:: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती वैद्य ( गाडगीळ )मा.सदस्या
१. गैरअर्जदार यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार एक सहकारी संस्था असून व्यवस्थापन बदलल्यानंतर व नाव बदलल्यानंतर गैरअर्जदार संस्थेचे पंजीबद्ध कार्यालय पहिला माळा गिरनार चौक चंद्रपूर येथे झालेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक १ कडे दिनांक ०९.०३.२००९ .रोजी बचत खाता क्रमांक ९८८ उघडले असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा खातेदार आहे.अर्जदाराने पासबुकची झेरॉक्स दाखल केली असून ती दस्त क्रमांक १ आहे. अर्जदार अगोदर गैरअर्जदार संस्थेच्या अभिकर्ता होता .गैरअर्जदार संस्थेचे खातेदाराचे घरून गैरअर्जदार संस्थेचे करिता दैनिक बचत खात्याचे किंवा आदी खात्यांचे पैसे घेऊन गैर अर्जदाराकडे जमा करायचे याकरता गैरअर्जदार मोबदला म्हणून ३.५ टक्के कमिशन द्यायचे. हे कमिशन अर्जदार आपले बचत खात्यात जमा करायचा याचप्रमाणे अर्जदाराने गैर अर्जदाराकडे दिनांक ०५.०२.२००९ रोजी ५०००/- रुपये मुदत ठेव जमा केलेली रक्कम गैरअर्जदाराने दिनांक ०४.०२.२०१२ रोजी ११ टक्के व्याजासह अर्जदारास परत करण्याची मान्य केले. मुदत ठेवीची पावती क्रमांक ८६ गैरअर्जदाराने जारी केली असून ती दस्त क्रमांक २ दाखल आहे. सन २०११ मध्ये गैर अर्जदाराचे व्यवहारात त्यांचे पदाधिकाऱ्यांनी अनेक घोटाळे व गैरप्रकार केल्यामुळे संस्था डबघाईस आली व म्हणून संस्थेने वेळोवेळी आपले कार्यालय देणेकरी लोकांचा त्रास होऊ नये म्हणून बदलवले अर्जदारास जुलै २०११ मध्ये पैशाची नितांत गरज असल्यामुळे दिनांक १२.०७.२०११ रोजी अर्जदाराने गैरअर्जदार वरील मुदत ठेवीची रक्कम मुदतपूर्व देण्याची विनंती केली सदर अर्ज दस्त क्रमांक ;अ-३ वर दाखल आहे. अर्ज प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या खात्यातील रकमेची उचल दिली नाही त्याने वारंवारतेचे बचत खाते क्रमांक ९८८ मधील जमा रकमेची गैर अर्जदारास मागणी केली परंतु वगैरे गैरअर्जदाराने अर्जदारास बचत खात्यातील रक्कम सुद्धा उचल करून दिली नाही. त्यामुळे शेवटी अर्जदाराने दिनांक २७.०८.२०१२ रोजी गैरअर्जदाराला लेखी अर्ज देऊन वरील दोन्ही खात्यातील रकमेची मागणी केली परंतु गैरअर्जदार क्रमांक २ ह्यांनी रक्कम देण्यास नकार दिला व शेवटी अर्जदाराने दिनांक १०.०९.२०१२ रोजी पजीबद्ध डाकेनेपत्र पाठविले सादर पत्र अ-५ वर दाखल असून त्यांची पोच पावती अ- ६ दाखल आहे. अशा प्रकारे वारंवार विनंती करून सुद्धा आधार क्रमांक १ कडे त्यांचे दोन्ही खात्यात जमा असलेली रकमेची गैरअर्जदार क्रमांक १ ने दिली नाही वास्तविक प्रचलित नियमानुसार एखाद्या खातेदार ग्राहकाला त्याची मुदत ठेवीतील रक्कम मुदतपूर्व उचल करावयाची असल्यास प्रचलित दरापेक्षा एक टक्का कमी दरात अशा रकमेची उचल देणे गैरअर्जदार संस्थेला बंधनकारक आहे .परंतु अर्जदाराने वारंवार विनंती करून सुद्धा गैरअर्जदाराने त्याचे खात्यातील जमा असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने गैरअर्जदाराने अवलंबलेली अनुचित व्यापार पद्धती असून अर्जदाराला दिलेली न्यूनतम सेवा आहे. अर्जदाराने सादर तक्रार मंचात दाखल केली आहे.
