Maharashtra

Dhule

CC/12/51

Suhas yadhav jogi sudharsha colony dhule - Complainant(s)

Versus

Samarth co op pat dhule nagarptti samarth buvab dhule - Opp.Party(s)

k r lohar

22 Mar 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/51
 
1. Suhas yadhav jogi sudharsha colony dhule
plot no 26 sudharshan colani Dhule
dhule
maharshtr
...........Complainant(s)
Versus
1. Samarth co op pat dhule nagarptti samarth buvab dhule
1199/a Nagarptti Shamartha Shakari Patpede Dhule
dhule
maharshtr
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                            ग्राहक तक्रार क्रमांक –    ५१/२०१२


 

                                            तक्रार दाखल दिनांक –  ०३/०३/२०१२


 

                                            तक्रार निकाली दिनांक –  २२/०३/२०१३


 

 


 

१. सुहास यादव जोगी                               


 

    उ.वय ४८, धंदा – निवृत्‍त


 

२. सिमा सुहास जोगी     


 

    उ.वय ४२, धंदा – घरकाम


 

३. यादव काशिनाथ जोगी


 

    उ.वय. ९५, धंदा- काही नाही


 

४. दिनेश यादव जोगी


 

    उ.व.४२, धंदा – नोकरी


 

५. प्रकाश यादव जोगी


 

    उ.व. ६२, धंदा – व्‍यवसाय


 

६. विजय प्रकाश जोगी


 

    उ.व. ३२, धंदा – व्‍यवसाय


 

७. माधुरी विलास जोगी


 

    उर्फ माधुरी नारायण निमीनकर (लग्‍नापुर्वी)


 

    उ.व. ४८, धंदा – घरकाम


 

८. चेतन विलास जोगी


 

    उ.व. २५, धंदा-व्‍यवसाय


 

    उपरोक्‍त नं.१ ते 9 सर्व राहणार


 

    प्‍लॉट नं.२६, सुदर्शन कॉलनी, धुळे.


 

    ता.जि. धुळे.                                              ............ तक्रारदार


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

१.      श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे. 


 

म. मॅनेजर सो.


 

११९९/अ, नगरपटटी, समर्थ भवन,


 

धुळे ता.जि. धुळे.


 

२.      सौ. कुमोदीनी पंचभाई - चेअरमन


 

श्री समर्थ सहकारी पतपेढी मर्या, धुळे


 

११९९/अ, नगरपटटी, समर्थ भवन,


 

धुळे ता.जि. धुळे.


 

 


 

३.      सचिन सुरेश कुलकर्णी


 

मुख्‍य कार्यकारी अधिकारी,


 

श्री समर्थ सहकारी पतपेढी मर्या, धुळे


 

सीलानी कॉलनी, झुंजार बंगल्‍याच्‍या मागे,


 

वाडीभोकर रोड, देवपूर धुळे.


 

ता.जि. धुळे.                                             ...........विरुध्‍द पक्ष


 

 


 

 


 

कोरम


 

(मा. अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

(मा. सदस्‍या – सौ.एस.एस. जैन)


 

 


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)


 

(विरुध्‍दपक्ष तर्फे – अॅड.वाय.बी. जोशी)


 

 


 

निकालपत्र


 

 


 

सौ.एस.एस. जैन, सदस्‍याः तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

 


 

२.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशील खालील प्रमाणे.


 

 


 

 


 














































































































































































































































































































अ.

नं.

तक्रार

दार क्र.

ठेव पावती क्र.

ठेव

तारीख

देय 

तारीख

मुदत   

व्‍याज

द.सा.द.शे.    

ठेव रक्‍कम

देय रक्‍कम

१.       


०२१५८७

०६-०२-०७

०८-०३-०७

३० दि.

%

७४९८०

७५४७३

२.       


०२१५८८

०६-०२-०७

०८-०३-०७

३० दि.

%

८४९६०

८५५१९

३.       


००४७३५

०५-१०-०६

०५-१०-०७

१ वि

११%

३०००

३३३०

४.       


००४७३६

०६-१०-०६

०७-१०-०७

१ वि

११%

४६००

५१०६

५.       


००४८८९

०७-१२-०६

०७-१२-०७

१ वि

११%

९३००

१०३२३

६.       


२६९७४

०९-०५-०६

०९-०५-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

७.       


३३९७७

८-८-०६

८-८-०८

२ वि

१२%

३८००

४७१३ + व्‍याज

८.       


३५७८०

६-६-५

६-६-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

९.       


००५३८९

५-५-७

५-७-०९

२ वि

१२%

४०००

४९६१ + व्‍याज

१०.  


००५४४७

६-८-७

५-८-०८

१ वि

११%

२८००

३१०८ + व्‍याज

११.  

,

००१०८९

२५-१०-०६

२५-४-०८

१९ वि

१२%

३००००

३०००० + व्‍याज

१२.  

,

३८१४०

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१३.  

,

३८१४१

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१४.  

,

३८१४२

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१५.  

,

३८१४३

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१६.  

,

३८१४४

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१७.  

,

१७७९

१-१-५

१-१-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१८.  


१७७५

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१९.  


१७७६

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२०.  


१७७७

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२१.  


१७७८

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२२.  


१७७४

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२३.  


१७६९

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२४.  


१७७०

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२५.  


१७७३

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२६.  


१७७१

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२७.  


१७७२

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२८.  

बचत खाते नं.४०/७५५ वरील दि.११-२-२०११ अखेरची शिल्‍लक मुदत ठेव पावतीच्‍या रक्‍कमेचा परतावा पोटीचा धनादेश क्र.२०४००७ दि.०९-१०-०७ वरील रक्‍कम

११०१९

१७९५८ + व्‍याज

२९.  

बचत खाते नं.४०/८८८ वरील दि.०७-१०-२०११ अखेरची शिल्‍लक

३७५५४

३०.  

बचत खाते नं.४०/१६८२ वरील दि.२८-०२-२००९ अखेरची शिल्‍लक

११२९५

३१.  

बचत खाते नं.४०/७५८ वरील दि.२०-०५-२०११ अखेरची शिल्‍लक

४२४५

एकूण घेणे रक्‍कम रूपये

८४४६०४ + व्‍याज


 

३.    तक्रारदार यांनी गुंतवलेल्‍या रकमेची मागणी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खाते मधील व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.


 

 


 

४.    विरूध्‍द पक्ष क्र.३ यांनी आपल्‍या लेखी खुलाश्‍यात असे म्‍हटले आहे की, तक्रारदारांनी संस्‍थेत रक्‍कम मागणीचा अर्ज सादर केल्‍यानंतर संस्‍थेतर्फे ठेवीदारांना दिल्‍याजाणा-या तडजोडीच्‍या प्रमाणात दरमहा रक्‍कम रू.५,०००/- पतपेढी तक्रारदारांना देण्‍यांस तयार होती परंतु तक्रारदारांनी रककम स्विकारण्‍यांस नकार दिल्‍यामुळे सदरची रक्‍कम हि पतपेढीत शिल्‍लक पडुन आहे. सदर बाब हि तक्रारदारांनी मे. न्‍यायमंचापासुन लपवुन ठेवलेली असुन सामनेवाला हयांच्‍या विरूध्‍द कारण नसतांना तक्रार दाखल करून सामनेवाला हयांना नाहक त्रासात व खर्चात टाकलेले आहे. सामनेवाला पतपेढीचा कर्मचारी असुन पतपेढीचे अगर ठेवीदारांचे रक्‍कम व्‍यक्‍तीशाः देण्‍याची जबाबदारी सामनेवाले यांची नाही. त्‍यामुळे त्‍यांना सदर तक्रारी अर्जातुन वगळणे व त्‍याच्‍या विरूध्‍दची मागणी रदद होणे कायदयाने आवश्‍यक आहे.


 

 


 

५.    विरूध्‍द पक्ष क्र.१ व त २ यांनी आपल्‍या खुलाश्‍यात असे म्‍हटले  आहे  की तक्रारदार नं.१ ते ८ यांनी स्‍वतंत्रपणे ठेवी ठेवलेली असल्‍याने सदर ठेवींबाबत सर्व तक्रारदारांनी  वेगवेगळा अर्ज मे. मंच दाखल करणे आवश्‍यक असतांना एक‍त्र रक्‍कमेचा सदर अर्ज कायदेशीर  नाही  व     टेनेबल नसल्‍याने  रदद  होणे आवश्‍यक  आहे.  मा.  मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या  आदेशानुसार  संचालक  मंडळास  संस्‍थेची रक्‍कम  देण्‍यासाठी वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविण्‍याचे आधिकार ग्राहक न्‍यायालयांना नाहीत. त्‍यामुळे तक्रार रदद करावी अशी त्‍यांनी विनंती केली आहे.


