Maharashtra

Thane

CC/553/2015

Shri Sunil Sakaram Gaunbhare - Complainant(s)

Versus

Sai chhaya Construction builder and Developers Prop Yogesh Singh - Opp.Party(s)

Chhaya V Jadhav

08 Jul 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/553/2015
 
1. Shri Sunil Sakaram Gaunbhare
Omkar Co Op Housing Soc. Building No 9 E Wing Room No 001, Sangharsh Nagar, Chandivali, Andheri (E) Mumbai 400 072
...........Complainant(s)
Versus
1. Sai chhaya Construction builder and Developers Prop Yogesh Singh
Sahakar Nagar, Near Riksha Stand, Cross Road, Virar E Dist Palghar
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER
 

न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

                                                           

  1.        तक्रारदारांनी श्री. चंदन सिंग यांचेकडे जय अंबे कन्‍स्‍ट्रक्‍शन बिल्‍डर्स व डेव्‍हलपर्स यांचेकडे फ्लॅट घेण्‍यासाठी रु. 1,00,000/- एवढी रक्‍कम भरणा केली. परंतु इमारतीचे बांधकाम सुरु झाले नाही, तसेच बिल्‍डर्सचे ऑफिसचा फलक काढून ऑफिस बंद झाले.
  2.  
  3.         तक्रारदारांनी सामनेवाले योगेश सिंग यांचेकडे विरार येथील नविन फ्लॅटच्‍या बुकींगबाबत विचारणा केली असता,  योगेश सिंग व चंदन सिंग नातेवाईक असून पार्टनर असल्‍याचे समजले. श्री. चंदन सिंग यांनी तक्रारदारांची रु. 1,00,000/- रक्‍कम जय अंबे कन्‍स्‍ट्रक्‍शनकरीता घेतलेली रक्‍कम सामनेवाले यांना विरारच्‍या सत्‍यम कॉम्‍प्‍लेक्‍स या फ्लॅटच्‍या बुकींगकरीता देतो असे सांगितले.
  4.          त्‍याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे 525 चौ.फू. क्षेत्रफळाचा रक्‍कम रु. 13,65,000/- किंमतीचा फ्लॅट बुक केला. तसेच             दि. 03/03/2013 रोजी रु. 50,000/- चा चेक योगेश सिंग यांचे नांवे व दुसरा चेक दि. 15/05/2013 रोजी रु. 50,000/- रकमेचा साईछाया कन्‍स्‍ट्रक्‍शन्‍सच्‍या नांवे दिला.
  5.            तक्रारदारांनी सामनेवाले यांचे सत्‍यम कॉम्‍प्‍लेक्‍सच्‍या जागेवर सी.पी. बिल्‍डर्स यांचे नावाचा बोर्ड लावलेला असल्‍याचे आढळून आले. सामनेवाले यांना यासंदर्भात विचारणा केली असता सी.पी. बिल्‍डर्स त्‍यांचे भागीदार असल्‍याचे सांगितले. तक्रारदारांनी सी.पी. बिल्‍डर्स यांचेकडे यासंदर्भात चौकशी केली असता सामनेवाले यांना ते ओळखत नसल्‍याची माहिती मिळाली. सामनेवाले यांनी फसवणूक केल्‍याचे लक्षात आल्‍यामुळे तक्रारदारांनी फ्लॅट बुकींगची रक्‍कम परत मागितली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु. 50,000/- चा चेक दिला. परंतु चेक न वटता परत आला.
  6.           तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदनिका खरेदीपोटी एकूण रु. 2,00,000/- अदा केले असून सामनेवाले यांनी दिलेला रु. 50,000/- चा चेक न वटता परत आला आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांचेकडे भरणा केलेली फ्लॅटची अनामत रक्‍कम 12% व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

 

  1.           तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी जय अंबे कन्‍स्‍ट्रक्‍शन बिल्‍डर्स अँड डेव्‍हलपर्स, नालासोपारा यांना                     दि. 04/02/2012 रोजी रु. 50,000/- चा चेक दिल्‍याचे पोचपावतीवरुन दिसते.
  2.  
  3.          तसेच तक्रारदारांनी सत्‍या ग्रुप ऑफ कंपनी वसई यांना दि. 10/06/2012 रोजीचा रक्‍कम रु. 50,000/- चा चेक दिल्‍याचे पोचपावतीवरुन दिसते. त्‍याचप्रमाणे साई छाया कन्‍सट्रक्‍शन विरार यांना दि. 12/05/2013 रोजी रु. 50,000/- रकमेचा दि. 15/05/2013 रोजीचा चेक दिल्‍याचे पोचपावतीवरुन दिसते.

 

  1.        तक्रारदारांनी वेगवेगळया ठिकाणच्‍या बिल्‍डर्स यांना वेळोवेळी रोख रक्‍कम अथवा चेक दिल्‍याच्‍या पावत्‍या मंचात दाखल केल्‍या आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पोचपावतीमध्‍ये सदर रकमा फ्लॅटच्‍या बुकींगकरीता दिल्‍याचे नमूद नाही.

 

  1.        तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार वर नमूद केलेल्‍या रकमा वसूल होऊन मिळण्‍यासाठी (Recovery suit) दाखल केली आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली, फ्लॅटच्‍या बुकींगची रक्कम घेऊनही बांधकाम सुरु झाले नाही. त्‍यामुळे फ्लॅटचे बुकींग रद्द करुन अनामत रकमेची मागणी केली आहे.
  2.  
  3.         तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये सदनिका खरेदीचा करार अस्तित्‍वात नाही. तक्रारदारांनी करार रद्द करुन सामनेवाले यांचेकडून   रु. 50,000/- चा चेक स्विकारला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेला रक्‍कम रु. 50,000/- चा चेक न वटता परत आल्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार सदर रक्‍कम सामनेवाले यांचेकडून वसूल होऊन मिळणेसाठी  तक्रारदारांनी   दाखल  केली  आहे.  सदरची बाब ग्राहक

 

 

मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात येत नाही. तक्रारदारांना या कारणास्‍तव योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाद मागता येर्इल असे मंचाचे मत आहे.

 

      सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                आ दे श

  1. तक्रार क्र. 553/2015 ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) नुसार फेटाळण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.
 
 
 
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.