२ .अर्जदाराची मागणी अशी आहे की गैर अर्जदार क्रमांक एक व दोन यांनी अर्जदारास जमा असलेली बचत खाता क्रमांक ९८८ मधील संपूर्ण रक्कम १२ टक्के व्याजासह व मुदत ठेव खाता क्रमांक ८६ मधील ६८३७ /- रुपये व त्यांवर दि.०५.०२.१२ पासून रक्कम अर्जदाराचे पदरी पडेपर्यंत द.स.द.शे १८ टक्के व्याज दराने रक्कम अर्जदारास देण्यात यावी.
तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रु. १५,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रु. १०,०००/- मिळण्यात यावा.
३. अर्जदारची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदाराला नोटीस पाठवण्यात आले आहे गैरअर्जदार उपस्थित राहून अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढून नमूद केले की निशांत शामराव हजारे हे दैनिक आवर्ती जमा खात्याचा अभिकर्ता म्हणून काम करीत होते. गैरअर्जदाराला संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य सप्टेंबर २०१० बदलले व नवीन कार्यकारिणी व संचालक मंडळ अस्तित्वात आले. व त्यांनी सोसायटीचे काम दिनांक ०८.०९.२०१० आणि ०३.११.२०१० पासून हाती घेतली. सर्व आर्थिक व्यवहार नवीन संचालक मंडळाने परीक्षेत लेखांचा ताळेबंद प्रमाणीत लेखा परीक्षक श्री. डाखोरे राहणार चंद्रपूर यांनी प्रमाणित केली होती .नवीन संचालक मंडळाने काम सुरू केल्यानंतर असे लक्षात आले की अभिलेख खात्यात दैनिक आवर्ती जमा खाते बचत खाते मध्ये अतिशय जास्त अनियमितता व विसंगती आढळून आली व प्रमाणित लेखापरीक्षकांनी त्यांच्या परीक्षीत लेखाच्या ताळेबंदातील शिल्लक यामध्ये अतिशय जास्त फरक होता व त्यामुळे दिलेल्या दोन रकमेत तालमेल करता येत नव्हता. यासंबंधी गैअर्जदाराने उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे दिनांक ८.३.२०११ रोजी लेखी माहिती कळविली. संचालक मंडळाच्या दिनांक १५.२.२०११ रोजी झालेल्या सभेत या संदर्भात सखोल लेखा परीक्षण करण्यात आली. आर्थीक वर्षे २००८-२००९,२००९-२०१०,२०१०-२०११ या अवधीच्या झालेल्या अनियमितता व विसंगती दुरुस्त करण्याच्या उद्देशाने लेखा परिक्षकानी दिनांक ३०.०३.२०११ रोजी अशी माहिती दिली की कोणत्याही ठेवीदाराचे रक्कम लेखापरीक्षण पूर्ण झाल्याशिवाय देण्यात येऊ नये कारण त्यामुळे लेखापरीक्षण अहवाल तयार करीत असताना लेखापरीक्षणाची पुन्हा विसंगती व फरक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही व तो धोका टाळण्यासाठी ठेवीदारांची रक्कम सध्या त्यांना देण्यात येऊ नये अर्जदारांनी रक्कम मागणीकरता अर्ज दाखल केला त्यावेळी म्हणजे दिनांक १२.०७.