 

 


 

६.    विरूध्‍द पक्ष क्र.१ व २ यांनी  पुढे असे म्‍हटले आहे की, प्रस्‍तुत सामनेवाला नं.१ पतपेढीचा आर्थिक व्‍यवहार हा धुळे येथील सहकार खात्‍याचे पारीत केलेल्‍या आदेशा प्रमाणे ठेवींच्‍या रक्‍कमांचे वाटप करण्‍यासाठी कमिटी नेमण्‍यांत आलेली असुन व संस्‍थेचा संपुर्ण आर्थिक कारभार सध्‍या हया कमिटी मार्फत सुरू आहे. तसेच पतपेढीच्‍या नुकत्‍याच निवडणुका झालेल्‍या असुन नविन संचालक मंडळ हे निवडुन आलेले असल्‍यामुळे तक्रारदारांना रक्‍कम देण्‍याची जाबाबदारी येत नाही. तसेच म. उपनिबंधक साहेब, धुळे हयांनी दि.०७/०७/२०१० रोजीच्‍या आदेशान्‍व्‍ये पतसंस्‍थेकडे आलेल्‍या वसुलीतून कोणत्‍याही सभासदास/ ठेवीदारास ठेवीची रक्‍कम संस्‍थेमार्फत परस्‍पर देणेत येव नये.   तसे  केल्‍यास  त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी त्‍यांची राहील यांची गांभिर्याने नोंद घ्‍यावी. त्‍यामुळे सदर कामी पैसे वाटप करण्‍याचे कोणतेही अधिकार नसल्‍यामुळे पतसंस्‍था तर्फे मा.जिल्‍हाधिकारी साहेब धुळे हयांच्‍या अध्‍यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक १३/०८/२००८ च्‍या निर्णयाप्रमाणे जिल्‍हा कृती समिती स्‍थापन झालेली आहे. त्‍या मार्फतच ठेवीच्‍या रक्‍कमेचे वाटप करू शकतात. त्‍यामुळे सदर कामी सामनेवाला हयांनी अनुसुचित व्‍यवसाय पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे, सेवे संबंधीचा दर्जा, प्रकार कामकाजाची पध्‍दत यात दोष, अपुर्णता व त्रुटी आहे हि बाबा खोटी असुन तक्रारदाराने सामनेवालाकडे वेळोवेळी रक्‍कमेची मागणी केली तसेच सामनेवाला रककम देण्‍यांस चालढकल करीत आहे हि बाब देखील खोटी आहे.


 

७.    तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे व युक्‍तीवाद यांचा विचार होता तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.


 

मुद्दे                                                                    उत्‍तर


 

१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय?                                           होय.


 

२. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी


 

   केली आहे काय?                                                       होय.


 

३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे?                अंतिम आदेशा प्रमाणे.


 

४. आदेश काय?                                                  खालील प्रमाणे.


 

विवेचन


 

८.    मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावती व बचत खात्‍याच्‍या छायांकित प्रती नि. १० ते १३ वर दाखल केलेल्‍या आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांच्‍या मुदत ठेव पावती व बचत खात्‍यांवरील रक्‍कमा नाकारलेल्‍या नाहीत. मुदत ठेव पावत्‍या व बचत खातेमधील रक्‍कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत.    तसेच सर्व तक्रारदार हे एकाच कुटूंबातील असल्‍याने त्‍यांनी एकत्रीत रित्‍या दाखल केलेली ही तक्रार कायदेशीर रित्‍या चालण्‍यास योग्‍य आहे. त्‍यामुळे या बाबत विरुध्‍दपक्ष यांच्‍या वकीलांनी घेतलेला आक्षेप योग्‍य नाही असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

९.    मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे  पाहता  त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत रक्‍कमा गुंतवल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेव पावती व बचत खाते अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही विरुध्‍द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

१०.   मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खातेमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांचेकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडून आर्थिक, मानसिक, शारिरिक त्रासापोटी प्रत्‍येकी रक्‍कम रूपये १,००,०००/- दयावेत अशी मागणी केली आहे.


 

११.   तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्‍या मधील व्‍याजासह होणारी रक्‍कम श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे व विरूध्‍द पक्ष क्र.१ ते ३ यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

 As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of   co-operation, which is the very foundation of establishment ofthe co-operative societies.


