Maharashtra

Nagpur

CC/411/2020

SHRI. VISHWAJIT DIGAMBER WASNIK - Complainant(s)

Versus

SAI BALAJI INTERIORS AND CONSTRUCTIONS- THROUGH PROPRIETOR SACHIN ARUN BHIVAPURKAR - Opp.Party(s)

ADV. MRS. S.K. PAUNIKAR

09 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/411/2020
( Date of Filing : 16 Oct 2020 )
 
1. SHRI. VISHWAJIT DIGAMBER WASNIK
R/O. ITWARI, MASKASATH, NEAR RAILWAY BRIDGE, BEHIND DR. AMBEDKAR STATUE, TELIPURA, PEOTHA, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAI BALAJI INTERIORS AND CONSTRUCTIONS- THROUGH PROPRIETOR SACHIN ARUN BHIVAPURKAR
R/O. RAJ RAJESHWARI MANDIR QUARTER NO.122, VIDARBHA HOUSING BOARD COLONY, SHESH NAGAR, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MRS. S.K. PAUNIKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 09 Mar 2022
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्षाचा साई बालाजी इंटेरियर अॅन्‍ड कन्‍स्‍ट्रक्‍शन या नावाने व्‍यवसाय असून तो बांधकामाचा आणि इंटेरियरचा करण्‍याचे काम करतो. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी त्‍याच्‍या मालकिचा मौजा- नारी, प.ह.नं. 11, खसरा क्रं. 147/3,  148/2, शीट क्रं. 340/98 आणि सर्वे नं. 338, कार्पोरेशन हाऊस नं. 2781/77, नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्‍यास  यांच्‍या हद्दीतील एकूण क्षेत्रफळ1500 चौ.फु. प्लॉटवर घर बांधण्याचा करारनामा दिनांक 22.11.2018 ला रुपये 23,31,000/- एवढ्या रक्‍कमेत करून देण्‍याबाबतचा  करार केला होता व करारातील शर्ती व अटीनुसार विरुध्‍द पक्षाला त्‍याच दिवशी रुपये 3,49,650/- अदा केले होते. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या घराचे बांधकाम हे दि. 01.01.2019 ला सुरु करण्‍यास सुरुवात केली असून घराचे बांधकाम हे सहा महिन्‍यात म्‍हणजेच दि. 22.06.2019 पर्यंत पूर्ण करुन तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत करण्‍याचे कबूल केले होते. त्‍यानंतर  तक्रारकर्त्याने दिनांक 03.03.2019 ला विरुध्‍द पक्षाला बांधकामा पोटी रुपये 2,00,000/- अदा केले.  त्यानंतर ही तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला रक्कम अदा केलेली आहे, तरी देखील विरुध्‍द पक्षाने कबूल केल्‍याप्रमाणे दि. 05.12.2019 पर्यंत घराचे बांधकाम पूर्ण केले नाही. उभय पक्षात झालेल्‍या कराराप्रमाणे घराचे बांधकाम हे दिनांक 22.10.2019 पर्यंत पूर्ण करावयाचे होते . तसेच करारात ठरलेल्‍या स्पेसिफिकेशन प्रमाणे बांधकाम केलेले नाही या व्यतिरिक्त जेव्हा तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाने केलेल्या बांधकामाबाबत आक्षेप घेतला त्यावेळी विरुध्‍द पक्षाने स्वतःहून घराचे बांधकाम थांबविले, म्‍हणून तक्रारकर्त्याने सिव्‍हील इंजिनिअर  अॅन्‍ड कॉन्‍ट्रक्‍टर, श्री. एन. एस. दत्ता यांना बांधकामाची तपासणी करता बोलाविले व त्‍यांनी त्‍यांचा अहवाल दिनांक 30.09.2019 ला सादर केला. तक्रारकर्त्‍याने दिनांक 22.12.2018 च्‍या करारानुसार एकूण रुपये 10,14,650/- विरुध्‍द पक्षाला अदा केले होते, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्‍या घराचे इतक्या मूल्याचे काम केले नाही.  तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या घराचे बांधकाम करतानां निकृष्ट दर्ज्‍याच्‍या विटाची भिंत बांधल्यामुळे सदर भिंतीला भेगा पडल्यात व त्यामुळे विरुध्‍द पक्षाने स्वतःहून भिंत पाडली व त्यानंतर ती बांधली सुध्‍दा नाही.
  2. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दिनांक 04.06.2019 ला विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडे रुपये1,00,000/- ची मागणी केली व सदरची रक्कम न दिल्यास तो स्वतः आत्महत्या करेल अशा प्रकारची धमकी दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने रुपये1,00,000/- विरुध्‍द पक्षाला दिले व त्यानंतर रुपये 75,000/- दिनांक 04.08.2019 ला पुनश्च दिले. तक्रारकर्त्याने बांधकामाच्या टप्प्यानुसार विरुध्‍द पक्षाला रक्कम देण्याचे ठरविले होते. त्यानंतर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे घराचे बांधकाम थांबविले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे घराचे बांधकाम निकृष्‍ट दर्ज्‍याचे व अपूर्ण केल्यामुळे त्याचे बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट कम असेसमेंट संबंधित कन्सल्टंट अँड कॉन्ट्रॅक्टर कडून करुन घेतले. कन्सल्टंटच्या अहवालानुसार विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घराचे रुपये 6,00,000/- इतक्या मूल्याचे काम केले आहे. कन्सल्टंटच्या अहवालानुसार विरुध्‍द पक्षाने केलेल्या बांधकामाच्या उणिवा  खालीलप्रमाणे आहे.

 

  1. Only the Ground Floor Slab and part of the Brickwork is complete. Plinth filling is done and plinth slab is not casted.
  2. Quality of the Concrete is very poor & the grade of the  
  3. concrete is not specified. Concrete was not properly vibrated as there were big size voids and gaps on the column beam function. There were Honey combs on the Concrete surface which were not repaired.
  4. Columns casted are not in plumb line, Slab casted is not in level. There was a settlement of the shuttering supports as it was laid on a loose ground surface.
  5. Staircase casted is a disaster and it is beyond repair and has to be demolished. Risers are uneven and it seems that it was casted by a Layman without referring to the drawings.
  6. All the Columns are not properly connected with Beams and there are no edge beams to take the load of the walls above.
  7. 230 mm thk. Brick masonry of the front was has developed settlement cracks as there is no stiffener present.
  8. Loft slab over Toilet is rested on a 115 mm thk. Wall and it is also not in level.
  9. The pace of the work is very slow and it seems that all the  construction is done by Unskilled. Workers without proper supervision.
  10. Value of work done till date is Rs. 6,00,000/-  (RS. Six Lakh Only) Details Attached.

 

  1. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला बांधकामातील उणिवा दूर करून बांधकाम पूर्ण करण्यास विनंती केली, तसेच बांधकामा पोटी असलेली ऊर्वरित रक्कम बांधकामाच्या टप्‍प्‍याप्रमाणे देण्याची तयारी दर्शविली असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने त्याची चूक कबूल केली नाही व स्वतःहून बांधकाम बंद केले व त्‍यानंतर परत आला नाही.
  2. तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, त्‍याने त्‍याच्‍या घराचे बांधकाम पूर्ण केल्यामुळे व बांधकामाचा दर्जा सरासरी असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला दिनांक 29.05.2020 ला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व त्याद्वारे बांधकाम पूर्ण करण्याबाबत व त्यापोटी दिलेली रक्‍कम रुपये10,14,650/- व्याजासह परत करण्‍याबाबत विनंती केली. विरुध्‍द पक्षाला सदरची नोटीस प्राप्त होऊनही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे  घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडून बांधकामा पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये10,14,650/- 18 टक्के दराने व्याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  3. विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविण्यात आलेली नोटीस दिनांक 12.02.2021 ला प्राप्त होऊनही विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष  हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 04.08.2021 रोजी पारित करण्यात आला.
  4. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद याचे वाचन केल्यावर व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

             मुद्दे                                     उत्तरे

1    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                 होय

2    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?                  होय

3.    विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय?     होय

4.    काय आदेश ?                                                                             अंतिम आदेशानुसार

का र ण मी मां सा

  1. मुद्दा क्रमांक 1 2 बाबत  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी त्‍याच्‍या मालकिचा मौजा- नारी, प.ह.नं. 11, खसरा क्रं. 147/3,  148/2, शीट क्रं. 340/98 आणि सर्वे नं. 338, कार्पोरेशन हाऊस नं. 2781/77, नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्‍यास  यांच्‍या हद्दीतील एकूण क्षेत्रफळ1500 चौ.फु. प्लॉटवर घर बांधण्याचा करारनामा दिनांक 22.11.2018 ला रुपये 23,31,000/- एवढ्या रक्‍कमेत करून देण्‍याबाबतचा  करार केला होता व करारातील शर्ती व अटीनुसार विरुध्‍द पक्षाला त्‍याच दिवशी रुपये 3,49,650/- अदा केले होते हे नि.क्रं. 2 (1) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाने  करारानुसार तक्रारकर्त्‍याच्‍या घराचे बांधकाम हे दि. 01.01.2019 ला सुरु करण्‍यास सुरुवात केली असून घराचे बांधकाम हे सहा महिन्‍यात म्‍हणजेच दि. 22.06.2019 पर्यंत पूर्ण करुन तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत करण्‍याचे कबूल केले होते. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला दिनांक 03.03.2019 ला विरुध्‍द पक्षाला धनादेश क्रं. 277120 द्वारे बांधकामा पोटी रुपये 2,00,000/- अदा केले होते. परंतु विरुध्‍द पक्षाने कबूल केल्‍याप्रमाणे दि. 05.12.2019 पर्यंत घराचे बांधकाम पूर्ण केले नाही. उभय पक्षात झालेल्‍या कराराप्रमाणे घराचे बांधकाम हे दिनांक 22.10.2019 पर्यंत पूर्ण करावयाचे होते. तसेच करारात ठरलेल्‍या स्पेसिफिकेशन प्रमाणे बांधकाम केलेले नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे दिसून येते.  या व्यतिरिक्त जेव्हा तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाने केलेल्या बांधकामाबाबत आक्षेप घेतला असता विरुध्‍द पक्षाने स्वतःहून घराचे बांधकाम थांबविले, त्‍यामुळे तक्रारकर्त्याने सिव्‍हील इंजिनिअर  अॅन्‍ड कॉन्‍ट्रक्‍टर, श्री. एन. एस. दत्ता यांना बांधकामाची तपासणी करता बोलाविले व त्‍यांनी त्‍यांचा अहवाल दिनांक 30.09.2019 ला सादर केला. तक्रारकर्त्‍याने दिनांक 22.12.2018 च्‍या करारानुसार एकूण रुपये 10,14,650/- विरुध्‍द पक्षाला अदा केले होते, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्‍या घराचे इतक्या मूल्याचे काम केले नाही.  हे नि.क्रं. 2(4) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक 04.06.2019 ला विरुध्‍द पक्षाला रुपये1,00,000/-  चेक क्रं. 541258 अन्‍वये दिले व त्यानंतर दि. 18.07.2019 ला रुपये 75,000/- चेक क्रं. 277122 अन्‍वये दिले असल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारकर्ता बांधकामाच्या टप्प्यानुसार विरुध्‍द पक्षाला रक्कम देण्यास तयार असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे घराचे ऊर्वरित बांधकाम पूर्ण करुन दिले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे घराचे  बांधकाम निकृष्‍ट दर्ज्‍याचे व अपूर्ण केल्यामुळे त्याचे बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट कम असेसमेंट संबंधित कन्सल्टंट अँड कॉन्ट्रॅक्टर कडून तपासणी करण्‍यास सांगितले व कन्सल्टंटच्या अहवालानुसार विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घराचे रुपये 6,00,000/- इतक्या मूल्याचे काम केले असल्‍याचे नि.क्रं. 2(4) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून रक्‍कम स्‍वीकारुन ही करारानुसार बांधकाम केले ही वि.प. ची अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षकडून बांधकामापोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 4,14,650/- व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर ही ते आयोगा समक्ष हजर झाले नाही व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षावर तक्रारीत लावलेले आक्षेप मान्‍य असल्‍याचे ग्राहय धरण्‍यात येते.       

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून बांधकामा पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 4,14,650/- व त्‍यावर दि. 18.07.2019 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम परत करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी. 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.