२०११ रोजी नवीन संचालक मंडळाच्या समितीद्वारे जुन्या समितींनी द्यायचे हिशेब खाते तपासून पाहण्यात येत होते व त्यावेळी लेखा पुस्तकं विसंगती आढळल्यामुळे फेर लेखा परीक्षण सखोलरीत्या करण्याचे ठरवण्यात आले. ह्या करण्यास तेव्हा अर्जदाराला त्यांची तथाकथित जमा असलेली रक्कमही जी वास्तविक त्यांच्या अभिकर्ता या नात्यांने ठेवण्यात आली होती व नियमाप्रमाणे आवश्यक असलेली अमानत रक्कम होती, फेर लेखा परीक्षण पूर्ण झाल्यावर परत करणे आर्थिक धोरणाच्या दृष्टिकोनातून योग्य उपयुक्त नव्हते. गैरअर्जदाराला अर्जदाराचे मागणी मान्य करण्यास कोणतीही हरकत नव्हती पण प्रत्यक्षात तसे झाले नाही व म्हणूनच अर्जदाराला त्यावेळी रक्कम देण्यात आली नाही. अर्जदाराच्या बचत खाते क्रमांक ९८८ मध्ये दिनांक ०८.०५.२०१0 ते दिनांक ३०.०६.२०१० पर्यंत जमा करण्यात आलेली रक्कम रुपये ६४,८९५/- ही अर्जदाराने अभिकर्ता म्हणून काम करीत असताना स्वतःच्या मार्फत उघडलेल्या विविध दैनिक बचत ठेव खात्यामधून परस्पर वळती करण्यात आलेली आहे. याबाबत चौकशी केली असता अर्जदाराने स्वतः गैरअर्जदार संस्थेच्या तात्कालीन पदाधिकाऱ्यांना असे कळले होते की संबंधित दैनिक बचत ठेवीदारांचे भुगतान अर्जदाराने स्वतःच्या खिशातून केले होते व करिता तत्कालीन व्यवस्थापकाने अर्जदाराच्या सांगण्यावरून व अर्जदाराने सादर केलेल्या व्हाऊचर वरून उपरोक्त रक्कमा संबंधित दैनिक बचत ठेव खात्यामधून खातेदारांच्या विविध दैनिक बचत ठेव खात्यांमधून अर्जदाराच्या बचत खाते क्रमांक ९८८ मध्ये वळत्या केलेल्या आहेत अर्जदाराने खातेदाराचे दैनिक बचत ठेव खात्याचे पासबुक संस्थेकडे परत केलेले नाही. अर्जदाराला दिनांक १२.०७.२०११ रोजी स्पष्ट सांगण्यात आले होते की उपरोक्त आवश्यक औपचारीकता त्यांनी त्वरित पूर्ण कराव्यात जेणेकरून त्यांना मुदत ठेव रक्कम नव्हे तर बचत ठेव खाते ९८८ मधिल रक्कम परत करता येईल. परंतु खेद पूर्वक असे नमूद करण्यात येते की अर्जदाराने दिनांक १२.०७.२०११ पासून आजतागायत उपरोक्त आवश्यक त्या औपचारीकता पूर्ण करण्याचा कधीही प्रयत्न केलेला नसून अभिकर्ता म्हणून आपली जबाबदारी योग्य रूपाने पार न पाडता उलटपक्षी अनावश्यक व बनावटी पत्रव्यवहार करून निरर्थक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्जदारा हे गैरअर्जदाराचा त्याचा ग्राहक नसून अभिकर्ता . अभिकर्ता या नात्याने अर्जदारांची भूमिका निष्काळजीपणाची असून बंद झालेल्या दैनिक ठेवीदारांची ओरीजनल पासबुक जमा न करता त्याची दावेदारी पूर्णपणे संपुष्टात न आणता स्वतःची दावेदारी कायम करण्याचा निरर्थक प्रयत्न अर्जदाराने केलेला आहे. संस्थेची एकूण रुपये ६४,८९५/- रुपयांची दावेदारी गैरअर्जदार संस्थेला कधीही मान्य नव्हती किंवा नाहीत. जोपर्यंत अभिकर्ता या नात्याने अर्जदार सर्व जबाबदाऱ्या संपुष्टात येत नाही तोपर्यंत अभिकर्त्याची अमानत रक्कम म्हणून सुरक्षीत ठेवण्यात आलेली मुदत ठेव रक्कमही परत करता येऊ शकत नाही. सबब मंचाला निवेदन आहे की अर्जदार हा संस्थेचा ग्राहक नसून अभिकर्ता आहे, करिता त्याची तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी.
