Maharashtra

Nagpur

CC/16/2020

SOU. DHANASHREE GUNVANT WELE - Complainant(s)

Versus

SAIKRUPA HOUSING SOCIETY, NAGPUR, THROUGH PROPRIETOR SHRI. JAGESHWAR SHREERAM TEMBHARE - Opp.Party(s)

ADV. NARENDRA R. KUKWAS

08 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/16/2020
( Date of Filing : 08 Jan 2020 )
 
1. SOU. DHANASHREE GUNVANT WELE
R/O. PLOT NO.9, NEAR WATER TANK, CHAMAT LAY-OUT, SAIBABA NAGAR, KHARBI ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAIKRUPA HOUSING SOCIETY, NAGPUR, THROUGH PROPRIETOR SHRI. JAGESHWAR SHREERAM TEMBHARE
R/O. BHAVANI NAGAR, PARDI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. NARENDRA R. KUKWAS, Advocate for the Complainant 1
 
Dated : 08 Feb 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हे जमिनीचे ले-आऊट पाडून भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा- तरोडी (बु), प.ह.नं.  33, तह. कामठी, जि. नागपूर येथील खसरा नं. 24/2/ख (पार्ट) मध्‍ये साईकृपा हाऊसिंग एजेन्‍सी अॅन्‍ड डेव्‍हलपर्स, नागपूर येथे टाकलेल्‍या ले-आऊट मधील भूखंड क्रं. 62, एकूण क्षेत्रफळ 600 चौ.फु.  (20 फुट X 30 फुट) एकूण किंमत रुपये 2,70,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरविले व त्‍याकरिता  दिनांक 24.10.2017 रोजी एकमुस्‍त रक्‍कम अदा केली व त्‍याच दिवशी विरुध्‍द पक्षाने 500/-रुपयाच्‍या  स्‍टॅम्‍प पेपरवर प्‍लॉटचे कब्‍जापत्र  तक्रारकर्तीच्‍या नांवे दोन साक्षीदारां समक्ष लिहून देऊन नोटरी करुन दिले आणि तक्रारकर्तीला सांगितले की, सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र करण्‍याकरिता लागणारे ले-आऊटचे कागदपत्र पूर्णपणे तयार व्‍हायचे आहे ते तयार झाल्‍यानंतर तक्रारकर्तीच्‍या नांवे लगेच विक्रीपत्र करुन देण्‍यात येईल. तक्रारकर्तीने काही दिवसांनी विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात भेट दिली असता विरुध्‍द पक्षाचे कार्यालय बंद असल्‍याचे दिसून आल्‍याने तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाच्‍या घरी जाऊन भेट दिली असता सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला पुन्‍हा आश्‍वासन दिले की, तक्रारकर्तीच्‍या नांवे स्‍टॅम्‍प पेपरवर नोटराईज पध्‍दतीने कब्‍जापत्र असल्‍यामुळे त्‍यांना घाबरण्‍याची आवश्‍यकता नाही.
  2.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने ऑगस्‍ट 2019 पर्यंत तक्रारकर्तीला सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र करुन न दिल्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला फोन केला असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला स्‍पष्‍ट सांगितले की, ते सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र करुन देऊ शकत नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला दि. 17.09.2019 ला वकिलामार्फत नोटीस पाठविली. परंतु सदरची नोटीस ही unclaimed या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे जाहीर करावे. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त भूखंड क्रं. 62 चे दि. 24.10.2017 रोजीच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर नोटराईज प्रमाणे करुन दिलेले विक्रीपत्र नोंदणीकृत पध्‍दतीने तक्रारकर्तीच्‍या नांवे करुन द्यावे. विरुध्‍द पक्षाला सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसेल तर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून भूखंडापोटी घेतलेली रक्‍कम रुपये 2,70,000/- व त्‍यावर 24 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम परत करावी. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई रुपये 2,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 30,000/-देण्‍याचा आदेश द्यावा अशी विनंती केलेली आहे.  
  3.      विरुध्‍द पक्ष यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर झाले नाही अथवा आपले लेखी उत्‍तर सादर केले नाही. म्‍हणून दि. 02.03.2020 रोजी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  4.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला.

 

              अ.क्रं.      मुद्दे                                      उत्‍तर

 

1 तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?होय

  1.      विरुध्‍द पक्षानी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय? होय

  1.   काय  आदेश ?                   अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून मौजा- तरोडी (बु), प.ह.नं.  33, तह. कामठी, जि. नागपूर येथील खसरा नं. 24/2/ख (पार्ट) मध्‍ये साईकृपा हाऊसिंग एजेन्‍सी अॅन्‍ड डेव्‍हलपर्स, नागपूर येथे टाकलेल्‍या ले-आऊट मधील भूखंड क्रं. 62, एकूण क्षेत्रफळ 600 चौ.फु.  (20 फुट X 30 फुट) एकूण किंमत रुपये 2,70,000/-  दिनांक 24.10.2017 रोजी एकमुस्‍त रक्‍कम अदा करुन विकत घेतला व त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने दि. 24.10.2017 रोजीच तक्रारकर्तीच्‍या नांवे रुपये 500/- रुपयाच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर प्‍लॉटचे कब्‍जापत्र  दोन साक्षीदारां समक्ष लिहून देऊन नोटरी करुन दिलेले होते याबाबतचे दस्‍तावेज नि.क्रं. 2 वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून उपरोक्‍त भूखंडाच्‍या विक्रीपोटी एकमुस्‍त संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारलेली असतांना ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या नांवे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा भूखंडाची रक्‍कम ही परत केली नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍यांनी अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केले असल्‍याचे सिध्‍द होते.   

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे घोषित करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला मौजा- तरोडी (बु), प.ह.नं.  33, तह. कामठी, जि. नागपूर येथील खसरा नं. 24/2/ख (पार्ट) मध्‍ये साईकृपा हाऊसिंग एजेन्‍सी अॅन्‍ड डेव्‍हलपर्स, नागपूर येथे टाकलेल्‍या ले-आऊट मधील भूखंड क्रं. 62, एकूण क्षेत्रफळ 600 चौ.फु.  (20 फुट X 30 फुट) चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे व विक्रीपत्राकरिता लागणारा खर्च तक्रारकर्तीने सोसावा.

                                                                   किंवा

 उपरोक्‍त भूखंडाचे कायदेशीररित्‍या किंवा तांत्रिक दृष्‍टया विक्रीपत्र नोंदवून देणे   शक्‍य नसल्‍यास किंवा अडचण असल्‍यास विरुध्‍द पक्षाने 600 चौ.फु. इतके क्षेत्रफळ असलेल्‍या अकृषक भूखंडाकरिता शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याच्‍या आंत द्यावी आणि  सदरहू रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रक्‍कमेवर आदेशाच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.  

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने  करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.