नि का ल प त्र :- (दि. 20/09/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंचे वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला संस्था ही इंग्रजी माध्यमातून फॅशन डिझायनिंग चा कोर्स देणारी शिक्षण संस्था आहे. तक्रारदारांना फॅशन डिझायनिंगचे शिक्षण इंग्रजीमधून दि. 28/06/2010 रोजी रक्कम रु. 10,000/- सामनेवाला संस्थेत भरुन रितसर प्रवेश घेतला. प्रवेश घेतेवेळी फॅशन डिझायनिंगचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिले जाईल व भरपूर प्रमाणात सराव घेतले जातील व दि. 1/07/2010 रोजीपासून क्लास चालू होतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात दि. 16/08/2010 रोजी पासून क्लास चालू केले. परंतु सदरचे क्लास हे मराठी माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकारचा सरावही(Practical) तक्रारदारांना दिले नाहीत. तक्रारदारांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून तक्रारदारांना शिकण्यासाठी अडचणी निर्माण झाली. सदर वस्तुस्थितीबाबत तक्रारदारांनी दि. 14/09/2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून प्रवेश फी परत देण्याची मागणी केली परंतु तक्रारदारांना सदरची फी परत दिलेली नाही. सबब, सामनेवाला यांना प्रवेश फी रक्कम रु. 10,000/-, शैक्षणिक नुकसानी रक्कम रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5,000/- अशी एकूण रक्कम रु. 65,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेकडे प्रवेश घेतल्याची पावती, व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, व त्याची पोहच पावती इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी त्यांचे म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात तक्रारदारांची तक्रार चुकीची आहे. सामनेवाला संस्थेतून इंग्रजी व मराठी या माध्यमातून डिझायनिंगचे कोर्स शिकविले जातात. याबाबतचा तक्रारदारांचे शैक्षणिक नुकसानीबाबतचा मजकुर चुकीचा आहे. तक्रारदारांची मावशी सामनेवाला संस्थेमध्ये रुजू होत्या. तक्रारदार हे सामनेवाला यांचेमध्ये वैयक्तिक हेवेदावेमुळे त्यांना कामावरुन कमी केले असलेमुळे त्यांनी चिडून जावून वैयक्तीक रागापोटी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीमध्ये सामनेवाला यांचेकडून फीची रक्कम परत मिळाल्याचे मान्य कबूल केले आहे. केवळ नोटीसीस उत्तर न दिलेने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना कधीही शिक्षण सेवा देणेचे नाकारलेले नाही. त्यांची शिक्षण देण्याची पूर्ण तयारी आहे. तक्रारदारांचे पुढील शिक्षण घेणेची तयार नाही. तक्रारदार व त्यांचे मावशीने संगनमताने त्रास देण्याच्या दृष्टीने सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब, सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. (5) प्रस्तुत प्रकरणी या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद विस्तृत व सविस्तरपणे ऐकला. सामनेवाला संस्था ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स देणारी संस्था आहे. सदरचा कोर्स हे मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून दिले जातात ही वस्तुस्थिती सामनेवाला यांचे वकिलांनी युक्तीवादाच्यावेळेस या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. सदर फॅशन डिझायनिंगचा कोर्ससाठी तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेत रक्कम रु. 10,000/- फी भरलेली आहे याबाबतची पावतीची झेरॉक्स प्रत प्रस्तुत कामी दाखल केली आहे. परंतु सामनेवाला संस्थेने सदर फॅशन डिझायनिंगचा कोर्स देण्याचे नाकारलेले आहे ही वस्तुस्थिती दिसून येत नाही. तसेच सामनेवाला संस्थेने सराव (Practical) घेतलेले नाहीत व त्यास तक्रारदारांना प्रतिबंध केलेला नाही. ही वस्तुस्थिती दोन्ही बाजूंचे वकिलांचा युक्तीवाद विचारात घेता दिसून येत नाही. सामनेवाला संस्थेने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे हे दिसून येत नाही. सबब, प्रस्तुतची तक्रार नामंजूर करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |