Maharashtra

Ahmednagar

CC/15/352

Uday Padmakar Panase - Complainant(s)

Versus

Sajjubhai Transport - Opp.Party(s)

Kulkarni

04 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/352
( Date of Filing : 26 Aug 2015 )
 
1. Uday Padmakar Panase
Director-Astron Automotive Pvt.Ltd.Shop No.3,Akshay Building,Lal Taki Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sajjubhai Transport
Near Grahak Bhandar,Juna Dane Dabara,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Kulkarni, Advocate
For the Opp. Party: Pathan, Advocate
Dated : 04 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारदार यांचा अॅस्‍ट्रॉन अॅटोमोटिव्‍ह प्रा.लि. या नावाने विविध कंपन्‍याचे ऑईल खरेदी विक्रीचा व्‍यवसाय आहे. श्री.उदय पद्माकर पानसे हे सदरील कंपनीचे डायरेक्‍टर आहेत. सदरील फर्म ही रजिस्‍टर्ड प्रा.लि. कंपनी असून तिची नोंदणी कंपनी कायद्याप्रमाणे झालेली आहे. सदरील फर्ममधुन तक्रारदार हे वेगवेगळया कंपन्‍याचे ऑईल ठोक व किरकोळ स्‍वरुपात विक्री करण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारदार हे त्‍यांचेकडे दुकानदार यांच्‍या आलेल्‍या ऑर्डर्स प्रमाणे माल पोहोच करतात. सामनेवाले यांचा ग्राहक भांडार शेजारी, जुना दाणे डबरा अहमदनगर येथे सज्‍जूभाई ट्रान्‍सपोर्ट या नावाने व्‍यवसाय आहे. तक्रारदार हे त्‍यांचे फर्म व्‍दारे वेळोवेळी त्‍यांचे ग्राहकांना माल सामनेवाले यांचे ट्रान्‍सपोर्टमार्फत पोहोच करीत आलेले आहेत. त्‍यामुळे तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्‍यान विश्‍वासाचे व भरवशाचे असे संबंध निर्माण झालेले आहेत. 

3.   तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे ट्रान्‍सपोर्टकडे ता.28.04.2014 रोजी सुपर अॅटोमोबाईल्‍स्‍ नेवासा फाटा यांना ऑईलचे एकुण सात बॉक्‍स त्‍याची किंती रक्‍कम रु.16,620/- असा माल सामनेवाले ट्रान्‍सपोर्टकडे पाठविलेला होता. त्‍यानुसार सामनेवाले यांनी सदरील माल स्विकारुन तो पोहोच करण्‍याचे मान्‍य करुन तशी पावती तक्रारदार यांना दिलेली आहे. सदर मालापैकी सामनेवाले यांनी सुपर अॅटोमोबाईल्‍स नेवासा फाटा यांना फक्‍त रक्‍कम रु.6,679/- इतक्‍या रक्‍मेचा माल पोहोच केला. तसेच सदर सामनवेालाने बाकी रक्‍कम रु.9,941/- चा माल पोहोच केला नाही. सदर तक्रारदार यांनी पाठविलेला माल सामनेवाले यांनी संबंधीत पार्टीला पुर्णपणे दिलेला नाही. त्‍याबाबत संबंधीत पार्टीने तक्रारदार यांना तसे कळविले. त्‍यानंतर वारंवार सामनेवालेकडे सदरील मालाबाबत तसेच त्‍याचे रकमेबाबत विचारणा करता सदर सामनेवाले यांनी उडवाउडवीची उत्‍तरे देऊन सदरचा माल सामनेवाले यांनी पुर्णपणे संबंधीत पार्टीस पोहोच केला नाही, अगर तक्रारदार यांना परत दिलेला नाही. अशा प्रकारे सामनेवाले यांनी माल ट्रान्‍सपोर्ट मार्फत पोहोच करण्‍यासाठी दिला असता त्‍याचा अपहार करुन परस्‍पर विल्‍हेवाट लावलेली आहे. सबब सदरील मालाची रक्‍कम वारंवार मागणी करुनही सामनेवाले यांनी दिलेली नाही. केवळ व्‍यावहारीक संबंध पाहून तक्रारदार यांनी सामनेवाले विरुध्‍द पोलीस स्‍टेशनला फिर्याद दिली नाही.

4.   अशा प्रकारे सामनेवालेस तक्रारदार यांनी पाठविलेला माल संबंधीत पार्टी संपुर्णपणे पोहोच न करता त्‍याचा परस्‍पर अपहार करुन तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान केलेले आहे. सबब सदरील मालाची रक्‍कम रु.9,941/- तसेच त्‍यावर माल सामनेवाले यांचे ताब्‍यात दिल्‍यापासून होणारे नुकसान दाखल व्‍याज अशी रक्‍कम वसूल करण्‍याचा सदर तक्रारदार यांना कायदेशीर हक्‍क व अधिकार प्राप्‍त झालेला आहे. वारंवार मागणी करुनही सामनेवाले हे देऊ दिलाऊ करुन रक्‍कम दिलेली नाही.

5.   तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दुषीत सेवा देदफन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार ग्राहकांची फसवणुक केलेली आहे. तसेच तक्रारदार यांना दिलेला शारीरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई देण्‍याची सामनेवाले यांचेवर कायदेशिर जबाबदारी आहे. तक्रारदार यांनी पाठविलेला माल संबंधीत पार्टीस पोहोच न केल्‍याने समोरील पार्टीचा तक्रारदार यांच्‍यावरील विशवास उडाला  व त्‍यामुळे तक्रारदार यांचे व्‍यवसायाचे देखील नुकसान झालेले आहे. वारंवार मागणी करुनही सामनेवाले यांनी मालाची रक्‍कम तक्रारदार यांना दिलेली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाले यांना शेवटी ता.09.03.2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून सदरील मालाची रक्‍कम, त्‍यावरील नुकसानदाखल व्‍याज तसेच तक्रारदार यांना झालेला शारीरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई त्‍वरीत आणुन द्यावी म्‍हणुन कळविले. मात्र नोटीस मिळूनही सामनेवाले यांनी त्‍याप्रमाणे वर्तन केले नाही. सबब सामनेवाले यांच्‍याकडून ट्रान्‍सपोर्टमार्फत पाठविलेल्‍या मालाची रक्‍कम तसेच नुकसानदाखल व्‍याज, तक्रारदार यांना झालेला शारीरीक व मानसिक त्रास याबाबत नुकसान भरपाईची रक्‍कम सामनेवालेकडून मिळावी करीता तक्रारदार यांचा अर्ज आहे. 

6.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, अर्जात सविस्‍तर नमुद केलेल्‍या कारणास्‍तव तक्रारदार यांना सामनेवाले यांच्‍याकडून मालाची रक्‍कम रु.9,941/- वसूल होऊन मिळावी. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दुषित सेवा देऊन तक्रारदार यांचे नुकसान केले म्‍हणून तक्रारदार यांना सामनेवाले यांच्‍याकडून शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.9,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा. वरील रकमेवर सामनेवाले यांनी माल स्विकारले तारखेपासून रक्‍कम वसूल होईपावेतो नुकसान दाखल व्‍याज द.सा.द.शे.18 टक्‍के प्रमाणे सामनेवाले यांच्‍याकडून देण्‍यात यावे. या अर्जाचा संपुर्ण खर्च तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून देण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.   

7.   तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी 2 ला अॅफिडेव्‍हीट, निशाणी 6 ला कंपनीचे वतीने दिलेले ठरावाची झेरॉक्‍स प्रत दिनांक 02.07.2012, सुपर अॅटो यांचे तक्रारदार यांचे दुकानातील खातेउतारा दिनांक 20.3.2014 ते दि.06.02.2015 ची झेरॉकस प्रत, सुपर अॅटो यांनी ऑईल खरेदी केल्‍याची बिलाची झेरॉक्‍स प्रत दिनांक 28.04.2014, तक्रारदाराने माल दिल्‍याबाबत सामनेवालाने माल मिळाल्‍याबाबतची दिलेले दिनांक 28.04.2014 चे पत्राची झेरॉक्‍स प्रत, नोटीस मिळाल्‍याची स्‍थळप्रत दिनांक 09.03.2015, नोटीस रजिस्‍टर केल्‍याची व मिळाल्‍याची पोच पावती दिनांक 9.3.15 व 11.3.15 इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

8.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीस काढण्‍याचे आदेश करण्‍यात आला. त्‍यानुसार सामनेवाला मे.मंचात हजर झाले. सामनेवाला यांनी कैफियत देण्‍यास वेळोवेळी मुदती घेतल्‍या परंतु मुदतीत कैफियत दाखल केली नाही. त्‍यामुळे मंचाने निशाणी 1 वर दिनांक 2.4.2016 रोजी कैफियत नाही म्‍हणून पुढे चालविण्‍याबाबतचा आदेश पारीत करण्‍यात आला. त्‍यावर निशाणी 16 ला सामनेवालाने नो से चा हुकूम रदद् करण्‍याबाबत अर्ज दिला त्‍यावर मे.मंचाने तक्रारदार यांना खुलासा मागितला. तक्रारदाराने दिनांक 7.5.2016 रोजी सामनेवाला यांचे म्‍हणणे मान्‍य नसून वेळेत कैफियत दिलेली नाही. व अर्ज मंजुर झाल्‍यास 5,000/- रुपये कॉस्‍ट करावी असा खुलासा दिला. त्‍यानुसार मे.मंचाने 300/- रुपये कॉस्‍ट करुन तक्रारदाराला द्यावा असा आदेश केला. व सामनेवालाचा निशाणी 18 नुसार कैफियत रेकॉर्डवर घेण्‍यात आली. सामनेवाला यांनी त्‍यांचे कैफियतीत तक्रारदाराचा संपुर्ण अर्ज त्‍यातील कथने विधाने व मजकुर खोटा व लबाडीचा असून तो सामनेवालास मुळीच मान्‍य नाही. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराचा अर्ज कायदयाने टेनेबल, मेंटेनेबल नाही. तक्रारदाराचा अर्ज कायदयाने या मे.कोर्टात चालु शकत नाही. तक्रारदाराने या विषयाबाबत दिवाणी कोर्टात कायदयाने दावा करावयास पाहिजे होता. त्‍यामुळे तक्रारदाराचा अर्ज रद्द करण्‍यात यावा.

9.   तक्रारदाराचा अर्ज कायदयाने या मे.कोर्टात चालविण्‍याचा अधिकार नाही. सदरचे अर्जास सी.पी.सी.कोड लागत असल्‍यामुळे कलम 9 प्रमाणे सदरचा अर्ज या मे.कोर्टात दाखल करण्‍याचा तक्रारदारास कायदयाने अधिकार नाही. तसेच मे.कोर्टालाही सदरचा अर्ज चालविण्‍याचा अधिकार नाही. सबब तक्रारदाराचा अर्ज रद्द करण्‍यात यावा.

10.  तक्रारदाराने सदरच्‍या अर्जास योगय ते जरुरीचे पक्षकार केलेले नसल्‍यामुळे सदरचा अर्ज या मुद्दयाखाली कायदयाने चालु शकत नाही. तसेच सज्‍जुभाई ट्रान्‍सपोर्ट यांचे भागीदार यांना पक्षकार केलेले नाही. तसेच सज्‍जुभाई ट्रान्‍सपोर्टचे मालक कोण आहेत या बाबतीत याचा कोणताही खुलासा केलेला नाही. त्‍यामुळे सदरचा अर्ज कायदयाने चालु शकत नाही. तो रद्द होण्‍यास पात्र आहे.

11.  तक्रारदार याने अर्जासोबत ज्‍या कागदावरुन अर्ज सामनेवालाविरुध्‍द दाखल केला आहे. ज्‍याच्‍या आधारे तक्रारदार हा आपला अर्ज दाखल केला आहे, परंतु सी.पी.सी.ऑर्डर 7 रुल 14 प्रमाणे अर्जासोबत संपुर्ण कागदपत्र दाखल केलेले नसल्‍यामुळे तक्रारदाराचा अर्ज या मुद्याखालीही रद्द होण्‍यास पात्र आहे.

12.  तक्रारदाराचा अर्ज मुदतीत नाही. तसेच तक्रारदाराने योगय तो कोर्ट फी स्‍टॅम्‍प लावलेला नसल्‍यामुळे सदरचा अर्ज कायदयाने चालु शकत नाही. तक्रारदार यास अर्ज दाखल करण्‍यास कोणतेही कायदेशिर कारण घडलेले नसल्‍यामुळे तक्रारदाराचा अर्ज रद्द करण्‍यात यावा.  

13.  तक्रारदाराने तक्रारदार याचा अॅस्‍ट्रॉन अॅटोमोटिव्‍ह प्रा.लि. या संदर्भात संपुर्णपणे कागदपत्र या फर्मचे दाखल केलेले नसल्‍यामुळे तसेच हे कंपनीचे संचालक आहेत, त्‍याबाबतही मे.कोर्टात कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नसल्‍यामुळे ही फर्म रजिस्‍टर आहे. या फर्मने तक्रारदार यांना उदय पदमाकर पानसे यांना अर्ज चालविण्‍याचे संपुर्ण अधिकार दिलेले आहेत. याबाबतचही कागदोपत्री पुरावा दाखल करणे कायदयाने गरजेचे असतांना कागदपत्र दाखल केलेले नसल्‍यामुळे तक्रारदाराचा अर्ज कायदयाने टेनेबल नाही.

14.  तक्रारदाराने अर्ज कलम 2 मधील वर्णन केलेला मजकुर संपुर्णपणे चुकीचा असून तो सामनेवालास कबुल नाही व मान्‍य नाही. सामनेवाले याने कोणतेही अपहार केलेला नाही. अपहार करण्‍याचे कारण नाही. सामनेवालेने कोणतीही फसवणूक केलेली नाही. ता.29.04.2014 रोजी सामनेवालेचा ट्रक चोरीस गेला. त्‍याबाबत सामनेवालेतर्फे नेवासा पोलीस स्‍टेशनला गु.र.नं.131/14 दाखल केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने केलेले कथन संपुर्ण चुकीचे असून ते सामनेवालेस कबुल नाही व मान्‍य नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने केलेली तक्रार संपुर्णपणे चुकीची असुन तक्रारदाराचा अर्ज रद्द करण्‍यात यावा.

15.  तक्रारदाराने सामनेवालेस पाठविलेली नोटीस मिळालेली नसल्‍यामुळे त्‍यामध्‍ये लिहीलेला संपुर्ण मजकुर खोटा व बनावट आहे. तसेच अर्ज कलम क्र.3 व अर्ज कलम क्र.4 मधील मजकुर खोटा व बनावट असून सामनेवालास मान्‍य व कबुल नाही. तक्रारदार व सामनेवाला यांच्‍यामध्‍ये ग्राहक व सेवा देणारे असे संबंध निर्माण होत नाही. तसेच स्‍थळसिमेबाबत दाखविलेले कारणही खोटे आहे.

16.  तक्रारदाराने अर्जामध्‍ये केलेल्‍या संपुर्ण मागण्‍या हया बेकायदेशिर असून कायदयाने अशा मागण्‍या सामनेवालेविरुध्‍द कायदयाने तक्रारदार यास मागताच येत नाही त्‍यामुळे तक्रारदाराचा अर्ज रद्द करण्‍यात यावा.

17.   निशाणी 20 ला तक्रारदाराने सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. त्‍यामध्‍ये त्‍यामध्‍ये असे कथन केले आहे की, सदर प्रकरणी सामनेवाले यांनी जी कैफियत व कागदपत्र दाखल केली आहेत त्‍यातील संपुर्ण मजकुर खोटा व लबाडीचा असून मला मुळीच मान्‍य व कबुल नाही. सदर प्रकरणी मी जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्‍यातील मजकुर खरा व बरोबर असुन त्‍यास निशाणी नंबर देण्‍यात येऊन पुराव्‍याचे कामी वाचण्‍यात यावीत ही विनंती. तक्रारदाराने पुढे असे कथन केले आहे की, माझ्या विनंतीप्रमाणे माझा अर्ज खर्चासह मंजुर करुन मला सामनेवाले यांच्‍याकडून मालाची रक्‍कम रु.9,941/- वसूल होऊन मिळावी. तसेच सामनेवाले यांनी मला दुषीत सेवा देऊन मी ग्राहक या नात्‍याने माझे नुकसान केले म्‍हणून मला सामनेवालेकडून शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.9,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच वरील रकमेवर सामनेवाले यांनी माल स्विकारलेचे तारखेपासून रक्‍कम वसुल होई पावेतो नुकसान दाखल व्‍याज द.सा.द.शे.18 टक्‍के प्रमाणे सामनेवालेकडून देण्‍यात यावे. निशाणी 26 ला सामनेवालाने लेखी अंतिम युक्‍तीवाद दाखल केला आहे. 

18.  उभय पक्षकारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला त्‍याचे प्रमाणे तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्र, सामनेवाला यांनी दिलेली कैफियत तसेच लेखी युक्‍तीवाद व तक्रारदाराचा सरतपासाचे प्रतिज्ञापत्र यांचे अवलोकन केले. व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात कमतरता ठेवली आहे काय.?                    

 

... होय.

2.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

19.   मुद्दा क्र.1  – तक्रारदार यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी युक्‍तीवाद केला व त्‍यांनी सामनेवाला यांचे ट्रान्‍सपोर्टचा माल तक्रारदाराचे फर्मव्‍दारे वेळोवेळी त्‍यांचे ग्राहकांना माल पोच करत आलेले आहेत. त्‍यामुळे सामनेवालाचे तक्रारदार ग्राहक आहे असे सिध्‍द झाले आहे. तक्रारदाराने सामनेवालास ट्रान्‍सपोर्ट दिनांक 28.4.2014 रोजी सुपर अॅटोमोबाईल्‍स नेवासा फाटा यांना ऑईलचे एकुण 7 बॉक्‍स रक्‍कम रुपये 16,620/- चा माल सामनेवाला ट्रान्‍पोर्टकडे पाठविला होता. सामनेवाला यांनी माल स्विकारुनही सामनेवालाने 6,679/- इतक्‍याच रुपयाचा माल पोच केला. उर्वरीत माल रक्‍कम 9,941/- चा माल पोच केला नाही. याबाबत संबंधीत पार्टीला पुर्णपणे दिलेला नाही असे तक्रारदाराला कळविले. त्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवालाकडे सदर मालाबाबत वेळोवेळी विचारणा केली असता त्‍यानी उडवा उडवीची उत्‍तरे देऊन सदरचा माल सामनेवाले यांनी पुर्णपणे संबंधीत पार्टीस पोहोच केला नाही, मालाचा परस्‍पर अपहार केलेला आहे. केवळ व्‍यवाहारीक संबंध पाहून तक्रारदार यांनी पोलीस स्‍टेशनला फिर्याद दिलेली नाही. सामनेवाला यांनी जी कैफियत व कागदपत्रे दाखल केली आहेत ते सर्व खोटे आहे असा युक्‍तीवाद केला. सामनेवालातर्फे त्‍यांचे वकील श्री.पठाण यांनी असा युक्‍तीवाद केलेला आहे की, सदरचा तक्रार अर्ज एकतर्फा होऊनये म्‍हणून वसिमखान अत्‍ताउल्‍लुखान पठाण हे सामनेवालातर्फे मुदतीत हजर झाले आहेत. सज्‍जूभाई ट्रान्‍सपोर्ट हे नामधारी आहेत. ट्रान्‍सपोर्टचे मालकीबाबत तक्रारदाराने खुलासा केलेला नाही. सज्‍जुभाई ट्रान्‍सपोर्टचे मालक आज रोजी जिवंत नाहीत, परंतु त्‍यासंबधी कोणताही पुरावा दाखल केला नाही. तसेच तक्रारदार यांस अॅस्‍ट्रॉन अॅटोमोटिव्‍ह प्रा.लि. या कंपनीस चालवण्‍याबाबत कोणताही कायदेशिर पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवालानी मालाचा अपहार केलेला नाही, सदर मालाचा ट्रान्‍सपोर्ट माल असलेल्‍या ट्रक अज्ञात इसमाने चोरीस नेऊन मालाची विल्‍हेवाट लावलेली आहे. तक्रारदाराने सामनेवालास दिनांक 9.3.2015 रोजी सज्‍जूभाई ट्रान्‍सपोर्टचे नावाने नोटीस पाठवली होती. परंतु सदरची नोटीस सामनेवालाला मिळाली नाही. या सर्व कारणास्‍तव तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्द करण्‍यात यावा असा युक्‍तीवाद केला आहे.

20. उभय पक्षकाराचे युक्‍तीवाद व तक्रारीसोबत दाखल केलेली दस्‍तावेजावरुन असे निष्‍कर्ष येतो की, तक्रारदाराने सामनेवाला यांचे ट्रान्‍सपोर्ट व्‍दारे माल पाठविलेला आहे. सदरील मालासंबंधी पार्टीस पुर्णपणे पोच करण्‍याची जबाबदारी ही ट्रान्‍सपोर्ट मालकाची आहे. सामनेवाला यांनी माल चोरीबाबत एफ.आय.आर. नोंदविल्याचे नमुद केले आहे. परंतु एफ.आय.आर. दाखल केलेली नाही. तसेच सज्जुभाई ट्रान्‍सपोर्टचा मालक या नात्‍याने सामनेवाला हे मे.मंचात हजर झालेचे त्‍यांचे कैफियतीत तसेच निशाणी 26 ला असलेला अंतिम युक्‍तीवादाचे अवलोकनावरुन दिसून येते. सर्व बाबींचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात कमतरता केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

21.   मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र.1 चे निष्‍कर्षावरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारदारास सामनेवाला यांनी सेवा देण्‍यात कमतरता केली आहे, त्‍यामुळे सामनेवालानी तक्रारदारास मालाची रक्‍कम रुपये 9,941/- रुपये माल स्विकारलेची तारीख 28.4.2014 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारदारास रक्‍कम आदायकी पावेतो द्यावेत. तसेच सामनेवालाने तक्रारदारास दुषीत सेवा देवून तक्रारदाराचे नुकसान केले म्‍हणून सामनेवाला यांचेकडून तक्रारदारास शारीरीक, मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- व या तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्‍यास तक्रारदार हे पात्र आहेत असे मंचाचे मत ठरले आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तरार्थ होकारार्थी नोंदविण्‍यात येते व खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मालाची रक्‍कम रुपये 9,941/- (रक्‍कम रुपये नऊ हजार नऊशे एकेचाळीस फक्‍त) माल स्विकारलेची तारीख 28.04.2014 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारदारास रक्‍कम अदायकीपावेतो द्यावेत.

3.   सामनेवाला यांनी तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- (रक्‍कम रु.तीन हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रु.2,000/- (रक्‍कम रु.दोन हजार फक्‍त ) तक्रारदाराला द्यावेत.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.