील रक्‍कम रु.१,०००/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) दि.२७/९/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
१८. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
१९. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.३०/११/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: १७/१०/२०११    
 
 
 (सुरेखा बिचकर)                (गीता सु.घाटगे)                        (अनिल य.गोडसे÷)
       सदस्‍या                       सदस्‍या                                 अध्‍यक्ष           
जिल्‍हा मंच, सांगली.             जिल्‍हा मंच, सांगली                 जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.