:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, मिलिंद बी. पवार (हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 26/06/2013)
1) तक्रारदाराने तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणप्रमाणे.
2) त.क. ही घुग्घुस जि. चंद्रपुर येथील रहिवासी असुन घरकाम करते. त.क. हिने दिनांक 15/10/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडुन बजाज कंपनीचे वाहन क्र. एम.एच 34, झेड 8357 खरेदी केले. गैरअर्जदार क्र. 2 हे बजाज गाडीचे चंद्रपुर येथील अधिकृत विक्रेता आहेत व गैरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र. 2 मार्फत आपला व्यसाय करतात. त.क. हिने गाडीचा पंजीकृत विमा गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडुन काढलेला होता. दिनांक 29/5/10 ला त.क चा मुलगा यांचा संबंधीत मोटार गाडीचा अपघात होऊन मृत्यु झाला. गाडीचे नुकसान झाल्यामुळे सदर गाडी ही गैरअर्जदार क्र.1 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे दुरुस्तीला पाठविली तसेच गाडी अपघाताची माहिती गैरअर्जदार क्र. 3 ला देऊन योग्य ते दस्ताऐवज क्लेम मिळविण्याकरीता सुपुर्त केले. त्यानंतर गैरअर्जदारांनी बराच काळ लोटुनही कुठलिच कार्यवाही केली नाही त्यामुळे त.क. ही वारंवार त्यांच्या कार्यालयात जाऊ लागली. परंतु गैरअर्जदाराने गाडी दुरुस्त करुन व्यक्तीगत अपघात विमा रक्कम रुपये 200000/- अर्जदाराला दिले नाही त्यानंतर त.क. ही गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे जाऊन विचारपुस केली असता गैरअर्जदार क्रमांक 2 चे कर्मचारी यांनी क्लेम प्रोसेस करण्याकरीता रुपये 10000/- ची मागणी केली. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांची गाडी दुरुस्त झाल्याबद्दलचे कळविले. त.क. हिने दुरुस्तीचे पुर्ण बिल रुपये 6000/- नगदी दिले. त.क. हिला गाडी चालविता येत नसल्यामुळे गै.अ.1 यांना गाडी घरी पोहचविण्यास सांगितले परंतु गाडी पोहचविली नाही. नाही. त.क ने तीन चार दिवस वाट पाहुन त्याबाबत चौकशी केला असता गै.अ. 2 यांनी गाडी पुर्णपणे दुरुस्त झाली नसुन ती पुन्हा दुरुस्त करावी लागेल असे सांगुन टाळाटाळ करु लागले. तसेच गाडीला वेल्डींग करायचे आहे म्हणुन रुपये 2500/- ची मागणी केली. ही मागणी पुर्ण करुन सुद्धा गाडी परत केली नाही व आजपर्यंत गाडी स्वतःजवळ ठेवली आहे व पुन्हा रुपये 15000/- ची मागणी करीत आहे. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 चे अधिकारी ने त.क. ला गैरअर्जदार क्र.3 कडुन अपघाती मोबदला व गाडी दुरुस्ती खर्च मिळवुन देण्यासाठी रुपये 10000/- ची मागणी केली. त्यामुळे त.क. ने गैरअर्जदारविरुद्ध हा अर्ज दाखल केला.
3) त.क. यांनी त्यांचे तक्रारी अर्जाचे पृष्ठर्थ एकुण 13 कागदपञे हजर केली आहेत.
4) तक्रारदाराचीतक्रार नोंदणीकृत करुन वि.प. 1ते 3 यांना नोटीस काढणेत आल्या. सदर नोटीसांची बजावणी वि.प. 1 ते 3 यांना झाली ती निशानी 6 व 7 दाखल आहे. विद्यमान मंचाची नोटीस मिळुनही वि.प. 1 ते 3 हे प्रस्तुत कामीहजर झाले नाहीत किंवा लेखी म्हणणे दिले नाही त्यामुळे सदर प्ररण एकतर्फा चालविणेचा हुकुम निशानी 1 वर पारीत करणेत आला.
वि.प.1 ते 3 यांचेवर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आल्यामुळे त.क. ची तक्रार दाखल कागदपञे व पुराव्याचे शपथ यावरुन प्रस्तुत प्रकरण निकाली करणेसाठी ठेवण्यात आले.
