Maharashtra

Nagpur

CC/193/2019

PRANAYKUMAR RAMBHAU BHONGALE - Complainant(s)

Versus

SAI SYSTEM - Opp.Party(s)

SELF

23 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/193/2019
( Date of Filing : 25 Mar 2019 )
 
1. PRANAYKUMAR RAMBHAU BHONGALE
44 PANDURANG NAGAR S R P.F. , HINGNA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAI SYSTEM
SHOP NO 3, PLOT NO 11, TULSIVIHAR, ABHAYANKAR NAGAR, OPP PATHAK HOUSE, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:SELF, Advocate
For the Opp. Party:
Dated : 23 Jun 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले आहे की, त्‍याने Sony XA1 (IMEI No. 357442085156779) हा Reliance Retail Limited , Empress City Mall, Near Shukarwari Talaw, Nagpur येथून दि. 18.03.2018 रोजी रुपये 17,990/- ला विकत घेतलेला होता. सदरचा मोबाईल विकत घेतल्‍यानंतर त्‍याच्‍या Display Tuch  मध्‍ये बिघाड निर्माण झाल्‍याने सदरचा मोबाईल हा विरुध्‍द पक्ष सोनी सर्विस सेंटर यांच्‍याकडे दि. 13.08.2018 ला दुरुस्‍तीकरिता दिला असता त्‍याचा जॉब नं. W118081300448 असा होता व तो दि. 28.08.2018 ला डिसप्‍ले बदलवून दि. 28.08.2018 ला परत दिला असता मोबाईलचे बॅक पॅनल ओपन असल्‍याचे लक्षात आले तेव्‍हा सर्विस एक्‍झेकेटिव्‍हच्‍या लक्षात आणून दिले. त्‍यानंतर त्‍यांनी सदरचा मोबाईल हा दि. 30.08.2018 ला विरुध्‍द पक्षाच्‍या सर्विस सेंटरला दिला असता त्‍याने त्‍याचा जॉब नं. W118083000595 असा दिला व सदरचा मोबाईल हा दि. 12.09.2018 ला परत दिला. परंतु मोबाईलचे बॅक पॅनल ओपन होते. ही बाब लक्षात आणून दिल्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने सदरचा बॅक पॅनल ओपन असलेला मोबाईल परत केला. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने ग्राहक मंचाकडे दि. 17.09.2018 ला ऑनलाईन तक्रार नोंदविली, त्‍याचा Grievance No. 916776 असा होता व यासंदर्भात सर्विस सेंटरच्‍या एक्‍झीकेटिव यांच्‍याशी बोलणे झाले असता त्‍यांनी मोबाईल बदलून देण्‍याचे आश्‍वासन दिले. त्‍यानंतर पुन्‍हा दि. 31.10.2018 ला संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून ग्राहक मंचाला कॉल केला असता त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची तक्रार Query मध्‍ये असल्‍यामुळे पुढे जाऊ शकणार नाही असे सांगितले व परत तक्रारकर्त्‍याची तक्रार दि. 22.11.2018 ला नविन तक्रार Grievance No. 1016668 नुसार नमूद केली. त्‍यानंतर सोनी कंपनीच्‍या प्रतिनिधीने दि. 02.01.2019 ला सर्विस सेंटर मध्‍ये बोलावून त्‍याच्‍या मोबाईलची पाहणी केली व एका आठवडयामध्‍ये मोबाईल बदलवून देण्‍याचे आश्‍वासन दिले. परंतु त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला योग्‍य ती सर्विस पुरविली नाही व दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे पूर्तता ही केली नाही.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून त्‍यात अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलची किंमत परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई मिळावी.
  2.      विरुध्‍द पक्षाला मंचा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 16.10.2019 रोजी पारित करण्‍यात आला.  
  3.      तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज, त्‍यांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं. मुद्दे उत्‍तर

 

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?होय

 

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?होय

 

3. काय आदेश ? अंतिम आदेशानुसार

 

                             निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून Sony XA1 (IMEI No. 357442085156779) हा Reliance Retail Limited , Empress City Mall, Near Shukarwari Talaw, Nagpur येथून दि. 18.03.2018 रोजी रुपये 17,990/- ला विकत घेतलेला होता हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तऐवज व बिलावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलचा Display Tuch मध्‍ये बिघाड निर्माण झाल्‍यामुळे त्‍याने सदरचा मोबाईल दि. 13.08.2018 ला विरुध्‍द पक्षाकडे दुरुस्‍तीकरिता दिला असता सदरचा मोबाईल हा दि. 28.08.2018 ला दुरुस्‍त करुन दिला. परंतु सदरच्‍या मोबाईलचे बॅक पॅनल हे ओपन असल्‍याचे लक्षात आले. तेव्‍हा याबाबत सर्विस सेंटर मधील इंजिनिअरच्‍या लक्षात आणून दिले. त्‍याप्रमाणे त्‍यांनी मोबाईल procedure repair साठी परत देण्‍यास सांगितले होते. त्‍यानंतर ही सदरच्‍या मोबाईलचा बॅक पॅनल बदलवून न देता तसाच ओपन असलेल्‍या स्थितीतील परत केला. तक्रारकर्त्‍याने कस्‍टमर केअर यांच्‍याकडे ऑनलाईनवरुन तक्रारी केली असता सोनी सर्विस सेंटरच्‍या प्रतिनिधीने तक्रारकर्त्‍याला बोलावून त्‍याच्‍या मोबाईलचे तपासणी केली व मोबाईलच्‍या बॅक पॅनलच्‍या डॅमेज पार्टचे फोटो काढून मोबाईल न घेता तक्रार नोंदवून घेतली व मोबाईल बदलवून किंवा मोबाईलची किंमत परत करण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याचा सदरचा मोबाईल हा वॉरन्‍टी कालावधीत असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलचे बॅंक पॅनल बदलवून न देणे तसेच तक्रारकर्त्‍याने अनेक वेळा सर्विस सेंटर येथे संपर्क साधून ही त्‍याच्‍या तक्रारीला प्रतिसाद न देणे ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                       अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या उपरोक्‍त मोबाईलचे बॅक पॅनल बदलवून द्यावे व तक्रारकर्त्‍याचे संपूर्ण समाधान करावे.
    •                                                                         किंवा

उपरोक्‍त मोबाईलचे बॅक पॅनल बदलवून देणे शक्‍य नसल्‍यास त्‍यांनी कंपनीकडून उपरोक्‍त मोबाईलची किंमत रुपये 17990/- तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 2,000/- द्यावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. ‍उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क प्रत परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.