Maharashtra

Sangli

CC/11/1

Mahesh Bhanudas Vaigade etc.5 - Complainant(s)

Versus

Sailaxmi Nag.Sah.Pat.Mar.Sangli etc. 14 - Opp.Party(s)

P.N.Malge

03 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/1
 
1. Mahesh Bhanudas Vaigade etc.5
B-2, Mithilanagari, Behind S.T.Stand, Nr.Patrakar Nagar, Sangli
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sailaxmi Nag.Sah.Pat.Mar.Sangli etc. 14
Pritee Apt., Gala No.10, Nr.Mali Chitra Mandir, Gul Mohor Colony, Sangli
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रार अर्ज क्र.१/२०११
 
नि.१ वरील आदेश
 
 
व्‍दारा मा.अध्‍यक्ष, श्री.अनिल य. गोडसे 
 
 
प्रस्‍तुत तक्रार अर्ज दाखल करुन घेणेचे मुद्यावर मंचासमोर प्रलंबित आहे. तक्रारअर्ज दाखल केलेनंतर प्रस्‍तुत तक्रारअर्ज एकत्रित दाखल करता येईल का ? या मुद्यावर युक्तिवाद करणेत यावा असा आदेश करणेत आला. त्‍यानुसार तक्रारदारांचे विधिज्ञांनी या मुद्याबाबत आपला लेखी युक्तिवाद व काही निवाडे आज रोजी दाखल केले आहेत. तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज आपल्‍या ठेवपावत्‍यांची रक्‍कम परत मिळावी या मागणीसाठी एकत्रित दाखल केला आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारअर्जामध्‍ये तक्रारदारांचे एकमेकांचे नातेसंबंध नमूद केलेले नाहीत. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदार क्र.४ या तक्रारदार क्र.१ यांच्‍या मेव्‍हणी असल्‍याचे तक्रारदार यांचे विधिज्ञांनी नमूद केले. संपूर्ण तक्रारअर्जाचा विचार करता सर्व तक्रारदार हे एकाच घरातील राहणारे नाहीत, ते वेगवेगळया घरातील राहणारे आहेत. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी आपल्‍या युक्तिवादामध्‍ये प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २() () (iv) नुसार अनेक तक्रारदारांना दाखल करता येईल. त्‍याचबरोबर प्रस्‍तुतची तक्रार ही प्रातिनिधीक स्‍वरुपाची नसल्‍याने ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १२() () नुसार दाखल करण्‍यासाठी या मंचाचे परवानगीची आवश्‍यकता नाही व कलम १३() प्रमाणे कोणतीही पूर्तता करण्‍याची आवश्‍यकता नाही असेही नमूद केले. तक्रारदारांच्‍या ठेवपावत्‍या या वेगवेगळया आहेत व सदरच्‍या ठेवपावत्‍या या वेगवेगळया तारखेस ठेवलेल्‍या आहेत. तक्रारदार यांची तक्रार ही प्रातिनिधिक स्‍वरुपाची नसल्‍याने तक्रारदार हे कलम २ () ()(iv) नुसार Numerous consumers having the same interest या स्‍वरुपात येत नाहीत ही गोष्‍ट स्‍पष्‍ट आहे. त्‍यानंतर तक्रारदार म्‍हणून कोण कोण सामील होईल याचे अवलोकन केले असता कलम २() ()(i) मध्‍ये ग्राहक स्‍वत: तक्रारअर्जाचे कामी सामील होऊ शकतो. ग्राहक या शब्‍दाची व्‍याख्‍या कलम २()() मध्‍ये दिली असून ग्राहक म्‍हणजे एखादी व्‍यक्‍ती असे नमूद आहे. व्‍यक्‍ती या शब्‍दाची व्‍याख्‍या कलम २() () मध्‍ये नमूद आहे. त्‍यामध्‍ये हिंदू अविभक्‍त कुटुंबातर्फे तक्रार दाखल करता येईल. सदरचे सर्व तक्रारदार हे हिंदू अविभक्‍त कुटुंबातील नाहीत हे या ठिकाणी स्‍पष्‍ट होते. तक्रारदार यांनी या कामी आपल्‍या युक्तिवादासोबत‍ अनेक निवाडे दाखल केले आहेत. सदर निवाडयातील गुणोत्‍तर पाहता सदर निवाडे याकामी लागू होणार नाहीत असे या मंचाचे मत आहे. सन्‍मा.राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र यांनी तक्रारअर्ज क्र.१३०/१० या नंदकुमार जबडे विरुध्‍द प्रशासक, वसंतदादा शेतकरी बॅंक या निवाडयाचे कामी दि.१० ऑक्‍टोबर २०११ रोजी दिलेल्‍या निकालातील निष्‍कर्ष अत्‍यंत महत्‍वपूर्ण आहे. सदर निवाडयामध्‍ये सन्‍मा.राज्‍य आयोग यांनी एकत्रित तक्रारअर्ज दाखल करता येईल का याबाबत ऊहापोह केला आहे. सदर सन्‍मा.राज्‍य आयोग यांनी दिलेल्‍या निवाडयातील निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदार यांना एकत्रित तक्रारअर्ज दाखल करता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. 
 
वरील सर्व विवेचनावरुन प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे. 
 
 
दि.०३/०१/२०१२.
सांगली.
 
                              सदस्‍या                  अध्‍यक्ष
                         जिल्‍हा मंच, सांगली        जिल्‍हा मंच, सांगली
 
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.