Complaint Case No. CC/200/2024 | ( Date of Filing : 21 Feb 2024 ) |
| | 1. M/S. AMARJIT FISCAL VENTURES PVT LTD | 24 CENTRAL BAZAAR ROAD, RAMDASPETH, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. SAMARTHAN SYSTEM PVT. LTD | S.NO 229/2/2, BEHIND WIPRO COMPANY, NEAR NIRALI HOTEL, HINJEWADI, PUNE | PUNE | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये- - तक्रारदार हे अमरजित फिस्कल व्हेन्च्यूर्स प्रा.लि. या कंपनीचे संचालक असून त्यांचा मिनरल वॉटरसाठी लागणा-या बिसलेरीचे बॉटल निर्मित करण्याचा व्यवसाय आहे. विरुध्द पक्षाचा वेगवेगळया इंडस्ट्रीयल machines equipment ( मशीन व उपकरणे) निर्मितीचा व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याने श्री. राहुल पवईकर यांच्या माध्यमातून विरुध्द पक्षाशी संपर्क साधला व मिनरल वॉटरच्या निर्मितीकरिता नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याकरिता लागणारे मशिनरी विकत घेण्यासाठी विरुध्द पक्षाला दि. 25.05.2017 रोजी रुपये 12,85,366/- व त्यानंतर दि. 25.05.2017 रोजी रुपये 28,09,125/- तसेच पुन्हा दि. 25.05.2017 रोजी रुपये 38,30,625 दि. 30.05.2017 रोजी रुपये 44,24,372/- अशा प्रकारे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला एकूण रक्कम रुपये 1,23,49,488/- इतकी रक्कम अदा केली. त्यानंतर सदर व्यवसायाकरिता तक्रारकर्त्याने रुपये 98,78,025/- इतक्या रक्कमेचे कर्ज देखील घेतले असून सदरची रक्कम विरुध्द पक्षाला अदा करण्यात आली आहे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मागणीप्रमाणे मशिनरीची डिलीव्हरी दि. 18.07.2017 रोजी पासून केली, परंतु पर्चेस ऑर्डरप्रमाणे वस्तू मशिनरी न पुरविता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला जुनी वापरलेली मशिनरी पुरविली, याबाबत लगेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला कळविले. तसेच विरुध्द पक्षाने केलेल्या फसवणूकी बाबत कळमेश्वर पोलिस स्टेशन येथे फिर्याद देखील नोंदविली होती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची फसवणूक करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने रुपये 44,55,625/- परत करण्याचा, तसेच व्याजापोटी रुपये 52,93,282/- व व्यावसायिक नुकसानीकरिता रुपये 15,00,000/- आणि शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,00,000/- देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
- तक्रारकर्त्यांच्या वकिलांचा तक्रार दाखल सुनावणी स्तरावर युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याने युक्तिवाद करतांना मा. राष्ट्रीय आयोगाच्या तक्रार अर्ज क्रं. 833/2020 एम.एस. प्यारीदेवी चाबीराज स्टील्स प्रा. लि. विरुध्द नॅशनल इन्श्युरन्स कंपनी या प्रकरणात पारित केलेल्या न्यायनिवाडयाचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने तक्रारीत मागणी केलेली रक्कम रुपये 44,55,625/- इतकी असल्याने सदरची तक्रार चालविण्याचा या आयोगास अधिकार आहे.
- तक्रारकर्त्याच्या वकिलांनी दाखल सुनावणी स्तरावर केलेला युक्तिवाद व तक्रारी सोबत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता आयोगाने सर्व प्रथम खालील मुद्दा विचारार्थ घेतला.
- प्रस्तुत तक्रार या आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येते काय ? नाही
- मुद्दा क्रं 1 बाबत - तक्रारकर्त्याने त्याच्या व्यवसायाच्या अनुषंगाने मशिनरी विकत घेण्याकरिता विरुध्द पक्षाकडे एकूण रक्कम रुपये 1,23,49,488/- इतकी रक्कम अदा केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या अनुषंगाने जिल्हा आयोगाच्या अधिकार क्षेत्राबाबत असलेली तरतुदी विचारार्थ घेणे गरजेचे आहे.
ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 34 (1) नुसार जिल्हा ग्राहक आयोगाच्या अधिकार क्षेत्राबाबत तरतुद स्पष्ट केली आहे. सदरच्या तरतुदीनुसार कोणत्याही वस्तू अथवा सेवेचे मोबदला मुल्य हे रुपये 50,00,000/- पेक्षा जास्त असल्यास सदरची तक्रार चालविण्याचे अधिकार आयोगास नाही. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून वस्तू / मशिनरी विकत घेतांना विरुध्द पक्षाला रक्कम रुपये 1,23,49,488/- इतकी अदा केलेली असल्यामुळे सदरची तक्रार या आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तक्रारकर्त्याने वस्तू विकत घेतांना दिलेल्या ले मोबदलाचे मुल्य हे रुपये 50,00,000/- पेक्षा जास्त असल्यामुळे प्रस्तुत तक्रार या आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने तक्रारकर्त्याला योग्य न्यायालयात प्रस्तुत तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात येते. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित. प्रस्तुत तक्रार जिल्हा आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने तक्रारकर्त्याला प्रस्तुत तक्रार योग्य न्यायालया समक्ष दाखल करण्याची मुभा देऊन प्रस्तुत तक्रार या आयोगातून नस्तीबध्द करण्यात येते. | |