Maharashtra

Satara

CC/14/92

ROHAN PRAKASH WADKAR - Complainant(s)

Versus

SAM KANSEPT TECNOLOGY PVT LTD - Opp.Party(s)

VIKAS JAGDALE

29 Oct 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/14/92
 
1. ROHAN PRAKASH WADKAR
NISARG, GREEN PARK ,SIDHNATH WADI, WAI,
SATARA
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SAM KANSEPT TECNOLOGY PVT LTD
WING B THIRD FLOOR, SENAPATI BAPAT MARG, PUNE,
PUNE
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                     मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.            

             

                तक्रार अर्ज क्र. 92/2014.

                      तक्रार दाखल दि.12-06-2014.

                            तक्रार निकाली दि.29-10-2015. 

 

 

श्री. रोहन प्रकाश वाडकर,

रा. निसर्ग ग्रीन पार्क,सिध्‍दनाथनाडी,

ता.वाई, जि.सातारा.                               ‍ ...  तक्रारदार.

  

         विरुध्‍द

 

1. सम कंसेप्‍ट टेक्‍नॉलॉजीज प्रा.लि.,

   संचालक चेतन खोजा

   विंग बी, तिसरा मजला, प्रा.1 च्‍या वर,

   ऑडी शोरुम, सेनापती बापट रोड,

   पुणे 411 013.

2. ला पोर्टल क्‍लब,

   प्रोप्रा. उदय कोटनीस,

   फ्लॅट नं.ए-601,स.नं.59/60,

   वॉटर फ्रंट सोसायटी, कल्‍याणनगर,

   येरवडा, पुणे 411 006

3. तिलेश गणपत जाधव,

   प्रभात कॉलनी, महाड,जि.रायगड,

   हल्‍ली मु.गणपत आळी, वाई,जि.सातारा.                ....  जाबदार.

 

                               

 

                                                                      तक्रारदारातर्फे अँड.व्‍ही.पी.जगदाळे.

                                जाबदार क्र. 1 तर्फे अँड.डी.पी.देशपांडे.                           

                    जाबदार क्र.2  एकतर्फा.

                                  जाबदार क्र.3 तर्फे- अँड.एम.एम.ताथवडेकर.                  

 

न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                     

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

    तक्रारदार हे निसर्ग ग्रीन पार्क, सिध्‍दनाथवाडी, ता.वाई,जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी आहेत.  जाबदार क्र. 1 हे वादातीत सॉफ्टवेअर निर्माण करणारे उत्‍पादनकर्ता असून जाबदार क्र. 2 हे मार्केटींग बाजार विपनन करत असून, जाबदार क्र.3 हे जाबदार क्र. 1 व 2 चे प्रतिनिधी आहेत.  मे. 2012 रोजी वर्तमानपत्रामध्‍ये जाबदाराने प्रकाशीत केलेली जाहीरात वाचून जाबदार क्र. 2 बरोबर संपर्क साधला, त्‍यांनतर जाबदार क्र.3 ने तक्रारदाराशी संपर्क साधला.  वाई जि.सातारा या प्रगतशील गावात शैक्षणिक सॉफ्टवेअर जे इयत्‍ता 1 ली ते 10 वी साठी उपयोगी आहे त्‍याचे विपनन/मार्केटींग करण्‍याचे काम सोपविण्‍यासाठी वारंवार जाबदार क्र. 3 हे तक्रारदाराला सदर सॉफ्टवेअरची माहिती देत राहीले.  तक्रारदार हे शैक्षणिक पार्श्‍वभूमी असणारे व शिक्षण संस्‍थामध्‍ये ओळखी असणारे व्‍यक्‍ती असल्‍यामुळे तक्रारदाराने जाबदारांवर विश्‍वास ठेवून स्‍वतःच्‍या उपजीविकेसाठी सदरचे 50 सॉफ्टवेअर रक्‍कम रुपये 3,50,000/- (रुपये तीन लाख पन्‍नास हजार मात्र) भरुन खरेदी केले.  प्रस्‍तुत 50 सॉफ्टवेअरमधील केवळ चार सॉफ्टवेअर विकण्‍यात आले.  मात्र जाबदार क्र. 1 व 2 यांच्‍यात झालेल्‍या करारामध्‍ये  काहीतरी प्रश्‍न निर्माण झाला आहे.  त्‍यामुळे कॉम्‍पकिन माईस्‍ट्रो एज्‍युकेशनल सॉफ्टवेअरबाबत परवान्‍याचे प्रश्‍न निर्माण झाले.  त्‍यामळे प्रस्‍तुत सॉफ्टवेअरचे लायसेन्‍स कोड रद्द केले गेले आणि प्रस्‍तुतचे रद्द केलेले कोडचे सॉफ्टवेअर तक्रारदार यांना विक्री करणे अवघड झालेने ते विक्री न करता तसेच पडून राहीले.  प्रस्‍तुत बाबतीत जाबदार क्र. 1 ते 3 यांचेशी संपर्क साधला असता, जाबदार यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली व प्रस्‍तुतची तक्रारदारकडे असलेली सॉफ्टवेअर जाबदार यांनी परत घेतली नाहीत व तक्रारदाराने सॉफ्टवेअरसाठी जाबदारांकडे अदा केलेली रक्‍कम ही परत तक्रारदाराला दिली नाही.  सबब तक्रारदाराने जाबदाराला वकिलांमार्फत नोटीस पाठविली.  सदरची  नोटीस जाबदाराला मिळूनही जाबदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही.  म्‍हणून तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.

