जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – १३७/२०११
तक्रार दाखल दिनांक – १८/०७/२०११
तक्रार निकाली दिनांक – २७/०८/२०१४
सौ.सुमनबाई पांडुरंग सुर्येवंशी
मयत तर्फे कायदेशिर वारस
श्री.पांडुरंग नफर सुर्येवंशी,
उ.व. – 51 वर्षे, कामधंदा – शेती,
राहणार – निमडाळे, ता.जि.धुळे - तक्रारदार
विरुध्द
- श्री.साई सेवा नागरी सहकारी पतसंस्था
- . म.चेअरमन सो.,
श्री.साई सेवा नागरी सहकारी पतसंस्था
- म.ब्रॅच मॅनेजर सो.,
श्री.साई सेवा नागरी सहकारी पतसंस्था
सर्वांचा पत्ताः- २२, भागयरेषा, म्युनिसिपल कॉलनी,
नेहरू नगर, देवपूर धुळे, ता.जि. धुळे - सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एल.पी. ठाकूर)
(सामनेवाला तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
-
तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या पतसंस्थेत मुदतठेव पावतींमध्ये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार हे दाखल दिनांकानंतर तारीख ०६/०२/२०१२ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रारदार यांच्या वकिलांनी दि.१०/०९/२०१३ रोजी दाखल केलेल्या अर्जात त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते हजर राहू शकत नाही असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
आ दे श
- तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.