 

 


 

वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.   त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.२ यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तसेच विरूध्‍द पक्ष क्र.३  हे पतसंस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांचा प्रत्‍यक्षरित्‍या पतसंस्‍थेच्‍या व्‍यवहारात त्‍यांचा संबंध नसल्‍याने त्‍यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. विरूध्‍द पक्ष क्र.१ श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्‍याकडुन रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे.  तसेच रक्‍कम परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्‍या कडून अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- व मानसिक त्रासापोटी रु.१०००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते.


 

१२.   मुद्दा क्र.४ - सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.


 

आ दे श


 

१.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.    श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात      नमुद असलेल्‍या मुदत ठेव पावत्‍या व बचत खाते मधील मुदतअंती देय रक्‍कम    ठरलेल्‍या व्‍याजदरानुसार दयावी व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत      द.सा.द.शे.६ टक्‍के प्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या दिनांपासून ३० दिवसाचे आत अदा    करावेत.   मुदत ठेव पावतींचा तपशील खालील प्रमाणे.


 

 


 

 


 

 


 














































































































































































































































































































अ.

नं.

तक्रार

दार क्र.

ठेव पावती क्र.

ठेव

तारीख

देय 

तारीख

मुदत   

व्‍याज

द.सा.द.शे.    

ठेव रक्‍कम

देय रक्‍कम

१.       


०२१५८७

०६-०२-०७

०८-०३-०७

३० दि.

%

७४९८०

७५४७३

२.       


०२१५८८

०६-०२-०७

०८-०३-०७

३० दि.

%

८४९६०

८५५१९

३.       


००४७३५

०५-१०-०६

०५-१०-०७

१ वि

११%

३०००

३३३०

४.       


००४७३६

०६-१०-०६

०७-१०-०७

१ वि

११%

४६००

५१०६

५.       


००४८८९

०७-१२-०६

०७-१२-०७

१ वि

११%

९३००

१०३२३

६.       


२६९७४

०९-०५-०६

०९-०५-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

७.       


३३९७७

८-८-०६

८-८-०८

२ वि

१२%

३८००

४७१३ + व्‍याज

८.       


३५७८०

६-६-५

६-६-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

९.       


००५३८९

५-५-७

५-७-०९

२ वि

१२%

४०००

४९६१ + व्‍याज

१०.  


००५४४७

६-८-७

५-८-०८

१ वि

११%

२८००

३१०८ + व्‍याज

११.  

,

००१०८९

२५-१०-०६

२५-४-०८

१९ वि

१२%

३००००

३०००० + व्‍याज

१२.  

,

३८१४०

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१३.  

,

३८१४१

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१४.  

,

३८१४२

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१५.  

,

३८१४३

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१६.  

,

३८१४४

२-३-०५

२-३-०८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१७.  

,

१७७९

१-१-५

१-१-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१८.  


१७७५

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

१९.  


१७७६

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२०.  


१७७७

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२१.  


१७७८

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२२.  


१७७४

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२३.  


१७६९

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२४.  


१७७०

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२५.  


१७७३

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२६.  


१७७१

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२७.  


१७७२

३१-१२-४

३१-१२-८

३ वि

१३%

३००००

३०००० + व्‍याज

२८.  

बचत खाते नं.४०/७५५ वरील दि.११-२-२०११ अखेरची शिल्‍लक मुदत ठेव पावतीच्‍या रक्‍कमेचा परतावा पोटीचा धनादेश क्र.२०४००७ दि.०९-१०-०७ वरील रक्‍कम

११०१९

१७९५८ + व्‍याज

२९.  

बचत खाते नं.४०/८८८ वरील दि.०७-१०-२०११ अखेरची शिल्‍लक

३७५५४

३०.  

बचत खाते नं.४०/१६८२ वरील दि.२८-०२-२००९ अखेरची शिल्‍लक

११२९५

३१.  

बचत खाते नं.४०/७५८ वरील दि.२०-०५-२०११ अखेरची शिल्‍लक

४२४५

एकूण घेणे रक्‍कम रूपये

८४४६०४ + व्‍याज


 

 


 

 


 

३.    श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्‍या दिनांपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.


 

 


 

४.    वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.


 

 


 

 


 

 


 

                   (सौ.एस.एस. जैन)                 (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                       सदस्‍या                         अध्‍यक्षा


 

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे.


 

 
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.