जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६०५/२००८
----------------------------------------------
१. शंकर आप्पासाहेब देसाई
वय वर्षे सज्ञान, धंदा – शेती व मजूरी
२. सौ जयश्री शंकर देसाई
वय वर्षे सज्ञान, धंदा – घरकाम
रा.देशिंग, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित, सांगली,
सांगली प्रधान कार्यालय, स्वागत अपार्टमेंट,
एस.टी.कॉलनी रोड, विश्रामबाग, सांगली
२. सौ विभावरी धनंजय कुलकर्णी, चेअरमन
वय-सज्ञान, धंदा-घरकाम/चेअरमन
रा.संत ज्ञानेश्वर चौक, विश्रामबाग, सांगली
३. डॉ सौ संजीवनी अशोक देशपांडे, व्हा.चेअरमन
वय-सज्ञान, धंदा-घरकाम/चेअरमन
रा.संजीवनी हॉस्पीटल, गणपती मंदिरासमोर,
विश्रामबाग, सांगली
४. सौ मेधा भास्कर कुलकर्णी, संचालिका
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
५. सौ स्मिता प्रदीप मोहिते, संचालिका
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.१०० फूटी रोड, सांगली
६. सौ जयश्री अशोक साळे, संचालिका
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.सामवेद अपार्टमेंट, एस.टी.कॉलनी,
विश्रामबाग, सांगली
७. सौ कल्पना चंद्रशेखर चिंचोरे, संचालिका
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.फेडरल बॅंकेशेजारी, १०० फूटी रोड,
विश्रामबाग, सांगली
८. सौ कुसुम चंद्रकांत नवले, संचालिका
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.फेडरल बॅंकेशेजारी, विश्रामबाग, सांगली
९. सौ शालीनी बाळासो पाटील, संचालिका
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.गणपती मंदिराजवळ, विश्रामबाग, सांगली
१०. सौ सुनंदा धुळाप्पा बनजवाड, संचालिका
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.सावरकर मार्ग क्र.३, धनंजय बंगला,
विश्रामबाग, सांगली
११. सौ मिना अनिल देवळीकर
वय-सज्ञान, धंदा-घरकाम
रा.नेमिनाथनगर, विश्रामबाग, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण मागील अनेक तारखांपासून जाबदार क्र.१ बाबत तजवीज करणेसाठी प्रलंबित आहे. प्रस्तुत प्रकरणी इतर सर्व जाबदारांबाबत पूर्तता झाली आहे. जाबदार क्र.१ यांना समन्स व फेरसमन्स काढणेसाठी तक्रारदार यांनी दि.६/५/२०१०, १२/०८/२०१०, ७/७/२०११ रोजी अर्ज सादर केले आहेत. दि.७/७/२०११ रोजी अर्ज देवून तक्रारदार यांनी त्यानंतर नोटीसबाबत कोणतीही तजवीज केली नाही. प्रस्तुत प्रकरण खूप जुने आहे. तक्रारदार मागील तारखेस गैरहजर तसेच आज रोजीही गैरहजर. जाबदार क्र.१ विरुध्द तक्रारदार यांनी तजवीज न केलेने व इतर जाबदारांबाबत पूर्तता झालेली असलेने, प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १८/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.