जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 47/2007 तक्रार दाखल तारीख –29/08/2011
मदनराव पि.रघुनाथरराव कुरे
वय 52 वर्षे धंदा घरकाम व शेती .तक्रारदार
रा.मोंढा पुर्व बाजू,माजलगांव ता.माजलगांव जि.बीड
विरुध्द
सहायक अभिंयता,
उपविभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत
वितरण कंपनी मर्यादित, माजलगांव
ता.माजलगांव जि.बीड. .सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- गैरहजर.
सामनेवाला तर्फे :- अँड.एस.एन.तांदळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारानी घरगुती वापरासाठी विज पुरवठा घेतलेला आहे. त्यांचा ग्राहक क्र.585010118733 मिटर क्र.90044-95109 असा आहे. सध्या विज पुरवठा चालू आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विरुध्द यापूर्वी सूध्दा चुकीच्या पध्दतीने बेकायदेशीर जादा देयक दिले होते. ते रदद करुन विज पुरवठा खंडीत न करण्या बाबत दावा नं.234/99 दिला होता. दावा चालू असताना सामनेवाला यांनी दि.17.10.2003 रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानुसार त्यांनी 100 युनिट दरमहा विज वापर असा शेरा मारत. त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला दिवाणी न्यायालयात तडजोड झाली.
सामनेवाला यांनीतडजोड पत्राप्रमाणे विज देयक दूरुस्त करुन दिली नाहीत. टाळाटाळ केली. तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.9.8.2005 रोजी आणि दि.23.3.2006 रोजी अर्ज दिला व देयक दूरुस्तीची विनंती केली.देयके भरण्याची इच्छा प्रगट केली. विज पुरवठा खंडीत न करण्याची विनंती केली. तरी सुध्दा सामनेवाला यांनी देयके दूरुस्ती केलेली नाहीत. सामनेवाला यांनी 100 यूनिटचे बिल देणे आवश्यक होते. त्यापेक्षा किती तरी पट जास्त विज बिल आकारले व त्यांचा हिशोब दिलेला नाही. तडजोडीप्रमाणे विज बिल न देता दि.3.12.2006 रोजीचे चूकीचे बिल रक्कम रु.1,37,320/- चे दिले. त्यामध्ये रु.67,049.43 एवढे व्याज दाखवले. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे.विज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदारांनी हिशोब न देता सुध्दा प्रकरणात रु.5,000/- सामनेवाला यांनी जबरदस्तीने भरुन घेतले.
विनंती की, सामनेवाला यांनी विज बिल विज मिटरप्रमाणे तडजोडीप्रमाणे देण्याबाबत आदेश व्हावेत. दि.3.12.2006 रोजीचे रक्कम रु.,1,37,320/- चे विज बिल रदद करण्यात यावी. पूढील बिल विज मिटरप्रमाणे व तडजोडीप्रमाणे देण्यात यावे. तसेच मानसिक त्रासाची रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्या बाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.3.11.2011 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. दिवाणी न्यायालयाच्या तडजोड पत्राप्रमाणे बिल दूरुस्त केलेले असून तक्रारदारांनी बिलाची बाकी भरली नाही. बिल दूरुस्त करुन दिल्याची नोंद ग्राहकाच्या पर्सनल लेजर मध्ये नोव्हेंबर 2006 ला झालेली आहे. तक्रारदारांनी रक्कम भरणा केलेली नाही. दि.30.12.2006ला बिल योग्य आकारणी करुन दिलेले आहे. मूददल व व्याज मागील बिलातील कमी करुन बिल दूरुस्त करुन दिलेले आहे. तक्रारदार थकबाकीदार असून त्यांनी दि.21.3.1995 नंतर त्यांचे पेमेट म्हणून दि.7.4.2006 ला रक्कम रु.5,000/- बिलापोटी जमा केलेले आहेत. त्यांची नोंद सीपीएल वर आहे. तक्रारदाराची थकबाकी असल्याने मूददल रक्कमेवर व्याजाची आकारणी नियमाप्रमाणे करण्यात येते ती रदद करता येत नाही. विज मापक वाचनाप्रमाणे आकारणी केलेली आहे. सूरुवातीचे बिल दिलेले नाही. यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही. कूठलाही मानसिक त्रास दिलेला नाही.त्यामुळे नूकसान भरपाई मागण्याचा तक्रारदारांना हक्क नाही. खर्चही तक्रारदार मागू शकत नाहीत. याउलट सामनेवाला यांचा सन 1997पासूनची विज बिलाची बाकी असून खोटी तक्रार करुन सामनेवाला यांचे आर्थिक नूकसान केले त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार सामनेवाला यांना रु.5,000/- खर्च देऊन रदद करावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा,शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदार यूक्तीवादाचे वेळी गैरहजर व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.तांदळे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सदरची तक्रार दि.6.3.2007 रोजी दाखल केली होती.सदर तक्रारीचा निकाल दि.11.8.2007रोजी झालेला होता. सदर निकाली विरुध्द सामनेवाला यांनी मा.राज्य आयोग परिक्रमा खंडपिठ औरंगाबाद यांचेकडे प्रथम अपिल नंबर 180/2008 चे दाखल केले होते. त्यांचा निकाल दि.14.1.2011 रोजी होऊन सदरचे प्रकरण फेर चौकशीसाठी जिल्हा मंचात दि.29.8.2011 रोजी दाखल झाले. त्यानुसार तक्रारदारांना सदर प्रकरणाची नोटीस पाठविण्यात आली ती तक्रारदारांनी स्विकारली परंतु तक्रारदार जिल्हा मंचात हजर झाले नाही. सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा व शपथपत्र दाखल केले.
सामनेवाला यांनी खुलाशात नमूद केले आहे की, तक्रारदार व सामनेवाला यांचे दिवाणी दावा नंबर 234/1999 मध्ये तडजोड झालेली आहे. तडजोड पत्राप्रमाणे तक्रारदारांना नोव्हेंबर 2006 मध्ये त्यांचे देयके दूरुस्त करुन दिल्याचे सी.पी.एल.वरुन दिसते.
या संदर्भात न्यायालयातील तडजोड पत्र पाहता त्यात जानेवारी 1999 ते सप्टेबर 2003 या कालावाधीमध्ये सामनेवालाकडून तक्रारदाराला घरातील मिटर फॉल्टी असल्याबददलची विज बिले दिलेली आहेत. या तडजोडीनुसार तक्रारदाराच्या विज मिटरची वरील कालावधीतील दावा दिल्यापासून आणखी काही फॉल्टी मिटर म्हणून विज देयके दिलेली आहेत. त्या बाबतचे बिल प्रत्येक महिन्याला 110 यूनिट देण्यात येईल व फॉल्टी दिलेली बिले रदद समजण्यास येतील. याप्रमाणे विज बिलात सामनेवाला दूरुस्ती करुन देतील.
सदरचा मजकूर हा अत्यंत महत्वाचा आहे. यानुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांना जानेवारी 1999 ते सप्टेंबर 2003 या कालावधीचे फॉल्टी बिले रदद करुन प्रतिमहा 110 यूनिटचेबिले देणे सामनेवालावर बंधनकारक आहे. तथापि, या संदर्भात सीपीएल वरुन सामनेवाला यांनी सप्टेंबर मध्ये रु.5,000/- Adjust to post period आणि नोव्हेबर 2006 मध्ये तक्रारदारांना रु.38,183.35 एनर्जी बिल आणि रक्कम रु.36,750.90 व्याज एकूण रु.74,934.25 सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या बिलाच्या अँगेन्स्ट कमी केल्याची दिसते परंतु या संदर्भातखुलाशात सामनेवाला यांनी तक्रारदारांना देयके दूरुस्त करुन दिल्याचे म्हटले आहे. सदरची देयके ही तडजोडीप्रमाणे दूरुस्त करुन दिल्याचे व दूरुस्त वरील रक्कमा या तडजोड पत्राप्रमाणे कशा योग्यरितीने आलेल्या आहेत या बाबतचा सामनेवाला यांचा कोणताही पुरावा नाही. 110 यूनिट प्रमाणे बिलाची आकारणी करीत असताना त्याप्रमाणे वरील कालावधीची एकूण होणा-या रक्कमेचा व सामनेवाले यांनी दिलेल्या रक्कमेतून वजा जाता किती रक्कम तक्रारदाराकडे निश्चितपणे शिल्लक राहते या बाबतचा खुलासा करण्याची जबाबदरी ही सामनेवाला यांची आहे. या संदर्भात सामनेवाला यांचे अत्यंत मोघम स्वरुपाचे विधान आहे व तसेच 2004 मध्ये तडजोड झाली असताना लगेचच सामनेवाला यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही केल्याचे दिसत नाही. तसेच वर नमूद केलेल्या अँडजेस्टमेटच्या रक्कमा तडजोडीप्रमाणे असल्याबाबत सीपीएल वर त्यांचा कूठलाही शेरा नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी योग्य त-हेने तक्रारदारांना देयक दूरुस्त करुन दिले ही बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. मुळात तक्रारदाराची तक्रारच त्या संदर्भात आहे की, सामनेवाला यांनी तडजोड पत्राप्रमाणे तक्रारदारांना देयके देणे आवश्यक आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. सामनेवाला यांनी तक्रारदारांना तडजोड पत्रात नमूद केल्याप्रमाणे 110 यूनिटचे तडजोड पत्रातील फॉल्टी मिटर दर्शविलेल्या कालावधीचे देयके दूरुस्त करुन देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
फॉल्टी मिटरचे देयक दूरुस्त करुन दिल्याबददल सदरची देयके रदद होतील अशी अट सदर तडजोड पत्रात असल्याने त्या संदर्भात सामनेवाला यांनी दिलेली सर्व देयके ही सदर तडजोड पत्राप्रमाणे रदद होतील. सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.2,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तडजोड पत्राप्रमाणे फॉल्टी मिटर दर्शवलेल्या कालावधीचे देयके 110 यूनिट दरमहा प्रमाणे आकारुन तक्रारदारांना आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत योग्य देयके दयावीत.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.2,000/- तक्रारदारांना आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत दयावी.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड