Maharashtra

Dhule

CC/09/772

Devidas Atmaram Powar, Shinkheda Dhule - Complainant(s)

Versus

Samarth Sahakari Pathpedi Dhule - Opp.Party(s)

S. A. wagh

30 Jan 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/09/772
 
1. Devidas Atmaram Powar, Shinkheda Dhule
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Samarth Sahakari Pathpedi Dhule
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D. D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                            ग्राहक तक्रार क्रमांक –    ७७२/२००९


 

                                            तक्रार दाखल दिनांक –  ०१/१२/२००९


 

                                            तक्रार निकाली दिनांक –  ३०/०१/२०१३


 

 


 

१. देविदास आत्‍माराम पवार (अ.प.क. ३ व ४ साठी)                                


 

    वय- ४९, धंदा – नोकरी


 

२. निवेदना देविदास पवार                                


 

    वय- ३५, धंदा – घरकाम


 

३. पियुष देविदास पवार                                


 

    वय- १६, धंदा – शिक्षण


 

४. चेतन देविदास पवार                                


 

    वय- १४, धंदा – शिक्षण


 

    सर्व रा. ३१, विजय नगर पंचायत समितीच्‍या मागे,


 

    मु.पो.ता. शिंदखेडा, जि. धुळे.                                 ............ तक्रारदार


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

१.      अध्‍यक्ष


 

श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे                         


 

मुख्‍य कार्यालय, ११९९ श्री समर्थ भवन  


 

नगरपटटी धुळे.


 

२.      शाखा व्‍यवस्‍थापक


 

श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे                        


 

    शाखा शिरपुर ता. शिरपुर जि.धुळे.                           ...........विरुध्‍द पक्ष


 

 


 

कोरम


 

(मा.अध्‍यक्ष – श्री.डी.डी.मडके)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.डी.वाय. कुलकर्णी)


 

(विरुध्‍दपक्ष तर्फे – एकतर्फा)


 

निकालपत्र


 

 


 

सौ.एस.एस.जैन, सदस्‍याः तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती व बचत खाते तसेच आवर्ती ठेव योजना खाते अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

२.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजने अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशील खालील प्रमाणे.


 

 


 



































































पावती क्र.

रक्‍कम रूपये

ठेव दिनांक

देय तारीख

देय रक्‍कम

४९७५१

२५,०००/-

१३.०४.२००५

१३.०४.२०११

५०,०००/-

४९७५३

२५,०००/-

१३.०४.२००५

१३.०४.२०११

५०,०००/-

४९७५४

२५,०००/-

१३.०४.२००५

१३.०४.२०११

५०,०००/-

४९७३१

२५,०००/-

२४.०३.२००५

२४.०३.२०११

५०,०००/-

४९७३२

२५,०००/-

२४.०३.२००५

२४.०३.२०११

५०,०००/-

३५७६८

२५,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

५०,०००/-

३३७६३

३०,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

६०,०००/-

३३७६७

३०,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

६०,०००/-

३३७६६

२५,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

५०,०००/-

बचत खाते क्र.४०/३४० दि.२९.०५.२००८ रोजी रू.१४,८४०/-

आवर्ती ठेव योजना खाते क्र.३०८७ व पासबुक क्र.५२११ दि.२५.०९.२००७ रोजी रू.३६,२५०/-


 

 


 

३.    तक्रारदार यांनी मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजना  अन्‍वये  गुंतविलेल्‍या रक्‍कमेसाठी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेकडे वेळोवेळी मागणी केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम दिली नाही अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडून मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव  योजनेवरील  व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.


 

 


 

४.    विरुध्‍द पक्ष क्र.१ व २ हे मे. मंचाची नोटीस लागुनही हजर न झाल्‍याने,  विरूध्‍द पक्ष क्र.१ व २ यांच्‍याविरूध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला आहे.


 

 


 

५.    तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच व त्‍यांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद याचा विचार होता तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.


 

 


 

मुद्दे                                                                    उत्‍तर


 

 


 

१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय?                                           होय.


 

२. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी


 

   केली आहे काय?                                                       होय.


 

३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे?                अंतिम आदेशा प्रमाणे.


 

४. आदेश काय?                                                  खालील प्रमाणे.


 

 


 

विवेचन


 

 


 

६.    मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजना यांच्‍या छायांकीत प्रती सादर केलेल्‍या आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांच्‍या सदर पावत्‍यांची रक्‍कम नाकारलेली नाही. सदर पावत्‍यांवरील रक्‍कमेचा विचार होता तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

७.    मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजने मध्‍ये रकमा गुंतवल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजनेत गुंतवलेली रक्‍कम परत करणे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही विरुध्‍द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

८.    मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजनेची व्‍याजासह होणारी रक्‍कम श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे व विरूध्‍द पक्ष क्र.१ व २ यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदारांची मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजने अंतर्गत त्‍यांच्‍या सर्व खात्‍यावरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह देण्‍यास विरूध्‍द पक्ष श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे जबाबदार आहे. असे या न्‍यायालयाचे


 

 


 

 


 

 


 

मत आहे. या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या  न्‍यायिक  दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of MaharashtraCo-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of   co-operation, which is the very foundation of establishment ofthe co-operative societies.


 

 


 

 


 

      वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.   त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष क्र.१ व २ यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्‍याकडुन रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे. तसेच रक्‍कम परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते.


 

 


 

 


 

 


 

 


 

९.    मुद्दा क्र.४ - सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.


 

 


 

आ दे श


 

 


 

१.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.    श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्‍या मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजने मधील मुदतअंती देय रक्‍कम ठरलेल्‍या व्‍याजदरानुसार व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द.सा.द.शे. ६ टक्‍केप्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव, बचत खाते व आवर्ती ठेव योजना यांचा तपशील खालील प्रमाणे.


 



































































पावती क्र.

रक्‍कम रूपये

ठेव दिनांक

देय तारीख

देय रक्‍कम

४९७५१

२५,०००/-

१३.०४.२००५

१३.०४.२०११

५०,०००/-

४९७५३

२५,०००/-

१३.०४.२००५

१३.०४.२०११

५०,०००/-

४९७५४

२५,०००/-

१३.०४.२००५

१३.०४.२०११

५०,०००/-

४९७३१

२५,०००/-

२४.०३.२००५

२४.०३.२०११

५०,०००/-

४९७३२

२५,०००/-

२४.०३.२००५

२४.०३.२०११

५०,०००/-

३५७६८

२५,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

५०,०००/-

३३७६३

३०,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

६०,०००/-

३३७६७

३०,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

६०,०००/-

३३७६६

२५,०००/-

२६.०७.२००६

२६.०१.२०१३

५०,०००/-

बचत खाते क्र.४०/३४० दि.२९.०५.२००८ रोजी रू.१४,८४०/-

आवर्ती ठेव योजना खाते क्र.३०८७ व पासबुक क्र.५२११ दि.२५.०९.२००७ रोजी रू.३६,२५०/-


 

 


 

३.    श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.


 

 


 

४.                  वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.


 

 


 

         


 

             (सौ.एस.एस. जैन)                    (डी.डी.मडके)


 

                  सदस्‍या                           अध्‍यक्ष              


 

                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MR. D. D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.