तक्रारदाराची तक्रार दाखल दस्ताऐवज, त.क. यांचे पुराव्याचे शपथपञ व लेखी युक्तीवाद व त.क. यांचे वकिलांचा युक्तीवाद यावरुन खालिल कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
5) त.क. ने तक्रार शपथपञावर दाखल केली आहे व निशानी 9 कडे पुराव्याचे शपथपञ दाखल केले आहे. तक्रारदाराची तक्रार व उपलब्ध कागदपञे यांचे बारकाईने अवलोकन करता निशानी 4/3 व 4 चे अवलोकन त.क यांनी वि.प. 1 व 2 यांचे सदर बजाज कंपनीची दुचाकी वाहन नंबर एम.एच.34 झेड 8357 खरेदी केले होते व त्याची किरकोळ दुरुस्तही ही वि.प. 1 व 2 यांचेकडे केली होती. यामुळे त.क. हे वि.प. 1 व 2 यांचे ग्राहक ठरतात. तसेच निशानी 4/2 कडील सदर वाहनाची विमा पॉलिसीचे अवलोकन करता त.क. यांनी वि.प. 3 यांचेकडुन विमा पॉलिसी घेतली होती व अपघात समयी चालु होती त्यामुळे त.क. हे वि.प. 3 यांचे सुद्धा ग्राहक ठरतात.
त.क. यांनी खरेदी केलेल्या बजाज दुचाकी गाडीला दिनांक 29/05/2010 रोजी अपघात झाला व त्यामध्ये त.क. यांचा मुलगा दिनांक 2/6/2010 रोजी मृत्यु पावला हे निशानी 4/1 वरील एफ.आय.आर. वरुन दिसुन येते. त्यानंतर त.क. यांनी सदर गाडी वि.प. 1 व 2 यांचेकडे दुरुस्तीला दिले व वि.प. 3 यांचेकडेही विमा मिळणेसाठी क्लेम फॉर्म भरुन दिला परंतु त्यानंतर अनेक दिवस होऊनही त.क. यांचे वाहन वि.प. 1 व 2 यांनी दुरुस्त केलेनाही व त्यानंतर वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांना दुरुस्ती पोटी 6000/- मागितले व ते वसुल ही केले हे निशानी 4/3 वरील वि.प. 1 व 2 यांनी दिलेल्या पावतीवरुन दिसुन येते. सदर गाडी दुरुस्ती झाल्यानंतर त.क. यांनी सदर गाडी यांचे घरी पोहोचविण्याची विनंती केली त्यावेळी चार दिवस वाट पाहुनही गाडी न आल्याने त.क. यांनी विचारणा केली असता गाडीचा अद्याप काम बाकी आहे असे सांगण्यात आले व त्यानंतर रुपये 2500/- मागण्यात आले व सद्यस्थिती गाडी वि.प. 1 व 2 यांचेकडेच आहे व ती परत देणेसाठी रुपये 15000/- मागणी करत आहे. ग्राहकांचे कडुन दुरुस्तीपोटी पैसे स्विकारुनही ती गाडीवेळेत दुरुस्त करुन न देणे ही गंभीर स्वरुपाची दुषित व ञुटीची सेवाआहे व त्यानंतर ग्राहकांचे कडुन अवास्तव पैसे मागणे ही अनुचित व्यापार प्रथा आहे व तयाचा वापर वि.प. 1 व2 यांनी केला आहे सिद्ध होत आहे.
तसेच अपघात कालावधी मध्ये सदर अपघातग्रस्त गाडीचा विमा होता हे निशानी 4/2 वरील विमा पॉलिसीवरुन दिसुन येते. सदर विमा कालावधी हा 15/10/2009 ते 14/10/2010 पर्यंत होता व गाडीचा अपघात हा 29/05/2010 रोजी झाला होता. त.क. यांनी अपघात विमा मिळणेसाठी वि.प. 3 यांचेकडे क्लेम फॉर्म भरुन दिला होता तरीही वि.प. 3विमा कंपनीने त्याबाबत काहीही कार्यवाही केली नाही व विमा लाभ मिळणेपासुन त.क. यांना वंचित ठेवले. त.क. यांचा मुलगा हा अपघातामध्ये मरण पावला होता. त्यामुळे त.क. यांना विमा रकमेचा खुप मोठा आधार होता. सर्वसामान्य वाहनधारक आपल्या वाहनामचा विमा हा याच एकमेव उदे्दशाने काढतअसतात कारण वेळेला तो विमा उपयोगी पडावा परंतु या प्रकरणात वि.प. 3 यांनी विमा पॉलिसी चालु असताना सुद्धा त्याचा लाभ त.क. यांना मिळु दिला नाही ही सुद्धा गंभिर स्वरुपाची दुषित व ञुटीची सेवा आहे व विमा पॉलिसी चालु असताना सुद्धा त्यांचा लाभ पॉलिसी धारकाला ने देणे ही अनुचित व्यापार प्रथा आहे व त्याचा वापर वि.प. 3 यांनीही केला असल्याचे दिसुन येते.
अशात-हेने तक्रारदार हे आपल्या न्यायहक्कासाठी व विमा रक्कम मिळणेसाठी तसेच गाडी परत मिळणेसाठी किती प्रयत्नात आहेत हे निशानी 4/5, 4/9 व निशानी 4/12 वरील त.क. यांचे वकिलांनी नोटीसा पाठविल्यावरुन दिसुन येते. वि.प. 1 ते 3 यांना त.क. यांचे वकिलांनी वेळोवेळी एकुण 3 नोटीसा पाठविल्या तरीही वि.प. 1 ते 3 यांनी याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. एवढेच नव्हे तर विद्यमान मंचाची प्रस्तुत प्रकरणाची नोटीस मिळुनही विद्यमान मंचात हजर झाले नाहीत यावरुन वि.प. 1 ते 3 यांची कायद्याबाबत व ग्राहकांबाबत किती नकारात्मक मानसिकता आहे हे स्पष्ट दिसुन येते.
6) अशा त-हेने वरील विवेचनावरुन वि.प. 1 ते 3 यांनी त.क. यांना दुषित व ञुटीची सेवा दिलीआहे व अनुचित व्यापार प्रथेचा वापर केला आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे वि.प. 1 ते 2 यांचे ताब्यात असणारी त.क. यांची बजाज कंपनीची दुचाकी वाहन नंबर एम.एम. 34, झेड 8357 यांचा ताबा कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थिती चालु स्थिती त.क. यांना द्यावा तसेच वि.प. 3 यांनी त.क. यांचे अपघात झालेल्या दुचाकी वाहनाची विमा रक्कम रुपये 20000/- (दोन लाख माञ) त.क. यांना अदा करावे व त्यावर अपघात झाले तारखेपासुन म्हणजे दिनांक 29/05/2010 पासुन 12% दराने व्याज द्यावे या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
त.क. यांनी दुरुस्तीसाठी सोडलेली गाडी वेळेत वि.प. 1 व 2 यांनी दुरुस्त करुन दिली व वि.प. 3 यांनी विमा पॉलिसीची रक्कम त.क. यांना अदा केली नाही त्यामुळे गाडी व विमा पॉलिसीची रक्कम यांचे उपभोगापासुन त.क. यांना वंचित राहावे लागले त्यामुळे त.क. यांना झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी वि.प. 1 व 2 यांनी 5000/- व वि.प. 3 यांनी 5000/- त.क. यांना अदा करावे व तक्रार खर्च प्रत्येकी रुपये 1000/- असे रुपये 3000/- त.क.यांना मंजुर करणे योग्य ठरेलअसे या मंचास न्यायोचित वाटते.
एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन वि.प. 1 ते 3 यांनी त.क. यांना सेवा देण्यास न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आले असल्याने खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
1) तक्रारकर्ता यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2) वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांचे मालकीचे बजाज दुचाकी वाहन नंबर एम.एच. 34, झेड 8357 पुर्ण दुरुस्ती करुन चालु स्थितीतचा ताबा कोणतेही शुल्क न आकारता त.क. यांना द्यावा.
3) वि.प. 3 यांनी त.क. यांचे विमा पॉलिसीची रक्कम रुपये 200000/- (दोन लाख माञ) व त्यावर अपघात तारखेपासुन म्हणजे दिनांक 29/5/2010 पासुन सर्व रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 12% दराने व्याज द्यावे.
4) वरील आदेशाचे पालन आदेश तारखेपासुन 30 दिवसात करावे अन्यथा आदेश तारखेचे 30 दिवसानंतर उपरोक्त कलम 2 मध्ये नमुद केलेल्याप्रमाणे गाडीचा ताबा न दिल्यास दररोज रुपये 100/- (शंभर माञ) दंड वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांना गाडीचा ताबा देईपपर्यंत द्यावेत तसेच वि.प. 3 यांनी उपरोक्त कलम 3 मध्ये केलेले व्याज 12% ऐवजी 15% दराने द्यावे
5) वरील आदेशाची प्रत सर्व पक्षकारांना पाठविण्यात यावे
चंद्रपूर
दिनांक - 26 /06/2013