::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 22.02.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अनुसार सेवा देण्यास कसुर केल्याबाबत दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. गै.अ.क्रं. 1 सहकारी पतसंस्था असुन लोंकाचे पैसे ठेवीचे स्वरुपात ठेवण्याचे काम करीत असते व त्या ठेवीवर मुदतीचे नुसार व्याज देत असते. तसेच लोकांना व्याजावर कर्ज ही देण्याचे काम करते. 3. अर्जदाराने दि.09/03/2010 रोजी गै.अ.कडे एक वर्षासाठी मुदत ठेव म्हणुन रु.2,75,000/- फिक्स डिपॉझिट दि.09/3/2010 ते 07/03/2011 पर्यंत देणे होते. या ठेवीवर गै.अ.ने द.सा.द.शे. 10 टक्के व्याज देण्याचे कबुल केले होते. त्याचवेळी मुदत ठेवीचे प्रमाणपञ अर्जदाराला देण्यात आले होते व त्याचा क्रं.91 असा आहे व फिक्स डिपॉझिट खात्याचा नं. 130 आहे. सदर फिक्स डिपॉझिट चा 07/03/2011 रोजी पूर्ण झाली. मॅचुरीटी झाल्यानंतर रु.3,02,500/- अर्जदारास मिळणे होते. सदर फिक्स डिपॉझिटवर अर्जदाराने नोव्हे.2010 मध्ये रु.50,000/- चे कर्ज त्याचे वैयक्तीक व तातडीचे कामाकरीता उचलले होते. 4. अर्जदार मुदत ठेव परतीचे दिवशी दि.7/3/11 रोजी गै.अ.संस्थेत गेला, मॅच्युरिटी झालेल्या फिक्स डिपॉझिट रक्कमेची मागणी केली. अर्जदाराने त्याकरीता अर्ज दिला परंतु गै.अ.ने रककम दिली नाही, त्याकडे लक्ष दिले नाही उलट असे म्हणाले की, तुमच्याने जे होतें ते करा आम्ही पैसे देत नाही. अर्जदाराने गै.अ.कडे फिक्स डिपॉझिटची रक्कम मागून पण दिली नाही. त्यामुळे वकीलामार्फत नोटीस पाठवीला. अर्जदाराने 6/4/2011 ला पोलिसात तक्रार दिली. दि.11/8/11 रोजी गै.अ.ने समझोता करारनामा केला तरी, मुदत ठेवीची रक्कम दिली नाही हे गै.अ.च्या सेवेत कसुर असून त्यामुळे अर्जदारास शारिरीक, मानसीक व आर्थिक ञास सहन करावा लागला. गै.अ.यानी अर्जदाराचे फिक्स डिपॉझिटचे रु.3,02,500/- या रक्कमेतुन अर्जदाराने उचलले कर्जाची रक्कम रु.50,000/- वजा करुन उरलेली रक्कम रु. 2,52,500/-, 10 टक्के व्याजासह त्वरीत परत करावे असा आदेश व्हावा. अर्जदारास शारिरीक, मानसीक व आर्थिक ञास सहन करावा लागला त्यासाठी गै.अ.नी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- देण्याचा आदेश व्हावा. अर्जदाराने गै.अ.स पाठविलेल्या नोटीसचा खर्च व केसचा इतर खर्च हे सर्व मिळवून रु.15,000/- गै.अ.वर लादण्यात यावे अशी विनंती केली आहे. 5. अर्जदाराने तक्रारी सोबत नि. 5 च्या यादीनुसार एकुण 22 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.स नोटीस काढण्यात आला. गै.अ.हजर होवून नि.12 नुसार लेखीउत्तर दाखल केले. 6. गै.अ.यांनी नि. 12 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात, अर्जदाराने तक्रारीत केलेले कथन अमान्य केले आहे. गै.अ.कडे बचत खाते उघडून रक्कम जमा केली हे म्हणणे खोटे असुन अमान्य आहे. मामल्यातील परिच्छेद क्रं.2 मधील मजकुर अंशतः खोटा व अंशतः बरोबर आहे. अर्जदाराने परिच्छेद 15 मध्ये केलेले सर्व मागण्या हया गै.अ.ला मान्य नाही. अर्जदार रक्कम रु.2,52,500/- व त्यावरील व्याज 10 टक्के मिळण्यास पाञ नाही. तसेच अर्जदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई रक्कम रु..2,00,000/- देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गै.अ.ला अर्जदाराने प्रस्तुत मामल्याचा खर्च रु.10,000/- दयावे असा आदेश पारीत होणे परिस्थितीनुरुप व कायदेशीर होईल.
7. गै.अ.यांनी लेखीबयानात अतिरिक्त बयानात कथन केले की, जेव्हा अर्जदार आवर्तीची रक्कम उचल करण्यास आला तेव्हा स्पष्ट कल्पना देण्यात आली की, सदर संस्था नविन संचालक मंडळानी घेतली असल्यामुळे व संस्थेच्या खात्यात अतिशय जास्त विसंगती व अनियमितता आढळून आल्यामुळे संस्थेचे लेखा परिक्षण करवून घेण्याचे ठरवून घेतले आहे. लेखापरिक्षणात असे स्पष्ट झाले की, अर्जदाराने कधीही स्वतःहा प्रत्यक्षरित्या रक्कम संस्थेत जमा केलेली नाही. आवर्ती जमा खात्याचा तसा खाता उघडण्यास आवश्यक असलेला फॉर्म अर्जदाराने भरुन दिलेला नाही. अगर भरलेला नाही. आवर्ती जमा खाता क्रं.130 मध्ये क्रेडिट व्हाऊचर एंन्ट्री दि.09/03/2010 अन्वये ट्रान्सफर एंन्ट्री म्हणून दर्शविण्यात आलेली आहे. श्रीमती गौरी मंडल हिच्या नावाचे आवर्ती जमा खाता क्रं.129 होता या आवर्ती खाते क्रं.129 मध्ये ट्रान्सफर एंन्ट्री व्दारे आवर्ती जमा खाता क्रं.130 मधून क्रमशः नावे लेखा व नावे नोंद दर्शविण्यात आली आहे. गोपाल मंडल यांनी स्वतः पास केल्या त्यांनी व्हाऊचर तयार करुन त्यांनी सहया केल्या. अर्जदाराने आवर्ती जमा खाता उघडण्याचा फॉर्म भरुन दिला नाही. त्याअर्थी जमा खात्याचे केवायसी दस्ताऐवज सुध्दा अभिलेखावर उपलब्ध नाही. अर्जदार व गोपाल मंडल हे अतिशय जवळचे जिवलग मिञ आहेत. गोपाल मंडल यांनी अर्जदाराशी हातमिळवणी करुन त्याने अर्जदाराला देणे असलेली रक्कम, संस्थेच्या माध्यमातुन अर्जदाराला मिळावी याकरीता त्याचे प्रशासकीय अधिकाराचा गैरफायदा घेऊन खोटा व बनावट व्यवहार तयार करण्यात आला आहे.
8. गै.अ.ना पुरविलेल्या माहितीवरुन असे निर्दशनात आले की, अर्जदाराचे गोपाल मंडल यांचेशी जवळच्या संबंधामुळे त्याच्या आपसात स्वतंञ पैशाचा व्यवहार झाला होता. अर्जदाराने गोपल मंडलला रु.2,75,000/- हात उसणे दिले होते. दि.24/2/10 रोजी गोपाल मंडल यास एम.एस.एन्टरप्रायझेस, नागपूर यांचेकडून वाहन विक्रीची किंमत म्हणून चेक क्र. 90457 व्दारे प्राप्त झाली होती. सदर रक्कम गोपाल मंडल यांची पत्नी सौ.गौरी मंडल हिचे नावाने फिक्स डिपॉझिट म्हणून संस्थेमध्ये खाता क्रं.129 मध्ये जमा केली. अर्जदारानी त्याच्या बहीणीच्या लग्नाकरीता आवश्यकता दाखविले असता मानवीय दृष्टिकोनाचा अवलंब करुन रेकॉर्डवर उपलब्ध मुदत आवर्ती ठेव रकमेवर त्यांना तात्पुरते रु.50,000/- चे कर्ज मंजुर करण्यात आले. त्याची निकटची आवश्यकता लक्षात घेता त्यावेळी त्याच्याकडून आवश्यक कागदपञावर भरुन सहया घेण्यात आल्या नाही. माञ अर्जदारानी या सर्व औपचारिकता दोन – तिन दिवसात पूर्ण करुन देण्याचे आश्वासन दिले होते. संस्थेकडे जमा असलेली रक्कम अवैध व चुकीच्या मार्गाने कोणत्याही व्यक्तीच्या हातात जाता कामा नये. 9. गै.अ.यांनी लेखीउत्तरात पुढे असेही कथन केले आहे की, प्रस्तुत मामल्यात उपस्थित मुद्दे अतिशय गुंतागुंतीचे असून सर्व पक्षांना पुरेपुर संधी देऊन कागदपञ व केलेले कथन सिध्द करुन देण्याची संधी मिळणे जरुरी आहे. अर्जदार हा संस्थेचा सदस्य किंवा जमाकर्ता नाही व म्हणून तो संस्थेचा ग्राहक सुध्दा नाही. वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा अर्ज गै.अ.च्या खर्चासह खारीज करण्यात यावे.
10. गै.अ.यांनी लेखीउत्तरासोबत नि.क्र.13 च्या यादीनुसार 11 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ शपथपञ नि. 8 व अतिरिक्त शपथपञ नि. 17 नुसार दाखल. गै.अ.यांनी नि.14 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. अर्जदाराने आपल्या तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ नि.19 नुसार मनिष तिवारी याचा शपथपञ दाखल. तसेच नि. क्रं.18 च्या यादीनुसार नोटराईज करारनामा सादर केला. 11. अर्जदार व गै.अ.यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ आणि उभयपक्षांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 12. गै.अ.ही महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 नोंदणीकृत सहकार संस्था असुन सहयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर र.न.384 या नावाने काम करतो. (यापुढे संक्षिप्त पत संस्था) गै.अ.संस्था ठेवीदारांकडून ठेवी स्विकारणे, कर्ज देणे, बचत खाते उघडणे इत्यादी स्वरुपाचे बॅकिंग व्यवहार करणारी पत संस्था आहे अर्जदाराचे नावाने आवर्ती जमा खाते क्रं.130 उघडण्यात आले असून त्या खात्यात रु.2,75,000/- फिक्स डिपाझीट एक वर्ष मुदती करीता दि.07/03/2011 या कालावधीकरीता ठेवण्यात आले. त्याचे मुदत ठेवीचे प्रमाणपञ क्रं. 91 अर्जदारास देण्यात आले. याच मुदत ठेवीवर अर्जदारास रु.50,000/- तारण कर्ज देण्यात आले. या बाबी गै.अ.पतसंस्थेने मान्य केल्या आहे.
13. गै.अ.पतसंस्थेने असा आक्षेप घेतला आहे की, प्रत्यक्षरित्या कोणताही व्यवहार झालेला नाही. तर गोपाल मंडल यांनी प्रशासकीय अधिकाराचा दुरुपयोग करुन ट्रान्सफर एंन्ट्री व्दारे खाता क्रं.129 मधून रक्कम ट्रान्सफर करुन आवर्ती खाता क्रं. 130 मध्ये दि. 9/3/10 रोजी रु.2,75,000/- ट्रान्सफर करण्यात आले. गै.अ.पतसंस्थेने प्रत्यक्ष व्यवहार झाल्याचे नाकारले आहे परंतु आवर्ती खाता क्रं. 129 गौरी मंडल हिचे नावाने होता व खाता बंद करुन त्यात मिळालेली रक्कम त्याच दिवशी अर्जदार याचा आवर्ती खात्यामध्ये जमा करुन एफ.डी.प्रमाणपञ अर्जदारास देण्यात आले. अर्जदाराने मुदतठेवीच्या प्रमाणपञाची झेरॉक्स प्रत अ-1 वर दाखल केलेली आहे. सदर दस्तावर पतसंस्थेचे सचिव व व्यवस्थापक यांची सही असुन शिक्का आहे. पतसंस्थेने मान्य केले आहे की, या मुदत ठेवीवर अर्जदारास रु.50,000/- तारण कर्ज दिले आहे. त्यामुळे अर्जदाराची मुदत ठेव गै.अ.पतसंस्थेत आहे व त्याची मुदत दि.07/03/2011 ला संपल्यानंतर 10 टक्के व्याजाने येणारी रक्कम रु.3,02,500/- देय होती. परंतु गै.अ.पतसंस्थेने अर्जदाराने मुदत ठेवीची रक्कम मागणी करुनही दिलेली नाही ही त्यांच्या सेवेतील न्युनता आहे असे उपलब्ध रेकॉर्डवरुन सिध्द होतो.
14. गै.अ.पतसंस्थेने असा आक्षेप घेतला आहे की, जुने संचालक मंडळाने पतसंस्थेच्या लेखात अनियमितता व विसंगती केल्याचे आढळून आले, त्यामुळे नविन संचालक मंडळाने लेखापरिक्षण करण्याचे ठरविले. गै.अ.ने लेखीउत्तरासोबत प्रमाणित लेखापरिक्षक अब्दुल रशिद याचा रिपोर्ट दाखल केला. लेखापरीक्षक यांनी लेखापरिक्षण केले असता, गौरी मंडल हिच्या आवर्ती जमा खात्यातील रु.2,90,000/- दि.9/3/10 रोजी परत केल्याची नोंद आहे. या रक्कमेतुन रु.2,75,000/- अर्जदार हयाचे मुदत ठेव जमा खर्ची नोंद संस्थेव्दारे लेख्याला घेण्यात आली आहे. यावरुन एक बाब स्पष्ट होते की, जरी प्रत्यक्ष रोख रक्कमेचा व्यवहार झालेला नसला तरी गौरी मंडल हिच्या खात्यातील रक्कम रु.2,90,000/- काढून ती रक्कम नगदी स्वरुपात पूर्णपणे देण्यात आली नाही तर, त्यातील 2,75,000/- अर्जदाराचे मुदत ठेव खात्या मध्ये जमा करण्यात आली. गै.अ.पतसंस्थेने हे नाकारले नाही की, गौरी मंडल हिचे खात्यात कोणतीही प्रत्यक्ष रक्कम जमा करण्यात आलेली नाही, तरी तो खाता बंद करुन अर्जदाराचे मुदत ठेव खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. वास्तवीक प्रमाणित लेखापरिक्षक अब्दुल रशिद यांच्या परिक्षण अहवालावरुन सत्य बाब दिसुन येते की, गोपाल मंडल यास एम.एस.एन्टरप्रायझेस, नागपूर चेक क्रं. 90457 रु.2,88,700/- दि.24/2/10 रोजी दिला, त्या चेकची रक्कम यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शाखा चंद्रपूर, येथील संस्थेचा खाता क्रं. 1121 मध्ये दि.24/2/10 ला जमा झाला. सदर चेक हा रु.2,88,700/- चा होता त्यामुळे त्याच्यात फरकाची रक्कम रु.1300/- भरणा करुन गोपाल मंडल यांनी त्याची पत्नी गौरी मंडल हिचे नावाने मुदत ठेवी मध्ये ठेवले. यावरुन प्रत्यक्ष पतसंस्थेत रक्कम प्राप्त झाली हे सिध्द होतो. आणि त्यामुळेच ट्रान्स्फर एंन्ट्रीव्दारे, अर्जदाराचे मुदत ठेव खात्यात तिचे खात्यातुन ट्रान्सफर करण्यात आली. गोपाल मंडल हा पतसंस्थेचा जबाबदार संचालक अध्यक्ष होता, व संस्थेत कार्यरत असतांना कृत्य केलेले आहे. त्यामुळे गै.अ.पतसंस्था ही संचालकाच्या कार्याकरीता जबाबदार आहे. त्यामुळे गै.अ.पतसंस्था अर्जदारास मुदतठेव प्रमाणपञ 91 नुसार रु.3,02,500/- देण्यास जबाबदार आहे. गै.अ.पतसंस्थेने या मुदत ठेवीवर तारण कर्ज दिले असल्याचे मान्य केले असल्याने आणि अर्जदाराने ही तारण कर्ज उचल केल्याचे मान्य केले असल्याने, देय असलेल्या रक्कमेतुन तारण कर्ज व त्यावरील व्याज वजा जाता उर्वरित रक्कम दि.08/03/2011 पासुन बचत खात्याचा व्याजदर द.सा.द.शे 6 टक्के प्रमाणे देण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
15. गै.अ.याने लेखीउत्तरात असा मुद्दा उपस्थित केला की, तक्रारीतील मुद्दा गुंतागुंतीचा असल्याने सखोल पुरावा घेणे आवश्यक आहे, यामुळे तक्रार मंचाचे अधिकार क्षेञात येत नाही. तसेच अर्जदार हा संस्थेचा सदस्य किंवा जमाकर्ता नाही व म्हणून संस्थेचा ग्राहक नाही. गै.अ.पतसंस्थेचे हे म्हणणे संयुक्तीक व न्यायोचित नाही. गै.अ.पतसंस्थेने मुदत ठेव मध्ये रक्कम असल्याचे मान्य करुन, त्यावर तारण कर्ज दिल्याचे सुध्दा मान्य करणे आणि स्वतःच्या बचावाकरीता जमाकर्ता नाही असे म्हणणे न्यायसंगत नाही. एकदा एक बाब मान्य करुन ती नाकारणे पुरावा कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राहय धरण्यास पाञ नाही. अर्जदार हा गै.अ.पतसंस्थेचा मुदत ठेव खातेदार असुन त्याचा खाता क्रं.130 आहे. गै.अ.पतसंस्थेने खाते उता-याची प्रत ब-10 वर, नि.13 च्या यादीनुसार दाखल केली आहे. गै.अ.पतसंस्थेने गौरी मंडल हिच्या खाते उता-याची प्रत सुध्दा दाखल केली आहे. त्यात सुध्दा to Fd-130 Abhijeet Sakharkar अशी नोंद घेतली आहे. अर्जदार हा पतसंस्थेचा खातेदार असल्याने ग्राहक होतो. तसेच अर्जदार व गै.अ.च्या कथनावरुन खुप सखोल पुरावा घेणासारखा मुद्दा नाही त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत तक्रार मंचाला निकाली काढण्याचा अधिकार आहे. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 16. एकंदरीत अर्जदाराने मुदत ठेवीची रक्कम गै.अ.ला मागणी करुन दिली नाही व अर्जदारास मानसीक शारीरीक ञास सहन करावा तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यापोटी रु.2,00,000/- ची मागणी अर्जदाराने केली आहे. परंतु त्याबाबत अर्जदाराने ठोस पुरावा दाखला केलेला नसल्याने ही मागणी पूर्णपणे मंजुर करण्यास पाञ नाही. 17. एकंदरीत उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.पतसंस्थेने सेवा देण्यात न्युनता केली या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार अंशतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदारची तक्रार अंशतः मंजुर. (2) गै.अ.पतसंस्थेने अर्जदारास मुदत ठेव खाता क्रं.130 मधील देय असलेले रु.3,02,500/- मधून तारण कर्जाचे रु.50,000/- व व्याज वजा करुन उर्वरित रक्कम दि.8/3/11 पासुन रक्कम अर्जदाराचे हातात पडे पर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (3) गै.अ.पतसंस्थेने अर्जदारास मानसीक, शारिरीक ञासापोटी व आर्थिक नुकसान पोटी एकमुस्त रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.500/- आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (4) अर्जदार व गै.अ. यांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 22/02/2012. |