Maharashtra

Nagpur

CC/117/2019

SHRI RAJESH KARUJI SARANGPURE - Complainant(s)

Versus

SAI KRUPA HOUSING AGENCY AND DEVELOPERS THROUGH TIS PROPRIETOR SHRI JAGESHWAR SHRIRAM TEMBRE - Opp.Party(s)

ADV SAILESH SITANI

29 Nov 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/117/2019
( Date of Filing : 11 Feb 2019 )
 
1. SHRI RAJESH KARUJI SARANGPURE
PLOT NO 19, TARODI TAH KAMPTEE, DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SAU DAMINI RAJESH SARANGPURE
TARODI TAH KAMPTEE NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAI KRUPA HOUSING AGENCY AND DEVELOPERS THROUGH TIS PROPRIETOR SHRI JAGESHWAR SHRIRAM TEMBRE
BHAWANI NAGAR PUNAPUR, PARDI TAH AND DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI GAJANAN BABAN MAHALLE
AT POST TARODI BURJ, TAH KAMPTEE, DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. SHRI MAROTI BABAN MAHALLE
AT POST TARODI BURJ, TAH KAMPTEE, DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Nov 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री संजय वा. पाटील, मा. अध्‍यक्ष)

  1. तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे मिळकतीचा विकसनाचा व्‍यवसाय करतात आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ हे जमिनीचे मुळ मालक आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे जमिन विकसीत करण्‍यासाठी करारनामा केलेला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी खसरा नंबर २४/२, पटवारी हलका नंबर ३३, मौजा तरोडी बुर्ज, तालुका कामठी या मिळकतीबाबत विकसनाचा करारनामा केलेलेा आहे आणि त्‍या   मिळकतीमध्‍ये लेआऊट मॅप तयार करुन भुखंड क्रमांक १२ हा तक्रारकर्त्‍याला रुपये २,५०,०००/-  मध्‍ये विकण्‍याचा करारनामा केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने ईसारापोटी रुपये २०,०००/-  विरुध्‍द पक्ष यांना दिलेले आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदरहु लेआऊट नकाशामध्‍ये बदल केल्‍यामुळे भुखंड क्रमांक १२ चा क्रमांक बदलुन भुखंड क्रमांक ७४ असा झालेला आहे आणि त्‍याचा एरिया १००० चौ. फुट असा झालेला आहे. तक्रारकर्त्‍याने भुखंड क्रमांक  ७४ ची पूर्ण रक्‍कम विरुध्‍द पक्ष यांना दिलेली आहे. तक्रारकर्त्‍याला भुखंड क्रमांक ७४ बाबत व्‍यवहार करण्‍याची विनंती केली आणि भुखंड क्रमांक ७४ चा ताबा दिनांक २५/०७/२०१६ रोजी तक्रारकर्त्‍यास दिला. तेव्‍हापासुन तक्रारकर्त्‍याच्‍या ताब्‍यात सदरहु भुखं‍ड क्रमांक ७४ आहे. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी विक्रीपञ करुन देण्‍यास टाळाटाळ केली आणि सदरहु भुखंडाचा जबरदस्‍तीने ताबा घेण्‍याचा प्रयत्‍न केला म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वर्तमान तक्रार दाखल केलेली आहे.  तक्रारकर्त्‍याने वर्तमान तक्रारीमध्‍ये विक्रीपञ करुन देण्‍याची मागणी केलेली आहे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये २,००,०००/- आणि खर्चाबाबत ५०,०००/- रुपये आणि १८ टक्‍के व्‍याजाची मागणी केलेली आहे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे मंचाचे नोटीस मिळाल्‍यानंतरही हजर झाले नाही. सबब त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ३/४/२०१९ रोजी पारीत करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्ते यांनी वर्तमान प्रकरणामध्‍ये अं‍तरीम आदेशासाठी अर्ज केला आणि सदरहु अर्जावरील आदेशाप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या भुखंडावरील ताब्‍याला कोणत्‍याही प्रकारे बाधा आणू नये आणि जबरदस्‍तीने ताबा घेऊ नये असा अंतरीम आदेश देण्‍यात आला.
  5. तक्रारकर्ते यांनी वर्तमान प्रकरणात तक्रारीमध्‍ये दुरुस्‍ती करुन भुखंड क्रमांक १९ (१०६२.५० चौ.फुट.) खसरा नंबर २४/२/के.ऐच. मौजा तरोडी, पटवारी हलका नंबर ३३, तालुका कामठी, जि. नागपूर याबाबत व्‍यवहार झाल्‍याबाबत नमुद करुन दुरुस्‍ती केली आणि भुखंड क्रमांक १९ बाबतचे विक्रीपञ करुन देण्‍याची मागणी केली.
  6. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी वर्तमान प्रकरणात आपला जबाब दाखल करुन तक्रारीतील मजकूर नाकारलेला आहे आणि तक्रार खारीज करण्‍याची विनंती केलेली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी वर्तमान प्रकरणात त्‍यांचे विरुध्‍द दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यासाठी वेगळा अर्ज केला परंतू तो नामंजूर करण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारकर्ते आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी वर्तमान प्रकरणात एकञीत पुर्सिस दाखल केली आणि सदरहु पुर्सिस प्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी ६ महिण्‍यांचे आंत विक्रीपञ करुन देण्‍याचे मान्‍य केले आणि तक्रारकर्ते यांनी नुकसान भरपाईबाबतची मागणी मागे घेतली.
  7. सबब वर्तमान प्रकरण हे अंतिम आदेशासाठी घेण्‍यात आले.
  8. वर्तमान प्रकरणात तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली कागदपञे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी दाखल केलेला जबाब आणि कागदपञे तसेच तक्रारकर्ता आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी दाखल केलेले एकञीत पुर्सिस या सर्वांचा विचार करुन या न्‍यायमंचाने खालिल मुद्दे विचारात घेतले आणि त्‍यावर निष्‍कर्षे खालिलप्रमाणे खालिल कारणांसाठी नोंदविले आहेत.

       अ.क्र.            मुद्दे                                                               उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?               होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा                        होय

दिली काय ?                                                                             

  1. नविन भुखंडाबाबत तक्रारकर्ते हे आदेश मिळण्‍यास      होय

हकदार आहे काय ?

  1. काय आदेश ?                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक १ ते ३ बाबत- आम्‍ही तक्रारकर्त्‍याचे वकील सितानी व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे वकील दिपाली पाटील यांचा युक्‍तीवाद ऐकला. वर्तमान प्रकरणामध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना भुखंड विक्रीबाबतचा करारणामा केलेला आहे. याबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी कोणत्‍याही प्रकारे न्‍यायमंचासमोर हजर राहुन जबाब दाखल करुन नाकारलेले नाही. विरुध्‍दपक्ष क्रमांक २ व ३ यांनी सुद्धा त्‍यांचे जबाबामध्‍ये लिमिटेशन बाबतच्‍या मुद्दा उपस्थित केला होता परंतू वर्तमान प्रकरणात तक्रार दाखल करण्‍याचे कारण सतत घडत आहे त्‍यामुळे वर्तमान तक्रार ही मुदतीबाहेर नाही आहे. विरुध्‍दपक्ष क्रमांक २ व ३ यांनी तक्रारदारासोबत एकञीत पुर्सिस दाखल करुन भुखंडाचे विक्रीपञ करुन देण्‍यास तयार असल्‍याचे नमुद केलेले आहे. सबब तक्रारदार हा विरुध्‍द पक्ष यांचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट आहे. सदरहु करारनामा झाल्‍यापासून आजपर्यंत विरुध्‍द पक्ष यांनी ठरल्‍याप्रमाणे विक्रीपञ करुन दिले नाही आणि म्‍हणून सेवेमध्‍ये ञुटी केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. सबब मुद्दा क्रमांक १ व २ यावर आम्‍ही होकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.
  2. तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ हे आता तक्रारकर्त्‍याला त्‍याच मिळकतीतील दुस-या  भुखंडाचे म्‍हणजे भुखंड क्रमांक १९ चे पुर्सिस मध्‍ये नमुद केलेल्‍या अटीवर विक्रीपञ करुन देण्‍यास तयार आहे. म्‍हणून वर्तमान तक्रार मंजूर करण्‍यात यावी.यावर तक्रारकर्त्‍याचे वकीलांना ‘इतर भुखंडाचे विक्रीपञ करुन देण्‍याचा आदेश कसा देता येईल असा प्रश्‍न केला असता तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे सोबत करारनामा झालेला आहे आणि सदरहु करारनामा हजर करण्‍यास तक्रारकर्ते तयार आहे. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ते यांनी पुन्‍हा एकञीत पुर्सिस दाखल करुन भुखंड क्रमांक १९ बाबतच्‍या  करारनाम्‍याची प्रत दाखल केलेली आहे. सबब तक्रारकर्ते यांना नविन भुखंडाचे विक्रीपञ मिळण्‍याचा अधिकार आहे. तसेच एकाच खसरा नंबर मधील आणि पटवारी हलका नंबर मधील भुखंडाचे लोकेशन आणि साईझ (क्षेञफळ) यामध्‍ये बदल झाल्‍यास तक्रार मंजूर करता येते.   आणि त्‍यासाठी Bimlesh Sakhuja Vs. Ansal Housing & Construction, I (2016) CPJ 459  या प्रकरणातील न्‍यायनिवाड्याचा आधार घेणे योग्‍य आहे असे आमचे मत आहे. सबब वर्तमान प्रकरणामध्‍ये  तक्रारकर्ते आणि विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या एकञीत पुर्सिस च्‍या  आधारावर आणि मुळ प्‍लॉट संबंधी दिलेला मोबदला (Consideration) विचारात घेवून वर्तमान तक्रार मंजूर करता येऊ शकते असे आमचे मत आहे. तक्रारकर्ते यांनी आपली नुकसान भरपाई मिळण्‍याची मागणी मागे घेतली आहे तसेच वर्तमान प्रकरणामध्‍ये मुळ भुखंडाचे कब्‍जापञ सुद्धा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी दिलेले आहे. सबब मुळ भुखंडाचा ताबा विरुध्‍द पक्षाला परत करणे आवश्‍यक आहे असे आमचे मत आहे. या सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता वर्तमान प्रकरणात आम्‍ही खालिलप्रमाणे आदेश पारीत करीता आहोत.

अंतिम आदेश

  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. तक्रारकर्ते यांनी मुळ भुखंडाचा ताबा विरुध्‍द पक्ष यांना परत करावा आणि त्‍यानंतर लगेचच दहा दिवसाचे आत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्‍याला नविन भुखंड क्रमांक १९, क्षेञफळ १०६२.५० चौ.फुट, खसरा नंबर २४/२/के.ऐच, पटवारी हलका नंबर ३३, मौजा तरोडी(बु) तहसिल कामठी, जिल्‍हा नागपूर या भुखंडाचे मुळ भुखंडाला दिलेल्‍या मोबदल्‍यापोटी अथवा नविन करारनाम्‍यात ठरल्‍याप्रमाणे नोंदणीकृत विक्रीपञ करुन द्यावे आणि नविन भुखंडाचा ताबा दिल्‍या नसल्‍यास विक्रीपञाच्‍या वेळी अथवा विक्रीपञ नोंदविल्‍यानंतर लगेचच ताबा द्यावा.
  3. विक्रीपञ नोंदणीचा खर्च तक्रारकर्ता यांनी सोसावा.
  4. नुकसान भरपाई बाबत आणि खर्चाबाबत वर्तमान प्रकरणात आदेश नाही.  
  5. वरील आदेशाची पूर्तता या आदेशाच्‍या तारखेपासून ६ महिण्‍यांचे आंत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.