४.. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार क्र. १ व 2 यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार क्र.१ व 2 यांनी तक्रारदारास
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार क्र. १ व 2 तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३ . आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व 2 बाबत :
५. अर्जदार याने गैरअर्जदार पतसंस्थेकडे दिनांक ०१.०३.२००९ रोजी बचत खाता क्रमांक ९८८ उघडले असून सदर पासबुकाची झेरॉक्स तक्रारीत अ-1 वर आहे व त्याचप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे.०५.०२.२००९ रोजी रु.५०००/- मुदतठेव जमा केले ही रक्कम गैरअर्जदार अर्जदाराला दिनांक ०४.०२.२०१२ रोजी ११ टक्के व्याजाने परत करायची होती, सदर मुदतठेवीची पावती क्र.८६ तक्रारीत अर्जदाराने अ-३ वर दाखल १ आहे.यावरुन ही बाब सिध्द होत असून वाद नाही कि अर्जदार हा संस्थेचा ग्राहक आहे .परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराच्या तक्रारीतील कथनावर आक्षेप घेवून कथन केले की सन २०११ मध्ये गैर अर्जदाराचे संस्थेत पदाधिकाऱ्यांनी अनेक घोटाळे व गैरप्रकार केल्यामुळे संस्था डबघाईस आली. संस्थेचे तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अर्जदाराला सांगितले होते की संस्थेचे सखोल लेखापरीक्षण २००९ ते २०११ या कालावधीसाठी सुरू असल्यामुळे अर्जदाराची रक्कम परत करता येणार नाही. परंतु नियमाप्रमाणे अंतर्गत लेखा परीक्षणासाठी खातेदाराची रक्कम उचल न करून देणे ही गैर अर्जदारानी अवलंबलेली चुकीची पद्धत असून सेवेत दिलेली न्युनता सिद्ध होत आहे. तसेच गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी उत्तरात अतिरिक्त बयानात ही बाब कबूल केलेले आहे की रू. ६४,८९५/- ची दावेदारी गैरअर्जदार संस्थेला कधीही अमान्य नव्हती. गैर अर्जदाराच्या युक्तिवादही रकमेबाबत गैरअर्जदाराने नकार दिला नाही. संस्थेच्या अंतर्गत वादाबाबत कोणत्याही खातेदाराची रक्कम थाबवून ठेवणे किंवा देण्यास नकार देणे ही बाब मान्य करण्यासारखी नाही गैर अर्जदाराला जर अर्जदार हा अभिकर्ता या नात्याने त्यांच्यावर काही परिणामाची किंवा जबाबदारी प्रत्यक्षरीत्या टाकायची असल्यास अर्जदाराने गैरअर्जदार विरुद्ध वेगळी कायदेशीर कारवाई करण्यास मोकळीक आहे. तसेच गैर अर्जदार यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे की अर्जदाराला संस्थेचा अभिकर्ता असताना अर्जदारातर्फे बचत खाते उघडण्यात आलेल्या खातेदाराचे पासबुक व रक्कम खात्यात जमा केली नाही परंतु ही बाब सिद्ध करण्याकरिता गैरअर्जदाराने तक्रारीत कोणताही दस्तावेज दाखल केलेले नाहीत. परंतुगैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी अर्जदारास गैरअर्जदाराकडे रकमेची वारंवार मागणी करून सुध्दा नकार देऊन अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केलेला आहे तसेच अर्जदाराला न्यूनता पूर्ण सेवा दिली आहे ही बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
६.. मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) तक्रार क्र. २४/२०१३ अंशत मान्य करण्यात येते.
(२) गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्यास सेवा सुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
(३) गैरअर्जदार क्र.१व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या बचत खाता क्र. ९८८ मधील संपूर्ण रक्कम ९%व्याजासह तसेच मुदतठेव क्र. ८६ मधील रक्कम रु ५०००/- व त्यावरील नियमाप्रमाणे व्याजाची रक्कम तक्रारकर्त्यास या आदेश प्राप्त दिनांकापासून ३०दिवसांत अदा करावी.
. .
(४) गैरअर्जदार १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक ञास व तक्रार खर्चापोटी एकत्रीत रक्कम रु १०,०००/- तक्रारकर्त्यास, आदेश प्राप्त दिनांकापासून ३०दिवसांत द्यावे.
(५) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
अधि. कल्पना जांगडे (कुटे) अधि. किर्ती वैदय (गाडगिळ) श्री. उमेश वि. जावळीकर
मा.सदस्या मा.सदस्या मा. अध्यक्ष