नि.14 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 203/2010 नोंदणी तारीख – 30/08/2010 निकाल तारीख – 9/3/2011 निकाल कालावधी – 189 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री प्रविण रामचंद्र साळुंखे रा. यशवंतनगर, ता.कराड जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री सागर जाधव) विरुध्द 1. सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड तर्फे श्री हा.करीम रज्जाक खैरतखान चेअरमन, सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड नं.1 रा. 113, रविवार पेठ, कराड ता.कराड जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत बचत खाते सुरु केले. सदरचे बचत खात्यामध्ये रक्कम रु.5,051/- इतकी रक्कम शिल्लक आहे. सदर रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 1 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 6 सोबत बचत खात्याचे पासबुक दाखल केले आहे. सदरचे बचत खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्या खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि. 5/1 कडील रक्कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस पाहिली असता अर्जदार यांनी बचत खात्यातील रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी बचत खात्यातील रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि. 6 कडील बचत खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 4. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना त्यांचे बचत खाते क्र.146 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 3,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 9/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |