नि. ३१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१४२/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २८/१/२०१०
तक्रार दाखल तारीख : २५/२/२०१०
निकाल तारीख : १५/१०/२०११
-----------------------------------------------------------
श्री महेश बसगोंडा बसरगे
वय वर्षे – ३३, धंदा – पिग्मी एजंट,
रा.बुधवार पेठ, बसवेश्वर चौक,
मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मिरज
रा.वैरण बाजार, नदीवेस, मिरज
२. चेअरमन,
श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मिरज
श्री आप्पासो सत्याप्पा कुडचे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार, वकीली,
रा.फुटाणे बोळ, बुधवार पेठ, मिरज
३. व्हाईस चेअरमन, श्री दिलीप आण्णासो लांडगे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.गोठण गल्ली, राममंदीर जवळ, मिरज
जि. सांगली
४. संचालक, श्री चंद्रकांत शंकर कुरणे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.लोहार गल्ली, बुधवार पेठ,
ज्योतिर्लिंग मंदीराजवळ, मिरज जि.सांगली
५. संचालक, श्री शिवपुत्र शंकर कुडचे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार, वकीली
रा.नदीवेस, माळी गल्ली, मिरज जि. सांगली
६. संचालक, श्री शंकर बाबुराव आंबी
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.रुईकर गल्ली, दर्ग्याजवळ, माळी गल्ली, मिरज
७. संचालक, श्री अशोक आप्पासो आदुरे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.बुधवार पेठ, जनवाडे गल्ली, मिरज जि.सांगली
८. संचालक, श्री सदाशिव शंकर ताशिलदार
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.नदीवेस, गणेशवाडे गिरणीजवळ,
ताशिलदार गल्ली, मिरज
९. संचालक, श्री चंद्रशेखर भाऊसो कोरे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.उदगाव वेस, कोरे तालीमजवळ, मिरज
१०. संचालक, श्री रमेश मोहनलाल आहुजा
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.शिवाजी नगर, डॉ भारती हॉस्पीटलजवळ,
मिरज
११. संचालक, श्री जितेंद्र शंकर कुरणे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.बुधवार पेठ, बसवेश्वर चौक,
डॉ भोसले हॉस्पीटलजवळ, मिरज जि. सांगली
१२. संचालक, श्री मनोहर श्रीपती शिंदे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.मु.पो. लिंगनुर, ता.मिरज जि. सांगली
१३. संचालक, सौ शारदा रमेश बंगले
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार,
रा.१०० फुटी रोड, दत्त साई मंदीराशेजारी,
विश्रामबाग, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री अनिल कोपार्डे
जाबदार क्र.१ ते ३ व ५ ते १२ – एकतर्फा
जाबदार क्र.४ व १३ – नो से
नि का ल प त्र
द्वारा- मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मिरज (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे दामदुप्पट ठेव अन्वये रक्कम गुंतविलेली होती. सदरचे ठेवींची मुदत पूर्ण झाली आहे. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ४ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते ३ व ५ ते १२ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. ४ व १३ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी झालेवर ते विधिज्ञांमार्फत हजर झाले. परंतु त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर नो से आदेश करण्यात आला.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १३ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
४. प्रस्तुत प्रकरणी दाखल ठेवपावत्यांचे सत्यप्रतींचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवींत गुंतविलेल्या रकमांवर कोणतेही व्याज मिळाल्याचे दिसून येत नाही. ठेवींच्या मुदतीही पूर्ण झालेल्या आहेत. सबब या सर्व ठेवींतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्याच्या दुस-या दिवशीपासून १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.०३०२५ व ०३०२६ मधील मुदतीनंतर मिळणारी प्रत्येकी रक्कम रु.३२,२२२/- (अक्षरी रुपये बत्तीस हजार दोनशे बावीस फक्त) व या रकमेवर दि. १३/१०/२००९ पासून संपूर्ण ठेवीचे रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के दराने व्याज अदा करावे.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.०३६३२ मधील मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.३०,२२२/- (अक्षरी रुपये तीस हजार दोनशे बावीस फक्त) व या रकमेवर दि.५/४/२००९ पासून संपूर्ण ठेवीचे रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के दराने व्याज अदा करावे.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.३०/११/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांक:१५/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११