Maharashtra

Nagpur

CC/465/2015

ARUN MANIKRAO CHAUDHARY - Complainant(s)

Versus

SAMALOCAHAN EKTA CO-OP. HOUSING SOCIETY LTD.-PRESIDENT SHEIKH MAHBOOB S. ISMAIL - Opp.Party(s)

PANKAJ A. TAMBOLI

17 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/465/2015
( Date of Filing : 25 Aug 2015 )
 
1. ARUN MANIKRAO CHAUDHARY
Trimurti Nagar Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SAMALOCAHAN EKTA CO-OP. HOUSING SOCIETY LTD.-PRESIDENT SHEIKH MAHBOOB S. ISMAIL
Nagpur 02
Nagpur
Maharashtra
2. Huned Bhai Mulla J. Bhai C/o Sheikh Mahboob S. Ismail
Nagpur 440002
Nagpur
Maharashtra
3. Sheikh Mahboob S. Ismail
Nagpur 02
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Feb 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही हाऊसिंग सोसायटी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे समालोचन एकता को-ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी लिमी. चे अध्‍यक्ष आहे आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ही सचिव आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा वांजरा, पटवारी हलका नंबर १७ येथील लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ७६ आणि ७७ एकूण क्षेञफळ १२०० चौरस फुट प्रत्‍येकी एकूण रुपये ६०,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी दिनांक १६/१/१९९९ रोजी केला. तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍याचे दिवशी नोंदणी शुक्‍ल रुपये १,०००/- विरुध्‍द पक्षाला अदा केले. विक्रीपञ करारनाम्‍याचे दिवशी विरुध्‍द पक्षाने कबुल केले की, दोन्‍ही प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी रुपये ६०,०००/- रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावर करण्‍यात येईल. तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍यानूसार विरुध्‍द पक्षाला हफ्त्‍याने रक्‍कम रुपये ६०,०००/- अदा केली व विरुध्‍द पक्षाने रक्‍कम मिळाल्‍याची पावती तक्रारकर्त्‍याला अदा केली. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम विरुध्‍द पक्षाला अदा केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी करुन देण्‍याबाबत विनंती केली. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी करुन देण्‍याबाबत वारंवार विनंती केल्‍यावर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे कब्‍जापञ दिले.
  3. विरुध्‍द पक्षाने लेआऊट मधील प्‍लॉट क्रमांक ७५ चे विक्रीपञ नोंदणी लावून दिल्‍याचे तक्रारकर्त्‍याला कळले. परंतु तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट क्रमांक ७६ व ७७ चे विक्रीपञ लावून दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत दिनांक ७/३/२०१५ रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारकर्त्‍याने दिनांक ७/३/२०१५ रोजी पाठविलेली नोटीस अनक्‍लेम शे-यासह परत आली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की त्‍याने तक्रारकर्त्‍याला विक्रीपञ नोंदणी करुन द्यावे किंवा विरुध्‍द पक्षाला प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट विक्रीपोटी अदा केलेली रक्‍कम रुपये ६०,०००/- १८ टक्‍के व्‍याज दराने परत करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ३,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ३०,०००/- अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ मंचासमक्ष हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २०/०३/२०१७ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्‍तीवाद तसेच तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित केले आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                     उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा वांजरा, पटवारी हलका नंबर १७ येथील लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ७६ आणि ७७ एकूण क्षेञफळ १२०० चौरस फुट प्रत्‍येकी एकूण रुपये ६०,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी दिनांक १६/१/१९९९ रोजी केला. तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍याचे दिवशी नोंदणी शुक्‍ल रुपये १,०००/- विरुध्‍द पक्षाला अदा केले. विक्रीपञ करारनाम्‍याचे दिवशी विरुध्‍द पक्षाने कबुल केले की, दोन्‍ही प्‍लॉटचे विक्रीपञ नोंदणी रुपये ६०,०००/- रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावर करण्‍यात येईल. तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍यानूसार विरुध्‍द पक्षाला हफ्त्‍याने रक्‍कम रुपये ६०,०००/- अदा केली व विरुध्‍द पक्षाने रक्‍कम मिळाल्‍याची पावती तक्रारकर्त्‍याला अदा केली. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक ४ वर दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट नंबर ७६ व ७७ चे विक्रीपञ नोंदनी करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे. 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला मौजा वांजरा, पटवारी हलका नंबर १७, प्‍लॉट नंबर ७६ व ७७, एकूण क्षेञफळ २४०० चौरस फुट  प्‍लॉटचे  कायदेशीर विक्रीपञ लावून द्यावे. विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

किंवा

          सदर भुखंड क्रमांक ७६ व ७७ चे नोंदणी करण्‍यास कोणत्‍याही प्रकारे कायदेशीर व तांञिक अडचण आल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी २४००  चौरस फुट इतके क्षेञफळ असलेल्‍या  भुखंडासाठी मौजा वांजरा  तह.जिल्‍हा  नागपूर  झोनमधील अथवा नजीकच्‍या  इतर झोनमध्‍ये  २४०० चौरस फुट अकृषक भुखंडासाठी शासकीय दराने आदेशाच्‍या  दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या  दिनांकापासुन एक महिण्‍याच्‍या आत द्यावी आणि सदरहु रक्‍कम एक महिण्‍याच्‍या  आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर दिनांक १७/०२/२०२१ पासुन द.सा.द.शे. ६ टक्‍के  दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ आदेशीत करण्‍यात येते की, विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.