2.   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार हे सेवेतील त्रुटीबाबत दोषी आहेत असे घोषीत करणेत यावे, जाबदार यांनी तक्रारदाराकडून ऊर्वरीत सॉफ्टवेअर परत घेऊन तक्रारदार यांना रक्‍कम रु.3,50,000/- परत अदा करावेत, दरम्‍यानचे नुकसानीबाबत रक्‍कम रु.50,000/- जाबदाराने तक्रारदाराला द्यावेत, प्रस्‍तुत रकमेवर रक्‍कम पदरी पडेपर्यंत 18 टक्‍के व्‍याज जाबदाराने तक्रारदाराला अदा करावे, तक्रारीचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- जाबदारांकडून मिळावा, तसेच मानसीक शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- जाबदार यांचेकडून तक्रारदाराला मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

3.   तक्रारदाराने याकामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/5 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 2 कंपनीची जाहीरात, तक्रारदार यांच्‍या वडिलांचे नावे डिस्‍ट्रीब्‍युटर फॉर्म, तक्रारदाराने जाबदाराला रक्‍कम अदा केलेचे बँक पासबुक, तक्रारदाराने जाबदार यांना वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस व त्‍याची पोहोचपावती, जाबदार नं. 1 ने पाठवलेले नोटीस उत्‍तर, नि. 16 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 17 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केले आहेत.

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 विरुध्‍द ‘म्‍हणणे नाही’ (No-Say) आदेश नि. 1 वर पारीत झालेला असून  जाबदार क्र. 3 यांनी प्रस्‍तुत कामी नि. 15 कडे म्‍हणणे/कैफीयत दाखल केली आहे. जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.

i   तक्रार अर्जातील अंशतः मजकूर खरा व बरोबर आहे.  तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे वादातीत सॉफ्टवेअर त्‍याचे लायसेन्‍स कोड रद्द केल्‍याने ते विकता येत नाहीत.  जाबदार क्र. 1 व 2 यांचेतील वादामुळे प्रस्‍तुत लायसेन्‍स कोड रद्द केल्‍याने सदर सॉफ्टवेअरची विक्री करता येत नसलेने पडून आहेत हे म्‍हणणे खरे व बरोबर आहे.  तसेच प्रस्‍तुत तक्रारीबाबत जाबदार क्र. 3 यांना खेद आहे. जाबदार क्र. 3 ने तक्रारदाराला जाबदार क्र. 1 व 2 यांनी दिले सेवात्रुटीसाठी वारंवार जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून तक्रारदाराला रक्‍कम परत देणेसाठी प्रयत्‍न केले आहेत.

ii     जाबदार क्र. 3 हे जाबदार क्र. 1 व 2 चे केवळ कर्मचारी तत्‍वावर मार्केटींगचे काम करतात.  त्‍यामुळे तक्रारदाराला दिले सेवा त्रुटीत जाबदार क्र. 3 हे जबाबदार नसून जाबदार क्र. 1 व 2 हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत.  जाबदार क्र. 3 ने तक्रारदार यांची सॉफ्टवेअर जाबदार क्र. 1 व 2 यांनी परत घेऊन तक्रारदाराची रक्‍कम परत करावी यासाठी खूप प्रयत्‍न करुनसुध्‍दा जाबदार क्र. 1 व 2 ने जाबदार क्र. 3 चे प्रयत्‍नाना कोणतीही दाद दिलेली नाही.  केवळ टाळाटाळ केली.  जाबदार क्र. 3 यांना तक्रारदाराला झाले नाहक त्रासाबाबत सहानुभूती आहे.  मात्र जाबदार क्र.3 हे केवळ जाबदार क्र. 1 व 2 वे कर्मचारी असलेने त्‍यांनी सॉफ्टवेअर मार्केटींगचे काम केले आहे.  जाबदार क्र. 1 व 2 यांचे निर्णयात सहभागी होणेचा जाबदार क्र. 3 ला कोणताही अधिकार नाही.  त्‍यामुळे जाबदार क्र. 3 यांना जबाबदार धरणेस कोणताही कायदेशीर आधार नाही.  सबब जाबदार क्र. 3 यांना याकामी जबाबदार धरु नये.

iii   तक्रारदाराला दिले सेवात्रुटी साठी जाबदार क्र. 1 व 2 हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत त्‍यामुळे जाबदार क्र. 1 व 2 यांनाच जबाबदार धरणेत यावे. अशाप्रकारचे म्‍हणणे जाबदार क्र. 3 ने याकामी दाखल केले आहे.

     प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही.  त्‍यांनी तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ने लेखी युक्‍तीवाद नि. 25 कडे दाखल केला आहे.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ने लेखी युक्‍तीवाद नि. 25 कडे दाखल केला आहे.  प्रस्‍तुत युक्‍तीवादात तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक नाही कारण तक्रारदाराने जाबदार क्र. 3 कडून सॉफ्टवेअर खरेदी करताना तक्रारदाराचे वडिलांचे नावे वितरक फॉर्म भरुन घेतला व त्‍या फॉर्मवर खरेदीदार म्‍हणून तक्रारदाराने स्‍वतःची सही केली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे कोणत्‍याही प्रकारे ग्राहक होत नाहीत.  तसेच प्रस्‍तुत सॉफ्टवेअर हे तक्रारदाराने विकण्‍यासाठी खरेदी केले असलेने तक्रारदार हे गाहक या संज्ञेत येत नाहीत. त्‍यामळे प्रस्‍तुत तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही असा युक्‍तीवाद जाबदार क्र. 1 ने दाखल केला आहे.

5.  वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे मंचाने प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.क्र.               मुद्दा                            उत्‍तर

 1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत  काय?                    होय.                                  

 2.  जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?      होय.

 3.  तक्रारदार हे जाबदार यांचेकडून सॉफ्टवेअर खरेदीची रक्‍कम

     परत मिळणेस पात्र आहेत काय?                             होय.

 4.  अंतिम आदेश काय?                                 खालील नमूद

                                                      आदेशाप्रमाणे.

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने जाबदार क्र. 2 यांचेकडून दि.6/6/2012 रोजी कॉम्‍पकीन माईस्‍ट्रो एज्‍युकेशनल सॉफटवेअर चे 50 सॉफ्टवेअर घेतले होते.  प्रस्‍तुतचे सॉफटवेअर हे जाबदार क्र. 1 यांनी निर्मीती केलेले आहे तर जाबदार क्र.2 हे मार्केटिंग//विपनन करम असून जाबदार क्र. 3 हे जाबदार क्र.1 व 2 यांचे कर्मचारी वजा प्रतिनिधी आहेत.  तक्रारदार हे सुशिक्षित बेरोजगार असून त्‍यांना उपजिविकेचे कोणतेही साधन नसल्‍यामुळे स्‍वतःच्‍या उपजीविकेसाठी काहीतरी उत्‍पन्‍न मिळावे म्‍हणून तक्रारदाराने जाबदारांचेवर विश्‍वास ठेवून तक्रारदाराने 50 सॉफ्टवेअर जाबदाराकडून खरेदी घेतले.  प्रस्‍तुत बाब जाबदार क्र. 3 ने मान्‍य केली आहे.  सबब तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे नाते आहे हे निर्विवाद स्‍पष्‍ट होते. तक्रारदार हे सुशिक्षीत बेकार आहेत त्‍यांना कोणतेही उत्‍पन्‍नाचे साधन नव्‍हते.  त्‍यामुळे तक्रारदार स्‍वतः रक्‍कम रु.3,50,000/- जाबदाराला अदा करु शकत नसलेने तक्रारदाराने त्‍यांचे आईचे सौ. वैशाली प्रकाश वाडकर यांचे जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेत असणा-या खातेवरील धनादेश क्र.891753 रक्‍कम रु.3,50,000/- चा जाबदार यांना अदा केला आहे व प्रस्‍तुत धनादेशाची रक्‍कम जाबदारांना मिळालेली आहे हे नि. 5/3 कडे दाखल बँक खाते उता-यावरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारदाराने सॉफ्टवेअर खरेदीचेवेळी वितरकफॉर्म श्री. प्रकाश सखाराम वाडकर (तक्रारदाराचे वडील) यांचे नावे भरलेला असून जाबदारानेच तक्रारदाराचे वडिलांचे नांव प्रस्‍तुत वितरक फॉर्मवर लिहीले आहे.  तक्रारदार यांना फसविणेचे उद्देशाने जाबदाराने सदर तक्रारदाराचे वडिलांचे नाव वितरक म्‍हणून फॉर्म भरला आहे हे स्‍पष्‍ट होते.  तसेच तक्रारदाराने त्‍याचे आईवडिलांचे संमतीनेच सदरचे सॉफ्टवेअर खरेदी केले होते हे स्‍पष्‍ट होते.  ग्राहक संरक्षण कायद कलम 2 (d) (i) प्रमाणे ग्राहक म्‍हणजे  Consumer means – i.  buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised or under any system of deferred payment and includes any user of such good] other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or  partly promised or under any system of deferred payment when wuch use is made with the approval of such person] but does not include or person who obtains such goods for resale or for any commercial purpose or.     

      प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने सदरचे सॉफटवेअर हे स्‍वतःच्‍या व कुटूंबाच्‍या उदरनिर्वाहासाठी खरेदी केले होते. प्रस्‍तुत सॉफ्टवेअर हे व्‍यापारी हेतूसाठी तक्रारदाराने खरेदी केले होते व त्‍यातून तक्रारदार यांचा जास्‍तीत जास्‍त नफा मिळविणेचा व्‍यापारी हेतू होता ही बाब जाबदाराने सिध्‍द केलेली नाही.  सबब तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येतो असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

7.  वर नमूद मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडून एकूण 50 सॉफ्टवेअर (कॉम्‍पकिन माईस्‍ट्रो एज्‍युकेशनल सॉफ्वेअर) रक्‍कम रु.3,50,000/- या किंमतीस खरेदी केले.  परंतू यापैकी फक्‍त चार सॉफ्टवेअरची विक्री झाली परंतू दरम्‍यानच्‍या काळात जाबदार क्र. 1 व 2  यांचेमध्‍ये झालेल्या जॉईंट व्‍हेंचरमध्‍ये काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत आणी त्‍यामुळे कॉम्‍पकिन माईस्‍ट्रो एज्‍युकेशनल सॉफ्टवेअरचे बाबत परवान्‍याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत त्‍यामुळे ऊर्वरीत 46 सॉफ्टवेअरची विक्री करता येत नाही.  प्रस्‍तुत जाबदार क्र. 1 व 2 यांचेतील असले मतभेदामुळे प्रस्‍तुत सॉफ्टवेअर विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे व त्‍यामुळे परवान्‍याबाबत (लायसेन्‍स) बाबत प्रश्‍न निर्माण झालेने सदर उर्वरित सॉफ्टवेअर विक्री करता येत नसलेने तक्रारदाराने रक्‍कम रु.3,50,000/- जाबदारांच्‍या मतभेदामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले आहे.  सबब तक्रारदाराने जाबदार क्र. 3 चे माध्‍यमातून जाबदार क्र. 1 व 2 यांना प्रस्‍तुत सॉफ्टवेअर परत घेवून तक्रारदाराने अदा केलेली रक्‍कम रु.3,50,000/- परत करावेत अशी विनंती करुनही व जाबदार क्र. 3 ने तक्रारदाराची रक्‍कम परत करणे आवश्‍यक आहे असे जाबदार क्र. 1 व 2 यांना सांगूनही जाबदार क्र. 1 व 2 हे तक्रारदाराचे ताबेतील ऊर्वरीत 46 सॉफ्टवेअर परत घेवून तक्रारदाराची रक्‍कम रु.3,50,000/- तक्रारदार यांना अदा करत नाहीत टाळाटाळ करत आहेत. तक्रारदार यांना फसविणेसाठी व तक्रारदारकडून बेकायदेशीरपणे रक्‍कम हडप करणेसाठी जाबदार क्र. 1 ते 3 यांनी केलेली (अवलंबिलेली) अनुचित व्‍यापार पध्‍दती आहे असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  अशाप्रकारे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना अनुचित व्‍यापारी व्‍यवस्‍थेचा अवलंब करुन एज्‍यूकेशनल सॉफ्टवेअर खरेदी करणेस भाग पाडले व जाबदारांचे दरम्‍यान असले जॉईंट व्‍हेंचरमध्‍ये प्रश्‍न उपस्थित झालेने मतभेद झालेले सॉफ्टवेअरबाबत परवान्‍याचा प्रश्‍न (लायसेन्‍सबाबत) प्रश्‍न निर्माण झालेने सदर सॉफ्वेअरची विक्री करता येत नाही.  परंतू याचा भूर्दंड तक्रारदाराने सोसणे न्‍यायोचीत होणार नाही.  तर जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराचे ताबेतील उर्वरित 46 सॉफ्टवेअर परत घेऊन तक्रारदाराची रक्‍कम रु.3,50,000/- तक्रारदार यांना परत अदा करणे न्‍यायोचीत होणार आहे.  ती जाबदाराने न दिलेने व टाळाटाळ केलेने तक्रारदार यांना सदोष सेवा जाबदाराने पुरविलेचे स्‍पष्‍ट होत आहे.  सबब मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.  सबब जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे रक्‍कम रु.3,50,000/- रुपये तीन लाख पन्‍नास हजार मात्र) अदा करावेत.  तक्रारदाराने त्‍याचे ताबेतील 46 वादातीत एज्‍यूकेशनल सॉफ्टवेअर जाबदारांचे ताब्‍यात द्यावेत.  तसेच जाबदार क्र. 3 हे केवळ कर्मचारी असलेने जाबदार क्र. 3 यांना यामाकी जबाबदार धरणे न्‍यायोचीत वाटत नाही.  त्‍यामुळे जाबदार क्र. 3 यास जबाबदारीतून वगळणे उचित होणार आहे असे आम्‍हास वाटते.  सबब तक्रारदार हे जाबदार यांचेकडून प्रस्‍तुत वादातीत सॉफ्टवेअर जाबदार यांना परत देऊन प्रस्‍तुत सॉफ्टवेअरची रक्‍कम रु.3,50,000/- (रुपये तीन लाख पन्‍नास हजार मात्र) जाबदार यांचेकडून परत मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  त्‍यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.           

     सबब प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांचे ताबेतील 46 एज्‍यूकेशनल सॉफ्टवेअर परत घेऊन तक्रारदार यांना रक्‍कम रु.3,50,000/- (रुपये तीन लाख पन्‍नास हजार मात्र) अदा करावेत तसेच प्रस्‍तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज जाबदार क्र. 1 व 2  यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला अदा करणे न्‍यायोचीत होणार आहे. 

 8.   सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.   

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2. जाबदार क्र. 1 व 2  यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांचे ताबेतील 46

   मॅन्‍युअल सॉफ्टवेअर परत स्विकारुन तक्रारदार यांना त्‍यांची रक्‍कम रु.3,50,000/-

   (रुपये तीन लाख पन्‍नास हजार मात्र) अदा करावेत.

3. प्रस्‍तुत रक्‍कम रु.3,50,000/- या रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून प्रत्‍यक्ष हाती

   पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजदराने होणारे व्‍याज जाबदार क्र. 1 व 2 यांनी

   वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला अदा करावे.

4. जाबदार क्र. 1 व 2  यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना झाले मानसिक

   त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- (रुपये पंधरा हजार मात्र) अदा करावेत.

  

5. जाबदार क्र. 1 व 2  यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना तक्रारअर्जाचा

   खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र ) अदा करावेत.

6.  वरील जबाबदारीतून जाबदार क्र. 3 यांना ते कर्मचारी असलेने वगळणेत येते.

7. वरील सर्व आदेशांची पूर्तता/पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45

   दिवसात करावी.

8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 व 2  यांनी  न केल्‍यास तक्रारदार

   यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्‍द कारवाई करणेची

   मुभा राहील.

9. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

10. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

ठिकाण- सातारा.

दि. 29-10-2015.

 

      (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

       सदस्‍या           सदस्‍य             अध्‍यक्षा

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.